Aditya Birla Group Case Study | Kumar Mangalam Birla Networth

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now
Aditya Birla Group
Aditya Birla Group Case Study
 
मित्रांनो भारताच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये अनेक क्रांतिकारी लोकांनी आपले योगदान दिले एवढेच नव्हे तर आपल्या प्राणाचे बलिदान सुद्धा दिले खूप जण कारागृहात सुद्धा गेले अशा अनेक क्रांतीकारी लोकांचे जीवन चरित्र आपण वाचत असतो. 

Aditya Birla Group Case Study

 
परंतु काही असे क्रांतिकारी पण होते ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आर्थिक स्वरूपात मदत केली. पण आपण त्यांच्याबद्दल जास्त चर्चा करत नाही. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे घनश्यामदास बिर्ला. 
 
Aditya Birla Group
 
त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात आर्थिक स्वरूपात मोठी मदत केली. एवढेच नव्हे तर मागासवर्गीय,दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी लढ्यात भाग घेतला. 
 
भारताच्या अर्थव्यवस्थेमध्येही त्यांचा मोलाचा वाटा आहे. 
• घनश्याम दास हे एकटे नाहीत ज्यांनी बिर्ला समूहाला वाढवलं, तर बिर्ला परिवारातील प्रत्येक व्यक्तीचा यामध्ये खूप मोठा सहभाग आहे. 
 
• आज आपण अंबानी परिवाराबद्दल चर्चा करतो पण एक काळ असा होता जेव्हा फक्त बिर्ला परिवाराची चर्चा असायची. बिर्ला समूह हा आपल्या देशाचा एक जुना आणि मजबूत असा आधार राहिलेला आहे. 


∆ कशी झाली बिर्ला समूहाची सुरुवात :
 
1840 ला शिव नारायण बिर्ला यांचा जन्म झाला. मोठे झाल्यानंतर शिवनारायण बिर्ला यांना काहीतरी वेगळे भव्य असे करायचे होते. म्हणून त्यांनी राजस्थानमध्येच कॉटन ट्रेडिंग व्यवसायाची सुरुवात केली.
 
त्यावेळी कॉटनची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असायची. इंग्रज भारतातून कॉटन विदेशात निर्यात करत होते. पण त्या व्यवसायामध्ये त्यांना नफा होत नाही म्हणून त्यांनी तो व्यवसाय बंद केला. 
 
• 1863 ला शिवनारायण बिर्ला मुंबईमध्ये राहण्यासाठी गेले. तेथे कॉटन ट्रेडिंगचा व्यवसाय पुन्हा नव्या जोमाने सुरू केला.
 
•त्यांना बाळ नव्हते त्यामुळे त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला त्याचं नाव बलदेव दास बिर्ला. 
 
1880 मध्ये शिवनारायण यांनी आपला संपूर्ण व्यवसाय त्यांचा मुलगा बलदेव दास बिर्ला यांच्याकडे सोपवला. त्यानंतर 1887 मध्ये बलदेव यांनी त्यांचा पहिला व्यवसाय कोलकत्ता येथे सुरू केला. त्यावेळेस कोलकत्ता हे भारताची राजधानी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा. 
 


………………………………………………………………
         बिर्ला परिवार 
              • बलदेवदास बिर्ला यांची मुलं
              1. Jugal Kishore
              2. Rameshwar Das
              3. Ghanshyam Birla
              4. Brij Mohan 
………………………………………………………………
 
• 1920 साली बलदेवदास यांनी आपला संपूर्ण व्यवसाय चारही मुलांमध्ये वाटून दिला आणि ते बनारस येथे गेले. 
 
Jugal Kishore आणि Brij Mohan यांनी मिळून मसाल्याचा व्यवसाय सुरू केला.Jugal यांना अपत्य नसल्यामुळे त्यांनी त्यांचा व्यवसाय ब्रिजमोहन यांचा मुलगा गंगाप्रसाद यांच्याकडे सोपवला. 
• गंगाप्रसाद यांनी हिंदुस्थान मोटर लिमिटेड, ओरिएंट पेपर , HIL इत्यादी नामांकित कंपन्यांची सुरुवात केली. 
•1981 ला गंगाप्रसाद यांचे प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे त्यांनी त्यांचा मुलगा चंद्रकांत बिर्ला यांना व्यवसाय सुपूर्द केला.
 
C K Birla यांनी वडिलांच्या पायावर पाऊल ठेवत वेगवेगळ्या कंपन्यांची सुरुवात केली. वडिलांचा व्यवसाय पुढे वाढवत गेले. त्यासोबतच समाजसेवेत ही जे कायम अग्रेसर असायचे. कोरोनाच्या महामारीत C K Birla Group ने जवळपास 35 करोड रुपयांची मदत केली आहे. 
 
∆ 1919 मध्ये घनश्याम दास यांनी Birla Brothers Limited ची स्थापना केली. ग्वालियर मध्ये त्यांनी कपड्याच्या मिलची सुरुवात केली. 
 
•1923-24 मध्ये त्यांनी Kesoram Cotton Mills ची सुरुवात केली. 
• 1924 मध्ये Hindustan Times ची सुरुवात केली.
• 1926 मध्ये Federation Of Indian Chambers Of Commerce And Industry ची सुरुवात केली. 
 
~ घनश्याम दास बिर्ला हे फक्त उद्योजक नव्हते तर एक देशभक्त पण होते. महात्मा गांधीजी यांच्यासोबत त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला होता. 
 
~ भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात त्यांनी तन, मन, धनाने महत्वाचा लढा दिला. 
 
• त्यामुळे 1957 साली त्यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आले. 
 
~ 1958 साली बिर्ला यांनी Hindalco ची स्थापना केली. त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण केल्या. तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. 
 
~ 1964 मध्ये Birla Institute Of Technology And Science ची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक शाळा, मंदिर बांधली.

 


Aditya Birla Group Case Study
Aditya Birla Group Case Study

∆ कोणत्या कोणत्या क्षेत्रात बिर्ला ब्रदर्स व्यवसाय करतात ?
1. Textile 
2. Manufacturing 
3. Cement 
4. Filmers
5. Chemical 
6. Electricity 
7. Fertilizer 
8. Telecommunication 
9. Finance 
इत्यादी क्षेत्रांमध्ये बिर्ला समूह आज अग्रेसर आहेत.

 
• 1983 मध्ये घनश्यामदास बिर्ला यांचे निधन झाले 
आदित्य विक्रम बिर्ला यांच्या निधनानंतर 1985 मध्ये Kumar Mangalam Birla यांच्यावर व्यवसायाची जबाबदारी आहे. 
कुमार बिर्ला यांनी यशस्वीपणे व्यवसाय पुढे नेत आता व्यवसायाची जबाबदारी त्यांच्या मुलांवरती सोपवली आहे. 
1.Ananya Birla
2.Aryaman Birla 
 


Kumar Mangalam Birla Biography 
नाव : कुमार मंगलम बिर्ला 
जन्म : 14 जून 1967 
शिक्षण : BCom (युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई)
              MBA (लंडन बिझनेस स्कूल)
वडील : आदित्य विक्रम बिर्ला 
आई : राजश्री बिर्ला 
पत्नी : नीरजा बिर्ला 
अपत्ये : अनन्या बिर्ला, आर्यमान बिर्ला, अद्वितेशा बिर्ला 
संपत्ती : 2280 करोड 
∆ Kumar Mangalam Birla Networth :
कुमार मंगलम बिर्ला यांचे एकूण संपत्ती 2280 करोड रुपयांची आहे.
 

1 thought on “Aditya Birla Group Case Study | Kumar Mangalam Birla Networth”

Leave a Comment