Bajrang Sonavane Biography In Marathi | Beed Loksabha 2024

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

एका सामान्य शेतकरी कुटुंबाच्या घरात जन्मलेल्या एका व्यक्तीचा खासदारकी पर्यंतचा प्रवास जाणून घेऊया. बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या जीवनावरती आधारित माहिती घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

Bajrang Sonavane Biography In Marathi

Bajrang Sonavane Biography In Marathi
Bajrang Sonavane Biography In Marathi
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये दिनांक 06 जुलै 1970 रोजी मनोहर सोनवणे आणि सत्वशीला सोनवणे यांना मुलगा जन्माला आला. मनोहर सोनवणे हे रामाचे भक्त असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाचं नाव बजरंग असं ठेवलं.
मनोहर सोनवणे हे हाडाचे शेतकरी असल्याने बजरंग सोनवणे यांना लहानपणापासूनच शेतीमध्ये आवड निर्माण झाली. शिक्षणासोबत शेतीमध्ये काम करून बजरंग हे लहानाचे मोठे झाले. शेतकरी पुत्र असल्याने त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी फार जवळून पाहिल्या आणि अनुभवल्या सुद्धा .
तरुणपणी गावचा विकास करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ते कामाला लागले. शेती करायला वावर पाहिजे आणि राजकारण करण्यासाठी पॉवर पाहिजे म्हणून त्यांनी राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला.
पहिली निवडणूक : 
1995 साली त्यांनी पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली. आणि फक्त 25 व्या वर्षी एक शेतकरी पुत्र सारनी गावचा उपसरपंच झाला.
∆ विवाह :
2 मे 1998 ला सारिका यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर ही त्यांनी समाजकारणात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
 

∆ मिळालेली पदे : 

2007 साली येवता मधून जिल्हा परिषद सदस्य झाले.
2012 ला युसुफ वडगाव येथून जिल्हा परिषद सदस्य झाले.
2017 मध्ये चिंचोलीमाळी येथून जिल्हा परिषद सदस्य झाले. 
त्याचवर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते जिल्हाध्यक्ष झाले.
बीड जिल्हा हा सर्वत्र ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या ऊसतोड कामगारांच्या समस्या समजून त्या सोडवून बजरंग बप्पांनी कामगारांना मदत केलेली आहे.
बजरंग सोनवणे यांनी येडेश्वरी साखर कारखाना सुरू करण्याचे धाडस केले. आणि एका ऐतिहासिक परिवर्तनाला सुरुवात झाली.
बजरंग यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने केवळ नऊ महिन्यांमध्ये कारखान्याची उभारणी केली. महत्त्वाचे म्हणजे त्यावेळी दुष्काळ असताना देखील मोठ्या हिमतीने कारखाना सुरू करून शेतकऱ्यांच्या उसाला महाराष्ट्रातील इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला भाव दिला. यामुळे शेकडो लोकांना रोजगार मिळाला.
∆ 2019 ची निवडणूक :
बजरंग सोनवणे यांनी 2019 ची निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांना 509807 मते मिळाली पण विजयापासून ते दूर राहिले. पराभव झाला असला तरी ते पुन्हा नव्याने कामाला लागले आणि जनसेवेमध्ये रुजू झाले.
∆ 2024 ची निवडणूक : 
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघामधून यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद चंद्र पवार) उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यामध्ये झालेल्या निवडणुकीत बजरंग सोनवणे विजय झाले आहेत. 

∆ पंकजा मुंडे यांच्या पराभवाची कारणे :
पंकजा मुंडे हे बीडच्या राजकारणातील सर्वात मोठे नाव परंतु या निवडणुकीत फक्त 6000 मतांनी पराभव पत्करावा लागला.
• या पराभवाचे मुख्य कारण भाजपने म्हणजे सत्ताधाऱ्यांनी मराठा आरक्षणावर घेतलेली भूमिका सकारात्मक पणे लोकांपर्यंत पोहचली नाही.
महाविकास आघाडीच्या बाबतीत लोकांमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळाले.
• राज्यामध्ये घडलेल्या पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण पाहून जनतेच्या मनातील भाजप बद्दल असलेला राग,चीड मतांच्या स्वरूपात बघायला मिळाला.
Bajrang Sonavane Biography In Marathi

Bajrang Sonavane Biography In Marathi
तब्बल साडे सहा लाखांपेक्षा अधिक मते घेऊन बजरंग सोनवणे हे खासदार झाले , मात्र बजरंग सोनवणे यांच्या प्रवासामध्ये मनोज जरांडे पाटील यांचा महत्वाचा वाटा ठरलेला आहे असे म्हणता येईल. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रभर केलेल्या आंदोलनामुळे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपला नुकसान झाले आहे. 
मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेला हा आरक्षणाचा लढा फक्त बीडमध्ये चालला असं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे प्रतिसाद उमटलेले दिसून आलेले आहेत.
काही महिन्यावर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वपक्षीय नेत्यांचे तसेच जनतेचे लक्ष लागलेले आहे.
 
 
 ∆ कोणत्या मतदारसंघातील स्थिती काय ? 
• परळी मतदासंघ
बजरंग सोनवणे : 66940
पंकजा मुंडे : 141774
 
• गेवराई मतदारसंघ : 
बजरंग सोनवणे : 134505
पंकजा मुंडे : 95409
 
• माजलगाव मतदारसंघ :
बजरंग सोनवणे : 104713
पंकजा मुंडे : 105648
 
• बीड मतदारसंघ :
बजरंग सोनवणे : 139264
पंकजा मुंडे : 77583
 
• आष्टी मतदारसंघ :
बजरंग सोनवणे : 139264
पंकजा मुंडे : 77583
 
• केज मतदारसंघ :
बजरंग सोनवणे : 123158
पंकजा मुंडे : 109360
 
एकूण मिळालेली मते : 
बजरंग सोनवणे : 681569
पंकजा मुंडे : 674984
 
भारतीय जनता पार्टीला मिळालेला सगळ्यात मोठा धक्का बिडला मिळाला आहे असे म्हणता येईल.
 
 
 
#बजरंगसोनवणे 
#MPBeed 
#BJP #NCP 
#Election 
#Maharashtra 
#PankajaMunde
#DM

Leave a Comment