Vodafone Idea Case Study | VI New Recharge Plans | जाणून घ्या नवीन प्लॅन्स

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now


Vodafone Idea Case Study
 
 
• एक काळ असा होता जेव्हा टेलीकम्युनिकेशन क्षेत्रातला सर्वात जास्त ग्राहक वर्ग या कंपनीकडे होता. पण मार्केटमध्ये आज त्याच प्रमाण खूप कमी झालं आहे. वोडाफोन आयडिया बद्दल सर्वांना माहीतच आहे पण आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. 

 

Vodafone Idea Case Study

 
१. कोणत्या कारणामुळे वोडाफोन आयडिया चा डाऊनफॉल चालू झाला
२. कंपनीने कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं
 
2018 मध्ये आदित्य बिर्ला ग्रुप आणि वोडाफोन ग्रुप यांच्यामध्ये करार होऊन तयार झालं वोडाफोन-आयडिया.
 
∆ Business Segment :
 
1. Mobility 
 
• Voice Business 
 ~ Vodafone Idea आज 22 सर्विस एरियामध्ये सर्विस देण्याचं काम करते. त्यामध्ये 4,87,000 लहान गावांचा समावेश होतो. 
~ 1.2 Billion लोकसंख्या असलेल्या भारतातील खूप कमी ग्राहक वर्ग याकडे सध्या आहे. 
~ रिपोर्टनुसार या क्षेत्रातील फक्त 16 टक्के ग्राहक वोडाफोन आयडिया चे सर्विस घेतात. 
~ 2G,3G,4G चे सर्विस वोडाफोन आयडिया देते. लवकरच 5G ची घोषणा होण्याची शक्यता आहे. 
 
2. Broadband Service :
~ 22 Service Area
~ 3,41,000 लहान गावांचा समावेश होतो.
 
∆रिलायन्स जिओ ची एन्ट्री : 
 
• 2016 मध्ये रिलायन्स चे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जिओ ची सुरुवात केली आणि तेव्हापासून टेलेकम्युनिकेशन क्षेत्रात नवी क्रांती उदयास आली. Jio च्या एन्ट्रीमुळे बाकीच्या स्पर्धकांचे ग्राहक Jio कडे वळले.
 
• Jio येण्याच्या अगोदर वोडाफोन आणि आयडिया या दोन्ही कंपन्या चांगल्या प्रकारे व्यवसाय करत होत्या. 
 
∆ 2016 च्या रिपोर्टनुसार : 
Airtel = 40%
Vodafone = 19%
Idea = 17% 
 
बाकी इतर कंपन्या असा मार्केटचा ग्राहक सांभाळत होते. तसेच मोठ्या प्रमाणात प्रॉफिट करत होते. 
 
VI New Recharge Plans
VI New Recharge Plans
∆ Jio मुळे काय परिवर्तन झालं : 
जेव्हा Jio मार्केटमध्ये लॉन्च झालं तेव्हा सर्वांना वाटलं की बाकीच्या कंपनीच्या तुलनेत छोटे-मोठे ऑफर्स Jio कडून देण्यात येतील.

• परंतु Jio नी ज्या प्रमाणात सर्व सुविधा फ्री केल्या त्यामुळे बाकीच्या कंपनीच्या ग्राहक Jio कडे आकर्षित होऊन Jio ची सेवा घेऊ लागले.

 
∆ 2024 च्या रिपोर्टनुसार : 
• Jio = 47%
• Airtel = 36%

• VI = 16%

असा ग्राहक वर्ग आज यांच्याकडे आहे.
~ मोठ्या प्रमाणात ग्राहक वर्ग Jio कडे वळला आहे.
 
•कोणत्याही क्षेत्रात एकच कंपनी मोठ्या प्रमाणात चालत असेल किंवा त्याला कॉम्पिटिशन नसेल तर ते सर्वांसाठी घातक ठरू शकते.
~त्यामुळे एअरटेल आणि वोडाफोन-आयडिया ने ग्राहकांसाठी आपल्या प्लॅनचे किंमत कमी केले. स्पर्धेत राहण्यासाठी त्यांना ते करावं लागलं.
 
∆ सरकारकडून वोडाफोन-आयडियाला मदत : 
 
वोडाफोन आयडिया च्या नावावर आधीच खूप मोठा कर्ज असल्यामुळे सरकारने त्यांचे शेअर्स घेतले त्यामुळे त्यांना थोडीफार मदत झाली आणि खेळते भांडवल त्यांच्याकडे तयार झाले. 
 
~स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर वोडाफोन आयडियाला लवकरच 5G ची सुविधा द्यावी लागेल. त्यामुळे कदाचित ग्राहक टिकून राहतील. 
 
~आज हे ग्रामीण भागात राहणारे साधा बटनाचा सेल फोन वापरणारे 2G सिम कार्ड असणारे बरेच जण वोडाफोन आयडियाची सेवा घेतात. तो एक प्रकारचा ग्राहक वर्ग वोडाफोन आयडिया कडे अजूनही आहे.
 
• मोटोरोला आणि शाओमी कंपनीसोबत पार्टनरशिप करण्यात आली.
 
• सोबतच वोडाफोन आयडिया सध्या गेमिंग क्षेत्राकडे जास्त लक्ष देत आहे. वेगवेगळ्या गेमिंग कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत.
 
 
∆ कोणत्या क्षेत्रात वोडाफोन आयडिया जास्त लक्ष देत आहे ?

 

1. Customer Experience 
2. Revenue Increase 
3. Business To Business 
4. Digital Marketing and Partnerships 
 
∆ शेअर मार्केट मधील स्थिती : 
मागच्या एक वर्षाच्या शेअर मार्केटच्या रिपोर्टनुसार वोडाफोन आयडिया ने गुंतवणूकदारांना 140.27% चा परतावा दिला आहे.
३० जून 2023 = 7.45 रूपये 
३० जून 2024 = 17.90 रुपये
सध्या 17.90 रुपये एवढी एका शेअरची किंमत आहे. 
 
~हळूहळू वोडाफोन आयडिया स्पर्धेत टिकून पुढील वाटचाल करत आहे. वोडाफोन आयडियाच्या शेअरची किंमत वाढत राहील याचा अंदाज मार्केटमध्ये गुंतवणूकदार करत आहेत..
 
∆ 3 जुलै 2024 पासून रिलायन्स जिओच्या रिचार्ज प्लान च्या किमती 20% ते 25% वाढ होणार आहे. 
तसेच बाकीच्या कंपन्यांनी सुद्धा त्यांच्या प्लॅन्सच्या किमती वाढवल्या आहेत. साधारणता 10% ते 21% ने किमती वाढवलेल्या आहेत.
 
∆ Who Is CEO Of VI ? 
Akshaya Moondra हे सध्या वोडाफोन-आयडिया चे Chief Executive Officer आहेत.
 
∆ वोडाफोन आयडिया जाणुन घ्या नवीन प्लॅन्स –

 
∆ रिलायन्स जिओ चे  नवीन प्लॅन्स :
 

 
 
 
 
• मुकेश अंबानी यांच्या जीवनावरती आधारित लेख पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा .
 
 

4 thoughts on “Vodafone Idea Case Study | VI New Recharge Plans | जाणून घ्या नवीन प्लॅन्स”

Leave a Comment