Nikki Tamboli Biography In Marathi|Big Boss Marathi | Popular Actress In Tamil

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

Nikki Tamboli Biography In Marathi

निकी तांबोळी चा जन्म महाराष्ट्रातील संभाजीनगर (औरंगाबाद) येथे 21 ऑगस्ट 1996 ला झाला. तिचे वडील दिगंबर तांबोळी हे आहेत तर आई प्रमिला तांबोळी आहेत.

• आज बिग बॉस मराठी च्या पाचव्या सीजन मध्ये निकी ग्रँड फिनाले मध्ये गेली आहे. वेगवेगळ्या कॉन्ट्रोव्हर्सीज चा सामना आज पर्यंत निकीने केलेला आहे आणि त्यामुळे ती सतत चर्चेत देखील असते.

• संपूर्ण महाराष्ट्राला तिच्या बाईईईई , पागल झालास का, काय हा प्रकार यावरील व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये वायरल होत आहेत.

नाव :निकी दिगंबर तांबोळी
जन्म :21 ऑगस्ट 1996
जन्म ठिकाण : संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व : भारतीय
शिक्षण : अभिनय क्षेत्रातील शिक्षण
Nikki Tamboli Biography In Marathi

1. अरबाज पटेल सोबतची फ्रेंडशिप असेल किंवा अभिजीत सावंत सोबतची ते प्रत्येक वेळेस चर्चेत राहिलेली आहे. 2.त्यासोबतच घनश्याम सोबतचे जे बिग बॉस मध्ये किस्से हे आपण सर्वांनी पाहिलेलेच आहेत.

निकीबद्दल आज संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

निकिच बालपण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झालेल आहे . लहानपणापासूनच तिला अभिनय क्षेत्रामध्ये आवड होती त्यामुळे शालेय शिक्षण झाल्यानंतर ती मुंबईला आली आणि अभिनयाचे धडे गिरवू लागली.

मुंबई म्हणजे स्वप्नाची नगरी त्याच स्वप्नाच्या नगरीमध्ये निकीचेही स्वप्न खूप मोठे होते. सुरुवातीची कारकीर्द तिच्यासाठी थोडी फार जड गेली परंतु तिने मॉडेलिंग पासून तिच्या करिअरची सुरुवात केली.

वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून ती समोर येऊ लागली.

त्यानंतर तिला तेलुगु फिल्म इंडस्ट्रीमध्ये डेब्यू करण्यासाठी संधी मिळाली. या संधीचं रूपांतर तिने योग्य पद्धतीने केलं. तसेच कंचना 3 मध्ये तिची भूमिका सर्वांसमोर चांगल्या प्रकारे दिसून आली. आणि तोच ठरला तिच्या अभिनय क्षेत्रातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट.

Nikki Tamboli Boyfriend :

निक्की सध्या सिंगल आहे परंतू बिग बॉस मराठी मध्ये अरबाज पटेल सोबतची फ्रेंडशिप तीच्यासोबत फार खास होती यात काही शंका नाही. त्या दोघांचं नात भविष्यात कोणत वळण घेईल हे बघण्यासारखं आहे

Big Boss (Hindi) :
बिग बॉस मध्ये निकी ला जाण्याची संधी मिळाली. तेथील तिचा खेळ आणि लोकप्रियता पाहून प्रेक्षकांच्या पसंतीस ती येऊ लागली त्या सीजनमध्ये ती सेकंड Runner-up ठरली.

त्यासोबतच नंतर तिने कलर्स वरील फेअर फॅक्टर खतरो के खिलाडी मध्ये भाग घेतला आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

वेगवेगळ्या singing तसेच रियालिटी शोच्या माध्यमातून ती आपल्याला आजपर्यंत दिसलेली आहे.

Niki Tamboli Instagram :
अभिनय क्षेत्रासोबतच निकीचे सोशल मीडियावरती लाखो चाहते आहेत.

Popular Actress in Tamil


इंस्टाग्राम वरती 5.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.


चहात्यांसाठी नेहमी पोस्ट करत असते आणि माहिती देत असते.

Big Boss Marathi Season 5 :
सध्या कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठीचा पाचव्या सीजन मध्ये निकी जोरदार प्रदर्शन करत आहे. तिच्या खेळाचे संबंध महाराष्ट्रातून तसेच देशभरातूनचांगल्या प्रकारे कौतुक केले जात आहे. आज निकी फायनल मध्ये गेली. पण या सिझनमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारे समोर आलेली आहे.

मागच्या एक महिन्यापासून निकीचे बिग बॉस मराठी मध्ये भरपूर व्हिडिओ इंस्टाग्राम युट्युब वरती वायरल होत आहेत.

Nikki Tamboli Films :

2019

1. Chikati Gadilo Chithakotudu

2. Kanchana 3

3. Thipparaa Meesam

2021

Jogira Sara Ra Ra

Nikki Tamboli’s Brother :

निक्कीच्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस म्हणजे तिच्या भावाचा मृत्यू असे ती म्हणते. 2021 मध्ये निक्कीचा भाऊ. जतिन याचा कोविड 19 मुळे मृत्यू झाला. निक्कीसाठी तसेच तिच्या परिवारासाठी त्याचं जाणं हे फार वेदनादायी होत.

Niki Tamboli Car Collection :
निकीकडे Audi Q5 लक्झरी कार आहे.

एक मोठा चाहता वर्ग निकीने आज निर्माण केलेला आहे आणि त्यासोबतच भरभरून तिला सपोर्ट सुद्धा मिळत आहेत.
या सीजनची विजेता निकी नक्कीच होईल यासाठी आपण सर्वांनी तिला वोट करून शुभेच्छा देऊया.


अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा


1 thought on “Nikki Tamboli Biography In Marathi|Big Boss Marathi | Popular Actress In Tamil”

Leave a Comment