Zakir Khan Biography

प्रत्येक कलाकाराची ओळख त्याच्या कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असते. कॉमेडी क्षेत्रात आज पर्यंत खूप कॉमेडियन आले आणि गेले . मागील काही वर्षांपासून एका कलाकाराने अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांच्या मनावरती राज्य करून आपली नवीन ओळख निर्माण केली आहे.
एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणण याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असूच शकत नाही. आज प्रत्येक जण वयक्तिक किंवा इतर गोष्टींमुळे सतत चिंतेत किंवा निराशेच्या कचाट्यात सापडला आहे. आपला थकवा किंवा कामाचा प्रेशर कमी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो.
Zakir Khan Biography
त्यातला सर्वोत्तम एक मार्ग म्हणजे मनोरंजन अर्थात कॉमेडी. आज आपण ज्या कलाकाराबद्दल बोलत आहोत तो फक्त एक कॉमेडियन नाही तर एक कवी, म्युझिशयन, लेखक आणि एक प्रसिद्ध यूट्यूबर् सुद्धा आहे.

झाकीर खानने कॉमेडी जगताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. प्रत्येकाच्या मनाला त्याच्या कवितेच्या माध्यमातून स्पर्श करणारा जाकीर आज सर्वांच्या पसंतीस उतरलेला आहे. त्याचा एक मोठा चाहता वर्ग तयार झालेला आहे.
तर आज याच झाकीर खान बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
कोण आहे झाकीर खान ?
झाकीरचा जन्म 20 ऑगस्ट 1987 ला मध्यप्रदेशच्या इंदोर या शहरामध्ये झाला.त्याच्या वडिलाचे नाव इस्माईल खान आहे आणि ते इंदोर मधील एका शाळेमध्ये म्युझिशियन टीचर म्हणून कार्य करत होते . आणि त्याची आई एक गृहिणी आहे.
झाकीरचे आजोबा उस्ताद मोईन खान हे प्रसिध्द म्युझिशन होते त्यामुळे एक प्रकारे झाकीरला घरातूनच कलेची शिदोरी मिळाली असे म्हणता येईल. घरातील कलेच्या वातावरणाचा एकूणच झाकीर वरती मोठ्या प्रमाणात प्रभाव होता.
लहानपणी झाकीरला सितार वाजवण्याची खूपच आवड होती. त्यामुळे तो त्याच्याकडे खूपच आकर्षित होऊ लागला. नंतर त्याने त्यामध्ये डिप्लोमा सुद्धा केला.
सख्त लौंडा हा शब्द देखील झाकीर खान मुळे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.

| नाव : | झाकीर इस्माईल खान |
| जन्म दिनांक : | 20 ऑगस्ट 1987 |
| शाळा : | ST.PAUL HIGHER SECONDARY SCHOOL |
| शिक्षण : | Bcom (Drop Out) , Diploma in Sitar |
| जन्मस्थळ : | इंदोर, मध्यप्रदेश, भारत |
| राष्ट्रीयत्व : | भारतीय |
| धर्म : | इस्लाम |
| छंद : | सितार वाजवने, गाणे गायन तसेच कॉमेडी |
| वडिल : | इस्माईल मोईन खान |
| आई : | कुल्सुम खान |
| भाऊ : | झीशान खान, अरबाज खान |
| नेटवर्थ : | 30 करोड (रिपोर्ट्स नुसार) |
• झाकीर चे बालपणीचे शिक्षण ?
इंदोर मधल्या प्रसिद्ध असणाऱ्या ST.PAUL HIGHER SECONDARY SCHOOL झाकीरने त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केले. शाळेबद्दलच्या आठवणी सांगताना तो कधीकधी खूप भावुक होताना आजपर्यंत वेगवेगळ्या पॉडकास्ट व इंटरव्यू मध्ये दिसून आला आहे.
शाळेत असताना झाकीरला शिक्षणाबद्दल आवड नव्हती परंतु त्याला सितार वाजवण्याची आणि कॉमेडी करण्याची मोठ्या प्रमाणात आवड असल्यामुळे तो त्या क्षेत्राकडे वळाला.
कलाकाराला त्याची कलाच जिवंत ठेवत असते हे अगदी तंतोतंत खर आहे असं म्हणता येईल.
त्यानंतर झाकीरने Radio Producer बनण्याचे ठरवले आणि पुढील शिक्षणासाठी दिल्ली येथे तो गेला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील त्याला दिल्लीमध्ये नोकरी मिळत नव्हती. एक काळ असा देखील होता त्याच्याजवळ गरजेच्या घेण्यासाठी सुध्दा पैसे नसायचे.
Vaishnavi Hagawane Suicide Case Maharashtra
रिकामा खिसा माणसाला जग दाखवतो आणि जगातील माणसे देखील त्याला कशाप्रकारे वागणूक देतात हे झाकिरला समजलं.
कलाक्षेत्रातलं पहिलं पाऊल …..
2012 साली India’s Best Stand Up Comedian मध्ये त्यांनी सहभाग नोंदवला. आपल्या कलेच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आणि तो त्या शोचा विजेता ठरला.
त्यानंतर त्याने AIB या शोच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात एक चाहता वर्ग निर्माण केला.
त्यानंतर आलेला त्याचा HAQ SE SINGLE याला सुद्धा मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली.
आज फक्त भारतात नव्हे तर अनेक देशांमध्ये जाकीर चे स्टँड अप कॉमेडीचे शोज मोठ्या प्रमाणात चालतात. प्रत्येक देशांमध्ये त्याचे Shows Housefull ठरतात.
इंस्टाग्राम वरती रील्स असतील किंवा युट्युब वरती शॉर्ट झाकीरचे व्हिडिओज मोठ्या प्रमाणात वायरल होतात. त्यामध्ये खास करून शायरी आणि मोटिवेशनल कोट्स यांना मोठ्या प्रमाणात पसंती मिळते.
झाकीर चे इंस्टाग्राम वरती जवळपास 6.7 Million फॉलोवर्स आहेत. त्यासोबतच युट्युब वर सुद्धा 8.2 Million सबस्क्राईबर आहेत. त्यामुळे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि युट्युब वरून देखील जाकीर चांगल्या प्रकारे कमाई करतो.
आज त्याची वार्षिक उलाढाल करोडोमध्ये आहे.
• आपका अपना झाकीर :
जवळपास एक वर्षाखाली सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन वरती आपका अपना झाकीर या शोमध्ये झाकीर दिसला. या मध्ये झकिरचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले.
ZAKIR KHAN SOCIAL MEDIA :
Instagram Account : Click Here
YouTube Channel : Click Here
• Zakir Khan Networth :
रिपोर्ट्स नुसार जवळपास 30 करोड रुपयांची संपत्ती झाकीरकडे आहे
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा