marathi story for kids– गोष्टी ऐकायला कोणाला नाही आवडत प्रत्येकेला गोष्टी वाचायला सुद्दा आवडतात.खास करून जेव्हा त्या गोष्टी मजेदार असतात, काहीतरी शिकवतात, आपल्याला काहीतरी बोध देतात आणि आपल्याला हसवतात देखील सुद्दा.
अश्याच सुंदर गोष्टी आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत छोटीशी, गमतीशीर आणि खूप काही शिकवणारी. हा गोष्टी संग्रह लहानग्यांसाठी अगदी योग्य आहे. आई-बाबांसोबत किंवा एकटेही वाचायला सोपी आणि मजेदार गोष्टी आहेत.
गोष्टीतले मजेशीर पात्र, सोपी भाषा आणि शेवटी मिळणारी गोमटी शिकवण त्यालाच आपण तात्पर्य असे हि म्हणतो सगळंच खास आहे या पोस्ट मध्ये. झोपताना, आराम करताना किंवा अगदी खेळून आल्यावर ही गोष्ट ऐकायला विसरू नका.
चला मग, गोष्टीच्या जगात करूया मजेशीर सफर तुमच्यासाठी खास marathi story for kids म्हणजेच गोष्टीना सुरुवात सुरू करूया.

1) अशक्य गोष्ट
एका वर्गात टीचरनी प्रत्येक विद्यार्थ्याला एक कार्गद दिला व ज्या गोष्टी आपणाला अशक्य वाटतात, त्यांची यादी करायला -सांगितली. चौथीचा वर्ग होता तो. एकानं लिहिले, मला चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात फेकता येत नाही. दुसऱ्यानं लिहिलं, मला चार अंकी भागाकार येत नाही. एका मुलीनं लिहिले, मी सुप्रियासारखे चित्र काढू शकत नाही. तर दुसऱ्या मुलीनं लिहिलं, मला बाईसारखे नटता येत नाही. सर्व मुलांनी अशी यादी केली.
काही वेळांनी टीचरनी ते कागद न वाचताच एकत्र केले व त्या म्हणाल्या, मुलांनो, आपण आता या अशक्य गोष्टींची होळी करू. त्यांनी ते कागेद पेटवून दिले. त्यांनी मुलांना विचारले, आपण आता काय केले? मुले म्हणाली, अशक्य गोष्टींची होळी केली. टीचर म्हणाल्या, ज्या गोष्टी आपल्याला जमत नाहीत, त्या जळून खाक झाल्या.
आता त्यांची आठवणही नको. आता आपण मी ज्या ज्या अशक्य गोष्टी आहेत. त्या करु शकेन, असा विचार पक्का मनात करू, म्हणजे आपण कोणत्याही विषयात, कलेमध्ये मागे राहणार नाही. यश नक्कीच मिळेल.
तात्पर्य : प्रत्येकाने जगताना अंसा नकारात्मक दृष्टिकोन काढून टाकून सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवा.
2) ईश्वराचे अस्तित्व
ईश्वराने सृष्टीची निर्मिती केली, मानव नावाचा अद्भूत प्राणीही निर्माण केला. त्याला तयार करताना मात्र देवाला खूप त्रास झाला. मानवाच्या निर्मितीनंतर हा त्रास वाढू लागला. तेव्हा ईश्क्राने साऱ्या देवतांना बोलविले व विचारले.
माणसाला तयार करून मी संकटात सापडलो आहे. मला चोवीस तास त्याच्या हाँका ऐकून घ्यावा लागतात. सारखं वाटतं की, माणूस सतत माझ्या दाराजवळ उभा राहून तक्रार करत आहे. त्यामुळे मला. शांतपणे झोपही लागत नाही. मी काय करू? कोठे लपूं? जेथे माणूस येणार नाही अशी जागा सांगा? या प्रश्नानंतर ईश्वराला त्या साऱ्या देवतांनी अनेक जागा सुचविल्या; पण ईश्वराला वाटले. काहीही करून माणूस तेथे पोहोचणारच.
