Gautam Gambhir Biography In Marathi | New Team India Coach

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

गौतम गंभीर यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1981 ला नवी दिल्ली येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव दीपक गंभीर व आईचे नाव सीमा गंभीर आहे. त्यांचे संपूर्ण शिक्षण नवी दिल्ली येथे झाले.

Gautam Gambhir Biography In Marathi

• गौतम जेव्हा दहा वर्षाचे होते तेव्हापासूनच त्यांना क्रिकेटची आवड होती. त्यानंतर ते त्यांचे मामा पवन गुलाटी यांच्यासोबत क्रिकेट खेळायचे तसेच त्यांच्या सोबतच राहत असायचे.

दिवस-रात्र त्यांच्यासोबत क्रिकेट खेळण्यात गौतम यांना आवडायचे. त्यामुळेच ते आजही त्यांच्या मामांना त्यांचे गुरु मानतात.

Gautam Gambhir Image

• गौतम यांच्या मनामध्ये असलेली क्रिकेट बद्दलची आवड पाहूनच त्यांचे मामा पवन यांनी गौतम ला क्रिकेट मध्ये कोचिंग देण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांना लाल बहादूर शास्त्री क्रिकेट अकॅडमी मध्ये क्रिकेट शिकण्यासाठी पाठवले.तिथे त्यांचे कोच राजीव भरद्वाज आणि संजय टंडन हे होते.

ODI मॅच ची सुरुवात :
गौतम यांची पहिली ODI मॅच ही 11 एप्रिल 2003 ला बांगलादेश विरुद्ध होती. त्या सिरीज मध्ये तिसऱ्या मॅच ला गंभीर यांनी 71 रन काढून शानदार असे खेळी खेळली होती. त्यामध्ये त्यांना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळालेला होता.

∆ आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात :
गौतमी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात 03 नोव्हेंबर 2004 ला ऑस्ट्रेलियाविरुद्ध केली. त्यामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली.


परंतु नंतर झालेल्या श्रीलंका विरुद्धच्या सामन्यांमध्ये त्यांना व्यवस्थित खेळ खेळता आला नाही. त्यांच्या खराब प्रदर्शनामुळे त्यांना टीमच्या बाहेर काढण्यात आलं.

• सन 2005 ते 2007 त्यांना वनडे क्रिकेट खेळण्याचा मोका मिळाला. आयसीसी वर्ल्ड कप 2007 मध्ये त्यांना खेळण्याचा मोका मिळाला नाही त्यामुळे ते खूप नाराज झाले. एक वेळ अशी आली की त्यांना क्रिकेट मधून बाहेर पडायचा विचार मनामध्ये येऊ लागलं.

Gautam Gambhir Biography
नाव : गौतम दीपक गंभीर
जन्म : 14 ऑक्टोंबर 1981
जन्मस्थळ : नवी दिल्ली
राष्ट्रीयत्व : भारतीय
शिक्षण : मॉडर्न स्कूल , नवी दिल्ली , हिंदू कॉलेज
पुरस्कार :अर्जुन अवॉर्ड , पद्मश्री
आई वडील : दीपक गंभीर, सीमा गंभीर
अपत्ये : अझिन, अनाइझा
संपत्ती : 150 करोड
पत्नी :नताशा गंभीर

परंतु मनामध्ये क्रिकेट बद्दलची असलेली आवड त्यांना रोखत असे. त्यानंतर त्यांनी पुढे झालेल्या बांगलादेशच्या विरोधात सामन्यात खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली. त्यामुळे त्यांनी संघात स्वतःची एक आगळी वेगळी ओळख निर्माण करून जागा फिक्स केली.

• नंतर त्यांना 2007 च्या T-20 वर्ल्ड कप साठी सिलेक्ट करण्यात आलं. त्या वर्ल्ड कप मध्ये त्यांचा खूप महत्त्वाचा सहभाग होता. त्यांनी तेव्हा खेळलेली खेळी आज पण लोकांच्या मनामध्ये आहे.
54 चेंडू मध्ये 75 धावा करून त्यांनी संघासाठी एक चांगला स्कोर केला होता.

• त्या संपूर्ण टूर्नामेंट मध्ये गौतम हे सर्वात जास्त रन बनवणारे खेळाडू ही बनले.

