Ankita Walawalkar Biography|Big Boss Marathi | Kokanhertedgirl

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

Ankita Walawalkar Biography

अंकिता प्रभू वालावलकर सध्या बिग बॉस मराठी च्या पाचव्या सीजन मुळे हे नाव खूप चर्चेत आहे. अंकिता ही या सीझनमधील पहिली कॅप्टन बनलेली आहे. एका सामान्य घरातून सुरू झालेला अंकिताचा प्रवास ते बिग बॉस मराठी सारख्या एका नामवंत रियालिटी शो पर्यंत कसा होता त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

कोण आहे अंकिता प्रभू वालावलकर ?
• तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी घडामोड ?
• चुकीच्या माणसावरती प्रेम केल्याने काय होतं ?
• कशामुळे झाली इंस्टाग्राम वरती एवढी प्रसिद्ध ?
• अंकिता वालावलकर किती कमवते ?
• बिग बॉस मराठी मधील प्रवास ?

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

कोण आहे अंकिता प्रभू वालावलकर ?
अंकिता चा जन्म 14 जानेवारी, 1993 ला देवबाग, मालवण येथे झाला. एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये अंकिताच बालपण गेलं. लहानपणी घरच्यांच्या धाकामुळे अंकिता अभ्यास करत असायची. घरच्यांनी लावलेल्या शिस्तीला कधी कधी कंटाळून जायची.

नाव:अंकिता वालावलकर
जन्म :14 जानेवारी 1993
जन्मस्थळ :देवबाग, मालवण
शिक्षण :Enginnering
व्यवसाय :Instagram Influencer, YouTuber
वडिल :प्रभू वालावलकर
बहीण :प्राजक्ता वालावलकर, ऋतुजा वालावलकर
TV Show :Big Boss Marathi
संपत्ती :2 करोड
Ankita Walawalkar Instagram

पिंजऱ्यात असणाऱ्या पोपटासारखे तिला तिच आयुष्य वाटायचं. लहानपणी प्रत्येकालाच असं वाटतं, त्यात नवल काही नाही. परंतु अंकिता अभ्यासात खूप हुशार होती. वर्गात तिचा पहिला नंबर येत असे. परंतु अभ्यासात कधी कधी मन रमाईच नाही अशा जडणघडणीतून तिचा प्रवास सुरू झाला.

तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी घडामोड ?

खरंतर सोळावं वर्ष धोक्याचं म्हणतात ते खर आहे. प्रत्येक जण कधी ना कधी प्रेमात पडलेला असतो. पण ते प्रेम आहे की आकर्षण हे समजण खूप गरजेचं असतं. कारण त्यावरती संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं.

इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असताना अंकिता एका मुलाच्या प्रेमामध्ये पडली. तो मुलगा तिच्या पेक्षा दहा-बारा वर्षांनी मोठा होता. दोघांच्या वयामध्ये खूप मोठा फरक होता.

काही काळ त्यांच्यामध्ये चांगले संबंध राहिले त्यामुळे नंतर अंकिताने पुढचा विचार करून हा माझ्याशी लग्न करेल या हेतूने त्याच्यासोबत पळून गेली. खूप लहान वय होतं त्या वयामध्ये कोणता निर्णय बरोबर असेल किंवा चुकीचा ही समज मुला-मुलींना नसते. परंतु आपला निर्णय बरोबरच आहे असं त्यांना वाटतं.

त्या मुलाच्या घरी अंकिता राहायला गेली. जवळपास दीड वर्ष तिथे राहिली. परंतु हळूहळू तिला एका वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागले. तो सतत तिच्यासोबत भांडत असायचं. कधी कधी मारहाण सुद्धा व्हायची.


परंतु एक गोष्ट तिच्यासाठी महत्त्वाची ठरली, अंकिताची सासू (त्या मुलाची आई) चांगल्या स्वभावाची मिळाली. तिने अंकिताला तिचं पुढील शिक्षण चालू ठेवण्यास आग्रह धरला. तू फक्त सध्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर बाकी काही गोष्टीकडे लक्ष देऊ नको अशी प्रेमाची समज सुद्धा दिली.


(त्यांनी लग्न केलेले नव्हते. Relationship मध्ये राहत असतं)

त्यामुळे अंकिताने तिचे पुढील शिक्षण चालू ठेवले. काही काळानंतर त्यांच्यामध्ये खूपच वाद विवाद होऊ लागल्यामुळे तिनं परत तिच्या स्वतःच्या घरी आई-वडिलांकडे जाण्याचे ठरवले.

