Krishnaraj Mahadik Biography|Kolhapur Elections 2024 |Youtuber, Politicians

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

Krishnaraj Mahadik Biography

सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे जोरात होऊ लागले आहे. त्याला कारण ही तसंच आहे. अगदी काही महिन्यांवरती होणार असणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यातच कोल्हापूरच्या राजकारणात एक नवीन चेहरा उदयास येत आहे. तो दुसरा कोणी नसून खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे आहेत.

एक सुसंस्कृत नेतृत्व म्हणून कोल्हापूरच्या राजकारणात एक वेगळा ठसा ते उमटवतील यात शंका नाही. महाडिक विरुद्ध पाटील संघर्ष पुढील पिढीकडून चालवला जाईल का याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

• कोण आहेत कृष्णराज महाडिक ?
• त्यांची आजपर्यंतची कारकीर्द काय ?
• महाडिक घराण्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी ते सक्षम आहेत का ?
• युट्युब वरती त्यांना कशामुळे यश मिळालं ?
• ऋतुराज पाटील विरुद्ध कृष्णराज महाडिक हा संघर्ष झाल्यावरती काय होईल ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहिती जाणून घ्या.

कृष्णराज धनंजय महाडिक हे खासदार धनंजय महाडिक आणि अरुंधती महाडिक यांचे पुत्र आहेत. त्यांची ओळख सर्वत्र एक स्पोर्ट्स प्लेयर म्हणून आहे. स्पोर्ट्स कार रेसिंग मध्ये उत्तम प्रकारे यश प्राप्त केलं.

नाव :कृष्णराज धनंजय महाडिक
जन्म : 12 जून 1998
कार्यक्षेत्र : Athelet,Youtuber, Politician, Entrepreneur
आई : अरुंधती महाडिक
भाऊ :पृथ्वीराज महाडिक, विश्वराज महाडिक
krishnaraj Mahadik Biography

“ब्रिटिश फॉर्मुला 3” जिंकणारे ते पहिले भारतीय आहेत.

Krish Mahadik यांचे सोशल मीडिया तसेच Youtube,Instagram,Facebook वरती लाखो Followers आहेत. एक मोठा चाहता वर्ग त्यांनी निर्माण केला आहे.

वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये कृष्णराज महाडिक यांचा सहभाग असतो. सध्या काही दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या YouTube Channel वरती कोल्हापूर मध्ये होत असलेले कचऱ्याचे चुकीचे व्यवस्थापन यावरती व्हिडिओ शेअर केलेला आहे. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण नागरिकांनी करूनच घंटागाडी मध्ये टाकावे असे आवाहन केले.

घंटा गाडीवरती काम करणारे कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतल्या. स्वतः एक दिवस कर्मचाऱ्यांसोबत राहून त्यांना दररोज कोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागतं याबद्दल सविस्तर अशी माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे.

वेगवेगळे उपक्रम जसे क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, दहीहंडी , वेगवेगळ्या कुस्तींच्या स्पर्धा कृष्णराज महाडिक हे आयोजित करतात.

Kolhapur Elections 2024

राजकीय दृष्ट्या कोल्हापूर कडे पाहिलं तर एकूण 12 आमदार आणि 3 खासदार आहेत . असं असलं तरी येथील राजकारण फक्त बंटी पाटील गट विरुद्ध महाडिक गट इथपर्यंतच मर्यादित आहे.
2009 पर्यंत एकदम जिवलग मित्र असलेले बंटी पाटील आणि धनंजय महाडिक आता राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत.

2009 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बंटी पाटील यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला आणि तेथून सुरुवात झाली एका नवीन राजकीय इनिंगची.

त्यानंतर 2009 च्या पराभवाचा वचवा काढण्यासाठी महाडिक गटाने 2014 ला अमल महाडिकांना उमेदवारी देऊन बंटी पाटलांना पराभूत केलं.

Vicky Kaushal Biography

सध्या बंटी पाटील हे विधानपरिषद ते वरती आमदार आहेत तर धनंजय महाडिक हे राज्यसभा खासदार आहेत.

कृष्णराज यांनी काही महिन्यांपूर्वी 25 कोटी रुपयांच्या कामाची घोषणा केली त्यामुळे सक्रिय राजकारणात ते उतरणार याचे संकेत त्यांनी दिले.

भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसोबत, कार्यकर्त्यांसोबत ते सतत कार्यरत असतात. एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

Krishnaraj Mahadik Biography|Kolhapur Elections 2024

कृष्णराज महाडिक हे जर कोल्हापूर दक्षिण मधून विधानसभेसाठी निवडणूक लढवत असतील तर सध्याचे विद्यमान आमदार असलेले ऋतुराज पाटील यांच्याशी जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे. खूपच अतितटीची निवडणूक होईल.

किंवा कोल्हापूर उत्तर मधून जयश्रीताई जाधव यांच्याविरुद्ध निवडणुकीला सामोरे जावे लागेल.

Krish Mahadik YouTube :

Krishnaraj Mahadik हे एक यशस्वी YouTuber म्हणून ही ओळखले जातात. युट्युब वरती Personal Vlogs च्या माध्यमातून त्यांनी मोठा चाहता वर्ग निर्माण केलेला आहे.

आज त्यांचे YouTube वरती 554K Subscribers आहेत.
त्याच प्रकारे Instagram वरती 388K Follwers आहेत.
Facebook वरती 103 Followers आहेत.

Youtuber, Politicians

त्यामधून ते लाखो रुपयांची कमाई सुद्धा करतात.

Krish Mahadik Social Media :

Youtube : Click Here

ऋतुराज पाटील विरुद्ध कृष्णराज महाडिक हा संघर्ष झाल्यावरती काय होईल ?


जर कृष्णराज महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील निवडणुकीला सामोरे गेले तर खूपच अटीतटीची आणि वर्चस्वाची निवडणूक होईल यात शंका नाही.
कारण कोल्हापूरच्या राजकारणात फक्त हे दोन गटच आपल्याला पाहायला मिळतील. ही तिसरी पिढी एकमेकांच्या विरोधात थांबली तर नक्कीच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मतदारसंघाकडे लागलेले असेल.

सध्याचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांच्यासाठी कृष्णराज महाडिक हे एक सक्षम उमेदवार ठरतील.

गोकुळ महासंघ, छत्रपती राजाराम सहकारी कारखाना, कोल्हापूर महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद प्रत्येक ठिकाणची निवडणूक हे लक्षवेधी असते.

त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय होईल हे पाहण्यासारख आहे.


अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा


Leave a Comment