Arjun Award :
2008 मध्ये भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौतम गंभीर यांना मानाचा अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

2010 ते 2011 ज्या दरम्यान गौतम यांनी भारतीय संघाचे नेतृत्व देखील केलेले आहे. कर्णधार गौतम गंभीर यांच्या नेतृत्वाखाली सहा पैकी सहाच्या सहा सहा सामने टीमने जिंकले. या उत्कृष्ट अशा प्रदर्शनामुळेच पुढे गौतम गंभीर यांना आयसीसी मेन्स वर्ल्ड कप 2011 मध्ये खेळण्याचा मोका मिळाला.

• श्रीलंका च्या विरोधात फायनल मॅच असलेल्या एकदम अटीतटीच्या सामन्यात गौतम यांनी 112 चेंडू मध्ये 97 रन काढून भारतीय संघासाठी शानदार अशी खेळी खेळली. त्यांचा तो खेळ पाहून संपूर्ण स्टेडियम मध्ये असणाऱ्या प्रेक्षकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं होतं.
ते मॅच भारतीय संघ जिंकला आणि 2011 चा विश्वविजेता म्हणून  घोषित झाला.

त्यानंतर गौतम यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.

IPL मधील कारकीर्द :
2012 नंतर त्यांनी आयपीएल मध्ये खूप चांगल्या प्रकारे कामगिरी केली . IPL कारकिर्दीत त्यांनी एकूण 154 सामने खेळलेले आहेत आणि त्यामध्ये 4218 धावा काढलेल्या आहेत.

भारतातील नवीन पिढीला चान्स मिळावा या उद्देशाने त्यांनी नंतर तेथून ही निवृत्ती घेण्याचे ठरवले.

Gautam Gambhir Networth :

गौतम गंभीर यांच्याकडे जवळपास 150 करोड रुपयांची संपत्ती आहे.

Gautam Gambhir Car Collection :
गौतम यांना महागड्या कारची आवड आहे. त्यांच्याकडे भरपूर अशा गाड्या आहेत.
• BMW X5
• Porsche 911
• Audi Q7
• BMW 530 D
• Mercedes GLS 360 D
अशा गाड्यांचा समावेश आहे.

Gautam Gambhir Love Life :
गौतम यांनी नताशा जैन यांच्यासोबत 2011 मध्ये विवाह केला. नताशाचे वडील खूप मोठे उद्योजक आहेत.

Gautam Gambhir Controversy :

क्रिकेट मधील कंट्रोवर्सी हा शब्द ऐकला तर सर्वात प्रथम नाव येतो त्या गौतम गंभीरच. गौतम हे स्वभावाने कडक असल्यामुळे त्यांना लहान लहान गोष्टींवरती राग येतो. मग आलेला राग मोठ्या प्रमाणात व्यक्त केल्यावरती अनेक कॉन्ट्रोव्हर्सीज ला त्यांना सामोरे जावे लागायचे.

• Shaheed Afridi
• Kamran Akmal
• Virat Kohli

यांच्यासोबत झालेल्या कंट्रोल व्हर्सेस संपूर्ण जगाला माहीतच आहेत. त्या आपण क्रिकेट सामन्यांच्या वेळेस पाहिलेले आहेत.

Gautam Gambhir Family

सन 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गौतम गंभीर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली पूर्व दिल्ली येथून खासदार झाले. 17 जून 2019 ला त्यांनी खासदारकीची शपथ घेतली.

एका इंटरव्यू मध्ये गौतम म्हणाले होते, खूप जण म्हणतात की मी पार्ट टाइम खासदार आहे. परंतु जेव्हा मी गरीब लोकांना एक रुपयांमध्ये जेवण मिळतं ही भावना मनामध्ये ठेवून काम करतो त्यामध्येच मला समाधान वाटतं.

एक आशा – जन रसोई  :
गौतम गंभीर यांनी अनेक ठिकाणी अशा पद्धतीने किचन सुरू केलेली आहेत ज्यामध्ये गरिबांना फक्त एक रुपया मध्ये अनलिमिटेड जेवण मिळतं.


Gautam Gambhir Team India Coach :

09 जुलै 2024 पासून गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवीन कोच म्हणून जय शहा यांनी घोषित केले.
आगामी काळात गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची रुपरेषा ठरवली जाईल.
गंभीर यांच्या नेतृत्व शैलीचे किस्से सर्वांना माहीतच आहेत.

अशाच प्रकारच्या प्रेरणादायी पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा

1 thought on “Gautam Gambhir Biography In Marathi | New Team India Coach”

Leave a Comment