Mukesh Ambani Biograpy In Marathi
मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी एडन, यमन येथे झाला.
आज जागतिक पातळीवरती ज्या मोठमोठ्या उद्योजकांचे नाव आदराने घेतले जाते त्यात टाटा, मित्तल, जिंदाल, बिर्ला, महिंद्रा यांच्यासोबत एक नाव ठळकपणे उठून दिसते ते म्हणजेच मुकेश धीरूभाई अंबानी.
नाव : मुकेश धीरूभाई अंबानी
जन्म : 19 एप्रिल 1957 (एडन, यमन)
आई : कोकिळाबेन धीरूभाई अंबानी
भाऊ : अनिल अंबानी
पत्नी : निता अंबानी
अपत्ये : आकाश, ईशा,अनंत
निवास स्थान : अँटेलिया, मुंबई
राष्ट्रीयत्व : भारतीय
शिक्षण : सेंट झवियर्स कॉलेज, मुंबई
पेशा : व्यवसाय
प्रसिद्ध उद्योजक धीरूभाई अंबानी यांना सर्वच ओळखतात त्यांच्या समृद्धीचा वारसा नुसता चालवलाच नाही तर कित्येक पटीने मुकेश यांनी पुढे नेला आहे. रिलायन्स या एका शब्दाने आजच्या मध्यमवर्गीय कुटुंबात जगण्याची पद्धत पार बदलून टाकली आहेत.
दररोज लागणाऱ्या किराणा, भाजीपाल्यापासून ते आजच्या काळात अनिवार्य असलेल्या मोबाईल ,वाय फाय, फोन ,पेट्रोल या सर्व गोष्टी सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा दरात आणि तसेच जलद पुरवण्यात रिलायन्सने सर्वत्र बाजी मारलेली आहे.
आज जगातील अव्वल 10 अशा संपन्न व्यक्तींपैकी एक म्हणून मुकेश अंबानी हे प्रसिद्ध आहेत. मुकेश यांनी आयुष्यात कधीही मद्यपानाला स्पर्श केला नाही तसेच ते मांसाहार ही करीत नाहीत त्यांना साधे आणि सकस शाकाहारी जेवण आवडते.
अगदी रस्त्यावरच्या गाड्या पासून ते जगातील अत्यंत प्रतिष्ठित हॉटेलमध्ये त्यांनी आजपर्यंत अनेक वेळा जेवण घेतलेले आहे. त्यांना डाळ, भात, पोळी ,भाजी असे सात्विक आहार आवडतो.

परदेशात शिकत असतानाच त्यांना धीरूभाईंनी भारतात बोलावले . भारतात आल्यानंतर त्यांना अत्यंत महत्त्वाच्या आणि भव्य अशा पाताळगंगा येथील एका नव्या कारखान्याच्या उभारणीची जबाबदारी दिली ती जबाबदारी मुकेश यांनी अत्यंत समर्थपणे पेलली. अगदी लहानशा वयात म्हणजेच 18 व्या वर्षीच मुकेश यांना संचालक मंडळावर घेतले होते.
Reliance Industries Ltd Success Story
अब्जाधीश असणारे मुकेश हे भारतातील सर्वात श्रीमंत गृहस्थ आहेत. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्न पैकी 5% हे त्यांच्या उद्योगातून येते.
ते अत्यंत कठोर परिश्रम करणारे आहेतच त्याचबरोबर त्यांना वेळ घालवायला आवडत नाही. दररोज पहाटे पाच ते साडेपाच च्या दरम्यान ते उठतात नंतर ते नियमाने आपल्या व्यायाम शाळेत जातात नंतर वृत्तपत्रावरून नजर फिरवतात.
हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्यालयात जाण्यापूर्वी ते आवर्जून आईच्या पाया पडतात तिचा आशीर्वाद घेतात आणि कित्येक वेळा त्यांच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये नाश्त्यासाठी ते जातात. संध्याकाळी घरी परतल्यावर ती पत्नी निता बरोबर दिवसभरातील घडामोडी वर चर्चा करतात.
मुकेश यांना मोटार गाड्यांचा संग्रह करण्याचाही खूप छंद असून त्यांच्या ताब्यात आज सुमारे 170 गाड्या आहेत. त्यामध्ये जगातील बहुतेक सर्व नामांकित कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे.
अंटेलिया निवासस्थान:
अरेबियन सागरावर नजर ठेवता येईल अशा अंटेलिया या भव्य आणि जगातील अत्यंत महाग अशा बंगल्यात अंबानी कुटुंब राहतात.37106 वर्ग मीटर, 27 मजले, १७० मोटार गाड्या लावता येतील असे समजले कार पार्किंग असे या भव्य दिव्य निवासस्थानाचे स्वरूप आहे.
यामध्ये 600 कर्मचारी, 40 अंगरक्षक आणि या सर्व वरती लक्ष ठेवण्यासाठी पर्यवेक्षण करणारे प्रत्येक मजल्याला एक व्यवस्थापक असे हे जगातील एकमेव ठिकाण आहे. तसेच यामध्ये पन्नास जण बसू शकतील असे एक थेटर आणि छानशी बागही आहे.

जियो ची क्रांती :
संदेशवहन क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी रिलायन्स टेलिकॉम ही कंपनी स्थापन करण्यात आली पुढे मुकेश आणि अनिल यांच्यात विभाजन झाल्यावर अनिल अंबानी यांच्याकडे हे क्षेत्र गेले.
मुकेश यांना या क्षेत्रात रस होता पण त्यांनी आपापसात स्पर्धा न करण्याचा करार केल्यामुळे त्यांना या क्षेत्राकडे येता आलं नाही. त्यानंतर 2010 मध्ये अनिल अंबानी यांच्यासोबत झालेल्या का करारामध्ये या गोष्टीला पूर्णविराम मिळाला.
2016 पर्यंत भारतातील फक्त 50 टक्के लोकांकडे मोबाईल फोन होते म्हणजेच या क्षेत्रात व्यवसायाच्या भरपूर अशा संधी निर्माण होणार होत्या मुकेश यांनी या संधी ओळखल्या आणि एका विशिष्ट पद्धतीने या कामावर मात करण्याची त्यांनी योजना आखली.
जिओ बाजारात आणून त्यांनी स्पर्धकांची जणू काही झोपच उडवली त्यांनी आपले दर एवढे कमी ठेवले की अनेक लहान आणि मध्यम स्पर्धकांना त्याला तोंड देणे अशक्य झाले.
रिलायन्स जिओनी बाजारपेठेत एखादी वादळ निर्माण होईल अशी झेप घेतली आणि स्पर्धकांना टिकाव करणे हे अवघड झाले. सुरुवातीच्या काळात दर एका गिगाबाइटला सात ते सहा रुपये इतका किरकोळ असा दर होता याशिवाय बोलण्याचे काही पैसे पडत नव्हते ते देखील अगदी मोफतच होते.
आज रिलायन्स पेट्रोल पंप, रिलायन्स स्मार्ट, रिलायन्स डिजिटल, रिलायन्स ट्रेंड्स, असे कित्येक उद्योग अंबानी कुटुंब चालवतात.
अगदी थोडक्यात अशी प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या बद्दल माहिती दिली आहे. सदर माहिती नियतकालिके, वर्तमानपत्रे आणि इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेली आहे