Anand Deshpande Biography
∆ कोण आहेत आनंद देशपांडे ?
आनंद देशपांडे हे आयटी क्षेत्रातील नामांकित असलेल्या पर्सिस्टंट सिस्टिम्स लिमिटेड चे संस्थापक अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
पर्सिस्टंट सिस्टीम हे 18 देशांमध्ये 23 हजार पेक्षा जास्त कर्मचारी असलेली जागतिक स्तरावरची कंपनी आहे.
साल 1990 पुण्यातला एक तरुण मराठी इंजिनियर मुलगा अमेरिकेमध्ये खूप मोठ्या पगारावर काम करत असतो. परंतु मन अस्वस्थ असतं. पुन्हा भारतामध्ये जाऊन काहीतरी मोठं करायचं असं स्वप्न असतं. पण ते कसं करायचं याचा काही मार्ग सापडत नसतो.
पण त्याच वेळी भारत सरकारने आवाहन केलेले असत ” की जगभरात पसरलेल्या भारतीय तरुणांनी भारतात वापस या आणि आयटी क्षेत्रात काहीतरी नवीन सुरू करा” हा मुलगा या आवाहनाला साथ देतो आणि पुन्हा भारतात येतो.
पण दुर्दैव असं की या तरुणाला एकही दुकान दिले जात नाही. परंतु खचून न जाता हा तरुण सरकारची सतत पत्र व्यवहार करतो आणि मग शेवटी व सरकारी अधिकारी त्याचे स्वतःचे ऑफिस या तरुणाला देऊ करतो. आणि तिथेच सुरू होते पर्सिस्टंट नावाची आयटी कंपनी.
• Personal Details
नाव : आनंद सुरेश पांडे
जन्म : 7 मार्च 1962
जन्मस्थळ : अकोला, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व : भारतीय
शिक्षण :
1. Bachelor technology with honours, IIT Kharagpur, 1984
2. Master of science , Indiana University,1986
3. Doctor of philosophy, Indiana University,1989
वडील : सुरेश देशपांडे
आई : सुलभा देशपांडे
पत्नी : सोनाली देशपांडे
अपत्ये : रिया देशपांडे, अरुल देशपांडे
…………………………………………………………….
” मनामध्ये असलेल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी मी काही गोष्टी लिहून ठेवत असतो “
– आनंद देशपांडे
…………………………………………………………….
∆ आयटी क्षेत्रात महत्त्वाचं काय ?
आयटी हे सर्वात वेगवान गतीने वाढणारं क्षेत्र आहे. त्यामध्ये दररोज काहीतरी नवीन अपडेट्स येत असतात. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मुळे जग खूप वेगाने पुढे जात आहे.
∆ पर्सिस्टंट नाव ठेवण्यामागचं कारण ?
• कम्प्युटरमध्ये काही डेटा हा मेमरी मध्ये असतो तो ट्रान्सजेंट असतो. तसेच काही भेटा हा डिस्क वरती असतो ,डिस्कवर चा डेटा हा persistent असतो.
∆ Persistent System म्हणजे काय ?
Systems that remains persistent on the disk. हे एक टेक्निकल टर्म आहे.
थोडक्यात काय तर, जो डेटा डिलीट होत नाही तो Persistent.
• पर्सिस्टंट चे बरेच अर्थ होतात जसे चिकाटी, सातत्य, सतत काम करत राहणे.
∆ आयटी क्षेत्राची भविष्याची वाटचाल ?
तर आयटी क्षेत्र हे भविष्यकाळात आणखी वाढत जाईल यामध्ये काही शंका नाही. तंत्रज्ञानामध्ये नवीन नवीन शोध लागत आहेत. संशोधन करून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला वेळ लागतो.
∆आयटी क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला:
विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन ज्या गोष्टीला पुढच्या दहा ते पंधरा वर्षात जास्त डिमांड येईल त्याबाबतीत माहिती घेऊन त्यात शिक्षण घ्यावं.
फक्त कॉलेजमध्ये शिकवलं जातं तेवढ्यावर न बसता विविध एक्स्ट्रा कोर्सेस करावे. कॉलेजमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम आणि वास्तवात आयटी क्षेत्रामध्ये असलेल काम यामध्ये खूप अंतर असतो.
• आपल्या करिअरची जबाबदारी ही आपलीच आहे, दुसरा कोणी येऊन मदत करणार नाही हे लक्षात ठेवावं.
• ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करून सुद्धा यातील कौशल्य विकसित केलं पाहिजे. कोणत्याही एका गोष्टीतला सर्वोत्तम व्यक्ती आपण असायला पाहिजे.
∆ Artificial Intelligence च भविष्य काय ?
खूप वर्षापासून आपण AI म्हणजेच Artificial Intelligence बद्दल वाचलं असेल. आणि सर्वांना प्रश्न पडला असेल की नेमका आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नक्की काय ?
– तर हे काय नवीन नाही. मागच्या कित्येक वर्षापासून याच्यावर विविध संशोधन होत आहेत. भविष्यात या क्षेत्रात तसेच Data Science, Machine Learning मध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण होतील.
∆ AI मुळे काही नोकऱ्यांना धोका आहे ?
तर हो नक्कीच वाढत्या तंत्रज्ञानामुळे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे त्यावरती फरक पडणारच याला एकच उपाय आहे. की तंत्रज्ञानाला सोबत घेऊन त्यातील बारीक गोष्टी शिकाव्या लागतील. त्याला दुर्लक्ष करणे घातक ठरू शकत.
∆ What is the Networth of Anand Deshpande :
आनंद देशपांडे यांच्याकडे किती संपत्ती आहे .
आनंद देशपांडे यांनी त्यांचा व्यवसाय दोन लाख रुपये गुंतवून सुरू केला होता. आज त्याची व्हॅल्युएशन 36 हजार करोड रुपयांची आहे.
आनंद देशपांडे यांच्याकडे एकूण 10600 करोड रुपयांची संपत्ती आहे.
आज Persistent System Ltd च्या एका शेअर्सची किंमत हे 3861 रुपये एवढी आहे.
मागच्या एका वर्षात कंपनीने गुंतवणूकदारांना तब्बल 55.44 % एवढा परतावा दिलेला आहे.
तसेच पाच वर्षाचा रिपोर्ट बघितला तर 1126% चा परतावा गुंतवणूकदारांना मिळाला आहेत.
Anand Deshpande Biography | मराठी माणसाने केला करोडोंचा व्यवसाय | Persistent System Ltd | What is Networth of Anand Deshpande
#AnandDeshpandeNetworth
#PersistentSystemLtd
#Googletrending
#Mahiteesatha.in
#AnandDeshpandeBiography
1 thought on “Anand Deshpande Biography |Persistent System Ltd | AI and ML”