Tejashree Pradhan Biography | Premachi Gosht | Marathi Actress

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

Tejashree Pradhan Biography

अभिनयाच्या जोरावरती स्वतःच नाव कमावणाऱ्या तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जान्हवी या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. आजपर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटांमध्ये काम केलेल आहे. तिचा आज पर्यंतचा संपूर्ण प्रवास जाणून घेऊया.

तेजश्री चा जन्म 2 जून 1988 ला मुंबई येथे झाला. तिचे पुढील शालेय शिक्षण डोंबिवली येथे झाले. डोंबिवलीतल्या चंद्रकांत पाटकर विद्यालयामध्ये ती शिकत होती.

शाळेत असतानाच तिला नृत्य, संगीत, गायनाची आवड होती.आता जरी तेजश्री तिच्या अभिनयामुळे ओळखली जाते परंतु शाळेत असताना ती गायनासाठी ओळखली जायची.

• शालेय शिक्षण झाल्यानंतर तिने मुलुंडच्या KET’s V. G. Vaze College of Arts, Science and Commerce येथून आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. आणि याच काळात तिने मॉडेलिंग करण्यास सुरुवात केली.

नाव : तेजश्री प्रधान

जन्म : 02 जून 1988

जन्मस्थळ : मुंबई

शाळा : चंद्रकांत पाटकर विद्यालय, डोंबिवली

कॉलेज : KET’s V. G. Vaze College of Arts, Science and Commerce

शिक्षण : पदवी

प्रसिद्ध मालिका : होणार सुन मी या घरची, प्रेमाची गोष्ट

प्रसिद्ध चित्रपट : ती सध्या काय करते

• Tejashree Pradhan First Movie :

तेजश्री चा पहिला सिनेमा लक्ष्मी होता. चित्रपटाचे शूटिंग काही प्रमाणात झाले सुद्धा होते. परंतु अनावधानाने तो पूर्णत्वास गेला नाही. त्यामुळे तो प्रदर्शित झाला नाही.

परंतु या चित्रपटाच्या शूटिंग मुळे तिला बऱ्याचशा गोष्टी समजल्या. या क्षेत्रामधील माहिती मिळण्यास हळूहळू सुरुवात झाली.

त्यानंतर तिने कर्तव्य, चित्रा अशा चित्रपटांमधून छोट्या छोट्या भूमिका साकारल्या. आणि अभिनय क्षेत्रात तिची वाटचाल सुरू झाली.

या छोट्या छोट्या भूमिका करत असताना तिला अवधूत गुप्ते यांचा झेंडा या सिनेमाची ऑफर आली. या चित्रपटांमध्ये तिची मोठी भूमिका नव्हती परंतु त्यातील केलेल्या कामामुळे पुढे तिला सचिन पिळगावकर यांच्यासोबत शर्यत या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली तिथे तिला चांगल्या प्रकारे भूमिका मिळाली होती.

त्यानंतर उदय या सिनेमातही ती दिसून आली. या भूमिका करत असतानाच छोट्या पडद्यावरती तिला ऑफर येऊ लागल्या तुझं आणि माझं घर श्रीमंताचं, लेक लाडकी या घरची या मालिकांमध्ये काम केलेला आहे.

• त्यानंतर हृदय, लग्न करावे पाहून यासारखे सिनेमे सुद्धा केले. या केलेल्या कामामुळे तिला झी मराठीवरची होणार सुन मी या घरची या मालिकेमध्ये मुख्य भूमिका मिळाली. आणि अभिनय क्षेत्रामध्ये सर्वात मोठी कलाटणी देणारी ही संधी तिला मिळाली.

तिने आजपर्यंत अनेक कौटुंबिक मालिका केल्या होत्या परंतु या मालिकेमुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनामध्ये तिने घर केलं होतं. त्या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद तिच्यासाठी खूप आनंददायी होता.

तेजश्रीचा साधा भोळा स्वभाव आणि तिच्या चेहऱ्यावरती सतत असणार स्मितहास्य हे प्रेक्षकांच्या पसंतीस येऊ लागलं. या मालिकेमध्ये शशांक केतकर यांनी साकारलेल्या श्री या पात्राची तती बायको होती. मालिकेमध्ये असणारे श्री आणि जान्हवी नंतर खऱ्या आयुष्यात सुद्धा नवरा बायको झाले.

• 08 फेब्रुवारी 2014 ला तेजश्री ला झी मराठी ची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळाला. तेजश्री आणि शशांक ची जोडी संपूर्ण महाराष्ट्राला पसंतीस आली.

• परंतु खऱ्या आयुष्यात ही जोडी फार काळ टिकली नाही. त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा प्रसंग पुढे उद्भवला. काही काळानंतर या दोघांमध्ये घटस्फोट झाला. आणि ते वेगळे झाले.

2015 साली डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या मराठी चित्रपटांमध्ये तिने एक छोटीशी भूमिका साकारली परंतु तिची भूमिका दिसायला जरी साधी असली तरी त्यामुळे ती चर्चेत आली.

• नाटक विश्वात झाली एंट्री :

छोट्या पडद्यावरती तसेच चित्रपटांमध्ये काम करत असताना तेजश्रीला मनामध्ये कुठेतरी वाटत होतं की आपण नाटक करायला पाहिजेत. परंतु तसा योगायोग जुळून येत नव्हता.

~ दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांच्यासोबत कार्टी काळजात घुसली या नाटकांमध्ये तिने महत्त्वाची भूमिका साकारली. या नाटकांमधून बाप आणि मुलीचे नाते सबंध महाराष्ट्राच्या पसंतीस आले.

• ती सध्या काय करते :

2017 हे साल तेजश्री साठी खूप महत्त्वाचं ठरलं. सतीश राजवाडे यांच्या ती सध्या काय करते या मराठी चित्रपटामध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. त्यात तिने साकारलेलं तनवी हे पात्र अनेक तरुणांच्या काळजात घर करून गेलं.

महाराष्ट्राची क्रश असेही या चित्रपटातील भूमिकेमुळे तिला ओळखू लागले.अंकुश चौधरी हे या सिनेमामध्ये मुख्य अभिनेते होते.

• त्यानंतर तिने ओली की सुकी या चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं. तसेच सुर नवा ध्यास नवा या रियालिटी शोमध्ये तिने अँकरिंग सुद्धा केली आहे.

∆ तिने त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केलेला आहे. चित्रपटातील केलेल्या कामामुळे अनेक पुरस्कार सुद्धा तिला मिळालेले आहेत

Premachi Gosht :

सध्या स्टार प्रवाह या वाहिनी वरती प्रसिद्ध असलेल्या प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये तेजश्रीला मुख्य भूमिका मिळाली आहे. त्यामध्ये मुक्त आहे पात्र ती साकारत आहे.या मालिकेमध्ये सुद्धा खूप रंजक वळण येत आहेत. प्रत्येक वेळी प्रमाणे याही मालिकेमुळे ते प्रेक्षकांना मनोरंजन घडवून आणत आहे.

हॅश टॅग तदेव लग्नम् हा तिचा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.•

Tejashree Pradhan Instagram :

इंस्टाग्राम वरती तिचे 1.3 मिलियन फॉलोवर आहेत. तिच्या चाहत्यांसाठी ते थे पोस्ट टाकत असते.


अशाच प्रकारच्या आणखी पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा


1 thought on “Tejashree Pradhan Biography | Premachi Gosht | Marathi Actress”

Leave a Comment