Mhani In Marathi With Meaning | मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

mhani in marathi with meaning म्हणी आणि वाक्प्रचार यांचा उपयोग विविध परीक्षा मध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे. जर पाहायला गेले तर आपण सर्वानी म्हणी आणि वाक्प्रचार हे शब्द माझ्या अंदाजा प्रमाणे लहानपनापासून ऐकत आलेले असाल.तर आपण आज mhani in marathi म्हणी व त्याचे अर्थ पाहणार आहोत.

तुम्हाला माहित आहे का? म्हणी ची व्याख्या चला तर मग पाहू यात.

लोकपरंपरेने आलेली नीतिबोधक किंवा दृष्टांतादी उपयोगी लोकमान्य झालेले सुटसुटीत आणि चटकदार असे दृष्टांतभूत वाक्य, रूढ वचन, म्हणणी किंवा लोकोक्ती म्हणजे म्हण.

याहून म्हणीची सोपी व्याख्या करता येईल. सर्वांच्या बोलण्यात सतत येणारे चिमुकले (विनोद), चटकदार, बोधप्रद व सर्वमान्य वचन म्हणजे म्हण.

कोणत्याही भाषेचे वैभव त्या भाषेतल्या म्हणींवरून ओळखता येते. म्हणी भाषेला समृद्ध करतात आणि म्हणी या अनुभवसिद्ध असतात म्हणून म्हणी अनुभवाच्या खाणी असेही म्हणतात. किंवा म्हणींना तोंडचे वाङ्मय असेही म्हणतात.

mhani in marathi with meaning| मराठी म्हणी व त्यांचे अर्थ

mhani in marathi with meaning

10 mhani in marathi। १ ० म्हणी मराठी मधून

  • अति तेथे माती => कोणत्याही गोष्टीत अतिरेक केल्यास त्याचा परिणाम वाईट होतो.
  • अचाट खाणे, मसणात जाणे => अति खाणे किंवा पिणे याचा शरीरावर दुष्परिणाम होतो. अर्थात खाण्यापिण्यातील अतिरेक टाळावा.
  • अर्थी दान महापुण्य => गरजू आणि योग्य माणसाला (सत्पात्री) दान करण्याने मोठे पुण्य लाभते.
  • अडला नारायण गाढवाचे पाय धरी => एखाद्या मूर्ख, नीच किंवा लायकी नसलेल्या माणसाकडे शहाण्या माणसाला नाइलाजाने जावे लागते आणि कामासाठी विनवण्या कराव्या लागतात.
  • आंधळा मागतो एकच डोळा => ज्याच्याजवळ मुळातच काही नाही त्याची मागणीही फारच कमी असते. कमी मिळण्यानेही त्याचे समाधान होते.
  • अन्नाचा मारलेला खाली पाही, तरवारीचा मारलेला वर पाही => ज्याच्यावर आपण उपकार करतो किंवा ज्याला आपण पोसतो तो आपला मिधा असल्याने आपल्याशी नमून वागतो. पण ज्याला आपण शक्तीच्या किंवा सत्तेच्या जोरावर नमवू पाहतो तो आपल्याशी मिंधा नसल्याने ताठ्यानेच वागतो.
  • अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण => भुकेच्या वेदना या मरणयातनांहून अधिक क्लेषकारक आणि दुःखदायी असतात.
  • आंधळ्या गायींत लंगडी गाय प्रधान => अडाणी किंवा अज्ञानी, मूर्ख माणसांच्या घोळक्यात थोडा शिकलेला किंवा थोडा शहाणा माणूस मोठा विद्वान ठरतो.
  • अति शहाणा त्याचा बैल रिकामा => फार शहाणपणा करायला गेल्यास शेवटी फसगत होते.बैलाकडून श्रमांचीच अपेक्षा करावी. त्याहून चांगले काम बैलाकडून करवून घेण्याच्या विचारात शेताची नांगरट राहून नुकसान होईल.
  • असतील शिते तर जमतील भुते => श्रीमंत माणसाभोवती माणसे जमा होतात. (स्वार्थ साधण्यासाठी मित्र जमा होतात.)

50 mhani in marathi । ५ ० म्हणी व अर्थ मराठी मधून

म्हणी अर्थ
अधिकारयाधिकं फलम्अधिक श्रम केल्यास अधिक चांगले फळ (यश) प्राप्त होते.
अन्नछत्री जेवणे, मिरपूड मागणे आपले काम आधीच फुकट करून घेऊन नंतर मिजास दाखवणे. उपकाराची जाणीव न ठेवणे.
अर्धी टाकून सगळीला धावू नये सबंध वस्तू मिळवण्याच्या मोहात प्रयत्न करताना मिळालेली निम्मी किंवा थोडी गोष्ट टाकून देऊ नये.
अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी आपली चूक असताना, ती मान्य न करता दुसऱ्याच्या माथी मारून आपण नामानिराळे होणे.
अव्यापारेषु व्यापार कारण नसताना पडू नये त्या कामात पडून भलतीच गोष्ट करणे आणि शेवटी स्वतःच अडचणीत येणे.
अळी मिळी गुप चिळी आपली गुप्त गोष्ट किंवा रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून गप्प बसणे.
आपला हात जगन्नाथ माणूस स्वतःची प्रगती स्वतःच करून घेऊ शकतो. -स्वावलंबन
आपापाचा माल गपापा जे धन किंवा ज्या वस्तू गैरमार्गाने किंवा विनासायास मिळतात त्या उधळेपणाने किंवा मूर्खपणाने खर्च केल्या जातात.
आधी पोटोबा मग विठोबा आधी स्वार्थ मग परमार्थ.
आधणातले रडतात आणि सुपातले हसतात आधणात उकडले जाणारे तांदूळ रडतात आणि सुपात पाखडले जाणारे तांदूळ हसतात -दुसऱ्यावर जशी वाईट वेळ आली आहे तशी आपल्यावर येऊ शकते हे न जाणण्याची प्रवृत्ती.
अंथरूण पाहून पाय पसरावे आपल्या ऐपतीनुसारच खर्च करावा. किंवा आपले सामर्थ्य ओळखून वागावे.
आयत्या बिळात नागोबा दुसऱ्याच्या श्रमाने उभ्या राहिलेल्या गोष्टीचा आपण काही न करता उपभोग घेणे. – मुंग्या किंवा अन्य प्राणी वारूळ किंवा बीळ करतात आणि नाग आयतेपणी त्यात शिरकाव करून राहतो.
आईजीच्या जिवावर बाईजी उदार दुसऱ्याचे पैसे खर्च करून आपण फार उदार आहोत असे दाखवणे (खोटा मोठेपणा दाखवणे).
आडात नाही तर पोहाऱ्यात कोठून येणार. जे आत मुळातच नाही ते दुसऱ्याला कसे मिळणार ? जे गुरूलाच माहीत नाही ते शिष्याला कसे येणार ?
अहो रूपमहो ध्वनिः एकाने दुसऱ्याची आणि दुसऱ्याने एकाची अशी एकमेकांची स्तुती (बऱ्याच वेळा खोटी स्तुती) करणे.
आपलेच दात आपलेच ओठ शिक्षा करणारे आपण आणि ज्याला शिक्षा करायची तोही आपल्या जवळचाच अशी अडचणीची परिस्थिती.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास एखादी गोष्ट करायचा उत्साह नसतानाच ती न करायला काहीतरी निमित्त मिळणे.
आंधळ्या-बहिऱ्याशी गाठ दोन माणसे जी एकमेकांना मदत करायला पूर्णपणे असमर्थ आहेत, त्यांची गाठ. (उघड्याकडे गेले नागडे आणि थंडीने काकडून मेले.)
उखळात डोके घातल्यावर मुसळाला कोण भितो येईल त्या संकटांची किंवा अडचणी सोसण्याची मनाची तयारी झाली की कशाचीच भीती उरत नाही.
इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी अडचणीची सारखीच स्थिती. काय करावे हे न सुचण्याची अवस्था.
आंधळे दळते, कुत्रे पीठ खाते एकाच्या श्रमाचा फायदा दुसराच घेतो. (कोण आपल्या श्रमाचा आयता फायदा घेतो, याकडे दुर्लक्ष असणे)
उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग उतावळेपणाने फार घाईने मूर्खासारखे वर्तन करणे.
उधाराचे पोते सव्वा हात रिते जेव्हा आपण उधार माल घेतो तेव्हा वजन, माप आणि दर यासंबंधी घासाघीस करता येत नाही. शिवाय दुकानदार हिशोबही खोटेच ठेवतो. – उधारीमुळे होणारे तोटे.
आपला तो बाब्या, दुसऱ्याचे कार्टे माणूस स्वतः किंवा आपल्या जवळच्यांविषयी जशी उदार बुद्धी ठेवतो तशी दुसऱ्यांबद्दल ठेवत नाही.
उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ताळमेळ, सत्यासत्य, योग्यायोग्य यांपैकी कोणताही विचार न करता मनाला येईल ते बोलणे.
ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये कोणत्याही गोष्टीचा किंवा कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये एकाने एक वाईट गोष्ट केली की तिला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्याने लहानशीदेखील वाईट गोष्ट करू नये.
एका हाताने टाळी वाजत नाही दोघांच्या भांडणाबाबत एकट्यालाच दोषी ठरवता येत नाही.
एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी एखाद्याचे नुकसान होत असताना त्यातही आपला फायदा कसा होईल याचा विचार करणे.
एका म्यानात दोन तलवारी राहत नाहीत दोन तेजस्वी माणसे एकत्र किंवा शेजारी राहू शकत नाहीत. त्यांच्यात वितुष्ट येण्याची शक्यता असते. (दोन सवती शांततेने एकत्र नांदत नाहीत.)
उथळ पाण्याला खळखळाट फार थोडासा गुण अंगी असणाऱ्या माणसालाच गर्व जास्त असतो.
उंदराला मांजर साक्ष ज्याचा एखाद्या गोष्टीत हितसंबंध आहे त्याला त्या गोष्टीबद्दल विचारणे व्यर्थ असते.
एक ना धड भाराभर चिंध्या अनेक कामे हाती घेऊन एकही धडपणे पूर्ण न करता अर्धवट सोडून देणे.
एका माळेचे मणी सगळे सारखेच (चांगले अथवा वाईट).
ऐकावे जनाचे करावे मनाचेलोकांची मते जरूर घ्यावीत, सल्लाही विचारावा पण शेवटी आपल्या मनाला योग्य वाटेल तेच करावे.
खर्चणाराचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते

यजमान अतिशय उदारपणाने लोकांना भोजन द्यायचे ठरवतो. परंतु त्याचा हा दानधर्म दुष्ट आणि मत्सरी कोठावळ्याला (कोठीवरचा मनुष्य) बघवत नाही.
करावे तसे भरावे ज्या प्रकारचे कृत्य करावे त्या प्रकारचे परिणाम भोगावे लागतात. (चांगल्या कृत्याचे चांगले आणि वाईट कृत्याचे वाईट परिणाम)
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही खरी मैत्री किंवा खरे नाते किरकोळ कारणांवरून भंग पावत नाही.
काडीचोर तो पाडीचोर छोटे अपराध करणारा माणूस मोठे अपराध करायला प्रवृत्त होतो.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाहीहलकट किंवा नीच अशा दुर्जनांच्या निंदेने थोरांचे वैभव किंवा सज्जनांचा मोठेपणा कमी होत नाही.
करंगळी सुजली म्हणून ती डोंगराएवढी होईल काय ? हाताची करंगळी कितीही सुजली म्हटले तरी ती डोंगराएवढ्या आकाराची होणार नाही. (बेडूक फुगला म्हणून तो बैल होत नाही.)
कसायाला (कसाबाला) गाय धारजिणी दुष्ट आणि कठोर माणसाशी सगळेच नरमाईने वागतात.
काट्याचा नायटा छोट्या गोष्टीला फार मोठे भयंकर स्वरूप देणे.
काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाहीत थोड्याशा अधिकाराने जे काम होते ते पुष्कळशा पैशाने देखील होत नाही.
कान आणि डोळे यांच्यात चार बोटांचे अंतर ऐकलेली गोष्ट आणि पाहिलेली गोष्ट यात फरक असण्याचा संभव असतो. (ऐकलेली गोष्ट खोटी ठरते, पाहिलेली गोष्ट खरी ठरते.)
काखेत कळसा गावाला वळसा जवळच असलेली वस्तू भान नसल्याने दिसत नाही आणि मग ती सर्वत्र शोधत (गावभर किंवा दूरवर) बसणे.
काप गेले नि भोके राहिली वैभव गेले आणि त्याच्या फक्त खुणा राहिल्या.
कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडेच मूर्खाच्या मनावर कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग होत नाही.
कानामागून आली आणि तिखट झाली मागून येऊन वरचढ होणे.

