Atharva Sudame Biography In Marathi
आपल्या मजेदार आणि मनोरंजनात्मक शैलीने आजूबाजूच्या घटनांवरती व परिस्थितीवर मार्मिकपणे भाष्य करण्याचे कौशल्य दाखवत लहानापासून ते वयस्कर वयोगटातील लोकांचे मनोरंजन करणारा कंटेंट क्रियेटर अथर्व सुदामे हा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे.
सोशल मीडिया वरती सर्वात लोकप्रिय पुणेकर अशी ओळख निर्माण करणाऱ्या अथर्वने आज प्रेक्षकांची मने जिंकलेली आहेत.
अथर्वने 2015 पासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. आज जे त्याचे यश आपल्याला दिसत आहे त्यासाठी त्याची 8-9 वर्षाची मेहनत आहे. लहानपणी टीव्ही वरती क्रिकेटचा सामना बघत असताना अथर्वला आपणही असं काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळे लोक आपल्याला बघतील असं वाटत होते.
नाव : अथर्व सुदामे
जन्म वर्ष : 1998
वय : 26 वर्ष
जन्मस्थळ : पुणे
राष्ट्रीयत्व : भारतीय
धर्म : हिंदू
व्यवसाय : कॉन्टेन्ट क्रियेटर / इन्क्लूएन्सर
पत्नी : ऋचा जोशी (2023)
शाळा : मॉडर्न इंग्लिश स्कूल, पुणे
कॉलेज : मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स, पुणे
शिक्षण : पदवीधर
∆ अथर्व सुदामेच्या प्रसिद्धी मागचे कारण :
1. समाजात घडणाऱ्या घटनेवरती एकदम मार्मिक पद्धतीने तो व्हिडिओ बनवतो.
2. पुणेरी भाषेच्या त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे प्रत्येकाला तो प्रभावित करतो.
3. ” हे काय बरोबर नाही “ हे वाक्य viral झाल्यामुळे त्याला चांगल्या प्रकारे ओळख निर्माण करता आली.
∆ अथर्व सुदामे किती कमवतो :
एका मुलाखतीमध्ये त्याला तो किती कमावतो हा प्रश्न विचारल्यानंतर बोलताना अथर्व म्हणाला “माझ्या कमाईचा जो हिशोब आहे तो सर्व माझी बायको, आई-वडील आणि माझे मित्र बघतात ” ते मी कधीही बघत नाही त्यामुळे मी ते सांगू शकत नाही.
मी फुल टाईम कॉन्टेन्ट क्रिएशन करू शकतो. मी माझं लग्न झालं तरी हे काम पूर्ण वेळ चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्यामधून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो. अथर्व हा महिन्याला लाखो रुपये कमाई करतो.
………………………………………………………………
” हे काय बरोबर नाही “
………………………………………………………………
हे वाक्य आपण अथर्वच्या विविध reels मध्ये नक्कीच ऐकलेल असेल.
∆ उत्पन्नाचे विविध स्त्रोत:
1 . युट्युब वरती 1.02 मिलियन सबस्क्राईबर आहेत आणि साडेपाचशे च्या वरती व्हिडिओ आहेत. त्यामुळे तो चांगल्या प्रकारे कमाई करतो.
2. सोशल मीडिया :
• अथर्वचे इंस्टाग्राम वरती 1.5 मिलियन फॉलोवर्स आहेत आणि जवळपास 1000 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. इंस्टाग्राम वरून सुद्धा चांगले पैसे कमवतो.
3. फेसबुक वरती 122 हजारांपेक्षा जास्त त्याचे फॉलोवर्स आहेत त्यामागील विविध जाहिरातीमार्फत तो महिन्याला पैसे कमवतो.
4. अथर्व आज पर्यंत विविध जाहिरातीमध्ये आपल्याला दिसला आहे ,जाहिरातीच्या माध्यमातून ही तो कमाई करतो.
याशिवाय कॉन्टेन्ट क्रियेटर असणारा अथर्व बॉईज 4 या चित्रपटामध्येही झळकला आहे.
5 . विविध सेलिब्रिटींसोबत आणि ब्रँड सोबत तो कोलाब्रेट करून या मार्फत ही उत्पन्नाचा मार्ग सुरू असतो.
∆ राज ठाकरेंचा लाडका अथर्व :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 17 वर्षे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थीसेनेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अथर्व सुदामेचे कौतुक केले.
” तुझ्या सगळ्या गोष्टी मी पाहत असतो, बरं का” असं म्हणत राज ठाकरे यांनी अथर्वच तोंड भरून कौतुक केले.
∆ राज ठाकरे यांचे कन्टेन्ट क्रियेटर्स ना मार्गदर्शन :
• तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या होत असलेल्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याबद्दल तुमच्या Reels मार्फत प्रबोधन झालं पाहिजे असे प्रतिपादन केले.
• तुम्ही महाराष्ट्रातील प्रश्नांकडे बारकाईने लक्ष द्यावे आणि महाराष्ट्रातील जे प्रश्न आहेत, ते तुमच्या विरोधाच्या रुपाने काही वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत जाव्यात आणि त्यामधून लोकांमध्ये जनजागृती व्हावी असे ते म्हणाले.
अथर्व सुदामे बायोग्राफी मराठी | Networth, Wife, Income, Lifestyle | सर्वात लोकप्रिय पुणेकर | Atharva Sudame
#अथर्वसुदामे
#बायोग्राफी
#फेमसकन्टेन्टक्रियेटर
#mahiteeSatha.in
#AtharvaSudameBiography
#AtharvaSudameBiographyMarathi
#स्थळपुणे
#हेकाहीबरोबरनाही
अशाच प्रकारच्या आणखी पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा