Gazal Alagh Biography In Marathi |Mamaearth Business Case Study

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now
 
 

• गझल अलग यांचा परिचय :

 
शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमामुळे प्रसिद्ध असलेल्या गझल अलघ यांचा जन्म 02 सप्टेंबर 1988 ला चंदिगड येथे झाला.
 
त्यांच्या वडिलांचे नाव कैलास साहनी आणि आईचे नाव सुनिता साहनी असे आहे . त्यांना एक भाऊ आणि बहीण आहे. त्यांची नावे चिराग साहनी आणि साहिबा साहनी आहे. पती वरुन अलघ हे आहेत. त्यांच्या मुलाचे नाव अगस्त्य हे आहे

 
∆ गझल यांचे शिक्षण :
 
गझल अलघ यांनी पंजाब विद्यापीठ येथून 2010 मध्ये बॅचलर इन कम्प्युटर एप्लीकेशन ची पदवी घेतली. त्यानंतर 2013 मध्ये मॉडर्न आर्ट इन डिझाईन आणि अप्लाईड आर्ट्समध्ये उन्हाळी गहन कोर्स तसेच न्यूयॉर्क अकादमी ऑफ आर्ट मध्ये अलंकारिक कला मध्ये गहन कोर्स केलेला आहे.
 
∆ गझल यांना मिळालेले पुरस्कार :
 
सन 2018-19 मध्ये त्यांना ममाअर्थसाठी वर्षातील सर्वोत्कृष्ट ब्रँड हा पुरस्कार मिळाला. 2019 मध्येच सुपर स्टार्टअप आशिया पुरस्कार हा देखील मिळाला .
 
 
∆ ममाअर्थ ची सुरुवात :
 
गझल यांचा बाळाला एलर्जी असल्यामुळे विविध प्रकारच्या क्रीम,लोशन लावत असायच्या. ते त्यांच्या बाळाला सुट होत नसायचे. तो सतत रडायचा मग त्यांनी मार्केटमध्ये मिळणाऱ्या सर्व प्रकारचे लोशन वापरायला चालू केले.
 
विदेशातून बनणाऱ्या लोशन चा उपयोग चालू केला. ते लोशन लावल्यानंतर त्यांचा बाळ शांत बसायचा. मग त्यांनी भारतात अशा क्रीम का बनत नाहीत याचा विचार केला. त्या विदेशी क्रीम मध्ये कोणते घटक आहेत आणि भारतीय बनावटीच्या क्रीम मध्ये कोणत्या प्रकारचे घटक आहेत याचा अभ्यास केला. येथील विविध उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वतःच क्रीम बनवण्याचा निर्धार केला .
 
सुरुवातीला त्यांनी जवळपास 700 पालकांसोबत चर्चा करून त्यांना त्या क्रीमचे सॅम्पल देऊन त्यांची मते घेतली. त्यांनी दिलेल्या सल्ल्यांवरती ते काम करू लागले. चालू असलेली नोकरी सोडून व्यवसाय करण्यासाठी त्यांच्या घरच्यांचा विरोध होता.
 
 
पण त्यांनी हार न मानता व्यवसायाची सुरुवात केली आणि आज आपण त्याचे फळ पाहतच आहोत.
 
• त्यांनी सुरुवातीपासूनच ऑनलाईन मार्केटिंग, इन्फ्लोअन्सर्स, आणि डिजिटल क्रियेटर्स यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केली. सुरुवातीला फक्त लहान बाळांसाठींचे लोशन,क्रीम बनवू लागले. त्यानंतर हळूहळू फेस वॉश तसेच इतर उत्पादन निर्मिती कडे वळाले.
 
 
ममाअर्थ या कंपनीमध्ये बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनीही गुंतवणूक केलेली आहे. तसेच ते या प्रॉडक्ट मार्केटिंग सुद्धा करताना आपल्याला दिसतात.
 
……………………………………………………………………
” तुमचा एक निर्णय तुमचे आयुष्य बदलू शकतो “
……………………………………………………………………
 
त्यांचा मुलगा अगस्त्य याला एलर्जी असल्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक क्रीमच्या शोधात सुरू केलेला प्रवास आज त्यांचा करोडोंचा बिझनेस झालेला आहे. एका आईने मनावर घेतलं तर ती काहीही करू शकते यावरून सिद्ध होते.
 
∆ गझल अलघ यांचे सध्या इंस्टाग्राम वरती 590 हजारांपेक्षा अधिक Followers आहेत. त्या सतत त्यांच्या चाहत्यांसाठी विविध ठिकाणी ट्रीप वर गेल्यावरती फोटो अपलोड करत असतात.
त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीचे काही वर्ष त्या फक्त चार ते पाच तास झोपत होत्या. त्यांचे बाळ अगस्त्य याची देखरेख व्यवसायाची उलाढाल यामध्ये त्या खूप मेहनत घेत होत्या आणि आज त्यांची मेहनत खऱ्या अर्थाने सफल झाली असेच म्हणता येईल.
 
कोणतीही बिझनेस स्टडी मॅनेजमेंट चा कोर्स न करता जर एखादी व्यक्ती एवढा मोठा करोडोंचा व्यवसाय करू शकते. तर मित्रांनो आपण पण त्यातून काहीतरी शिकायला पाहिजे.
 
शून्यातून विश्व निर्माण करणं काय असतं ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.
 
∆ शार्क टॅंक चा फायदा :
 
गझल अलघ या शार्क टॅंक मध्ये गुंतवणूकदार म्हणून आल्या होत्या त्यांनी विविध स्टार्ट अप्स मध्ये गुंतवणूक केलेली आहे.
 
 
त्यांचा मनमिळावू स्वभाव चहात्यांना सतत आकर्षित करत असतो. शार्क टॅंक इंडिया मुळे त्यांना तसेच त्यांच्या व्यवसायाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
 
 

अशाच प्रकारच्या प्रेरणादायी पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा


Leave a Comment