Prafulla Wankhede Biography | प्रफुल्ल वानखेडे बायोग्राफी | गोष्ट पैशापाण्याची

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now


Prafulla Wankhede Biography 

 

प्रफुल्ल वानखेडे हे अभियांत्रिकी उद्योजक आहेत.Kelvinsgroup, LiquigasIndia,FahrenheitHC आणि आणखी दोन कंपन्यांचे ते संस्थापक अध्यक्ष तसेच चेअरमन आहेत. जवळपास गेल्या वीस वर्षांपासून इंधन, ऊर्जा आणि ऊर्जा निगडित असणाऱ्या व्यवसायांशी भारतभर तसेच जागतिक स्तरावरती काम करतात.
 
∆ प्रफुल्ल यांचे बालपण खूप हलाखीचे असे होते. अगदी शून्यातून आज करोडोंचा व्यापार स्वतःच्या मेहनतीने आणि चिकाटीने उभा केला आहे. काहीतरी करून दाखवण्याची मनामध्ये असलेली जिद्द त्यांना आज यशाच्या शिखरावरती घेऊन गेलेली आहे. 
 
• प्रफुल्ल वानखेडे यांनी त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेबद्दल त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याशी निगडित असणाऱ्या गोष्टींबद्दल  ” गोष्ट पैशापाण्याची “ या त्यांच्या पुस्तकांमध्ये सांगितलेलं आहे.
 
• मराठी माणसाच्या मनामध्ये असलेली व्यवसायाबद्दलची भीती, दडपण याबद्दल सविस्तर तसेच ऊर्जा देणारे असे प्रसंग यामध्ये आहेत. मुंबईसारख्या मायानगरीमध्ये एक मराठी तरुण व्यवसायामध्ये विविध संघर्ष करून घडत असतानाचा हा सर्व किस्सा यामध्ये समाविष्ट आहे.
 
• भरपूर कष्ट करण्याची शिकवण यामध्ये दिलेली आहेत तसेच मिळालेल्या पैशांचा मनमुराद आनंद कशा पद्धतीने घ्यावा आणि एक समृद्ध आयुष्य जगण्यासाठीची देणगी यामध्ये दिलेली आहे.
 
Prafull Wankhede Biography
Prafulla Wankhede Biography

 

बुद्धी असो की पैसा जर योग्य ठिकाणी वापरले नाही तर या दोन्ही गोष्टी वाया जातात. अर्थ साक्षरता म्हणजे पैसे कमावणे एवढेच नव्हे तर त्यामधील असलेली गुंतवणूक होय.
तर माणसाने सर्वात मोठी गुंतवणूक ही स्वतःमध्ये करावी स्वतःच्या ज्ञानावरती पैसे खर्च करावेत असे ते म्हणतात.
 
……………………………………………………………………
” The best investment you can make , 
    is an investment in yourself “
…………………………………………………………………..
 
पुस्तक वाचन करणे ही आपल्यातल्या बदलाची पहिली पायरी आहे आणि सर्वात सोप्पा असणारा मार्ग देखील !!
जरा चक्रवाढ व्याजाप्रमाणे ज्ञान,धन वाढवायचे असेल तर सर्वात प्रथम पुस्तक वाचनात गुंतवणूक करायला हवी ! 
 
∆ लॉकडाऊन पासून  सोशल मीडियाचा तसेच मोबाईल ,टीव्ही यांचा वाढता वापर पाहता तो वेळ कमी करून पुस्तक वाचनाकडे जास्तीत जास्त वेळ द्यावा. जेवढे ज्ञान आत्मसात कराल तेवढेच भविष्यासाठी असलेले ते वरदान आहे.
 
∆ पैशाच्या गुंतवणूकी बरोबरच माणसातली गुंतवणूक ही कधीही फायदेशीर ठरते.

 

एक छोटीशी घटना आहे, प्रफुल्ल यांना व्यवसायाच्या काही कामानिमित्त एका व्यक्तीची सही लागणार होती. ते व त्यांचे सीए त्या मीटिंगसाठी पूर्ण तयारी करून गेले होते. पण समोरची व्यक्ती त्यांचे काही ऐकत नव्हते.
 
तिथे एक लग्नाची पत्रिका आली आणि त्या पत्रिकेवरती प्रफुल्ल यांच्या एका मित्राचे नाव होते. नंतर त्या मित्राच्या ओळखीमुळे त्यांचे ते काम झाले.
 
मित्रांनो कोण, कधी ,कोणत्या रूपामध्ये आणि कसा आपल्या कामाला येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकासोबत चांगल्या प्रकारचा व्यवहार आणि संबंध ठेवावेत.
 
ज्ञानी माणसाकडे अज्ञानी माणसांपेक्षा अधिक धन, ऐश्वर्य, यश त्याचसोबत आनंद येण्याची शक्यता जास्त असते. ज्ञान संपादन करून श्रीमंत होण्याचा सर्वात साधा आणि सोपा मार्ग म्हणजे पुस्तक वाचन, ध्यान करणे, मनन आणि चिंतन होय.
 
• श्रीमंतीचा दिखाऊपणा हा दुसऱ्यांसमोर करण्यापेक्षा जसे आहोत तसे रहावे असा सल्ला त्यांनी यामध्ये दिलेला आहे.
 
Prafull Wankhede Books
 
 
• आज सर्व जग हे इंटरनेट वरती आलेला आहे त्यामुळे फक्त नोकरी करून घर चालवणं अवघड होतं त्यामुळे त्यासोबतच काहीतरी व्यवसाय करण्यासाठी हे पुस्तक नक्कीच मदत करेल.
 
•प्रफुल्ल वानखेडे ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या उद्योजकीय जीवनातले धडे थोडक्यात सांगत होते त्यातून मित्रांच्या आग्रहामुळे त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचे ठरवले. अनेक वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत. गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे.
 
सर्वांनी एकदा नक्की ” गोष्ट पैशापाण्याची ” हे पुस्तक नक्कीच वाचायला हवं.
Prafulla Wankhede Biography_गोष्ट पैशापाण्याची
 
#प्रफुल्लवानखेडे
#prafullaWankhedeBiography 
#GoshtPaishapanyachi
#Mahiteesatha
#BestsellerBook
#TrendingBook
 
 

Leave a Comment