• शिक्षण क्षेत्रामध्ये लातूरचे नावलौकिक संपूर्ण देशभरामध्ये आहे. याच लातूरच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक वातावरणामध्ये वाढलेले नेत्ररोग तज्ञ आणि लातूरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे हे विजयी झालेले आहेत.Doctor Shivaji Kalge Biography
डॉक्टर शिवाजी काळगे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार होते. गेल्या दोन वर्षांपासून लोकसभेच्या निवडणुकीसाठी ते इच्छुक होते आणि यावर्षीच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये त्यांनी जोरदार विजय मिळवलेला आहे.
डॉक्टर शिवाजी बंडाप्पा काळगे हे राणी अंकुंलगा येथील जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक शिक्षण घेऊन आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावरती देशिकेंद्र विद्यालय, राजश्री शाहू महाविद्यालय आणि त्यानंतर छत्रपती संभाजी नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अशा एकेक पायरी चढत त्यांनी नेत्ररोग तज्ञ होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
∆ डॉक्टरी पेशा :
सन 1997 पासून लातूरच्या परिसरातील रुग्णांसाठी ते अखंड कार्यरत आहेत. आज पर्यंत हजारो रुग्णांवरती उपचार करून लातूरच्या वैद्यकीय क्षेत्रात स्वतःची नवी ओळख निर्माण करून ठसा उमटविला आहे.
∆ सामाजिक वारसा :
लहानपणापासूनच डॉक्टर शिवाजी काळगे यांना वडिलांचा सामाजिक वारसा मिळालेला आहे. वडिलांच्या पायावरती पाय ठेवून आणि सामाजिक असलेली जाण त्यामुळे लहानपणापासूनच त्यांना बाळकडू मिळालेले आहे.
डॉक्टर शिवाजी काळगे यांचे ऋषीतुल्य वडील बंडाप्पा महालिंगआप्पा काळगे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये स्वतःचा वेगळा रस्ता निवडला . ते शेती आणि कुटुंब सांभाळून सामाजिक कार्यामध्ये सहभागी होते. आज ही नवीन कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देत असतात.
बंडाप्पा काळगे यांनी महाराष्ट्र वीरशैव सभा लातूर जिल्हा शाखेचे माजी अध्यक्ष पद भूषवले आहे. निलंगा येथील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जातात.
शेतकरी यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणाऱ्या नेत्यांच्या यादीमधील ते एक आहेत. मागच्या 50 वर्षा वरून अधिक काळ ते शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
∆ पत्नीचे सहकार्य :
डॉक्टर शिवाजी काळगे प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ आहेतच तसेच त्यांच्या पत्नी डॉक्टर सविता शिवाजी काळगे यादेखील स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ आहेत . त्यांची डॉ शिवाजी काळगे यांना खूप मोलाची साथ आहे.
उच्चशिक्षण घेतलेल्या पण जन सामान्य लोकांमध्ये मिळून मिसळून असणाऱ्या आणि सामान्य लोकांशी दुःख जाणून घेणारी अशी जोडी हे लातूरच्या राजकारणात चांगले उदाहरण ठरेल यात काहीही शंका नाही.
∆ सामाजिक कार्य :
• सामाजिक संस्थेमध्ये सेवा करणे
• जंगम चॅरिटेबल ट्रस्ट लातूर (चे अध्यक्ष होते)
• महाराष्ट्र नेत्र तज्ञ संघटना (कोषाध्यक्ष)
• मराठवाडा नेत्रतज्ञ संघटना (उपाध्यक्ष)
• लायन्स क्लब ऑफ लातूर (संस्थापक सदस्य)
• प्लॅनेट क्रिटिकल केअर सेंटर (सद्स्य)
• इंडियन मेडिकल असोसिएशन (सन्माननीय सदस्य)
अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आहेत .
∆ लोकसभा निवडणुकीत विजय :
लोकसभा 2024 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांचा पराभव डॉक्टर काळगे यांनी केला आहे .
• मिळालेली मते
1.डॉक्टर शिवाजी काळगे – 609021
2. सुधाकर शृंगारे – 547140
61881 चे मताधिक्य
∆ देशमुख बंधूंची फिल्डींग :
डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षातर्फे
प्रियंका गांधी यांची सभा लातूरमध्ये झाली होती. माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी तसेच आमदार धीरज विलासरावजी देशमुख यांनीही संपुर्ण लातूरमध्ये जोरदार तयारी केली होती.
प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता . लातूरचा गड हा राखण्यात देशमुख यांना यश प्राप्त झाले असे म्हणता येईल. गेली दोन टर्म लातूर वरती भाजपाच वर्चस्व राहिले होते. यावेळेस मात्र काँग्रेस पक्ष विजयी झालं आहे .
∆ यामुळे काळगे जिंकले ?
• मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व राज्यातील निकालावर प्रतिसाद उमटले आहेत .
• लातूर मधील लिंगायत समाज जो भाजपा ला वोट देत होता , तो डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या कडे वळला.
• सुधाकर शृंगारे यांचा कमी असलेला जनसंपर्क.
• मराठा समाजातील आक्रोश.
• राज्यातील राजकारणावर संतापलेल्या जनतेच्या मनातील राग.
∆ सुधाकर शृंगारे यांचा पराभव :
भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लातूरला आहे होते . लातूरच्या गरुड चौक येथे भव्य दिव्य अशी सभा आयोजित करण्यात आली होती. राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्रिमंडळातील सदस्य अश्या मोठ्या नेत्याच्या सभा झाल्या होत्या.
निलांगयाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती . पण देशमुख बंधूपुढे ते निवडणूक हरले
Doctor Shivaji Kalge Biography | डॉक्टर शिवाजी काळगे बायोग्राफी | लातूरचे नवे खासदार लोकसभा 2024 | अमित देशमुख
DoctorShivajiKalgeBiography
#डॉक्टर शिवाजी काळगे बायोग्राफी
#लातूरचे नवे खासदार लोकसभा
#Mahiteesatha
#महाराष्ट्रनिवडणूक
1 thought on “Doctor Shivaji Kalge Biography|Latur Loksabha Elections|INDIA Alliance”