Hardik Pandya Biography In Marathi| Indian Cricketer

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now


Hardik Pandya Biography In Marathi 

 
11 ऑक्टोंबर 1993 ला गुजरातमधल्या छोरयासी या गावी हार्दिक चा जन्म झाला. हार्दिकच्या वडिलांचे नाव हिमांशू पंड्या हे आहे त्यांचा गुजरात मध्ये कार फायनान्स छोटा व्यवसाय होता. त्याच्या आईचे नाव नलिनी पंड्या हे आहे त्या गृहिणी आहेत.
 
हार्दिक च्या वडिलांना क्रिकेट खूप आवडायचे ते टीव्ही वरती क्रिकेट मॅच बघत बसायचे. हार्दिक छोटा होता तेव्हा तो वडिलांसोबत क्रिकेट मॅच बघत असायचा. एक-दोन वेळेस त्याच्या वडिलांनी क्रिकेटचा सामना बघण्यासाठी त्याला स्टेडियमला घेऊन गेले. त्यामुळेच हार्दिकला क्रिकेट बद्दलचे आकर्षण वाढत गेले.
 
तर फक्त हार्दिकलाच नव्हे तर त्याचा मोठा भाऊ कृणालला पण क्रिकेट फार आवडायचे. 
 


नाव : हार्दिक हिमांशू पंड्या 
जन्म : 11 ऑक्टोंबर 1993 
वय : 30 
विशेषता : अष्टपैलू 
फलंदाजीची पद्धत : उजव्या हाताने 
गोलंदाजीची पद्धत : उजव्या हाताने मध्यमगती 
आई : नलिनी पंड्या 
वडील : हिमांशू पंड्या 
भाऊ : कृणाल पंड्या 
पत्नी : नताशा पंड्या
राष्ट्रीयत्व : भारतीय
 
विद्यार्थी दशेत असताना हार्दिक शाळा सोडून दिवसभर गल्लीमध्ये क्रिकेट खेळत असायचा. आपल्या मुलांमध्ये क्रिकेट बद्दलची आवड बघून त्याच्या वडिलांना वाटलं, की आपल्या मुलांना क्रिकेटमध्ये मोका मिळायला पाहिजे. गावामध्ये क्रिकेटसाठी खास सुविधा नव्हत्या त्यामुळे ते वडोदरा, गुजरात येथे स्थायिक झाले.
 
तिथे राहण्यासाठी फक्त एक रूम होती पण स्वप्न खूप मोठी होती. तिथे आल्यानंतर हार्दिक आणि कृणाल ने किरण मोरे यांच्या क्रिकेट अकादमी मध्ये प्रवेश घेतला त्यावेळी हार्दिक लहान होता त्यामुळे बॅटिंग करण्यासाठी त्याला कमी वेळ मिळायचा. पण एक वेळेस किरण मोरे यांनी हार्दिक ला बॅटिंग करताना पाहिले आणि ते आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्यांनी हार्दिकला आपल्या मार्गदर्शनाखाली घेतले.
 
हार्दिकने त्याचे प्राथमिक शिक्षण एम के हायस्कूल येथून पूर्ण केले. त्याचे शिक्षणात मन रमायचे नाही. शाळेतले शिक्षक सतत हार्दिक च्या वडिलांना सांगायचे की तुमचा मुलगा चुकीच्या ट्रॅक वरती आहे. त्याचे भविष्य अंधारमय होईल. 
 
– पण हार्दिक च्या वडिलांना त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. ते त्यांना म्हणायचे ” तुम्हाला माहित नाही, परंतु एक दिवस हा खूप यशस्वी होईल “.
 
• हार्दिकची अकादमी त्याच्या घरापासून वीस-पंचवीस किलोमीटर लांब होती त्याचे वडील कामात व्यस्त असायचे आणि त्यामुळे हार्दिक आणि कृणालला आणण्यासाठी त्यांच्या मित्राला पाठवायचे
.
– हार्दिक ला वडिलांचा मित्र आलेला आवडत नसे.
 
2008 साली हार्दिकच्या वडिलांना हृदयविकाराचे झटके येऊ लागले त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बेडरेस्ट करायला लावला. त्यावेळेस घराची संपूर्ण जबाबदारी हार्दिक आणि कृणालच्या खांद्यावरती आली होती.
 
त्यावेळेस हार्दिक वेगवेगळे क्रिकेटचे टूर्नामेंट्स खेळत होता काही काळानंतर ते कर्जात बुडाले पण हार्दिकला स्वतःवरती विश्वास होता. तो यामधून सावरण्याचा भरपूर प्रयत्न करत होता. आपल्या खेळातल्या कौशल्याने सर्वांना हार्दिक नेहमी आकर्षित करायचा. त्यानंतर हार्दिक ला स्टेट टीम मध्ये सिलेक्ट करण्यात आलं. 
 
• मार्च 2013 मध्ये हार्दिकच National Debue झालं या टूर्नामेंट मध्ये हार्दिक ला मॅन ऑफ द टूर्नामेंट मिळालं त्यामध्ये बक्षीसाच्या स्वरूपात 80 हजार मिळाले होते.
 
• 2015 साली मुंबई इंडियन्स ने हार्दिक पंड्याला दहा लाख रुपयांमध्ये आयपीएल साठी सामील करून घेतलं. त्याच वर्षी हार्दिक ला आयपीएल मध्ये डेब्यू करण्याचा मोका मिळाला.
 
– 19 एप्रिल 2015 ला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर च्या विरुद्ध त्याने आयपीएल मध्ये डेब्यू केलं. या मॅचमध्ये त्याने सहा चेंडूत 16 धावा केल्या आणि सामना संपवला. त्याच वर्षी मुंबई इंडियन्स आयपीएल फायनल जिंकली होती.
 
2016 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध t20 सामन्यासाठी त्याची निवड करण्यात आली. तसेच हार्दिक ने आतापर्यंत अनेक t20 ओडीआय सामने खेळलेले आहेत सर्वच प्रकारच्या फॉरमॅटमध्ये त्याने उत्तम असा खेळ खेळला आहे.
 
∆ Hardik Pandya Networth : 
 
2024 चा रिपोर्टनुसार हार्दिक पांड्या कडे 91 करोड रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्याच्याकडे महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. हार्दिक ला स्पोर्ट कार चालवण्याची खूप आवड आहे. विविध कंपन्यांचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून हार्दिक पांड्या काम करतो.
 


∆ लव लाईफ :
 
हार्दिक ने 2020 मध्ये नताशा सोबत विवाह केला. नताशा ही एक एक्ट्रेस आहे. नताशाने तिचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुंबई येथे मॉडलिंग करण्यास सुरुवात केली होती. तिने अनेक टीव्ही शो मध्ये काम केलेल आहे .
 
पण जेव्हा बिग बॉस सीजन 8 मध्ये प्रवेश केला तेव्हा ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर ती सिंगर बादशहा च्या पॉप्युलर ठरलेल्या डीजे वाले बाबू या गाण्यांमध्ये सुद्धा दिसली.
 
– बॉलीवूड मधील काही चित्रपट तसेच वेब सिरीज मध्ये सुद्धा नताशाने काम केलेल आहे.
– 30 जुलै 2020 मध्ये नताशा ला एक मुलगा झाला त्याचे नाव अगस्त असे आहे.
 
∆ काही दिवसापूर्वीच सर्व सोशल मीडिया वरती हार्दिक आणि नकाशाचे घटस्फोटाचे फोटोज वायरल झाले होते. सर्व प्रसारमाध्यमांमध्ये तसेच सोशल मीडिया वरती याबाबत खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. 


 
∆ आयपीएल 2024 मध्ये हार्दिक ला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आल. मुंबई इंडियन्सच्या संचालक मंडळाने मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेल्या रोहित शर्माला काढून त्या ऐवजी हार्दिक पंड्याला कर्णधार केल्यामुळे रोहित शर्माचे फॅन्स तसेच मुंबई इंडियन्स चे चाहते यांनी सुद्धा हार्दिक पांड्याला मोठ्या प्रमाणात स्टेडियम मध्ये ट्रोल केलं.
 
Hardik Pandya Biography Networth, Love life, IPL | क्रिकेटर हार्दिक पंड्या बायोग्राफी मराठी मध्ये | mahiteesatha.in 
 
#हार्दिक पांड्या बायोग्राफी
#HardikPandya
#mahiteesatha
अशाच प्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा

1 thought on “Hardik Pandya Biography In Marathi| Indian Cricketer”

Leave a Comment