म्हणून त्याने सर्व जागा नाकारल्या. अखेर एक म्हतारा देव उठला त्याने ईश्वराच्या कानात काहीतरी सांगितले. ईश्वरालाही ते पटले. त्या वृद्ध देवाने सांगितले, की तू माणसाच्या आत लपून बस. ईश्वराने तसे केले आणि तो सुखी झाला. –
तात्पर्य : ईश्वराचे अस्तित्व आपल्या आतच आहे, पण तेवढीच जागा सोडून आपण त्याला सर्वत्र शोधत असतो.
3) माणसांतील देव
एका गावात एक चर्च होते. एक दिवस तेथील नदीला पूर आला. पाणी गावात गुडघ्यापर्यंत आले. चर्चच्या फादरना न्यायला एक जीप आली. जीप मधील माणसे म्हणाली, चला फादर. बहुतेक पाण्याने सगळे वाहून जाईल. फादर म्हणाले मला माझा येशूच येऊन वाचवेल. जीप निघून गेली. नंतर पाणी वाढल्यानंतर एक बोट आली. बोटीतील लोक फादरना न्यायला आले.
फादरनी नकार दिला. पाणी इतके वाढले की फादरना चर्चच्या छप्परावर जावे लागले. मग एक हेलिकॉप्टर वरून घिरट्या घालू लागले. त्यातून एक दोर आला. हेलिकॉप्टरमधले लोक म्हणाले, फादर, आता त्तरी दोर पकडा आणि जीव वाचवा.’ फादर म्हणाले, ‘मला माझा येशूच येऊन वाचवेल.
यानंतर एकच मोठी लाट आली आणि फादर मृत्युमुखी पडले. स्वर्गात गेल्यावर त्यांनी येशूला विचारले, मी इतकी प्रार्थना केली. पण तू मला वाचवले नाहीस. येशू म्हणाले, मी प्रथम जीप घेऊन आलो होतो. नंतर बोट आणि हेलीकॉप्टर. पण तूच मला ओळखले नाहीस.’ देव काही प्रत्यक्ष येऊन मदत करत नाही, तो माणसातच शोधावा लागतो.
तात्पर्य : देव हा माणसातच शोधायचा असतो.
4) हुशार ससा

एक होता ससा पांढरा पांढरा शुभ्र. गुंजांसारखे लाल लाल डोळे असलेला आणि गुबगुबीत आपले दोन कान उभारून तो रानात इकडे तिकडे भटकायचा आणि खाण्याचे पदार्थ शोधीत फिरायचा.
एके दिवशी रानात फिरता फिरता त्याला एक पांढरा उंदीर दिसला. त्या पांढऱ्या उंदराला पाहताच सशाला वाटले, अरे हा कोण आपल्यासारखा प्राणी इथे आलाय ! याचे डोळे तर काळे काळे दिसतायत, आणि एक बारीक लांब शेपटीही आहे. सशाला वाटले, आपण त्याची ओळख करून घ्यावी व त्याच्याशी मैत्री करावी म्हणजे या रानात आपली
गट्टी जमली की खूप खूप खेळता येईल. ससा त्या उंदराजवळ गेला आणि म्हणाला, भाऊ, आपले नाव काय आपण येथे कोठून आलात त्यावर उंदीर म्हणाला, माझे नाव उंदीरमामा. मी इथून थोड्याच अंतरावर असलेल्या माणसांच्या घरात राहतो. त्यांच्या घरातले आयते खातो पितो आणि दिवसभर उनाडत फिरतो. ससा म्हणाला, उंदीरमामा, मी येऊ का तुझ्याबरोबर माणसाच्या घरात
उंदीर म्हणाला, चल की, पण तेथे खूप लहान लहान मुले आहेत. त्यांनी तुला धरून ठेवले तर मात्र तुझी सुटका व्हायची नाही.सशाला आपल्या चपळाईचा खूप गर्व होता. तो म्हणाला, मला कोण धरणार ? मी काही कोणाला सापडणार नाही. मग तो पांढरा उंदीर आणि ससा दोघे मिळून गावात आले.
सशाला पाहताच लहान मुले त्याच्याभोवती जमा झाली आणि सर्व मुलांनी मिळून त्या मऊ मऊ सशाला धरून एका पिंजऱ्यात कोंडून ठेवले. ससा खूप घाबरला होता. पण करणार काय ? त्याला वाटले, या उंदीर-मामांनी तर आपल्याला फसवले नाही ना ससा हुषार होता. तो उंदराला म्हणाला, उंदीरमामा, आता आपण दोघे मित्र आहोत. तेव्हा तू मला मदत केली पाहिजेस.उंदराने सशाला मदत करायचे कबूल केले.
