CM Devendra Fadanvis Biography| Maharashtra State CM | BJP Maharashtra Leader

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

CM Devendra Fadanvis Biography

मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन
मी पुन्हा येईन …

हे वाक्य संपूर्ण महाराष्ट्राने गेले पाच-सहा वर्ष ऐकलेले आहेत आणि त्याला कारणही तसेच होतं देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द हा आता पूर्ण करून दाखवलेला आहे.
महाराष्ट्राचे चाणक्य, किंगमेकर ठरलेले देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे

Devendra Fadanvis Biography In Marathi

अगदी सुरुवातीच्या काळापासूनच देवेंद्र फडणवीस यांचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत असणाऱ्या प्रत्येक पक्षातील नेत्यांसोबत आपुलकीचे संबंध राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासात त्यांना एक मोठं पाठबळ आज पर्यंत मिळालेल आहे

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीचा प्रवास सुरू झाला असे म्हणता येईल. 1990 मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम पाहत होते. त्या वेळचे एक सूत्र होतं जे विद्यार्थी परिषदेमध्ये काम करत असायचे ते पुढे जाऊन राजकारणात सक्रिय पाहायला मिळायचे त्यामुळे खूप जणांची सुरुवात ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासूनच झालेली आपल्याला दिसून येईल. देवेंद्र फडणवीस त्यासोबतच विनोद तावडे देखील याच तालमीतले पैलवान आहेत असे म्हणता येईल.

त्यासोबतच देवेंद्र फडणवीस संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोबत जुन नात आहे. भारतीय जनता पार्टीने आजपर्यंत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच सर्व निवडणुका लढवलेल्या आहेत.

नाव :देवेंद्र गंगाधरराव फडणवीस
जन्म : 22 जुलै 1970
वडील : गंगाधरराव फडणवीस
आई :सरिता फडणवीस
शिक्षण: LLB आणि MBA
पत्नी : अमृता फडणवीस
मुलगी : दिविजा फडणवीस

Devendra Fadanvis Family

• नगरसेवक देवेंद्र फडणवीस :
नागपूर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या रामनगर भागातून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची पहिली निवडणूक लढवली आणि नगरसेवक म्हणून काम पाहू लागले.
त्याच टर्ममध्ये 1997 ला ते नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर म्हणून रुजू झाले. आणि इथूनच सुरू झाली देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात.

• आमदार देवेंद्र फडणवीस :
भारतीय जनता पार्टीच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर पश्चिम मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली. त्यामध्ये देवेंद्र यांना विजय मिळाला आणि ते विधानसभेवरती आमदार म्हणून निवडून आले. दोन वेळा देवेंद्र फडणवीस या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.
कालांतराने त्या मतदारसंघाचं नाव दक्षिण पश्चिम असं झालं आणि ते चार वेळा या मतदार संघातून आतापर्यंत निवडून आलेले आहेत.
.CM Devendra Fadanvis Biography

• शाळेतील रोमांचक किस्सा :
देवेंद्र फडणवीस हे इंदिरा कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शिकायचे. आणीबाणीच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांना काही वर्ष कारागृहात टाकल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावरती राग होता.
शाळेचं नाव इंदिरा असल्यामुळे त्यांनी मी उद्यापासून शाळेत जाणार नाही असं घरच्यांना ठणकावून सांगितलं.

2019 च्या महायुतीतील अंतर्गत वाद :
2019 पर्यंत भाजप आणि शिवसेना हे एकत्रित निवडणूक लढवत असायचे. परंतु त्यावेळेस मुख्यमंत्री पदासाठी अंतर्गत वाद झाले त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनता आले नाही.
उद्धव ठाकरे यांनी एक वेगळीच वाट निवडली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या सोबत जाऊन महाविकास आघाडी चे सरकार स्थापन केले. जवळपास दोन अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचा कारभार पाहिला. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते.

राजकीय कारकीर्द थोडक्यात :
1889 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सदस्य
1997 नागपूर महानगरपालिकेचे सर्वात तरुण महापौर
1999 ते 2024 नागपूर दक्षिण पश्चिम मधून आमदार
2010 भाजपचे जनरल सेक्रेटरी
2013 भाजपचे प्रदेशाध्यक्ष
2014 ते 2019 मुख्यमंत्री
19 नोव्हेंबर 2019 ते 26 नोव्हेंबर 2019 दुसऱ्यांदा मुख्यमंत्री
डिसेंबर 2019 ते जून 2022 विरोधी पक्षनेते
30 जून 2022 उपमुख्यमंत्री
5 डिसेंबर 2024 मुख्यमंत्री

फडणवीस सत्तेत जरी नसली तरी सरकारमधील प्रत्येक अंतर्गत बाबी त्यांच्यापर्यंत पोहोचत असायच्या कारण त्यांचे संबंध प्रत्येक पक्षातील लोकांपर्यंत होते.
2022 मध्ये शिवसेने मधून एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यांच्यासोबत 40 आमदार हे देखील होते.
त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख भूमिका होती. शिवसेनेचे आमदार सोबत आल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं सर्वांना वाटत होतं परंतु नियतीच्या मनामध्ये काही दुसरंच होतं.

पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा कारभार पाहू लागले. राजकारणामध्ये संयम किती महत्त्वाचा असतो हे देवेंद्र फडणवीस यांच्या कारकीर्दीतून पाहायला मिळते. कारण पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेला माणूस उपमुख्यमंत्री या पदावर ती त्याच तत्परतेने काम कसं केलं जाईल याचं एक उदाहरण म्हणजे देवेंद्र गंगाधर फडणवीस.

दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये बंड झालं आणि अजित पवार आणि त्यांचे काही समर्थक आमदार यांनी महायुती मध्ये सामील झाले.

Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजना ठरली मास्टरस्ट्रोक :
महाराष्ट्रामधील निकाला मागे लाडकी बहीण योजना ही सफल झाली असे दिसून येते. कारण लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी महायुतीकडून या योजनेमार्फत महिलांना दीड हजार रुपये महिना देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि ते पूर्ण देखील करण्यात आले त्यामुळे कुठेतरी जनतेच्या मनामध्ये महायुती सरकार बद्दल एक आत्मियता निर्माण झाली आणि लाडक्या बहिणीने ह्या सरकारला मोठ्या प्रमाणात मतदान करून निवडून दिले.
मतदानाचा टक्का देखील वाढला.

CMDevendraFadanvisBio5

मोदी-अमित शहा यांचा विश्वास :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवेंद्र फडणवीस यांच्यावरवी विश्वास असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये पक्ष वाढीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत केलेले काम पाहून त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली.
गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचे फार मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्यांचादेखील फडणवीस यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र मध्ये एक चांगलं सुसंस्कृत नेतृत्व उभा राहील याची त्यांना खात्री आहे त्यामुळेच कदाचित आज देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावरती एवढी मोठी जबाबदारी पुन्हा एकदा देण्यात आली.

मनोज जरांगे पाटील आंदोलनाचा फटका :
महाराष्ट्र मध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचा देवेंद्र फडणवीस यांना सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यामुळे 2024 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठं अपयश मिळालं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टर चालला अशी सगळीकडे चर्चा होती.

काही महिन्यानंतरच विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या त्यामुळे लोकसभेतील पराभव भारतीय जनता पार्टी तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.

विधानसभेचे बिगुल वाजलं निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि संपूर्ण महाराष्ट्राला धक्का देणारा निवडणुकीचा निकाल लागला.
भारतीय जनता पार्टीच्या इतिहासातील सर्वात मोठा ऐतिहासिक असा निर्णय लागला. भारतीय जनता पार्टीचे 235 आमदार निवडून आले. एक हाती बहुमत मिळायला फक्त काहीशा जागा शिल्लक होत्या.

शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे महायुतीला अपक्ष आमदारांची गरजच पडली नाही कारण संख्याबळ हे एकूण लागणाऱ्या जागांपेक्षा खूप जास्त आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना कोणते वळण येतील हे पाहण्यासारखं आहे.


अशाच प्रकारच्या आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा


1 thought on “CM Devendra Fadanvis Biography| Maharashtra State CM | BJP Maharashtra Leader”

Leave a Comment