
Prajakta Mali Biography In Marathi
प्राजक्ताचा जन्म 08 ऑगस्ट 1989 ला बार्शी, सोलापूर येथे झाला. प्राजक्ताचे बालपण तसं तर पुण्यामध्येच झालं. प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण हे येथेच पूर्ण झालं. प्राजक्ताचे वडील हे महाराष्ट्र पोलीस दलात होते तर आई गृहिणी होती.
प्राजक्ताच्या आईला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती त्यांना जे जमलं नाही ते त्यांच्या मुलीने करावे असे त्यांची इच्छा होती. आपल्या मुलीने मीनाक्षी, शेषाद्री यांच्यासारखे नृत्यांमध्ये चांगल्या प्रकारे करिअर घडवावे असे त्यांना वाटायचं.
मग काय प्राजक्ताने आईच्या म्हणण्यानुसार भरतनाट्यम चे क्लास लावले आणि भरत नाट्यम या कला प्रकारांमध्ये ते चांगल्या प्रकारे धडे घेऊ लागली.
वयाच्या अगदी सहाव्या वर्षी प्राजक्ताला नृत्य कला प्रकाराची आवड निर्माण झाली आणि शिकू लागली. त्याच वर्षी ते छोट्या पडद्यावरील सह्याद्री या वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर या मालिकेत नृत्य करताना दिसून आली.
त्यानंतर दम दमा दम या कार्यक्रमामध्ये तिने भाग घेतला तसेच अनेक स्पर्धेमध्येही त्यावेळेस भाग घेत असायची. आणि एकदम लहान वयात असतानाच ती टीव्हीवर झळकली.
नाव : | प्राजक्ता माळी |
जन्म : | 8 ऑगस्ट 1989 |
आई : | श्वेता माळी |
कार्यक्षेत्र : | अभिनय |
शिक्षण : | पदवी |
धर्म : | हिंदू |
संपत्ती : | 40 करोड |
व्यवसाय : | प्राजक्तराज |
क्या मस्ती क्या धूम हिंदी वाहिनीवरील असणाऱ्या या शोमध्ये सुद्धा ती नृत्य करताना दिसली. आणि त्या शो मध्ये विजेतेपद पटकावलं.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून तिने भारत नाट्यम या विषयातील पदवी प्राप्त केली. त्यावेळेस तिला वाटायचं की आपण एअर फोर्स मध्ये जावं. त्याचप्रमाणे घरात वडिलांचा पोलिसीपेशा असल्यामुळे तिचं पोलीस बनण्याचे देखील स्वप्न होतं.
वाल्मीक कराड बायोग्राफी Click Here
एक वेळेस ती दिल चाहता है हा चित्रपट बघत होती त्यावेळेस तिला आपला देखील स्टुडीओ असायला पाहिजे असा मनामध्ये विचार आला. परंतु परमेश्वराच्या मनामध्ये काही वेगळंच होतं. तिच्यासाठी ही ते खूप आनंददायी असणार होत.

पुणे युनिव्हर्सिटीच्या ललित कला केंद्रातून नृत्य विभागातून तिने पदवी प्राप्त केली.
- अभिनय क्षेत्रात पदार्पण :
एकदा रस्त्यामध्ये तिला तिचा मित्र भेटला. आणि तिला बघतात त्याने चित्रपटाच्या सेटवर जाण्याचा सल्ला दिला. आणि तू ऑडिशन दे असं त्याने सांगितलं.
त्या ठिकाणावरून जवळच चित्रपटाची शूटिंग होत होती. संजय सुरकर यांच्या चित्रपटाची त्या ठिकाणी शूटिंग होत होती त्यांना अभिनेत्री पाहिजे होती आणि प्राजक्ताला त्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली.
त्या चित्रपटाचे नाव तांदळा एक मुखवटा. अभिनय क्षेत्रातील तिच्या कारकीर्दीतला हा पहिलाच चित्रपट होता. विशेष बाब म्हणजे त्या चित्रपटांमध्ये तिचा एक ही संवाद नव्हता.
त्यानंतर तिने गुड मॉर्निंग महाराष्ट्र या शोमध्ये अँकरिंग साठी ऑडिशन दिलं. आणि त्यामध्ये ती सिलेक्ट सुद्धा झाली. त्यानंतर तिने साम मराठीवर सुगरण, गाणे तुमचे आमचे यासारख्या शो मध्ये निवेदिका म्हणून काम केलं.
- जुळून येती रेशीमगाठी :
प्राजक्ताच्या अभिनय क्षेत्रातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आला तो म्हणजे झी मराठीवरील जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे. यामध्ये आदित्य आणि मेघना या पात्रासाठी ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांची केमिस्ट्री सबंध महाराष्ट्राला पसंतीस आली.
मालिकेच्या लोकप्रियतेमुळे प्राजक्ता संपूर्ण महाराष्ट्रामुळे मेघना या नावाने ओळखू लागली. कामाच्या निमित्ताने पुण्यावरून मुंबईला आलेल्या प्राजक्तानं याच मालिकेच्या कमाईतून मुंबई येथे स्वतःचे घर घेतलं.

छोट्या पडल्यावरती काम करत असताना प्राजक्ताला वाटायचं की आपण रंगभूमीवर सुद्धा काम केलं पाहिजे. मनामध्ये करण्याची इच्छा असेल तर माणूस कोणत्याही क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकतो याचे उदाहरण प्राजक्ता माळी कडे पाहून येत.
- पहिलं व्यावसायिक नाटक
लेजंड सरप्राईज या नाटकाच्या माध्यमातून प्राजक्ता माळी ने नाटक क्षेत्रांमध्ये पाऊल टाकलं.
त्यानंतर शिवपुत्र संभाजी राजे, निम्मा सीमा राक्षस या नाटकांमधून मी वेगवेगळे भूमिकेमध्ये दिसून आली.
सुवासिनी या मालिकेचे भाग पाहत असताना त्यातील प्राजक्ताचे अभिनय इतके आवडले की दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या आगामी चित्रपट असलेल्या खो खो यात प्राजक्ताला मुख्य भूमिका देऊ केली.
आणि या चित्रपटामध्ये भरत जाधव आणि प्राजक्ता माळी यांची केमिस्ट्री संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलेच आहे.
प्राजक्ताने आजपर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये तसेच वेब सिरीज मध्ये काम केलेला आहे.
आजपर्यंत मला वेगवेगळे पात्र साकारायला मिळाले त्याचा मला सर्वस्वी आनंद आहे आणि ते करत असताना मी मनमोकळे जगत होते.
~प्राजक्ता माळी
- महाराष्ट्राची हास्यजत्रा :
सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांमध्ये प्राजक्ता सुरुवातीपासूनच निवेदिका म्हणून काम करत आहेत. तिचं हसणं, वेगवेगळ्या कमेंट्स आणि एकंदरीतच निवेदन करण्याची पद्धत यामुळे या शोमध्ये तीने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
अनेक भागांमध्ये तिच्यावरती वेगवेगळे विनोद सुद्धा करण्यात आले. तिचे वा दादा वा हे वाक्य वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल झालेले आहे.
अनेक स्किट मध्ये सुद्धा ती दिसून आली.
- फरसाण प्रेमी प्राजक्ता :
प्राजक्ताला फरसाण खाण्याची खूप आवड आहे. कोणत्याही चित्रपटाची शूटिंग असो अथवा महाराष्ट्राची हास्य जत्रा ची शूटिंग असो तिच्यासोबत कोणी असो अथवा नसो परंतु फरसाण नेहमीच असते.
∆ प्राजक्त राज :
प्राजक्ताने अभिनय क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे काम करत असताना काहीतरी आऊट ऑफ द बॉक्स करण्याचा विचार केला. खरं पाहायला गेलं तर महिलांच प्रमाण उद्योगधंद्यात खूप कमी प्रमाणात दिसून येतात परंतु प्राजक्ताने खूप हिमतीने प्राजक्तराज हा तिचा व्यवसाय सुरू केला.

मराठी लोकांना काही मोजकेच दागिने माहीत होते त्यामुळे तिने काहीतरी नवीन करून वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्या ग्राहकांना देण्याचा निर्धार केला.
तांब्याच्या धातूपासून वेगवेगळे डिझाईन प्राजक्ताने बनवले आणि त्यावरती रिसर्च करून ते फायनल केले. मोठ्या उत्साहात तिनं या तिच्या नव्या स्टार्टअप च उद्घाटन केलं.
अशाच प्रेरणादायी पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा
1 thought on “Prajakta Mali Biography In Marathi | Maharashtrachi Hasyajatra| Prajaktaraj”