Shraddha Khapra Biography In Marathi|मायक्रोसॉफ्ट सोडण्यामागचं कारण..

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

Shraddha Khapra Biography In Marathi

मायक्रोसॉफ्ट वाली दीदी किंवा श्रद्धा दीदी अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या श्रद्धा खापरा यांच्या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

• हरियाणाच्या छोट्याशा एका गावामध्ये 1 ऑगस्ट 2000 ला श्रद्धा चा जन्म झाला. अगदी मध्यमवर्गीय कुटुंब होते. एकाच खोलीमध्ये ते राहत असे. श्रद्धा चा लहानपणीच जीवन हे फारच संघर्ष होतं असं म्हणता येईल.

• तिला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. तसेच टीव्ही पाहायला देखील तिला खूप आवडायचं.

∆ लहानपणीच श्रद्धाच्या वडिलांनी तिला सांगितलं होतं जर आपल्याला आयुष्यामध्ये काही मोठं करायचं असेल तर अभ्यास हा करावाच लागेल. त्याशिवाय पर्याय नाही. 

वडिलांकडून मिळालेल्या बाळकडूमुळे श्रद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करायची.

नाव : श्रद्धा खापरा

जन्म : 1 ऑगस्ट 2000

जन्मस्थळ : हरियाणा

व्यवसाय : Teacher , YouTuber

कॉलेज : नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NSIT)

संपत्ती : 8 करोड

पती : अमन धतरवाल

Official Channel : Apna College

• श्रद्धा चा संघर्षमय प्रवास :

हरियाणा राजस्थान भागामध्ये आज ही दहावीनंतर मुलींना बीए बीकॉम अशा शाखेकडे ऍडमिशन देण्याचा कल जास्त दिसतो. श्रद्धा च्या बाबतीत ही अगदी तसंच होत होतं. परंतु श्रद्धा ने ठरवलं होतं सायन्स घ्यायचं. घरच्यांना समजावून श्रद्धाने सायन्स घेतला.

कॉलेजमध्ये असताना तिने एक प्रायव्हेट क्लास लावला होता. कॉलेज सुटल्यानंतर क्लासला जाण्यासाठी तिला दोन अडीच तास लागायचे. मग ती रात्री नऊ दहा वाजता घरी यायची. बसच्या गर्दीमध्ये पैसे वाचवण्यासाठी श्रद्धा प्रवास करायची. 

त्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेजला आल्यानंतर श्रद्धाला पहिल्यांदाच लॅपटॉप मिळाला. एका मुलाखतीमध्ये तिने सांगितलं आहे की तिला सुरुवातीला त्यांच्या गावामध्ये मोबाईल,कम्प्युटरची सोय नव्हती तेव्हा ती नेट कॅफे मध्ये जाऊन बसायची. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तिच्या लहान भावाने तिला मोबाईल मधले ॲप्स बद्दल माहिती दिली

.• Shraddha Khapra Career :

श्रद्धा खापरा हिने शिक्षणासाठी जैन भारती मृगावती विद्यालयात प्रवेश घेतला. तिला 10 वी मध्ये 10 चे CGPA आणि 12 वीं मध्ये 94.4% CGPA मिळाले. तिने नेताजी सुभाष इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (NSIT) मधून संगणक अभियांत्रिकीच्या पदवीवर 8.8 मिळवले.

तीन महिने श्रद्धा खापराने मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर इंटर्न म्हणून काम केले. कामाच्या ठिकाणी मायक्रोसॉफ्टमध्ये तिच्या वेळेचा तिच्यावर मोठा प्रभाव पडला. प्रत्येकाने अशा कामाच्या वातावरणात उतरले पाहिजे, असे तिला वाटते.

• तिच्या इंटर्नशिपनंतर, तिला एका महिन्यासाठी DRDO मध्ये संशोधन प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त करण्यात आले. तिला जुलै 2021 मध्ये तेलंगणामध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले.

∆ मायक्रोसॉफ्ट सोडण्यामागचं कारण ?

• एका मुलाखतीमध्ये श्रद्धा म्हणाली होती, मायक्रोसॉफ्ट सारखे मल्टिनॅशनल कंपनी सोडताना श्रद्धाच्या मनात अनेक वेळा चिंता निर्माण झाली होती की पुढे काय होईल. परंतु तिने शिक्षण क्षेत्रामध्ये फुल टाइम उतरण्याच ठरवलं.

ज्या गोष्टींचा मला माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये सामना करावा लागायचा त्या अडचणी इतर विद्यार्थ्यांना येऊ नये म्हणून श्रद्धा ने क्लासेस घेण्यास सुरुवात केली

• Aman Dhattarwal सोबत ओळख :

श्रद्धा मायक्रोसॉफ्ट मध्ये काम करत असताना यांच्याशी तिची ओळख झाली. त्याने वेळोवेळी श्रद्धाला मार्गदर्शन केले. दोघांनी मिळून आपणास कॉलेज हे युट्युब वरती एक चैनल काढलं.त्यावर तिथे कम्प्युटर सायन्स रिलेटेड व्हिडिओ बनवू लागले. आणि या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी साठी क्लास सुरू केले.

अमनने केले श्रद्धाला प्रपोज :

फेब्रुवारी 2023 च्या हृदयस्पर्शी महिन्यात,युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांच्या गर्दीच्या वेळी, अमन धत्तरवालने श्रद्धा खाप्राला प्रपोज करण्याचे धैर्य दाखवले. श्रध्दा क्षणार्धात उभी राहिल्याने संपूर्ण इंटरनेटने आपला श्वास रोखून धरला आणि त्याचा मनस्वी प्रस्ताव आनंदाने स्वीकारला. जगभरातील लोकांच्या हृदयाला स्पर्श करणाऱ्या प्रपोजल व्हिडिओसह त्यांची प्रेमकथा त्वरित खळबळजनक बनली.

21 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांच्या मोहक व्यस्ततेनंतर, अमन धत्तरवाल आणि श्रद्धा खापरा यांनी लग्नाच्या दिशेने सुंदर प्रवास सुरू केला. त्यांचे प्रेम, डिजिटल क्षेत्रात जन्मलेले आणि कोडिंग प्रकल्प आणि सामायिक स्वप्नांमध्ये वाढलेले, खोल, वास्तविक कनेक्शनमध्ये बहरले.

SIGMA 3.0 𝚺

Complete DSA + Web Development

Everything included in Alpha Plus 3.0Projects like Zerodha, Airbnb,Zoom, Linkedin, ChatGPT,Github & many moreQuant & Aptitude Preparation

Complete MERN StackFrontend & ReactBackend & DatabaseGit & Github

2 Certificates of Completion

Duration – 8.5 months

Apna College वरती श्रद्धा आणि अमन अशा प्रकारे अनेक विषयावरती क्लासेस घेतात. विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी मदत करतात.

त्यांच्या क्लास मधील अनेक विद्यार्थी मोठ्या कंपनीमध्ये आज नोकरी करत आहेत.

अश्याच प्रकारच्या प्रेरणादायी पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा


5 thoughts on “Shraddha Khapra Biography In Marathi|मायक्रोसॉफ्ट सोडण्यामागचं कारण..”

Leave a Comment