25 mhani in marathi । २ ५ म्हणी व अर्थ मराठी मधून

गरजवंताला अक्कल नसते.
जरूर किंवा गरज भासली म्हणजे माणूस भलत्या गोष्टी करतो.
कुंभाराची सून कधी तरी उकिरड्यावर येईलच माणसाने आपला मूळचाच गुणधर्म किती जरी झाकायचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी तो उघड होणारच.
कुसंतानापेक्षा निसंतान बरे वाईट पुत्र असण्यापेक्षा पुत्र नसणे चांगले.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ जवळचाच माणूस आपल्याच जातभाईच्या नाशाला कारणीभूत होतो – फितुर देशद्रोही माणूस आपल्याच देशाचा घात करतो.
कुठे जाशी भोगा तर तुझ्यापुढे उभा जे संकट येऊ नये असे आपल्याला मनोमन वाटत असते तेच संकट आपल्यावर नेमके येते.
केळीवर नारळी अन् घर चंद्रमौळी घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असणे.
कुडी तशी पुडी देहाप्रमाणे आहार
कर नाही त्याला डर नाही ज्याने पाप केले नाही त्याला घाबरण्याचे कारण नाही.
खऱ्याला मरण नाही खऱ्याचा नेहमी विजय होतो. खरे कधी लपत नाही. कधी ना कधी उघडकीला येतेच.
खाई त्याला खवखवे एखाद्या माणसाने जर वाईट काम केले असेल तर त्याचे मन त्याला सदासर्वदा डाचत राहते.
कोरड्याबरोबर ओले जळते वाईटाबरोबर चांगल्याचाही नाश होतो. चूक नसणारा माणूस निष्कारण चूक असणाऱ्याबरोबर अपराधी धरला जातो.
कामापुरता मामा आपले काम करून घेण्यापुरती लाडीगोडी लावणे किंवा गोड बोलणे.
कोंड्याचा मांडा करून खावा मिळत असेल त्यात समाधान मानावे. (आहे त्या परिस्थितीत समाधानी असावे)
कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहात नाही जी गोष्ट होणारच आहे ती गोष्ट क्षुल्लक अडथळ्यामुळे थांबत नाही.
खल्वाटो निर्धनः क्वचित् ज्याच्या डोक्यावर टक्कल असते असा माणूस सहसा दरिद्री नसतो.
खाऊ जाणे तो पचवू जाणे जो मनुष्य हिम्मत करून एखादा पदार्थ खातो, त्याच्या अंगी तो पचवण्याचे सामर्थ्य असते.
खाऊन माजावे टाकून माजू नये अन्न, पैसा किंवा तत्सम गोष्टी वाया घालवू नयेत किंवा त्यांचा गैरवापर करू नये.
खायला काळ भुईला भार निरुपयोगी माणूस सर्वांनाच भारभूत होतो.
गर्जेल तो पडेल काय ? जो माणूस बडबड करतो त्याचे हातून काही घडत नाही. (गडगडाट करणारे मेघ पाऊस पाडत नाहीत)
खिळ्यासाठी नाल गेला, नालेसाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला. एवढा अनर्थ खिळ्याने केला एका क्षुल्लक गोष्टीत जरी हयगय केली किंवा दुर्लक्ष केले तर परंपरेने किंवा टप्याटप्याने मोठा अनर्थ घडू शकतो.
गर्वाचे घर खाली गर्वाचा परिणाम अपमान होण्यात किंवा नुकसान होण्यात होतो. – खोट्या गर्वाचा फुगा फुटल्यावर त्या व्यक्तीची मान खाली जाते.
गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता ज्याला उपदेश ग्रहण करण्याची पात्रता नाही, त्याला उपदेश करण्यापेक्षा आहे ती परिस्तिथी स्वकारावी.
गाड्याबरोबर नळ्याची यात्रा मोठ्यांच्या आश्रयाने (संगतीने) लहानांचाही फायदा.
गळा कापला खोकला गेला मूळच्या दुःखापेक्षा त्याच्या निवारणाचाच उपाय भयंकर असतो. (खोकल्याच्या निवारणासाठी गळाच कापणे)
गरज सरो वैद्य मरो एखाद्या माणसाची गरज असेपर्यंत त्याला भेटायचे, त्याच्या पुढे पुढे करायचे आणि गरज संपली की त्याला ओळखही दाखवायची नाही.

mhani in marathi 50 । ५ ० म्हणी

घर बांधून पाहावे, आणि लग्न करून पाहावे घर बांधायला आणि लग्न करायला आपण केलेल्या अंदाजाहून बऱ्याच वेळा अधिक खर्च येतो. ती ती कामे करून अनुभव घेतल्याशिवाय त्यातल्या कटकटी कळत नाहीत. -ही म्हण ‘घर पाहावे बांधून, आणि लग्न पाहावे करून’ अशीही वापरतात.
घरोघरी मातीच्याच चुली सामान्यतः सर्वत्र परिस्थिती सारखीच असते.
घरचे झाले थोडे, व्याह्याने धाडले घोडे स्वतःच्या कामाचा भरपूर व्याप असताना दुसऱ्याचे कामही आपल्यावर लादले जाणे. -आपलाच घरखर्च जास्त असताना त्यात दुसऱ्याच्या खर्चाची भर
घरासारखा पाहुणा होतो, पण पाहुण्यासारखे घर होत नाहीएखाद्या परक्या ठिकाणी माणूस गेला तर त्याला त्या ठिकाणच्या भाषा, चालीरीती वगैरे गोष्टी स्वीकाराव्या लागतात. पण त्या गेलेल्या माणसाच्या चालीरीती किंवा त्याची भाषा त्या ठिकाणचे लोक स्वीकारत नाहीत.
चार दिवस सासूचे आणि चार दिवस सुनेचे सासूचे वैभवाचे दिवस असतात तेव्हा ती सुनेवर सत्ता किंवा अधिकार गाजवते. पुढे सून त्या वातावरणात स्थिरावून कर्ती सवरती झाली की सासूवर तिचा अधिकार चालतो. -हातात अधिकार असताना दुसऱ्यालाही अधिकार मिळू शकतो याचा विचार करावा.
चोरांची पावले चोरांस ठाऊक चोरांची कृत्ये, आणि वागणूक (लबाड्या किंवा चोरी करण्याचे मार्ग) चोरालाच माहीत असतात.
चढेल तो पडेल आणि पोहेल तो बुडेल जो कोणी काही साहसाचे काम करायला प्रवृत्त होईल, त्याला कधी अपयश येईल तर कधी यश येईल. पण अपयशाला घाबरून काही करायचे नाही असे करू नये (अपयश येणे यात कमीपणा नाही. काही न करणे यात कमीपणा आहे)
चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा जशास तसे या न्यायाने वागणे.
जशी कुडी तशी पुडी जसा आणि जेवढा देह त्या मानानेच आहार
जया अंगी मोठेपण तया यातना कठिण जो मोठा असतो किंवा मोठ्या अधिकारावर असतो त्यालाच अधिक त्रास किंवा झीज सोसावी लागते.
जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे दुसऱ्याच्या परिस्थितीची जाणीव आपल्याला होत नाही. जेव्हा तशीच परिस्थिती आपल्यावर येईल तेव्हाच त्याची खरी जाणीव आपल्याला होते.
ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी जो आपल्याला खाऊ घालील किंवा अन्नाला लावील त्याच्या नावाने टाळ्या वाजवाव्यात. – खाल्ल्या मिठाला जागावे, उपकारकर्त्याला नेहमी स्मरावे.
तहान लागल्यावर विहीर खणणे अगदी ऐन वेळी प्रयत्न सुरू करणे. भविष्यात जी गोष्ट लागणार आहे तिची तरतूद आधीच करून न ठेवणे.
डोळा न फुटे काडी न मोडे कोणत्याही पक्षाला, गटाला किंवा बाजूला वाईट न वाटेल अशा रीतीने सौम्य उपायाने किंवा नाजूकपणे सुवर्णमध्य साधणे.
