Bharat Parekh Lic Agent Networth | Biography | Success Story

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now
Bharat Parekh LIC Agent

Bharat Parekh LIC Agent Networth
 ∆ कोण आहेत भारत पारेख ?
भारत पारेख हे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणजेच एलआयसीचे विमा प्रतिनिधी आहेत. आज पर्यंत त्यांनी करोडोंच्या पॉलिसी विकलेल्या आहेत. भारतातील सर्वात मोठे पॉलिसी विक्रेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांची कमाई हे एलआयसी च्या चेअरमन पेक्षा कित्येक पटीने जास्त आहे.
 

Bharat Parekh LIC Agent Networth 

∆ भारत पारेख यांचा प्रवास : 
 
भारत यांच बालपणीचे जीवन अगदी मध्यमवर्गीय कुटुंबात झालेल आहे. छोट्याशा घरामध्ये ते राहत होते. वयाच्या 18 व्या वर्षी जेव्हा ते कॉलेजमध्ये होते तेव्हा घरच्यांना थोडासा आपल्याकडून हातभार लागावा म्हणून पार्ट टाइम एलआयसी विमा प्रतिनिधी म्हणून काम करू लागले.
 
• अगदी कोवळ्या अशा वयामध्ये त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आणि पॉलिसी विकण्यास सुरुवात केली. 
 
• त्यावेळेस असं म्हणलं जायचं की ज्याला काहीच काम भेटत नाही तो एलआयसी एजंट होतो. तेव्हा त्यांच्या वर्गातील मुलं त्यांना चिडवायची यांच्यासोबत बोलायला टाळायची. 
 
 
•एवढेच नव्हे तर जेव्हा त्यांना लग्न करायची वेळ आली तर त्यांच्या सासऱ्यांना इन्कम टॅक्स रिटर्न ची रिपोर्ट दाखवावी लागली.
 


 
नाव : भारत वाडीलाल पारेख 
शिक्षण : बॅचलर ऑफ कॉमर्स (फायनान्स) 
पत्नी : बबीता पारेख 
संपत्ती : 469 करोड 
 
• प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अचानक काही गोष्टी घडतात त्यातून सावरण्यासाठी कोणाच्यातरी आधाराची गरज असते. जिथे भावना काम करत नाहीत तेथे पैसा लागतोच. पैसा हा सर्व काही नाही
 
परंतु पैशाशिवाय काही गोष्टी मिळतही नाहीत.
अशावेळी लाईफ इन्शुरन्स ही काळाची गरज बनलेली आहे. 
 
 
∆ भारत पारेख यांचा नवीन विमा प्रतिनिधींना सल्ला : 
 
भारत पारेख यांच्या मते या क्षेत्रामध्ये शिकलेले सुशिक्षित तरुणांनी सहभाग घ्यावा. कारण या क्षेत्रामध्ये अशा लोकांची गरज आहे. फक्त करायचं म्हणून काम करू नये तर पूर्ण एनर्जी लावून त्याकडे बघावे.
 
आपण सर्विस क्षेत्रामध्ये काम करतो त्यामुळे सेवाभावी मनाने पॉलिसीधारकाचे काम करावे.
 
∆ टोल फ्री नंबर सुरू करण्याची आयडिया : 
 
टोल फ्री नंबर चा कन्सेप्ट असा होता, जो व्यक्ती कॉल करेल त्याला नाहीतर जो कॉल रिसिव्ह करेल त्याला पैसे भरावे लागायचे. 
– जेव्हा भारत 1995 ला अमेरिकेमध्ये गेले होते तेव्हा त्यांना याबद्दल माहिती मिळाली. मग त्यांना वाटलं की आपण पण असं सुरुवात करायला पाहिजे. 
 

माझ्या ग्राहकांनी का पैसे भरावे ? 

 
भारत यांना असा प्रश्न पडला त्यांच्या ग्राहकांनी फोन करण्यासाठी पैसे का भरावे, आणि इथूनच सुरुवात झाली ती भारत यांच्या यशस्वी वाटचालीकडे. 
– ही बातमी इतकी वेगाने पसरली की त्यानंतर भारत यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली. 
-एका एलआयसी एजंट ला टोल फ्री ची गरज काय असा प्रश्न इन्कम टॅक्स कडून विचारण्यात आला. 
 
• सुरुवातीच्या काळात भारत यांना कोणी ओळखत नव्हतं त्यामुळे ते घरोघरी जाऊन एलआयसीच्या विविध योजना बद्दल ग्राहकांना समजावून सांगत असायचे. कित्येक ठिकाणावरून त्यांना अपमानास्पद वागणूक मिळायची परंतु ते वाईट न वाटून घेता पुन्हा नव्या उत्साहात सुरुवात करायचे. तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात आली की हा व्यवसाय पार्ट टाइम न करता पूर्ण वेळ करावा लागेल.
 
l
 
Source Google
Source Google
∆ स्मशान घाटावरची मार्केटिंग : 
 
भारत हे दररोज पांढरे कपडे घालून आजूबाजूच्या स्मशानात जात असत. आणि जे कोणी वारलेले व्यक्ती असतील त्यांच्या घरच्यांना ते फ्री मध्ये डेथ क्लेमची सर्विस देतात असे सांगून व्हिजिटिंग कार्ड देत असत.
आणि त्यांनी आजपर्यंत भरपूर लोकांना अशा प्रकारे मदत केलेली आहे. 
 
• तुम्हाला प्रश्न पडला असेल यात भारत यांचा फायदा काय ?
 
तर भारत हे दूरदृष्टी असणारे व्यक्ती आहेत. लोकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करून त्यांची भविष्यात पॉलिसी भारत पारेख हे करतं असत.
 
भारत पारेख यांच्याकडे 469 करोडपेक्षा अधिकची संपत्ती आहे. भारतातील सर्वात जास्त एलआयसी विकण्याचा रेकॉर्ड त्यांच्याकडे आहे. आतापर्यंत त्यांनी करोडोंच्या एलआयसी पॉलिसी विकलेले आहेत. जेंव्हा या क्षेत्रामध्ये नविन एजंट येतात. तेंव्हा फक्त पैसा लवकर कसा कमावता येईल. यादृष्टीने प्रयत्न करत असतात.
 
पॉलिसी विकण्याचे टार्गेट मनामधे ठेऊन चालतात.पण भारत पारेख हे भविष्यातील संधी पाहून काम करणाऱ्यातले आहेत. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास प्रत्येकास प्रेरणा देणारा आहे.
 
Bharat Parekh Lic Agent Networth | Biography | Success Story | सर्वात जास्त पैसे देणारा एलआयसी एजंट 
 
 
 

अशाच प्रेरणादायी पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा

1 thought on “Bharat Parekh Lic Agent Networth | Biography | Success Story”

Leave a Comment