रात्र झाल्यावर लहान मुलांनी सशाचा पिंजरा घरात नेऊन ठेवला. मुले झोपल्यावर तो उंदीर सशाच्या पिंजऱ्या-जवळ आला व म्हणाला, सशाभाऊ, मी तुला काय मदत करू ते सांग त्यावर ससा म्हणाला, या पिंजऱ्याचे दार उघड आणि तू आत ये. मुलांनी मला खाण्यासाठी या पिंजऱ्यात किती खाऊ ठेवला आहे तो पाहा. तुला सोडून मी एकटा हा खाऊ कसा खाणार पिंजऱ्यातला खाऊ पाहून उंदराच्या तोंडाला पाणी सुटले. त्याने हळूच पिंजऱ्याचे दार उघडले व तो आत शिरला.
ससा म्हणाला, उंदीरमामा, हा पिंजरा फार लहान आहे. आपल्या दोघांना या पिंजऱ्यात बसता येणार नाही. मी बाहेर बसतो व तू आत येऊन हा खाऊ खात बस. तुझे खाणे संपले की मी पुन्हा पिंजऱ्यात जाईन.
उंदराला अक्कल नव्हतीच. तो पटकन् खाऊच्या आशेने पिंजऱ्यात गेला व ससा बाहेर पडला. बाहेर पडताच सशाने पिंजऱ्याचे दार लावून घेतले व उंदराला म्हणाला- मामा आता बसा कायमचे आत मला हुशार ससा म्हणतात.
5) गमावलेला आत्मविश्वास
एकदा एका सर्कशीच्या तंबूजवळ एक हत्तीचे पिल्लू बांधून ठेवलेले असते. ते पिल्लू आपले साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करत असते; पण ते साखळदंड काही तुटत नाही. शेजारी हे दृश्य त्याची आई शांतपणे पाहात असते. बंटी आपल्या बाबांना सहज कुतूहल म्हणून विचारतो, बाबा हत्ती फार ताकदवान प्राणी आहे ना हो? मग ते हत्तीचे पिल्लू स्वतः साखळदंड तोडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याला ते शक्य नाही; पण त्याच्या आईला तर ते शक्य आहे ना? मग ती इतकी शांत कशी?
यावर बाबा म्हणतात, हे बघ बंटी, त्या पिलाच्या आईलाही लहानपणी असेच साखळदंडाने बांधलेले असते. ती सुद्धा या पिलाप्रमाणेच साखळदंड तोडण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असते, पण ते तिला शक्य होत नाही. आता ती हत्तीण मोठी झालीय, तिची शक्तीही खूप आहे; पण लहान असताना तिच्या मनात आपल्याला साखळदंड तोडता येत नाहीत, ही सल आहे ती अजूनही आहे. तिची ताकद साखळदंड तोडण्याइतकी आहे. तिच्याकडे आत्मविश्वास नाही. जो तिने लहानपणीच गमावला आहे.
तात्पर्य : आत्मविश्वास गमावला की शक्य गोष्टीही अशक्य होतात.
6) परमेश्वराचा दृष्टीक्षेप
रामपूर नावाचे गाव होते. त्या गावावर कर्मकांड आणि अंधश्रद्धेचा खूपच पगडा होता. सगळे गाव धर्ममार्तंडांच्या अधिपत्याखाली होते.
या सनातनी लोकांनी गावावर अनेक निर्बंध लादले होते. लोकांना कोणताही मनोरंजनाचा कार्यक्रम पाहण्याची, अगर त्यात भाग घेण्याची बंदी होती. एकदा एक नाटकमंडळी त्या गावात आली. गावातील निर्बंधामुळे त्या लोकांना गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवरच अडवले, पण नाटकाचा निर्माता हुशार होता. त्याने कुणालाही न जुमानता नाटकाचा प्रयोग गावात करायचाच असा निश्चय केला. त्याने गावात तळ ठोकला.