ताकाला जावे आणि भांडे का लपवावे ? दुसऱ्याकडे उसने किंवा भीक मागण्याचा कमीपणा एकदा पत्करल्यावर मग त्यात लपवालपवी करू नये.
थेंबे थेंबे तळे साचे थेंब थेंब साचूनच त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त होते. (मिळकत जरी कमी असली तरी त्यातूनच थोडी थोडी शिल्लक ठेवावी. कालांतराने ती मोठी रक्कम होऊन आपल्या उपयोगी पडते.)
थोराघरचे श्वान, त्याला सर्व देती मान मोठ्या किंवा समर्थ माणसाच्या नुसत्या आश्रयाला जरी राहिले तरी मोठेपणा मिळतो.
दगडाचे नाव धोंडा, आणि धोंड्याचे नाव दगड जी गोष्ट स्पष्ट आहे, तिच्याबद्दल वाटाघाटी किंवा वादविवाद करण्यात अर्थ नाही. दगड म्हणा किंवा धोंडा म्हणा. ते एकच.
दसकी लकडी एकका बोजा एका एका माणसाने एक एक लाकूड जरी दिले, तरी ती लाकडे इतकी जमतात की ते एका माणसाचे ओझे होते. (सर्वांनी हातभार लावल्यावर एक मोठे कार्य होऊ शकते)
दात कोरून कोठे पोट भरत असते भलत्याच कामी चिक्कूपणा करून कसे चालेल? मोठ्या कामाला लहान साधन पुरत नाही.
नखाने काम होते तेथे कुऱ्हाड कशाला? अल्प शक्तीने, थोड्या प्रयत्नाने किंवा क्षुल्लक साधनाने जे काम होण्यासारखे आहे तेथे मोठी शक्ती किंवा मोठे साधन का वापरायचे ?
नकटीच्या लग्नाला सत्राशे विघ्ने दोषयुक्त काम क्ररणाऱ्याच्या मार्गात एकसारख्या अनेक अडचणी येतात.
न कर्त्याचा वार शनिवार ज्याला एखादे काम मनापासून करायचे नसते तो कोणत्या ना कोणत्या कारणाने किंवा कोणती ना कोणती सबब सांगून टाळतो.
नाचता येईना, अंगण वाकडे आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा झाकण्याकरता संबंधित गोष्टीत दोष दाखवणे.
निंदकाचे घर असावे शेजारी दुसऱ्याची निंदा करणारा माणूस उपयोगी पडतो.
पळसाला पाने तीनच कोठेही गेले तरी मानवी स्वभाव सारखाच असतो. स्थिती कोणतीही असो, सुखदुःखे सारखीच असतात.
प्रयत्नांती परमेश्वर कितीही अवघड वाटणारी गोष्ट सतत, मनापासून प्रयत्न केल्यावर साध्य होते.
पडलेले शेण माती घेऊन उठते चांगल्या माणसावर एखादा ठपका आला आणि नंतर तो निर्दोष ठरून त्याचे निरसन झाले तरी त्याची थोडी तरी बदनामी होतेच. (जमिनीवर पडलेले शेण तेथून उचलून दुसरीकडे फेकले तर त्या शेणाबरोबर जमिनीवरची मातीही जाते.)
पी हळद आणि हो गोरी कोणत्याही बाबतीत उतावीळपणा करणे. (हळद प्याल्याने माणूस गोरा होत नाही आणि झाला तरी ताबडतोब होत नाही.)
पायाची वहाण पायीच बरी हलक्यांचा वाजवीपेक्षा अधिक सन्मान झाला म्हणजे ते शेफारतात. म्हणून ते योग्य जागीच असलेले बरे.
