Sai Tamhankar Biography In Marathi
हिंदी चित्रपटसृष्टी मधील अभिनेत्रींना सुद्धा फिकं पडेल असा सई ताम्हणकरचा आजपर्यंतचा प्रवास राहिलेला आहे. सईची चित्रपट सृष्टीतील कारकीर्द खूपच रोमांचिक राहिलेली आहे.

बोल्ड, ब्युटीफूल, बिनधास्त महाराष्ट्राची परमसुंदरी अशी ओळख असलेल्या सई ताम्हणकर बद्दल संपूर्ण महाराष्ट्राला खूप गोष्टी माहीतच आहेत परंतु ज्या गोष्टी माहित नाहीत त्या आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.
सईचा जन्म महाराष्ट्रातील सांगली येथे 25 जून 1986 ला झाला. तिचे पूर्ण बालपण त्यासोबतच शालेय शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण सांगली मध्येच झाले आहे.
शाळेमध्ये असताना सईला कबड्डी खेळण्याची खूप आवड होती त्यात ती तशी पारंगत सुद्धा होती. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तिने त्यावेळी भाग घेतला.
अभिनयाची आवड तिला कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात झाली आणि तिथूनच तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास हा पुढे सुरू झाला.
खरा कलाकार तोच, जो स्वतःला त्या कलेमध्ये पूर्णपणे समाविष्ट करून आपली कला उत्कृष्टरित्या जगासमोर सादर करतो. कलेच्या माध्यमातून लोकांच्या मनावरती अधिराज्य गाजवतो.

Sai Tamhankar Biography In Marathi
नाव : | सई नंदकुमार ताम्हणकर |
जन्म : | 25 जून 1986 |
जन्मस्थळ : | सांगली |
शाळा : | सावरकर प्रतिष्ठान शाळा, सांगली |
कॉलेज : | चिंतामण कॉलेज ऑफ कॉमर्स,सांगली |
शिक्षण : | पदवी |
जात : | ब्राह्मण |
धर्म : | हिंदू |
वडील : | नंदकुमार ताम्हणकर |
आई : | मृणालिनी ताम्हणकर |
भाऊ : | सचिन |
सईचा अभिनय क्षेत्रातील प्रवास :
कलाक्षेत्रात सई नाटकांच्या माध्यमातून सर्वात आधी आली. पडद्यावरील नाटकांपासून सुरू झालेला प्रवास एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठा झाला. नाटकानंतर ती हळूहळू मालिकांमध्ये सुद्धा काम करू लागली.
त्यानंतर तिने मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि आता तर ती हिंदी चित्रपट तसेच वेब सिरीज मध्ये सुद्धा दिसत आहे.सईचा एकूणच प्रवास हा सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.
कॉलेजमधील नाटकांच्या जोरावरतीच तिला अर्धे अधुरे या नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यामधे तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या सन्मान मिळाला.
त्यानंतर मराठी मधील ह्या गोजिरवाण्या घरात या मालिकेमध्ये तिला अभिनय करण्याची संधी मिळाली.
त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तुझं माझं जमेना, कस्तुरी अश्या अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये ती दिसून आली.
सईचे चित्रपटसृष्टीतले पहिले पदार्पण ब्लॅक अँड व्हाईट या हिंदी चित्रपटाने तसेच मराठीतील सनई चौघडे या चित्रपटा मधून झाले.

Bollywood मध्ये प्रसिद्ध झालेला गजनी चित्रपटामध्ये सईची एक छोटीशी भूमिका होती. सुपरस्टार आमिर खान या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होता.
नो एन्ट्री पुढे धोका आहे, अशाच एका बेटावर त्यानंतर 2013 मध्ये आलेला आणि त्यावेळेस छप्पर फाड कमाई केलेला दुनियादारी चित्रपटामुळे सईच्या प्रसिद्धीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि तिथूनच तिच्या अभिनय क्षेत्रातील आयुष्याला मोठा वळण आला.
2015 मध्ये आलेल्या क्लासमेट या चित्रपटामध्ये सईला एक आगळी वेगळी स्टायलिश भूमिका मिळाली. कॉलेज जीवनातील मित्रांवर आधारित तो चित्रपट होता त्यामध्ये एकदम फ्रीस्टाइल अशी भूमिका तिला मिळालेली होती. तिचा तो Rowady लूक अनेक तरुणांच्या पसंतीस आलेला होता.
फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा सई चांगल्या भूमिका मध्ये दिसून आली.अनुराग कश्यप यांचा हंटर या सिनेमामध्ये ती मुख्य भूमिकेत होती.
Sai Tamhankar Lovelife :
चित्रपट निर्माता अमेय गोसावी सोबत 2013 मध्ये सईचा विवाह झाला होता. त्यानंतर दोन वर्षाने दोघांच्या संमतीने घटस्फोट झालेला सर्वांना माहीतच आहे.
सध्या सईचे अनिश जोग यांच्यासोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात ते विवाह करतील का नाही हे बघण्यासारखे आहे.
• सईचे गाजलेले चित्रपट :
– दुनियादारी
– क्लासमेट
– प्यार वाली लव स्टोरी
– बालक पालक
– गर्लफ्रेंड

महाराष्ट्रातील हास्यजत्रा मधील प्रवास :
वेगवेगळ्या रियालिटी शोमध्ये जजच्या रूपामध्ये सई दिसली आहे. महाराष्ट्रातील सध्या सर्वात प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये सई परिक्षक म्हणून काम पाहते.
बोल्ड,ब्यूटिफुल,बिंदास्त अशी ख्याती असलेल्या सईचे निरीक्षण कौशल्य देखील किती चांगली आहे हे यामधून स्पष्ट दिसते.
प्रसाद ओक सोबत असलेली तिची मैत्री प्रकर्षाने जाणवते.
कलाकारांना चांगल्या प्रकारे काम करण्यासाठी ती सतत प्रोत्साहन देते.समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, नम्रता संभेराव तसेच गौरव मोरे आणि इत्यादी कलाकार या कार्यक्रमामध्ये स्किटच्या रूपामध्ये सादरीकरण करून मनोरंजन करतात.
एखाद्याच्या चेहऱ्यावरती हसू आणता येईल याच्यापेक्षा पुण्याचं काम कोणतं असू शकत नाही. कारण रडवणं सोपं असतं परंतु हसवण फार अवघड असत.
• सई ताम्हणकर सोशल मीडिया :
सोशल मीडिया वरती सई चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह असते. तिच्या चाहत्यांसाठी ती सतत पोस्ट करत असते. येणाऱ्या आगामी वेब सिरीज किंवा चित्रपट यांची माहिती त्यातून चाहत्यांसाठी ती देत असते.
इंस्टाग्राम वरती सईचे 3.4 Million Followers आहेत.
त्यासोबतच फेसबुक वरती सुद्धा 1.7 मिलियन फॉलोवर्स आहेत.

• Official Social Media Accounts :
Sai Tamhankar Instagram Click Here
Sai Tamhankar Facebook Click Here
• Sai Tamhankar Awards Collection :
सईला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार, महाराष्ट्राचा फेवरेट कोण, आयफा असे अनेक पुरस्कार आजपर्यंत मिळालेले आहेत.
इंडियन टेलिव्हिजन अकॅडमी अवॉर्ड्स
महाराष्ट्राचा फेवरेट कोण
Zee चित्र गौरव पुरस्कार
महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
लोकमत स्टायलिश अवॉर्ड्स
आयफा अवॉर्ड्स
फक्त मराठी सिने अवॉर्ड्स
अशाच प्रकारच्या प्रेरणादायी पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा
2 thoughts on “Sai Tamhankar Biography In Marathi | Family,Lovelife,Networth,Carrier | महाराष्ट्राची परमसुंदरी”