महाराष्ट्राची हास्यजत्रा सोडण्यामागचं कारण, (Gaurav More Biography)

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now
Gaurav More Biography : सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या प्रसिद्ध कार्यक्रमात स्वतःची एक आगळी वेगळी ओळख निर्माण करणारा महाराष्ट्राचा एक विनोदी अभिनेता म्हणजे गौरव मोरे. अतिशय मध्यमवर्गीय कुटुंबातून अभिनय क्षेत्रात आलेला गौरव हा एक मेहनती अभिनेत्यांपैकी एक आहे.

त्याचा आजपर्यंतचा प्रवास खूप प्रेरणादायी या अभिनेते विषय आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आपल्या कलेच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलेला गौरव हा मुंबईतील अतिशय दुर्लक्षित अशा पवई फिल्टर पाडा येथे राहतो. त्याचा जन्म ही तेथेच झाला. त्याचं शालेय शिक्षण फिल्टर पाड्यातल्या मिलिंद हायस्कूल येथे झालं.

तेथील गणपती मंडळाच्या स्पर्धेमध्ये तो नाटक,डान्स यामध्ये भाग घ्यायचा आणि तिथून त्याला अभिनय क्षेत्राकडे आवड निर्माण झाली. आज आपण गौरवचा बच्ची डान्स बघत आहोत त्याचा उदय हा फिल्टर पाड्यातल्या गणपतीच्या मिरवणुकीतूनच झाला. त्यानंतर त्याने एस के सोमय्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला परंतु अभ्यासात मन लागत नव्हता अभिनय क्षेत्राकडे जायचं असं मनोमन ठरवलेल्या गौरवणे नंतर कॉलेज बदललं. शेवटी त्याने विद्यापीठातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे ठरवलं.

Gaurav More Biography
Gaurav More Biography ( )

Gaurav More Biography Networth, Age, Lifestyle

त्यानंतर प्रशांत दामले, संतोष पवार, कविताताई, अपूर्वा पंडित अशा भरपूर या क्षेत्रातल्या मान्यवरांसोबत त्याला काम करण्याची संधी मिळाली.

अभिनय क्षेत्रामध्ये पहिली वाटचाल :

हास्य सम्राट भाग 2 चे ऑडिशन सुरू आहेत असं समजल्यावर ते गौरव ऑडिशन देण्यासाठी गेला. आणि तेथे सिलेक्ट झाला. त्यामध्ये त्याने चांगल्या प्रकारे काम केलं. त्यानंतर गौरवने अनेक मालिकांमध्ये काम केलं. त्याला चांगले रोल मिळू लागले. यंदा कदाचित या नाटकामध्ये गौरव मोरे दिसून आला.

काही दिवसानंतर त्याला अनेक सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

1. बाळू कडू

2. गावठी

3. माऊली

4. विकी वेलिंगकर

5. संजू

6. झोया फॅक्टर

Gaurav More Biography
Gaurav More Biography

Gaurav More Biography | Networth, Age, Lifestyle

नावगौरव मोरे
जन्म – 20 जानेवारी 1998
जन्म ठिकाण –पवई, मुंबई
शाळा-मिलिंद हायस्कूल
कॉलेजS.K Somaiya College, Mumbai
शिक्षणपदवी
राष्ट्रीयत्वभारतीय
धर्मबौध्द

त्यानंतर गौरवला भरपूर जाहिराती करण्यासाठी ऑफर्स येऊ लागल्या. आपल्या कौशल्याच्या जोरावरती त्याने त्या स्वीकारल्या आणि चांगल्या पद्धतीने केल्या.

फिल्टर पाड्यातून अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलेला गौरव त्याच्या मनमोकळे स्वभावामुळे हे सतत चर्चेत असतो. मित्रांसोबत गप्पा मारणारा घरी साधा राहणारा गौरव डाऊन टू अर्थ आहे असं म्हणता येईल.


” मी काम करत राहतो याचाच मला आनंद आहे, मला प्रेक्षकांना हसवायचा आहे त्यांच्या हसण्याचं कारण बनायचं आहे आणि तो मी करत राहणार “

~ गौरव मोरे

एका मुलाखतीमध्ये गौरव म्हणतो , मला काम करायला खूप आवडतं . जर एखाद्या दिवशी काम नसेल तर खूप मन नाराज होतात त्यामुळे सतत काम करत राहावं असं वाटतं. कोणत्याही कामावरती प्रेम करून पूर्ण झोकून द्यायला पाहिजे तरच माणूस यशस्वी होतो.

हस्यजत्रेतील प्रवास –

गौरव मोरे ची खरी ओळख हे हास्य जत्रेपासूनच झाली. हास्य जत्रेचे निर्माते आणि दिग्दर्शक असलेले सचिन गोस्वामी सचिन मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरव अभिनय करत असे.आजच्या काळात जिथे या क्षेत्रामध्ये नेपोटिझम विषयी सतत बातम्या येत असतात अशाच चाळीत राहणारा गौरव मोरे इथपर्यंत प्रवास करतो की खरंच मोठी गोष्ट आहे.त्याला हास्य जत्रेत मिळालेल्या वेगवेगळ्या भूमिका, व्यक्तिरेखा त्याने अतिशय अचूकपणे निभावल्या आहेत.

  • गौरव मोरे आणि वनिता खरात यांची जोडी संपूर्ण महाराष्ट्राला पसंतीस आली होती. दोघांचेही कॉमेडी टाइमिंग, वेगवेगळे पंचेस रसिकांना हसण्यासाठी भाग पाडायचे.

  • हॅलो फ्रेंड्स आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा टना नाना नाना” हे वाक्य गौरव मोरेच्या प्रत्येक स्किटमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. गौरव ची ओळख म्हणजे त्याचे केस. त्याला लहानपणापासूनच केस वाढवण्याची आणि ती जपण्याची आवड आहे.

  • महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये त्याने स्वतःची एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली होती. जत्रेतील जज असलेले सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांनी वेळोवेळी त्याचं भरपूर कौतुक केलं. सर्वांवरती वेगवेगळे कॉमेडी करणारा गौरव सर्वांचा एक प्रकारे लाडका होता.

  • सचिन मोटे,सचिन गोस्वामी , सई ताम्हणकर, प्रसाद ओक, प्रसाद खांडेकर, समीर चौगुले, प्राजक्ता माळी, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव, अरुण कदम, शिवाली परब, प्रभाकर मोरे यांच्यासोबत गौरव मोरे उत्तम अशी कॉमेडी करत होता.

महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडण्यामागचं कारण

एका मुलाखतीत दरम्यान गौरव मोरे सांगतो की त्याच्या आयुष्यात केली पाच वर्ष झालं हास्य जत्रा करत असताना सतत तोच तोचपणा येत होता काहीतरी वेगळं करायचं होतं त्यामुळे हास्य जत्रा सोडली. हास्य जत्रा सोडल्यानंतर त्यांनी विविध हिंदी सिरियल ओटीटी प्लॅटफॉर्म वरती काम केला आहे. त्याने बॉईज 4 या चित्रपटांमध्येही खूप चांगल्या प्रकारे भूमिका साकारलेली आहे. आता नुकताच त्याचा अल्याड पल्याड सिनेमा चर्चेत आहे.


या सारख्या पोस्ट अजून वाचा