पाची बोटे सारखी नसतात सर्व माणसे सारख्या स्वभावाची, मताची आणि कर्तृत्वाची नसतात. प्रत्येक व्यक्तीत वेगळेपणा असतो.
पालथ्या घड्यावर पाणी केलेला उपदेश निष्फळ ठरणे.
फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचू नयेत जेथे वैभव उपभोगले तेथेच वाईट दिवस कंठण्याची पाळी येऊ नये.
फुटका डोळा काजळाने साजरा करावा आपल्या अंगी दोष आहे जो नाहीसा करता येणार नाही, त्याचा होईल तितका फायदा किंवा उपयोग करून घ्यावा.
बळी तो कान पिळी ज्याच्या अंगी शक्ती, पैसा, सत्ता असे सामर्थ्य असते तो इतरांवर अंमल गाजवतो.
बाप तसा बेटा जे बापाच्या अंगी गुण असतात तेच मुलाच्या अंगी असायचे.
बापाला बाप म्हणेना, तो चुलत्याला काका कसा म्हणेल जवळच्या नातलगाला जो ओळखत नाही तो त्या मानाने दूरच्या माणसाला काय ओळखणार या ठिकाणी ओळखणे हा शब्द मान देणे, किंमत देणे या अर्थी आहे.
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये मेहरबानीमुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये. (एखादा मदत करतो आहे म्हणून त्याला जास्त लुबाडू नये.)
भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा सपाटून भूक लागली म्हणजे कोंड्यासारख्या निःसत्व पदार्थाची भाकरीही रुचकर लागते आणि खरी झोप आली असली तर धोंड्यावर पडूनही झोप लागते.
भिकेची हंडी शिक्यास चढत नाही भिक्षा मागून आणलेल्या पदार्थाला बरकत नसते. दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्याचे हातून मोठे कार्य घडत नाही.
मांजराचे गळ्यात घंटा कोणी बांधावी अवघड काम करायला कोणीही धजत नाही.
मातीचे कुल्ले लावल्याने लागत नाहीत एखाद्या परक्याला नुसते आपले म्हणून तो आपला होत नाही. त्यासाठी त्यावर खरे प्रेम असावे लागते.
मान सांगावा जना आणि अपमान सांगावा मना आपला जर आदरसत्कार किंवा सन्मान झाला असेल तर तो लोकांना सांगावा
रोज मरे त्याला कोण रडे ? तीच तीच गोष्ट रोज घडू लागली म्हणजे त्यातील स्वारस्य जाते आणि तिकडे कोणी लक्ष देत नाही – सारखी किरकीर किंवा तक्रार करणाऱ्या माणसाकडे दुर्लक्ष केले जाते.
लकडीवाचून मकडी वठणीस येत नाही माकडाच्या चेष्टा किंवा खोडकरपणा हा सौम्य उपायाने बंद होत नाही. त्यासाठी काठीचाच वापर करावा लागतो.
लष्कराच्या भाकरी भाजणे फायदा नसलेला निरुपयोगी उद्योग करणे.
लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण पुष्कळ माणसे लोकांना असे करावे, तसे करावे असा उपदेश करत असतात. पण त्यांचे स्वतःचे आचरण मात्र त्याच्या नेमके उलट असते.

अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा.


Leave a Comment