संगणक म्हणजे काय?|What is Computer in Marathi

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

आजच्या धावपळीच्या युगामध्ये संगणक (कॉम्प्युटर) चा वापर आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत कॉम्प्युटरचा वापर वाढत आहे. कॉम्प्युटरने आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान पटकावले आहे.

दिवसेंदिवस कॉम्प्युटरचा वेग आणि साठवणक्षमता वाढत आहे: पण त्याच्या किमती मात्र कमी होत आहेत. तसेच कॉम्प्युटर सहज उपलब्ध होत आहेत.

what is computer in marathi
What is Computer in Marathi

संगणक म्हणजे काय? | What is Computer Meaning in Marathi

कॉम्प्युटर हा शब्द लॅटिन भाषेतील ‘कॉम्प्युट’ (Computer) या शब्दावरून आला. ‘कॉम्प्युट’ म्हणजे ‘गणन करणे, पूर्वी कॉम्प्युटर या साधनाचा उपयोग गणन करण्यासाठी करीत असत. म्हणून या साधनाला ‘कॉम्प्युटर’ हे नाव देण्यात आले. कॉम्प्युटर म्हणजे गणना करणारे यंत्र पण नंतर कॉम्प्युटरमध्ये अनेक बदल झाले, खूप सुधारणा झाल्या आणि आजचे अत्यंत प्रगत कॉम्प्युटर तयार झाले.

आजचा कॉम्प्युटर केवळ गणना करीत नाही, तर तो प्रचंड प्रमाणात माहिती साठवू शकतो, त्या माहितीवर क्रमवार आज्ञावलीनुसार प्रक्रिया करू शकतो. माहितीचे विश्लेषण करू शकतो आणि माहितीचे व्यवस्थापनही करू शकतो.

कॉम्प्युटर हे बौद्धिक कार्यात मदत करणारे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. कॉम्प्युटरला काही तपशीलवार माहिती किंवा डेटा आणि क्रमवार सूचना किंवा प्रोग्रॅम पुरवला असता, त्या प्रोग्रॅमच्या साहाय्याने तो डेटावर प्रक्रिया करतो व त्यापासून आपल्या इच्छेनुसार उत्तरे किंवा नवीन माहिती तयार करतो.

आज कॉम्प्युटरचा उपयोग बऱ्याच क्षेत्रांत केला जातो. उदा. सिव्हिल इंजिनियरला घराचे डिझाईन, पुलाचे डिझाईन किंवा एखाद्या धरणाचे डिझाईन तयार करायचे असेल, तर ती कामे तो कॉम्प्युटरवर तयार करू शकतो. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये क्षणात बदल करून एक आकृती (Model) कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दाखवू शकतो. बँका, दवाखाने, कंपनी, ग्रंथालये, मॉल्स, आरक्षण केंद्रे अशा ठिकाणी कॉम्प्युटरचा उपयोग होतो.

कॉम्प्युटर चा फुल फॉर्म काय आहे? | Full Form Of Computer in Marathi

कॉम्पुटर(computer) चा फुल फॉर्म पुढील प्रमाणे असेल. 

C  :-  Commonly

O  :-  Operated

M  :-  Machine

P  :-  Purposely

U  :-  Used for

T :- Technological

E :- Educational

R :- Research

म्हणजेच कॉम्पुटर चा फुल फॉर्म हा पुढील प्रमाणे आहे. Computer- Common Operating Machine Purposely Used for Technological and Educational Research असा आहे.

संगणक कसे काम करते? | How Does a Computer work?

आजच्या पीडी मध्ये संगणकाचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात होत आहे. जर तसे पाहायला गेले तर ९५ % लोक हि संगणकाचा वापर करतात. आता सर्व काही डिजिटल झाले आहे. आणि सर्व कामे हि ऑनलाईन पद्धतीने कॉम्पुटर वर झाली आहे. यामुळे भ्रष्टाचार यावर नियंत्रण आले आहे.

संगणकाला जोडलेली उपकरणे पण खूप सारे कामे करतात तर ते कसे हे आपण जाणून घेऊयात तर तसे पाहायला गेले तर याचे दोन भागात विभागले गेलेले आहेत. एक म्हणजे इनपुट डिवाइस आणि दुसरे म्हणजे आउटपुट डिवाइस असे वर्गीकरण केलेले आहे. इन डिटेल खालील प्रमाणे पाहुयात.

१ ) इनपुट डिवाइस (Input device)

इनपुट डिवाइस च्या माध्यमातून वापरकर्ता हा संगणकाला माहिती देत असतो. तर मग तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कि इनपुट डिवाइस कोणते आहेत. तर वेबकैम, कीबोर्ड, माइक्रोफ़ोन, जॉय स्टिक, माऊस, ट्रॅक बॉल, स्कॅनर ही सर्व इनपुट डीव्हाइस चि उदाहरणे आहेत.

आपण पाहुयात काही इनपुट डिवाइस यांची माहिती.

१ ) की बोर्ड (keyboard )

मुख्यत्वेकरून कॉम्प्युटरला की बोर्ड या साधनाच्या साहाय्याने माहिती पुरवली जाते. कॉम्प्युटरचा की बोर्ड हा साधारणपणे टाईपरायटरसारखा असतो. की बोर्ड इनपूट डिव्हाईस (Input Device) म्हणून कार्य करतो. कॉम्प्युटरला द्यावयाची माहिती कॉम्प्युटरच्या भाषेत रूपांतरित करण्याचे काम की बोर्डद्वारे इनपूट होत असताना केले जाते. की-बोर्डला ८४ Keys, १०१ Keys, किंवा १०८ Keys असतात.

१) F1 ते F10 किंवा F2 Keys या वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये प्रक्रियेचे (Function) कार्य करतात.

२) Control Key व की बोर्डवरील इतर Keys यांच्या संयुक्त वापराद्वारे आपण दिलेले आदेश (Commands) कॉम्प्युटर स्वीकारीत असतो.

३) Pause या कीच्या साहाय्याने आपण स्क्रीनवरील माहिती तात्पुरती थांबवू शकतो. तसेच

४) ESC (एस्केप) या कीच्या साहाय्याने बऱ्याच पॅकेजीसमध्ये आपण एक पायरी (Step) मागे येतो किंवा कधी कधी मूळ जागी येतो.

५) ALT या की चे कार्य हे आपण ज्या प्रोग्रॅममध्ये काम करीत असू त्यानुसार बदलत असते.

६) Arrow Keys चा उपयोग दिशांसाठी होतो. जसे खाली, वर, डावीकडे, उजवीकडे कर्सर नेता येतो.

२ ) ट्रॅक बॉल

ट्रॅकबॉल ही माऊसची खूप सुधारित आवृत्ती आहे किंवा याला सुधारित माऊस असेही म्हणतात. याचा उपयोग माऊससारखाच केला जातो.

what is computer in marathi

ट्रॅकबॉल हा एक Pointing device आहे. यामध्ये एक छोटा चेंडू (ball) असतो. हा चेंडू एका सॉकेटमध्ये बसवलेला असतो व त्याला सेन्सर्स (Sensors) लावलेले असतात. हा चेंडू दोन अक्षरांवर फिरवला जातो. जसे खाली व वर. वापरताना तो अंगठ्याचा साहाय्याने किंवा बोटांच्या साहाय्याने फिरवला जातो. याचा उपयोग शक्यतो Rolling साठी केला जातो.

ट्रॅकबॉलचा उपयोग जास्तीत जास्त CAD Workstation मध्ये केला जातो. टचपॅड यायच्या आधी ट्रॅकबॉलचा उपयोग पोर्टेबल कॉम्प्युटरमध्ये व्हायचा.

या ट्रॅकबॉलचा उपयोग Redar consoles, Air-traffic control किंवा Sonar अशी Equipment जी मोठी जहाजे, पाणबुड्यांमध्ये वापरली जातात.

ट्रॅकबॉलचा उपयोग कॉम्प्युटरचे गेम किवा व्हिडीओ गेम (Computer Game and Video Game) या खेळण्यांसाठी होतो. नेहमी जे कॉम्प्युटरवर गेम खेळतात ते सहजतेने या ट्रॅकबॉलचा उपयोग करतात.

३ ) स्कॅनर (Scanner)

या साधनाच्या साहाय्याने चित्राचे रूपांतर डाटामध्ये केले जाते. तो डाटा (चित्र) आपण संगणकाच्या स्क्रीनवर पाहू शकतो. मूळ चित्रात आवश्यकता वाटल्यास नंतर संगणकाच्या साहाय्याने फेरफारही करूशकतो. फ्लॅट ब्लेड स्कॅनर साधारण A4 (९” X ११”)

साईजपर्यंतच्या चित्राचे स्कॅनिंग करू शकतात. तर हँड स्कॅनर मात्र अगदीच पर्सनल वापरासाठी वापरले जातात.

१ ) आउटपुट डिवाइस (Output device)

आउटपुट डिवाइस म्हणजे संगणक वापरकर्ता च्या इनपुट नुसार माहिती प्रदान करत असतो. जर उदाहरण पाहायचे झाले तर वापरकर्ता संगणकावर गाणी ऐकत असतो म्हणजेच वापरकरताने गाणे ऐकण्यासाठी संगणक कडे इनपुट दिले आणि संगणकयाने ते आउटपुट साऊंड वर दिले. आता आपण पाहूयात आऊटपुट डिव्हाईस कोणते आहेत.

हेडफोन, प्रिंटर, प्रोजेक्टर, कम्प्युटर स्पीकर्स, जीपीएस, ध्वनी कार्ड, व्हिडिओ कार्ड ही सर्व आउटपुट डीव्हाइस ची उदाहरणे आहेत बर का.

१ ) प्रिंटर (Printer)

प्रिंटर चे अनेक प्रकार आहेत जसे कि, डॉट मॅट्रिक प्रिंटर, लेझर प्रिंटर, इंकजेट प्रिंटर असे आहेत. आपण थोडक्यात यांची माहिती पाहुयात.

डॉट मॅट्रिक्स प्रिंटर । (Dot Matrix Printer)

डॉट मॅट्रिक्स प्रिंटरलाच ‘कॅरेक्टर प्रिंटर’ म्हणतात. यात कॅरेक्टर प्रिंटरच्या साहाय्याने एक-एक कॅरेक्टर (अक्षर) कागदावर प्रिंट होऊन त्याद्वारे एकूण मजकूर तयार होत असतो. अक्षरे तयार होताना ती डॉट्सच्या (ठिपक्यांच्या) साहाय्याने तयार होत असल्याने याला ‘डॉट मॅट्रिक्स’ प्रिंटर म्हणतात.

डॉट मॅट्रिक्सचा स्पीड दर सेकंदाला साधारण ८० ते १२० कॅरेक्टर्स असा असतो. अलीकडे हा प्रिंटर सेकंदाला २४० कॅरेक्टर्स, अशा रेंजमध्येही मिळू शकतो. साईजनुसार हा साधारणपणे दर लाईनीमध्ये ८० कॅरेक्टर्स, १३२ कॅरेक्टर्स, २०० कॅरेक्टर्स या प्रकारात उपलब्ध असतो.

लेझर प्रिंटर । (Laser Printer)

या प्रिंटरच्या साहाय्याने प्रिंटिंग करीत असताना प्रिंटरच्या मेमरीत प्रथम संपूर्ण पानाची इमेज (प्रतिमा) प्रथम तयार केली जाते व नंतर संपूर्ण पान आपल्याला छापून मिळते. याचा छपाईचा वेग दर मिनिटास चार पाने ते आठ पाने असा असतो. अलीकडील काळात दर मिनिटास १२ पाने प्रिंट करणारे प्रिंटर्सही बाजारात उपलब्ध आहेत.

३०० Dots per square inch (D.P.I) ते २४०० Dots per square inch (DPI) अशा परिमाणात ठळक छपाई हा प्रिंटर करू शकतो. डॉट मॅट्रिक्स किंवा लाईन प्रिंटर्स या दोन्ही प्रकारच्या प्रिंटर्सपेक्षा या प्रिंटरचा वेग खूपच जास्त असतो.

इंकजेट प्रिंटर । (Inkject Printers)

इंकजेट प्रिंटरमध्ये छापण्याकरता काळ्या रंगाचे कार्टिज असते. यामध्ये रंगीत छपाई करता लाल, निळा, पिवळा या रंगाचे कार्टिज असतात. या प्रिंटरमध्ये प्रोसेसर रंगांचा नियंत्रित मारा करून हवी ती प्रतिमा हव्या त्या रंगात कागदावर छापतो. याचा छपाईचा वेग हा लेझर व

डॉट मॅट्रिक्स प्रिंटरपेक्षा कमी असतो. साधारणपणे मिनिटाला ४ पानांपेक्षा जास्त प्रिंटिंग होत नाही. लेझर प्रिंटर येण्याआधी या रंगीत छपाईसाठी या प्रिंटरचा उपयोग केला जात होता; परंतु तुलनात्मकदृष्ट्या छपाई व देखभालीचा खर्च लेझर प्रिंटरच्या मानाने जास्त आहे. म्हणून याचा वापर कमी झाला आहे.

संगणकाचे फायदे | Advantages of computer

संगणकाचे फायदे खालील प्रमाणे दिलेले आहेत चला तर पाहू यात.

१ ) वेगवान काम करणे – तुम्हाला माहित असेल कि संगणक कोणतेही मोठं काम सेकंदांत करू शकतो.

२ ) माहिती साठवायला सोपा आहे – संगणक हे खूप सगळी माहिती एका जागी ठेऊन साठवता येते, तेही व्यवस्थितपणे आणि पद्धतशीर पाहे करतो.

३ ) जगाशी जोडन्याचे काम करतो – आपण संगणकावर इंटरनेट जोडू शकतो आणि इंटरनेट मुळे जगात कुठेही कुणाशीही संपर्क साधता येतो.

४ ) शिकण्यासाठी अत्यांत उपयोगी आहे – संगणकावर तुम्ही ऑनलाइन क्लासेस, व्हिडीओ मुलाखत, ई-बुक्स, ऑनलाईन क्लास यामुळे शिक्षण सोप्पं झालंय.

५ ) विविध क्षेत्रात मदत करतो – संगणक हा शाळा, ऑफिस, हॉस्पिटल, बँक अशा सगळीकडे उपयोगी पडतो.

संगणकाचे वर्गीकरण | Classification of Computer

संगणकाचे वर्गीकरण हे खालील प्रमाणे केलेले आहे.

सुपर संगणक (Super Computer)

या प्रकारामध्ये संगणक हे मोठ्या संशोधन संस्था, अंतराळ संशोधन, हवामान विभाग मध्ये हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी वापरले जातात. हे जगातील सर्वात वेगवान आणि शक्तिशाली संगणक प्रकारामध्ये मोडते.

मेनफ्रेम संगणक (Mainframe Computer)

यामध्ये एकाच वेळी अनेक वापरकर्ते (user’s) संगणक वापरू शकतात. विमा कंपन्या, बँका, सरकारी संस्था यामध्ये वापरले जातात.

मिनी संगणक (Mini Computer)

हे मेनफ्रेमपेक्षा लहान पण एकाच वेळी अनेक लोक वापरू शकतील असे संगणक असतात.लहान-मोठ्या उद्योगांमध्ये या प्रकारचे संगणक वापरले जातात.

पर्सनल संगणक (Personal Computer – PC)

या प्रकारांमध्ये वैयक्तिक वापरासाठी केलेला असतो.घर, ऑफिस, शाळा, कॉलेज याठिकाणी सामान्यतः वापरला जातो.


अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा


Leave a Comment