नाटक पाहायचे नाही, असा निर्बंध असल्यामुळे भीतीने लोक नाटक पाहायलाच जात नव्हते; पण तरीही नाटकाची जाहीरात रोज त्या गावात केली जात होती. त्याचा परिणाम एके दिवशी दिसून आला. एक दिवस खुद्द तेथील धर्ममार्तंडालाच नाटक पाहावेसे वाटले, पण आपणचा काढलेला आदेश कसा मोडायचा? शिवाय लोक काय म्हणतील? हाही प्रश्न त्याच्यासमोर होता.
म्हणून त्याने त्या नाट्यगृहाच्या व्यवस्थापकाकडे एक चिठ्ठी पाठविली. ‘मला कोणीही पाहणार नाही, अशा दरवाजातून आत घ्याल का?’ यावर व्यवस्थापकाने त्यांना उत्तर दिले, ‘परमेश्वराच्या दृष्टीला पडणार नाही, असा एकही दरवाजा या नाट्यगृहाला नाही.’
तात्पर्य : सत्याचा वाटा, पळवाटा, आडवाटा नसतात. सत्य ते सत्यच. ते कधीही चुकविता येत नाही.
7) देशभक्ती
प्राचीन काळात मगध साम्राज्य अतिशय भरभराटीला आलेले साम्राज्य होते. चंद्रगुप्त मौर्य मगधचा सम्राट होता. अतिशय न्यायी आंणि तितकाच पराक्रमी असा हा राजा होता. आचार्य चाणक्य त्याची मार्गदर्शक आणि प्रमुख सल्लागार होता. चंद्रगुप्ताच्या राज्यात एकदा ऐन थंडीच्या दिवसांत घोंगड्या चोरीला जाऊ लागल्या. अनेक प्रयत्न करूनही चोर सापडत नव्हते. लोक मात्र थंडीने आजारी पडत होते.
marathi story for kids
यावर उपाय म्हणून सरकारने घोंगड्या पुरवाव्यात, असे चाणक्याने सुचविले. चंद्रगुप्ताने ते मान्य केले आणि हजारो घोंगड्या आणल्या. त्यांच्या वितरणाची जबाबदारीही त्याने चाणक्यावरच टाकली. चोरांना ही गोष्ट कळली. त्यांनी एका रात्री चाणक्याच्या वाड्यात प्रवेश केला.
पाहतात तर काय, हजारो घोंगड्यांचा ढीग लागलेला अन् शेजारी चाणक्य आणि त्याची वृद्ध आई मात्र भूमीवर झोपलेले. पांघरूणही नव्हते त्यांच्या अंगावर आश्चर्य वाटून चोरांनी चाणक्याला उठविले आणि विचारले की, ‘वाड्यात हजारो घोंगड्या असून, तुम्ही त्यातली एखादी का वापरायला घेतली नाही?’ चाणक्य म्हणाला, ‘बाबांनो, या घोंगड्या माझ्या नाहीत. फक्त त्या वाटण्यासाठी माझ्याजवळ दिल्या आहेत. जी वस्तू माझी नाही, तिचा उपभोग मी कसा काय घेणार? माझा त्यावर काय अधिकार आहे?’
तात्पर्य : हेच तत्त्व आचरणात आंणून सार्वजनिक मालमत्तेचे आपण विश्वस्त आहोत, हे समजून घेतले तरच देशाची प्रगती होईल.
8) वाघ आणि वाटसरू
एका जंगलात एक बाध राहात होता. म्हतारा झाल्यामुळे त्याला पूर्वीसारखी शिकार करता येईना. त्याला एक युक्ती सुचली. जंगलातील दर्भ गोळा करून त्याने त्याचेकडे तयार केले ओणि आपल्या पुढच्या पायात घालून जंगलातील तळ्याकाठी बसला. आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना सांगू लागला, मी दानधर्म करत आहे. हे सोन्याचे कंकण मला दान करायचे आहे.
ज्याला हवे असेल त्याने माझ्याजवळ येऊन घेऊन जावे. त्याचे हे बोलणे एका वाटसरूने ऐकले. सोन्याचे कंकण हे शब्द ऐकून त्याला लोभ सुटला. तो वाघाजवळ गेला; पण थोड्या अंतरावरून त्याला म्हणाला, तू तर हिंस्त्र पशू आहेस, मी जवळ आल्यावर तू मला मारणार नाहीस कशावरून?’ तेव्हा वाघ म्हणाला, अरे, आयुष्यभर तेच करत आलो ना मी! त्याचाच आता मला पश्चात्ताप होत आहे.
माझ्या गुरूंनी पापक्षालन करण्यासाठी मला दानधर्म करायला सांगितला आहे. आता हे सोन्याचे कंकण तेवढे राहिले आहे. ते मला दान करायचे आहे. तळ्यात स्नान कर आणि या दानाचा स्वीकार कर.’ वाटसरू स्नानासाठी जाताना चिखलात अडकून पडला. थांब तुला वर काढलो, असे म्हणत वाघाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला खाऊन टाकले.
तात्पर्य : लोभाच्या आहारी जाऊन कुणावरही आंधळा विश्वास ठेवणे घातक असते.
9) संपत्तीचा लोभ
एक साधू एका जंगलातून जात होता. अचानक त्याला एक मस्तृक आणि पोलदी पाय असणारा एक विचित्र माणूस समोर आला. त्या माणसाला पाहून साधूला जरा आश्चर्यच वाटले. आता पर्यंत या जंगलातून साधूने खूप वेळा भ्रमंती केली होती; पण अशा प्रकारचा माणूस भेटेल, अशी त्याला शंकासुद्धा आली नव्हती.
कुतूहल म्हणून साधूने त्या माणसाला त्याच्या आहाराविषयी विचारले. यावर तो म्हणाला, मी भूखंड खातो आणि समुद्राचे पाणी पितो. तसा मी अत्यंत सुखी आहे.
सर्व भौतिक सुविधा मला उपलब्ध आहेत. माझ्या आहारासाठी मी अनेक भूखंड आरक्षित केलेले आहेत; पण तरीही मला भविष्याची चिंता छळत आहे. यावर साधूने विचारले, इतकी सुखं पायाशी लोळत असताना तुला भविष्याची चिंता का बरं? तो माणूस म्हणाला, आज जरी मला प्रचंड जमीन व अमर्याद पाणी उपलब्ध असले तरी हे सारे गिळंकृत केल्यानंतर काय खाऊ? हा प्रश्न मला सतत छळत असतो.
तात्पर्य : सत्ता, संपत्ती आणि सन्मान यांचा लोभही असांच अमर्याद असतो, तो कधीच संपत नाही.
10) मनःशांती
एका राजाने भगवान बुद्धांना विचारले, आपण कोण? मला आपल्यासारखी मनःशांती लाभेल का? यावर बुद्ध म्हणाले, अवश्य लाभेल. मी ही फार दरिद्री विचारांचा माणूस होतो. माझ्याजवळ खूप काही होतं; पण आत काहीच नव्हतं, जे मला जमलं ते तुला नक्कीच जमेल. जे एका बीजाला शक्य आहे, ते दुसऱ्यालाही आहे. प्रत्येक बीजाचा वृक्ष बनू शकतो. तुझाही असाच शांतिवृक्ष बनेल.
कारण मनुष्याची आंतरिक शक्ती समान आहे; परंतु तुला त्यासाठी काहीतरी करावं लागेल. राजा म्हणाला, मी काहीही करण्यास तयार आहे. सर्वसंगपरित्यागसुद्धा करेन. बुद्ध म्हणाले, काही गमावून त्यागून शांती मिळत नाही. स्वतःजवळचे सर्व सोडायला तू सिद्ध आहेस. सोडशीलही; पण तुला शांती मिळणार नाही. जो स्वतःलाच हरवायला तयार असतो, त्यालाच शांती मिळते.
तात्पर्य : स्वतः जवळचे नव्हेतर स्वतःच समर्पित झाल्याशिवाय मनःशांती लाभत नाही.
11) स्वतःला जाणा
विवेकानंदांचे भारतभ्रमण सुरू होते. सत्याचा शोध घेत ते फिरत होते. एका रात्री नदी पोहून ते पलीकडच्या काठावरील महर्षी देवेंद्रनाथांच्या आश्रमात गेले. ध्यानस्थ बसलेल्या महर्षीना त्यांनी विचारले, ईश्वर आहे की नाही, हे मला जाणून घ्यायचे आहे. अर्ध्या रात्री येऊन हा प्रश्न विचारणारा तो युवक पाहून महर्षीसुद्धा घाबरले त्या तरुणाला म्हणजेच विवेकानंदांना ते म्हणाले, मुला खाली. बैस. मग निवांत बोलू एवढे ऐकताच विवेकानंद त्यांना म्हणाले, आपल्याकडून काहीही मिळणार नाही. मी निघतो. दौन महिन्यानंतर हाच प्रश्न त्यांनी रामकृष्ण परमहंसांना विचारला.
रामकृष्ण म्हणाले, तुला खरंच जाणून घ्यायचं असेल तर बोल. देव आहे किंवा नाही, याची चिंता सोडून दे. तुला जाणायचं आहे की नाही, एवढंच सांग. विवेकानंद पहिल्यांदाच विचारात पडले. आतापर्यंत मी लोकांना पकडत होतो. मी आत्तापर्यंत विचारच केला नव्हता की माझी जाणून घ्यायची तयारी आहे किंवा नाही. रामकृष्णांजवळ अनुभव होता. फक्त शब्द नव्हते. अनुभवाजवळ टाळाटाळ नसते. संदिग्धता नसते, काहीही शंका नसतात. असे ज्ञान नेहमी आतून येते.
तात्पर्य : स्वतःला जाणून घ्यायची इच्छा हवी असं मिळवलेले ज्ञान आतून येते. ते कोणालाही हिरावून घेता येत नाही.
12) दोन तऱ्हेचा कपडा (खरा मार्ग)
एका माणसाला गंगोत्रीला जाण्यासाठी ऋषीकेशला सकाळी रांगेत तिकिट काढण्यासाठी उभा राहिला. साठ वर्षाच्या आसपास त्या माणसाचे वय असेल. त्याच्या मागे आम्ही रांग लावली. पाहतो तो तर काय? त्या माणसाने जे शर्ट घातले होते त्यातील पुढील बाजूचा कपडा आणि मागील बाजूचा कपडा वेगवेगळा होता.
marathi story for kids
आम्ही सहज भावनेने त्याला विचारले, हे कशाप्रकारचे शर्ट घातले आहे? तो म्हणाला, जर नवीन शर्ट शिवले असते तर गंगोत्रीला जाण्यासाठी पैसा वाचला नसता.मी बायकोला सांगितले दोन वेगवेगळे कापड आहे. त्यांनाच मागे पुढे लावा, त्याने शरीर तर झाकले जाईल. आता फॅशनची गरज नाही. वृध्दपणा आला होता. पैसे कोतून येतील आहे त्यातच भागावे लागते. मागून मागून काय मागणार पैसा दयावेतर लागतील आम्हाला त्याच्या गोष्टी ऐकून खूप समाधान वाटले.
विचार केला अशी सुध्दा माणसे जगात आहेत. जी जगाला पाहण्याची इच्छा धरतात. मग त्याच्याजवळ साधन कमी का असेना. ते लोक धैर्य हारत नाही. शर्ट काय? तो तर शरीर झाकण्यासाठी असतो. आत्याचे खादय काही वेगळेच असते. काही वेळा छोटया छोटया गोष्टीसुध्दा मनाला भावून जातात. खर्चाला वाढवू, कमी केले जावू शकते. विश्व बधायचे असल्यास घर सोडणे जरूरीचेच आहे. माणसाचा विचार चांगला पाहिजे.
13) उपकाराची परतफेड
पावसाळ्यात मोठे वादळ झाले. तेव्हा त्यात सापडलेल्या घोडा, बैल व मांजर यांनी माणसांच्या घरात आश्रय घेतला. ते तिघेही पावसाने चिंब भिजले होते, म्हणून माणसाने शेकण्याकरिता त्यांना शेकोटी पेटवून दिली. थोड्याच वेळात त्यांना उबदार वातावरण वाटू लागले, पण तिघांनाही खूप भूक लागली होती. नंतर त्याने घोड्याला हरभरा दिला, बैलाला चारा घातला, मांजराला आपल्यातले अन्न दिले. वादळ शांत झाले. ते तिघेही जायला निघाले.
माणसाने केलेल्या उपकाराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्याचे ठरविले. माणसाच्या सर्व आयुष्याचे तीन सारखे विभागे करून त्यांनी आपल्यातील गुण माणसाच्या त्या अवयबाला दिले. घोड्याच्या वाट्याला पहिला भाग असल्यामुळे तरुणपणात माणसे घोड्यासारखी तल्लख व उतावळी असतात. त्यांना कोणाचे बंधन नको असते.
दुसरा भाग बैलाच्या वाट्याला आला. त्यामुळे मधल्या प्रौढ वयात माणसे स्थिर बुद्धीची व आपल्या कामात मग्न असतात. तिसरा भाग मांजराच्या वाट्याला आला. त्यामुळे शेवटच्या म्हातारपणाच्या काळात माणसे तिरसट असतात.
तात्पर्य : उपकाराची परतफेड करणे, हा गुणधर्म सर्वांनीच अंगी बाणवायला हवा.
14) आधार
श्रीकृष्णांचे जेवण चालले होते. त्यांनी दोन घास खाल्ले आणि ताट बाजूला सारून तें दरवाजाकडे गेले. रुक्मिणी म्हणाली, असं भरल्या ताटावरून कोणी उठतं का? काहीही उत्तर न देता कृष्ण बाहेर गेले. उदास होऊन लगेचच परतले आणि पुन्हा जेवण करू लागले. रुक्मिणीने विचारताचं ते म्हणाले, माझा आवडता भक्त रस्त्यातून जात होता. काही लोक त्याला दगड मारत होते.
रक्ताळलेल्या अवस्थेतही तो हसत होता. त्याला माझी गरज होती म्हणून मी उठलो होतो. रुक्मिणी म्हणाली, मग का परत आलात दरवाजाबाहेर गेलो तेव्हा माझी गरजच उरली नाही. कारण त्याने स्वतःच दगड हातात घेऊन प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली होती. जोपर्यंत तो निराधार होता तोपर्यंत त्याचे प्राण मला चुंबकाप्रमाणे खेचून घेत होते. आता तो निराधार नाही. त्याला दगडाचा आधार आहे. तो लढतो आहे. त्याला माझी गरज नाही.
तात्पर्य : आपले मन, हात भरलेले आहे, तोपर्यंत परमात्म्याचा आधार नसतो जेव्हा तो लाभतो तेव्हा आपण निराधार असतो दुर्बल असतो.
15) साप आणि कावळा
कावळा आणि कावळीन नवरा बायको झाडावर राहत असे. त्यांना मूल होणार होते. कावळा आपली पत्नीची खूप काळजी घेत असे. कावळीनही त्याच्या सर्व गोष्टींवर लक्ष देत असे. दोघांनी मिळून एका झाडावर घरटे तयार केले. जस जसे दिवस जवळ येत होते, कावळा आणि कावळीन काळजी करत. ते एकमेकांना सांगत कि, आपल्याला मुल झाल्यावर त्याला साप न खावो.
या गोष्टींची त्यांना चिंता होती. कालांतराने त्यांनी एक अंडे उगवले. सापाला अंडयाचा वास लगेच लागतो. असे लोक म्हणतात. सापाने विचार केला कि, कुठेतरी अंडे जरूर आहे. तो अंडयाचा शोध घेऊ लागला.
एक दिवस त्याला त्याचा पत्ता लागला आणि त्याने अंड खावून टाकले. कावळा आणि त्याची बायको काहीं करू शकले नाही. ते खूप उदास झाले.काही दिवस गेले. कावळीनने परत कावळ्याला सांगितले कि, तीला मुल होणार आहे. तो खुप चिंतीत झाला कि, पुन्हा तेच घडणार.
एक दिवस राणी तलावात आंघोळ करायला आली. तीने आपला हार किनाऱ्यावर ठेवला आणि आंघोळीला गेली. कावळीनीने तो हार आपल्या चोचीत पकडला आणि उडाली. सर्वांनी आवाज केला. शिपाई काषळीणीच्या दिशेने पळाले. जिथे ती जाई. तेथे शिपाई धावत. तीने तो हार सापाच्या बिळाजवळ टाकला.
आता शिपायांनी पाहिले कि तेथे साप आहे. त्यांनी सापाला मारून टाकले आणि हार राणीच्या स्वाधीन केला.ही गोष्ट नितीची आहे. युक्तीने युक्ती मिळते. नीतीकार म्हणतात, काही गोष्टी बुध्दीने ठिक होतात. जरूरत नाही कि ताकदीला ताकदाने लढा करावा. हे बुध्दीने सुध्दा होऊ शकते.
marathi story for kids pdf
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा