Suraj Chavan Biography
सध्या बिग बॉस मराठी च्या या सीजनमध्ये एक कंटेस्टंट चांगल्या प्रकारे महाराष्ट्रातील जनतेच मनोरंजन करत आहे. त्याच्या स्टाईलने अगदी लहानांपासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत एक वेगळीच छाप सोडली आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रसिद्ध रील स्टार तसेच युट्युबर सूरज चव्हाण आहे.
• सुरज चा पहिला मराठी चित्रपट :
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे यांचा झापुक झुपुक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला यामध्ये सुरज चव्हाण मुख्य भूमिकेत दिसून आला. सुरज चव्हाण चा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यासाठी हे फारच विलक्षण अशा पद्धतीचा प्रवास होता.
या चित्रपटामध्ये सुरज ने उत्कृष्ट असे काम केलेले आहे . एका आठवड्यामध्ये जवळपास एक करोड रुपयांचे कलेक्शन झाले आहे.
बिग बॉस मराठी पाचव्या सीजन चा विजेता सूरज चव्हाण ठरलेला आहे ✨
गुलीगत धोका असो किंवा बुक्कीत टेंगूळ आपल्या बोलीभाषेच्या जोरावरती स्वतःची एक वेगळी छाप निर्माण करणारा सुरज चव्हाण हा आज सर्वांच्या मनोरंजनाचा भाग बनलेला आहे.
कोणी कौतुक करत तर कोणी त्याची टिंगल करतात. परंतु सुरज चा आजपर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर असा राहिलेला आहे. अगदी गरीब कुटुंबातून सुरज ने आज लाखो फॉलोवर्स त्याचे चाहते सबंध महाराष्ट्रामध्ये जोडलेले आहेत.
• कोण आहे सुरज चव्हाण ?
• बिग बॉस मराठी सारख्या एका नामवंत कार्यक्रमांमध्ये कशी त्याची इंट्री झाली ?
• त्याला एवढी प्रसिद्धी कशामुळे मिळाली ?
• Instagram वरती त्याचे किती फॉलोवर्स आहेत ? तो महिन्याला किती कमवतो ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी संपूर्ण लेख आवर्जून वाचा.
• Suraj Chavan Biography In Marathi
बारामती तालुक्यातील मोरगाव शेजारील असणाऱ्या मोडवे या गावामध्ये सुरजचा जन्म झाला आणि तो सध्या तेथेच वास्तवास आहे. एका गरीब कुटुंबामध्ये सुरजचा जन्म झाला. लहानपणीच त्याच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरवलं. त्यामुळे तो एकाकी झाला.
BIG BOSS MARATHI वर एकदा सुरज ने सांगितले होते ,
जेव्हा त्याचे वडील वारले तेव्हा तो गोटया खेळत होता अचानक एक जण आला आणि त्याला सांगितलं की तुझे वडील वारले त्यावेळेस तो अगदी लहान होता त्यामुळे त्याला तेवढी काही समज नव्हती.
त्याचेआप्पा (वडील) हे वारले असताना देखील सुरजच्या डोळ्यातून पाणी आलं नाही आणि त्याला त्यावेळी दुःख देखील झालं नाही असं तो म्हणाला.
• या घटनेनंतर गावकऱ्यांनी त्यांना वेठीस धरले. परंतु सुरज ने नंतर सांगितलं की त्याच्या आप्पांनी म्हणजेच वडिलांनी लोकांना भरपूर मदत केलेली आहे. दारावरती कोणीही मदत मागायला आले तर त्यांनी निस्वार्थपणे मदत केलेली आहे.
आज जेव्हा सुरजला त्यांची आठवण येते तेव्हा तो भाऊक होतो.

• आई-वडिलांच्या जाण्यानंतर सुरजच्या मोठ्या बहिणीने सूरजला सांभाळले व त्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. मोठी बहीण म्हणजे खरंतर दुसरी आईच.
• लहानपणापासूनच घरामध्ये गरीबी पाहिलेल्या सुरजने त्याचे शालेय शिक्षण सुद्धा पूर्ण केले नाही. सुरज चे शिक्षण फक्त आठवीपर्यंत झालेल आहे. त्यानंतर सुरज पोटापाण्यासाठी मोल मजुरी करू लागला.
गरिबाचं घर म्हटलं की हातावरच पोट. काम केलं तरच दोन वेळेचे जेवण मिळणार. कधी कधी रात्रीच्या जेवणाची ही सोय होत नसायची.
Suraj Chavan TikTok Star :
सुरज ला सर्वात आधी प्रसिद्धी मिळाली ती Tik Tok मुळे. मोलमजुरी करत असताना एका दिवशी सुरजच्या बहिणीच्या मुलाने त्याला Tik Tok बद्दल सांगितले.
• त्यानंतर सुरजने त्यावरती एक एक व्हिडिओ बनवला. तो प्रचंड मोठ्या प्रमाणात वायरल झाला. सुरज ला व्हायरल झाल्याचे कळल्यानंतर त्याने नंतर मोल मजुरी करून मोबाईल घेतल्यानंतर स्वतःच्या नावाने त्याची आयडी काढली. आणि Tik Tok वरती व्हिडिओ करू लागला.
• त्याला त्यावरती चांगल्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला. मग त्यानेही पुन्हा मागे वळून पाहिलं नाही.
• परंतु परमेश्वराच्या मनामध्ये काही वेगळेच होते. त्यानंतर भारतामध्ये Tik Tok वरती बंदी आली. आणि सर्वच Tik Tok वरील क्रिएटर्स इंस्टाग्राम तसेच फेसबुक वरती शिफ्ट झाले.
त्यात सुरज ही होता.
Suraj Chavhan Instagram and YouTube :
• Tik Tok बंद झाल्यानंतर सूरजने युट्युब तसेच Instagram वरती छोटे छोटे Short तसेच Reels टाकण्यास सुरुवात केली.
~ आधीच टिक टॉक वरती मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तो कमी वेळामध्येच या दोन्ही प्लॅटफॉर्म्स वरती चांगल्या प्रकारे काम करू शकला आणि प्रकाश झोतात आला.
• लोकांसाठी मनोरंजन करणाऱ्यांची कमी नव्हती परंतु वेगळ्या शैलीमध्ये सुरज व्हिडिओ बनवू लागला जे की मनोरंजनात्मक दृष्टिकोनाने बनवले जायचे.
अनेकांनी घेतला सुरजच्या स्वभावाचा गैरफायदा !
• एका मुलाखतीमध्ये सुरज म्हणाला , जेव्हा तो प्रसिद्ध झाला त्यानंतर अनेक लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला. ठरलेल्या रकमेपेक्षा कमी रक्कम देऊन त्याला पाठवलं जायचं. अनेकांनी तर कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाला त्याला बोलावलं आणि एक शर्ट किंवा पॅन्ट देऊन तसेच वाट लावायचे.
आर्थिक ज्ञान कमी असल्यामुळे सुरज खूप वेळा व्यवहार व्यवस्थित करू शकला नाही.
स्वभावाने साधा भोळा असणारा सुरज आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचे मन जिंकत आहे.
• Suraj Chavan Instagram CLICK HERE
• Suraj Chavan YouTube CLICK HERE
• Suraj Chavan Income :
सुरजची कमाई आज लाखोंमध्ये आहे. तो आज एखाद्या व्यवसायाच्या उद्घाटन असेल किंवा कोणतेही व्यवसायीक कार्यक्रम जवळपास 50-60 हजार रुपये घेतो.
Instagram तसेच YouTube च्या माध्यमातून आज तो लाखो रुपये कमावतो.
- कशी झाली बिग बॉस मध्ये मराठीमध्ये एन्ट्री :
~ बिग बॉस मराठी च्या या सीझनमध्ये सुरज चव्हाण ची निवड झाली. सोशल मीडिया वरती प्रसिद्ध असल्यामुळे त्याची निवड करण्यात आली. बिग बॉसच्या घरामध्ये सुरज चांगल्या प्रकारे टास्क कंप्लीट करत आहे. सर्वांसोबत हसत खेळत असल्यामुळे तो तेथील लोकांचा सुद्धा चांगल्या प्रकारे मनोरंजन करतो.
~ यावर्षीचा बिग बॉस मराठी Host प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख करत आहेत. देशमुख म्हटलं की मराठी बाणा . त्यांची स्टाईल वेगळी यांचा हात भारी, लाथ भारी आणि सगळंच लय भारी. मागच्या वर्षी संबंध महाराष्ट्राला वेड सिनेमाच्या माध्यमातून वेड लावणाऱ्या या अभिनेत्यामुळे देखील यावर्षीचा सिझन खूप हटके होणार आहे.
~ चला मग बघूया सुरज चव्हाण चा बिग बॉस मधील प्रवास. कशाप्रकारे तो संपूर्ण टास्क साठी कटिबद्ध राहतो का नाही. आणि त्याच्या विजयासाठी आपण प्रार्थना देखील नक्की करूया. त्यासोबतच त्याला वोट करून सपोर्ट करूया.
सुरज ला वोट करून या सीजन चा विजेता ठरवलेल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. ❣️🙏🏻
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा
संपूर्ण लेख आवडला असेल तर आमच्या Instagram Account ला फॉलो करा तसेच टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.
Marathi creator sathi kadhi pn ready
Nice
सूरज चव्हाण यानी फक्त विनर झाल पाहिजे
100%,संपूर्ण Big Boss Marathi च्या प्रेक्षकांची तीच इच्छा आहे.💯✨🔥
गरीब परिस्थिती मध्ये जन्मलेला तसेच कायम दुष्काळी असणाऱ्या ग्रामीण भागातील हा रांगडा व गावठी कलावंत ज्यामध्ये कुठलीही भीती, गरिबीची लाज न बाळगता अस्सल गावठी कलाकार आहे त्यामुळे त्याला जनतेने पूर्ण मदत करावी हीच अपेक्षा.
हो नक्कीच सर . आज सुरज चव्हाण यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे आणि त्यासाठी तो पात्र देखील आहे. नक्कीच सुरज चव्हाण हेच बिग बॉस मराठी चा किताब जिंकतील 💯🔥✨