आई-वडिलांनी हे मोठ्या मनाने तिला परत स्वीकारलं. तुझी चूक तुला समजली असेल तर त्यातून शिकून पुढे काहीतरी चांगलं कर असं सांगितलं.

चुकीच्या माणसावरती प्रेम केल्याने काय होतं ?
मित्रांनो, प्रेम कारण चुकीच नाही परंतु चुकीच्या माणसासोबत करणं खूप धोकादायक ठरू शकत. प्रेम आणि आकर्षण यातला फरक पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे.

आज तरूण पिढीला प्रेम रोग नावाचा एक भयंकर रोग झालेला आहे.

प्रेम म्हणजे काय ? हे समजण्यापेक्ष्या भलतेच उद्योग चालू आहेत.प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीवर निस्वार्थ भावनेतून जीव लावणे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसणे.

हल्ली आज एका सोबत तर उद्या दुसऱ्यासोबत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

चित्रपटात दाखवल्या प्रमाणे वास्तवात ही तश्याच गोष्टी असतील असा गोड गैरसमज झालेला आहे. त्यासाठी काही अंशी चित्रपटातील चुकीचा संदेश ही जबाबदार आहेत.

Boy Friend, Girl Friend ही नविन Concept जन्माला आली. भविष्यात ही किती महागात पडणार आहे हे खरंच बघण्यासारखं आहे.

Ankita Walawalkar Instagram and YouTube :


आज अंकिताचे Instagram तसेच Youtube वरती लाखो चाहते आहेत. Kokanhertedgirl या नावाने तिचे Youtube चॅनेल तसेच इंस्टाग्राम वरती अकाउंट आहे.

कोकणातील सौंदर्य, तेथील नैसर्गिक वातावरण आणि एकूणच तेथील ऐतिहासिक वारसा याबद्दल अंकिता तिच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत असते.तिचे अनेक व्हिडिओ खूप प्रसिद्ध झाले आहेत.

कोकण म्हणलं की आपल्याला आठवतो तो समुद्र किनारा, निसर्गरम्य वातावरण आणि त्यात असलेली शांतता.

Instagram वरती अंकिताचे 646K फॉलोवर्स आहेत. त्यासोबतच YouTube वरती 274K Subscribers आहेत.

Ankita Walawalkar Instagram CLICK HERE
Ankita Walawalkar YouTube. CLICK HERE

अंकिता वालावलकर किती कमवते ?
अंकिता हे सोशल मीडिया माध्यमांतून तसेच तिच्या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये कमावते. फक्त इन्स्टाग्राम किंवा Youtube नाही तर तिचे इतर अनेक व्यवसाय देखील आहेत.

सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी अंकिताचा एक सुंदर असं रेस्टॉरंट आहे. वालावलकर्स बीच रिसॉर्ट या नावाने आहे. तिचे आई वडीलच ते सांभाळतात.

त्यासोबतच अंकिताचा सिंधूद्योग नावाने देखील व्यवसाय आहे तेथून ही तिची कमाई चांगल्या प्रकारे होते.

Big Boss Marathi मधील प्रवास ?
सोशल मीडियामुळे प्रसिद्ध झालेली अंकिताचा Big Boss Marathi मधील प्रवासी तितकाच रोमांचक असणार आहे. अंकिता ही बिग बॉसच्या या सीजन मधील पहिली कॅप्टन ठरली आहे.

त्यामुळे नक्कीच तिच्या बिग बॉस मधील कारकिर्दीला चांगल्या प्रकारे महत्व दिलं जाईल. आज ती बिग बॉसच्या घरामध्ये चांगल्या प्रकारे खेळ खेळून महाराष्ट्रातील जनतेचं मनोरंजन करत आहे.

तेथील विविध टास्कमध्ये ती भाग घेत आहे आणि स्वतःला त्यासाठी सिद्ध करून दाखवत आहे.

Nikki Tamboli Biography

तर चला मग अंकिताला भरघोस मत देऊन बिग बॉसच्या घरातील तिचं स्थान पक्क करू. त्यासोबतच ती या सीजनची विजेता ठरेल अशी प्रार्थना देखील करू आणि सपोर्ट करू.

अंकिताचा आजपर्यंतचा प्रवास यातून आजच्या तरुण-तरुणींनी चांगल्या प्रकारे बोध घेण्याची गरज आहे.

वरील लेख आवडला असेल तर आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.


अशाच प्रकारच्या प्रेरणादायी पोस्ट पाहण्यासाठी Mahiteesatha.in ला भेट द्या.

7 thoughts on “Ankita Walawalkar Biography|Big Boss Marathi | Kokanhertedgirl”

Leave a Comment