
Deepinder Goyal Biography
गेल्या वर्षभरापासून शेअर मार्केटमध्ये एका शेअरने तब्बल 206.85 % एवढा मोठा परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे.
तो शेअर म्हणजेच Zomato.
- कशी झाली झोमॅटो ची सुरुवात:
सन 2008 मध्ये दिपेंदर गोयल आणि त्याचा मित्र पंकज चड्डा यांनी मिळून एक स्टार्टअप चालू केला सुरुवातीला त्याचे नाव फुडीबे असे होते. त्यानंतर त्यांनी 2010 मध्ये कंपनीचे नाव zomato असे ठेवले. - अन्नपदार्थ घरोघरी पोहोचवण्याचा हा त्यांचा हेतू होता. ऑनलाइन मोबाईल वरून ग्राहकांनी ऑर्डर केल्यानंतर तात्काळ त्यांच्यापर्यंत अन्न पदार्थ पोहोचवण्याचे ही सेवा क्षेत्रातली सर्वात मोठी फूड डिलिव्हरी कंपनी आज सर्वांनाच माहिती आहे. झोमॅटो चे मुख्यालय गुडगाव, हरियाणा येथे आहे.
- आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीचा एकूण महसूल 12441 कोटी एवढा आहे. यामध्ये 351 कोटी एवढा निव्वळ नफा आहे.
कंपनीमध्ये 6000 पेक्षा जास्त कर्मचारी आज काम करतात. - त्यासोबतच Blinkit आणि हायपरप्युअर या दोन कंपन्या त्याच्या उप कंपन्या आहेत.
नाव : दिपिंदर गोयल
जन्म : 26 जानेवारी 1983
शिक्षण : Indian Institute Of Technology Delhi (IIT)
Books :Culture at Zomato: How to Rewire Your Brain for Greatness
पत्नी : Grecia Munoz
Networth : 8400 करोड
∆ Deepinder Goyal Car Collection :
- Ferrari Roma
- Lamborghini Urus Performante
- Porsche 911 Turbo S
- Aston Martin DB11 AMR
- Mercedes-AMG G 63
- BMW M8 Competition and more
√ शेअर मार्केट मधील वातावरण :
शेअर मार्केटमध्ये हे झोमॅटोचा बोलबाला चालू आहे. ह्या शेअरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात असल्यामुळे शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
मार्केट मधल्या तज्ञांच्या माहितीनुसार हा शेअर लवकरच 250 रुपयांचा टप्पा पार करणार असे वातावरण दिसत आहेत.
आज ZOMATO च्या एका शेअर ची किंमत 221.30 रूपये आहे.
- दिपेंदर गोयल चा प्रवास :
सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वरती प्रसिद्ध असलेल्या शार्क टॅंक च्या तिसऱ्या सीझनमध्ये दिपेंदर गोयल सर्व भारतीयांच्या परिचयाचा झाला. या शोमुळे त्याचा सोशल मीडिया वरती फॉलोवर्स ची संख्या वाढली. - शार्क टॅंक मध्ये तो शार्क म्हणून आला होता त्याने भरपूर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. दिपेंदर चा जन्म 26 जानेवारी 1983 रोजी झाला. त्याने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली येथून शिक्षण घेतलेले आहे.
- सर्वप्रथम ग्राहक त्यांच्या मोबाईल द्वारे ऑर्डर करतात.
- ग्राहकांनी ज्या रेस्टॉरंट मधून ऑर्डर केली आहे त्या रेस्टॉरंटला ऑर्डर असाइन होते.
- रेस्टॉरंटला ऑर्डर असाइन झाल्यानंतर ते ऑर्डर पूर्ण करण्याच्या तयारीला लागतात.
- त्यानंतर डिलिव्हरी बॉय ला ऑर्डर असाइन होते आणि तो त्या रेस्टॉरंटला जातो आणि ऑर्डर घेतो
- ऑर्डर घेतल्यानंतर ग्राहकाच्या पत्त्यावरती जाऊन ती ऑर्डर ग्राहकाला देण्यात येते. • यामध्ये झोमॅटो चा काय फायदा ?
• झोमॅटो पैसे कसे कमवतो?
तर खूप साधी गोष्ट आहे, झोमॅटो कंपनी रेस्टॉरंट कडून काही प्रमाणात कमिशन घेते तसेच ग्राहकाकडून डिलिव्हरी फी, चार्जेस घेते यामध्ये कंपनीचे अंतर्गत खर्च, पगार, कॉल सेंटर, डिलिव्हरी बॉय पेमेंट या सर्वांचा खर्च काढून झोमॅटो कंपनीला फायदा होतो.
या क्षेत्रामध्ये विविध स्पर्धक आहेत त्यामध्ये स्विगी हा झोमॅटो चा मुख्य स्पर्धक आहे.
वाढत्या मागणीमुळे लवकरच झोमॅटो शेअर मार्केटमध्ये 250 रुपयांच्या टप्पा पार करेल यात शंका नाही.
Deepinder Goyal Net Worth :
झोमॅटो ची आज मार्केट व्हॅल्युएशन 8400 करोड रुपयांपेक्षा जास्त आहे. दिपेंदर गोयल हे अब्जाधीश आहेत.
अशाच प्रकारच्या प्रेरणादायी पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा