Ranveer Allahbadia Biography In Marathi | Girlfriend, Family, Networth ,Past | व्यसनातून बाहेर येऊन कसा झाला यशस्वी Youtuber
उद्योजक,युट्युबर, इन्फ्ल्यूंसर म्हणून प्रसिद्ध असलेला रणवीर अलाहाबादिया याच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
रणवीर अलाहाबादिया याचा जन्म 2 जुलै 1933 ला मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्याचे वडील गौतम अलाहाबादिया आणि आई स्वाती अलाहाबादिया दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. रणवीर चे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल येथून घेतले. तसेच महाविद्यालयीन शिक्षण द्वारकादास जे सांगवी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथून घेतलेले आहे.
• रणवीर शाळेत असताना एक हुशार विद्यार्थी होता. त्याला लहानपणापासूनच छोट्या छोट्या गोष्टींमधून प्रयत्न घेण्याची सवय होती. तसेच त्याला फुटबॉल आणि बास्केटबॉल खेळण्याचे लहानपणापासूनच आवड लागलेली होती. वडिलांसोबत क्रिकेट मॅच बघण्यात त्याला खूप मजा यायची तसेच बाहेर फिरणे,खेळणे त्याला खूप आवडायचं.
13-14 वर्षांचा झाल्यानंतर रणवीरला व्हिडिओ गेम खेळण्याचा नाद लागला. नाद कसला व्यसनच म्हणता येईल त्याला. तो सतत गेम खेळून एक प्रकारे व्हिडिओ गेमच्या आहारी गेला होता.
नाव : रणवीर गौतम अलाहाबादिया
जन्म : 2 जुलै 1993
जन्मस्थळ : मुंबई,महाराष्ट्र
शाळा : धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल
कॉलेज : द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
आई : स्वाती अलाहाबादिया
Website : beerbiceps.com
YouTube Channel : BeerBiceps
Awards :
• Popular Choice Best Fashion Blogger by Cosmopolitan (2019)
• Disruptor of the Year Award at National Creators Award (2024)
Ranveer Allahbadia Biography In Marathi
बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला पुढे काय करायचं याबद्दल काही कळेना. नातेवाईक कांची मुलं इंजिनिअरिंग कॉलेजला असल्यामुळे त्यानेही त्याच क्षेत्राकडे जाण्याचा निर्णय घेतला. बी इ in टेलिकम्युनिकेशन मध्ये त्याने प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये गेल्यानंतर रणवीर च पूर्ण चित्रच बदलून .
तो अशा मित्रांच्या संगतीत गेला होता ज्यांना दारू पिणे, सिगारेट अशा भरपूर वाईट गोष्टींची सवय होती. त्यामुळे रणवीरला नंतर या गोष्टी कराव्या लागायच्या. तो या गोष्टींच्या आहारी गेला होता.
कॉलेजच्या प्रथम वर्षात असताना त्याची प्रेयसी याच्यासोबत रणवीर भांडू लागला दारू पिऊन तिला शिव्या देऊ लागला. त्यामुळे दोघांचं ब्रेक-अप झालं.
त्यानंतर रणवीरला एक दुसरी मुलगी आवडत असे तो दिवसभर तिच्यासोबत बाहेर फिरायला जायचं. काही काळानंतर त्याला कळालं की ती मुलगी त्याला धोका देत आहे फक्त त्याचा वापर करून घेत आहे तिच्या खर्चासाठी. त्यानंतर तो खूप निराश झाला.
काही दिवसानंतर त्याचा प्रथम वर्षाचा निकाल लागला आणि तो फेल झाला. जवळच्या माणसाने दिलेला धोका हा रणवीर सहजासहजी पोहोचू शकला नाही.
रणवीर ला लहानपणापासूनच बॉक्सिंग बघण्याचा आणि बॉडी बिल्डर सारखे बॉडी आपली पण असावी असं त्याला वाटायचं. मग त्याने जिम जॉईन केली.
एका इंटरव्यू मध्ये रणवीर सांगतो “माझा जिम जॉईन करण्याचा निर्णय हा आजपर्यंत मी घेतलेला सर्वात उत्तम असलेला निर्णय होता त्यानंतर माझ्या आयुष्यात खूप चांगले बदल झाले आहेत”.
जर चांगली बॉडी बनवायचे असेल तर व्यसनांपासून लांब राहावं लागतं आणि रणवीर ला बॉडी बनवायची होती म्हणून त्याने सिगारेट,दारू या गोष्टी सोडून दिल्या आणि फक्त फिटनेस कडे लक्ष दिलं. थोड्या दिवसानंतर तो एक जिम ट्रेनर म्हणून काम करू लागला.
जिम ट्रेनर म्हणून काम करत असताना रणवीर ने एक youtube वरती चैनल काढलं होतं त्याचं नाव होतं Beerbiceps . मोबाईल मध्ये व्हिडिओ करून नंतर तो लॅपटॉप वरती एडिट करून रणवीर youtube वरती अपलोड करू लागला.
परंतु त्याला एका कॅमेराची गरज होती नवीन कॅमेरा घेण्यासाठी त्याला पैसे नव्हते म्हणून त्याने त्याचा व्हिडिओ गेम चा सेटअप विकला तरी पैसे कमी पडू लागले अनेक जणांना त्यांनी पर्सनल जिम ट्रेनिंग दिली होती त्याचे पैसे गोळा करून त्याने कॅमेरा घेतला.
आणि व्हिडिओ त्याच्या यूट्यूब चैनल वरती अपलोड करू लागला.
काही महिने त्याने खूप मेहनत घेतली परंतु घरच्यांना हे पटत नव्हतं. जर तुला जिम ट्रेनरच बनायचं होतं तर मग इंजीनियरिंग चे शिक्षण घेण्याचा उपयोग काय असा घरच्यांकडून त्याला सतत विचारणा होत असायचे.
त्यानंतर रणवीर ने जसे जसे पैसे जमा लागले त्याच्याकडे त्याने एक कॅमेरामन ठेवला. राजेश नावाच्या या कॅमेरामॅन ला रणवीर 200 रुपये देऊ लागला.
…………………………………………………………….
” अपयशाच्या भीतीने खूप जण रिस्क घेत नाहीत”
…………………………………………………………….
Ranveer Allahbadia Biography In Marathi
पण रणवीर त्यातला नव्हता रिस्क हे तो इश्क या मानसिकतेतून रणवीर आलेला होता. तोच कॅमेरामन राजेश त्याच्या आयुष्यात असं काही घडवून आणेल याची कल्पना रणवीरला सुद्धा नव्हती. गुरुवारी आणि रविवारी व्हिडिओ अपलोड करायचा असं त्याने ठरवलं. Beerbiceps मध्ये रणवीर आणि राजेश दोघांची पार्टनरशिप चांगली जमली.
परंतु अपलोड केलेल्या व्हिडिओ वरती जास्त वेळ सबस्क्राईबर होत नसल्याने ते निराश होऊन गेले. त्यांनी एक शेवटचा प्रयत्न करण्याचा ठरवला आणि मग मेन्स फिटनेस अँड लाइफस्टाईल वरती ते व्हिडिओ अपलोड केला.
बघता बघता त्या एका व्हिडिओ वरती लाखो views आले. मग त्यांना प्रेरणा मिळाली आणि ते त्यावरती काम करू लागले.
आज रणवीर त्याच्या Beerbiceps या यूट्यूब चैनल वरती यशस्वी असलेल्या लोकांचे इंटरव्यू घेतो. सर्वात मोठ्या पोडकास्ट चैनल पैकी त्याचे एक आहे.
∆ MONK Entertainment नावाचे रणवीर चे एक मार्केटिंग एजन्सी आहे त्यामधून हे तो चांगल्या प्रकारे पैसे कमवतो. मोठ्या मोठ्या ब्रँडचे ॲड youtube चैनल वरती तसेच फेसबुक इंस्टाग्राम सर्व मॅनेज करण्याचे काम हे एजन्सी करते यामध्ये त्याची एक टीम आहे. जवळपास 40 ते 50 जणांची टीम यामध्ये काम करते.
5 thoughts on “Ranveer Allahbadia Biography In Marathi|Girlfriend | व्यसनातून बाहेर येऊन कसा झाला यशस्वी Youtuber”