Sameer Chaughule Biography |Maharashtrachi Hasyajatra | Comedy King

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now


Sameer Chaughule Biography 

 
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एक प्रमुख चेहरा म्हणजे हास्यसम्राट समीर चौघुले. आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना सतत हसवण्याची जादू असणारा एक जादूगर. हास्याचा खळखळीत असा वाहणारा झरा आजपर्यंत या कलाकारान आपल्या कलेमधून अनेकांची दुःख दूर केली आहेत.
 
तो येतो, सादरीकरण करतो आणि प्रेक्षकांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करून जातो. अशा या हास्यजत्रेतल्या असणाऱ्या हास्यसम्राट बद्दल जाणून घेऊया. 
 
समीर चौघुले हे मूळचे चिपळूणचे. त्यांचे शालेय शिक्षण शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी स्कूल दहिसर येथून झालं. कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकांमध्ये तसेच एकांकीता मध्ये त्यांनी काम केलेलं होतं.
 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका मध्यमवर्गीय मुलाप्रमाणे त्यांनी खाजगी कंपनीमध्ये कामाला लागले. 
पण त्यांचं या नोकरीमध्ये मन रमत नव्हतं. मग त्यांनी नोकरी सोडून अभिनय क्षेत्रामध्ये जाण्याचा निर्णय घेतला.शाळेत असतानाच म्हणजे चौथी ला असताना एका नाटकात भाग घेतला होता. ते नाटक होते हिमगोरी आणि सात बुटके. या नाटकामध्ये सातव्या बुटक्याची भूमिका त्यांना मिळाली होती. 
 
• समीर यांचा आजपर्यंतचा प्रवास बघायला गेला तर खूप खडतर असा राहिलेला आहे. 
 
त्यांच्यातली एक विशेषता म्हणजे ते कधीही आणि कुठेही दिलेल्या वेळेच्या आधी हजर असतात. त्यांचा हाच हजर जबाबी पणामुळे ते ओळखले जातात
 


नाव : समीर दिवाकर चौघुले
जन्म : 29 जून 1973
शिक्षण : पदवी 
शाळा : शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी स्कूल
कॉलेज : M.L धानोरकर कॉलेज 
टीव्ही शोज : फु बाई फु, बुलेट एक्सप्रेस, कॉमेडी एक्सप्रेस, आंबट गोड , महाराष्ट्राची हास्य जत्रा 
चित्रपट : बांबू, चंद्रमुखी, बॉईज 3 आणि आणखी भरपूर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. 
राष्ट्रीयत्व : भारतीय 
 
 
 
∆ समीर यांची नाटकातील खऱ्या अर्थाने सुरुवात झाली ती यदाकदाचित पासून. संतोष पवार यांच्या यदाकदाचित या नाटकामध्ये समीर यांची निवड झाली आणि येथून सुरू झाला समीर यांचा व्यावसायिक रंगभूमीकडे प्रवास. 
यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. 
 
झी मराठीवरील फु बाई फु या कार्यक्रमातून लोकांना हसवायला सुरुवात केली. निर्मिती सावंत आणि स्वप्निल जोशी हे या कार्यक्रमाचे जज होते. त्यांनी बऱ्याच वेळा समीर यांना शाबासकी देऊन कौतुक केलं आहे. त्यांचे अनेक स्कीट हे खूप गाजलेले होते. 
 
• स्टार प्रवाह वरील आंबट गोड या मालिकेमध्ये ते मुख्य भूमिकेमध्ये दिसून आले. त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस आली. 
 
∆ समीर चौगुले हे उत्तम अभिनेते आहेतच पण त्यासोबतच ते एक उत्कृष्ट असे लेखक सुद्धा आहेत. आज पर्यंत त्यांनी अनेक स्कीट लिहिले आहेत आणि त्यातील खूप प्रसिद्ध सुद्धा झाले आहेत.
अनेक विनोदी स्किटमाध्यमातून त्यांनी आजपर्यंत प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले आहे 
 
1760 सासुबाई या मालिकेचे त्यांनी २०० भाग लिहिले आहेत. 
 
फु बाई फु नंतर ते पुन्हा एकदा कॉमेडीची एक्सप्रेस, कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि सध्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना हसवत आहेत.
 

 • महाराष्ट्राची हास्य जत्रेतील सम्या दादा : 

 
सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून समीर चौघुले घराघरात पोहोचले आहेत. अगदी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत समीर चौघुले यांची खूप मोठी क्रेझ आहे.  हास्तजत्रेत त्यांनी आजपर्यंत विविध भूमिका सादर केलेले आहेत. 
 
 
समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांची जोडी ही हास्य जत्रेमध्ये सुपरहिट ठरली आहे. दोघांची केमिस्ट्री म्हणजे प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच.
 
कार्यक्रमामधील अँकर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचे वा दादा वा हे वाक्य तर संपूर्ण महाराष्ट्रभर खूप प्रसिद्ध झालेले आहे.
 
समीर यांची चार्ली चापलीन, हमरे का तुमरे, डोअर बेल ची आवाज, दरवाजा उघडताना चा आवाज आणि खास करून विशाखा सुभेदार यांना सतत परेशान करणारा अशी ओळख आहे.
 
स्वतःवरती विनोद करणं हे फार कमी लोकांना जमतं आणि त्यातला एक समीर चौगुले.
समीर चौघुले यांनी अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेला आहे.
 
सोनी मराठी वहिनीचा एक मुख्य चेहरा म्हणून ही समीर चौगुले यांचकडे पाहिले जाते. त्याचा आजपर्यंतचा प्रवास फार प्रेरणादायी आहे. अशा प्रतिवाभान व्यक्तीमत्त्वाबाबत अभिताभ बच्चन यांच्याकडून ही कौतुक करण्यात आले.
 
 
महाराष्ट्राची हास्य जत्रा ची संपूर्ण टीम अमिताभ बच्चन यांच्या भेटीला गेली होती त्यावेळेस अमिताभ यांनी समीर चौगुले यांना नमस्कार करून त्यांचं खूप कौतुक केलं. आणि म्हणाले आम्ही तुमचा कार्यक्रम खूप आवडीने बघतो आणि त्यातील तुमची भूमिका,नाटक,सादरीकरण बघून खूपच आनंद होतो.
 
 
Sameer Chaughule Biography | महाराष्ट्राची हास्यजत्रा | विनोदवीर अभिनेता समिर चौघुले | वा दादा वा , हामरे का तूमरे 
 
 

अशाच आणखी पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा

1 thought on “Sameer Chaughule Biography |Maharashtrachi Hasyajatra | Comedy King”

Leave a Comment