
bhakti geet lyrics – भक्ती गीते म्हणजे देवाची आठवण करून देणारी आणि मनाला शांतता देणारी सुंदर गाणी. ही गाणी ऐकली की मन हलकं होतं, विचार सकारात्मक होतात आणि घरातही एक शांत, पवित्र वातावरण तयार होतं. मंदिरात असो, घरी असो किंवा सणांच्या वेळी भक्तीगीते नेहमीच मनाला आनंद देतात.
या गीतांचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सोपी आणि समजायला सोपी भाषा. संगीताचं खास ज्ञान नसले तरीही त्यातील भावना प्रत्येकाला लगेच समजतात. भक्तीगीते आपल्याला देवाजवळ आणतात आणि आपल्याला आपल्या भावना व्यक्त करायला मदत करतात.
गीते लिरिक्स च्या माध्यमातून पाहणार आहोत.
विठ्ठला समचरण तुझें धरिते
विठ्ठला समचरण तुझे धरिते। रूप सांवळे दिव्य आगळे । अंतर्यामी भरते ॥ धृ०॥
नेत्र कमल तव नित फुललेले । प्रेम मददे किती भरले तवगुज गुंजी, घालित रुंजी । मानस भ्रमरी फिरतें ॥१ ॥
अरुणचन्द्र हे जिथे उगवती । प्रसन्न तव त्या अधरावरती होऊन राधा माझी प्रीति । अमृत मंथन करिते ॥ २ ॥
अशी लाडकी नामयाची । गुंफून गाला प्राणफुलांची अपूर्व कंठी मुक्तीसाठीं । जीवरत दासी झुरते ॥३॥
कवि : पी. सावळाराम गायिका : लता मंगेशकर
दत्त दिगंबर दैवत माझे
दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयीं माझ्या नित्य विराजे अनसूयेचे सत्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळें त्रैमूर्ती अवतार मनोहर ! दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे ॥१ ॥
तीन शिरें, कर सहा शोभती, हास्य मधुर शुभ वदनावरती जटाजूट शिरीं पायी खडावा । भस्म विलोपित कांती साजे ॥२॥
पाहूनी प्रेमळ सुंदर मूर्ती, आनंदाचे आंसू झरती सारे सात्विक भाव उमलती । हळुहळु सरते मी पण माझें ॥३॥
कवि : सुधांशु गायक : आर. एन. पराडकर
वेड लागले या राधेला
जो तो सांगे ज्याला त्याला, वेड लागले राधेला ॥ध्रु० ॥
पितांबराची साडी ल्याली, मोरपिसांची करी कांचोळी वेळी अवेळी काजळ काळी, उटी लावते मुखचंद्राला ॥१ ॥
विळखा सुंदर कचश्रेणीचा मुगुट चढविते फुलवेणीचा हार अर्पिती मुक्तामणीचा, मोडित डोळे प्रतिबिंबाला ॥२ ।।
डुंबत अविरत यमुना डोही, राधेचा ती कृष्णा होई मिठी मारते ओलेती हो, शेषशायी भगवंताला ॥३॥
कवि : पी. सावळाराम गायिका : आशा भोसले
या मुरलीने कौतुक केले
या मुरलीने कौतुक केलें गोकुळाला वेड लाविले
वेड लाविलें श्रीकृष्णाला हिजविण क्षणही न सुचे त्याला सतख आपुल्या अधरी धरिले ॥१ ॥
हिच्या मधुर मंजुळ सुरांतून अमरसुरीचे डुलले नंदन यमुनेंचे जल चाल विसरले ॥२॥
अधरमुधा प्राशून हरीची पावन झाली तनु मुरलीची भाग्यवती मी मुरली बोले ॥३॥
कवि : सुधांशु गायक : माणिक वर्मा
दत्त दिगंबर दैवत माझे
दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयीं माझ्या नित्य विराजे अनसूयेचे सत्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळें त्रैमूर्ती अवतार मनोहर ! दीनोद्धारक त्रिभुवनी गाजे ॥१ ॥
तीन शिरें, कर सहा शोभती, हास्य मधुर शुभ वदनावरती जटाजूट शिरीं पायी खडावा । भस्म विलोपित कांती साजे ॥२ ॥
पाहूनी प्रेमळ सुंदर मूर्ती, आनंदाचे आंसू झरती सारे सात्विक भाव उमलती । हळुहळु सरते मी पण माझें ॥३॥
कवि : सुधांशु गायक : आर. एन. पराडकर
Marathi bhakti geet | भक्तीगीते
क्रूर अक्रूरा नकोस नेऊं
क्रूर अक्रूरा नकोस नेऊं आनंदाचा ठेवा, नेऊं नकोस माधवा । खेळगडी तो गोपाळांचा । गिरीधारी रे भक्तजनांचा । तारी गोकुळ कान्हा आमुचा । सर्व सुखाचा अमोल ठेवा कुंजवनी रे रास रंगली । तालावरती टिपरी घुमली । धुंद रात्र रे स्वप्नी उरली । ऐकू दे मज मंजुळ पावा । नकोस नेऊ लाला मुकुंदा । वेडी होईल गौळण राधा । तुला विनविते नंदयशोदा । अक्रूरा नेऊ नको माधवा ।
कवि : योगेश्वर अभ्यंकर गायिका : सौ. सुमन कल्याणपुर
अमृताहुनी गोड नाम
अमृताहुनी गोड नाम तुझे देवा । मन माझें केशवा कां मी ने घे ?
सांग पंढरीराया । काय करूं यासी । कां रूप ध्यानासी न ये तुझे ?
कीर्तनी बसतां निद्रे नागविलें । मन माझें गुंतले विषयसुखा हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति ।
न ये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥१ ॥
गीत : संत नामदेव संगीत: बाळ माटे स्वर: माणिक वर्मा
दळितां कांडितां
दळितां कांडितां तुज गाईन अनंता ॥१ ॥
न विसंबे क्षणभरी । तुझे नाम ग मुरारी ॥२॥
नित्य हाचि कारभार । मुखीं हरि निरंतर ॥३॥
॥४॥ मायबाप बंधुबहिणी । तू बा सखा चक्रपाणी
॥५॥ लक्ष लागलें चरणासी । म्हणे नामयाची दासी
कवयित्री : संत जनाबाई गायिका : आशा भोसले
bhakti geet lyrics – मराठी भक्ती गीते
अशीच अमुची आई असती
अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो बदले छत्रपती ! ॥धृ० ॥
शिवरायाच्या दरबारी त्या, युवती मोहक ती सुभेदाराची सून लाडकी भयकंपीत होती ! शब्द ऐकतां चकीत झाली हरिणीसम ती रती ॥१॥
वसंतातले यौवन होती नयनी मादकता रूप अलौकिक मनमोहक तें कोमल बाहुलता सौंदर्याची प्रतिमा परी ती प्रभू माता मानिती ॥२।।
अलंकार के वस्त्रभूषणें देऊन मानाने परत सासरी पाठविलें तिज शिवभूपालानें ! रायगडाच्या पाषाणांतून शब्द अजून येती… ॥३॥
कवि : मधुकर जोशी गायक : दशरथ पुजारी
विठ्ठला तूं वेंडा कुंभार
फिरत्या चाकावरती देशी । मातीला आकार विठ्ठला तुं वेडा कुंभार ॥धृ०॥
माती, पाणी, उजेड वारा । तूंच मांडसी सर्व पसारा आभाळच मग ये आकारा ॥
तुझ्या घढांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥१ ॥ घडाघडाचें रूप आगळें प्रत्येकाचें दैव वेगळें तुझ्याविना ते कोणा कळे ॥
मुखीं कुणाच्या पडते लोणी, कुणी मुखीं अंगार ॥२ ॥ तूंच घडविसी तूच जोडिसी । कुरवाळीसी तूं तूंच तोडिशी न कळे यांतून काय सांधिसी देसी डोळे परी निर्मिस तयापुढें अंधार ॥३॥
कवि : ग. दि. माडगूळकर गायक : सुधीर फडके
नंदाघरी नंदनवन फुलले
नंदाघरी नंदनवन फुलले, बोल बोबडे श्रीरंगाचे गोकुळांत घुमले ॥ध्रु० ॥
रिंगण घाली शाम सावळा बाळकृष्ण तो रांगत आला हात धरूनि चालू लागला पुढें पुढें ग पाऊल पडले ।। नंदनवन फुलले…. हात चिमुकला उंच नाचवीं छुमछुम बाळा मधुर वाजवी स्वतः हांसुनी जनास हंसवी कौतुक करते गोकुळ सगळें ।॥ नंदनवन फुलले….
कवि : योगेश्वर अभ्यंकर गायिका : सुमन हेमाडी
उठी गोविंदा उठी गोपाळा
उठी गोविंदा, उठी गोपाळा, उषाकाळ झाला हलके हलके उघडे राजिवा, नीळ नेत्र कमला ॥धृ० ॥
तुझ्यापरी बघ जीवन वारा, मिठी मारतो प्राजक्ताला धवल केशरी मूदुल सुमांचा, पाऊस अंगणी झिमझिमला ॥१ ॥
पर्ण पोपटी हिंदोळ्यावर, कंठ फुटतो आनंदाला तुज भोपाळी आळवित सुंदर, चढली गगनी विहंगमाला ॥२॥
गोठ्यामधले मुके लेकरूं, पीत झुरुझुरु कामधेनुला भरला पान्हा किती आवरूं, हांसवी अरुणा तव आईला ॥३॥
कवि : पी. सावळाराम गायिका : आशा भोसले
माती सांगे कुंभाराला
माती सांगे कुंभाराला । पायीं मज तुडविशी तुझाच आहे शेवट वेड्या । माझ्या पायाशी ॥धृ० ॥
मला फिरविसी तूं चाकावर । घट मातीचे बनवी सुंदर लग्न मंडप कधीं असे मी कधीं शवापाशी ॥१ ॥
वीर धुरंधर आले गेले । पायी माझ्या इथे झोपले कुब्जा अथवा मोहक युवती । अंत मजपाशी ॥२ ॥
गर्वाने कां ताठ रहाशी । व्यर्थ कशाला उगा नाचशी तुझ्या ललाटी अखेर लिहिले । मीलन माझ्याशी ॥३॥
कवि : मधुकर जोशी गायक : गोविंद पोवळे
जा सांग लक्ष्मणा राम राजाला
जा सांग लक्ष्मणा राम राजाला
समजला म्हणावे न्याय तुझा सीतेला
अग्नीत घेतली उडी, उजळ ही कुडी पेटविली तेव्हां होतास तूं देवा
केलास न्याय हरी उलटा, ठरवुनी कुलटा, केलीस सफळ मम सेवा शोभेल तुझ्या वंशास, दिगंत यशास चढेल तजेला समजला राघवा न्याय तुझा सीतेला !
जा सांग जानकी अजुनी राही जिवंत जो रघुवंशाचा अंश तिच्या उदरांत तो वरी प्राण कोंडील क्षुद्र देहांत
राणीची भिकारीण आज, होय रघुराज !
तिला संभाळा, समजला राघवा न्याय तुझा सीतेला !
गायक : वसंत बापट गायिका : गीता राय
श्रीहरी गोड तुझी बांसरी
श्रीहरी गोड तुझी बांसरी
दिन रजनी रे फुलवित स्वप्नें, घुमते मम अंतरी ॥ध्रु० ॥
स्वर मुरलीचे पडतां कानीं, वसंत फुलतो वनी उपवनी गुंगत राही त्रिभुवन अवघे, मंजुळ नादावरी ॥१ ॥
तत्र मुरलीच्या ऐकून नादा, हंसते फुलते भोळी राधा सदैव माझ्या मनीं शामला, मूर्ति तुझी हांसरी ॥२ ।।
ये घननीळा राधारमणा, विनवित सदया तुझिया चरणा युगें युगें मी ऐकत राहिन, सख्या तुझी पावरी ॥३॥
कवि : सूर्यकांत खांडेकर गायिका : सौ. निर्मला गोगटे
मुकुंदा रुसू नको इतुका
मुकुंदा रुसू नको इतका विनविते, तुझी तुला राधिका ॥ध्रु०॥
तुझ्या मुरलीला आतुरलेली, गवळ्याची गौळण भोळी ।
तूं माझा मी तुझी सावली, नको रे राग धरूं लटका ॥१॥
खिन्न होऊनी तुझीयासाठीं, नाच थांबला यमुनाकांठीं ।
गोपिनाथ तूं तुझ्याभोवती, जमल्या साऱ्या गोपिका ॥२ ॥
पुन्हां एकदां पहा विचारूनी, तुझे तुला तूं मनापासूनी ।
तूं नाही तर तुझ्यावांचुनी, मंजुळ नाद येईल का ? ॥३॥
कवि : रमेश आणावकर गायिका : लता मंगेशकर
हरि आला ग माझ्या अंगणी
लुटु लुटु धावंत, खुद खुद धावंत……… हरि आला ग माझ्या अंगणी.. . ॥धृ० ॥
रुणझुणतो बाळा, करी लाडिक चाळा नाचे कान्हा ग माझ्या अंगणी…… ॥१ ॥
जाईजुई फुलली, जिवाजी कळी फुलली बघ चिमण्या अधरी कशी ग बाई धरी चिमणी मुरली याला गोजिरवाणी नवलाईची लेणी नंदकिशोर आला ग माझ्या अंगणी….. ।॥२ ॥
बाल मुकुंदा गुणी जणु असे सांजणीमा ब्रह्म सोनुले उमें अंगणी…. हरि आला ग माझ्या अंगणी..
गायिका : सौ. सुमन कल्याणपुर
एकदां दर्शन दे घनश्याम
मधुवंताच्या सुरासुरांतून आळविते मी नांव
एकदां दर्शन दे घनश्याम…… ॥५०॥
नयनी माझ्या गोकुळ बसले यमुनेचे जळ गाली धरले राधेपरी मी सर्व वाहिले
सुखशांतीचे धाम….. एकदां दर्शन दे घनश्याम ॥१ ॥
वसंतांतले सरले कूजन तूझ्याविना हे उदास जीवन शोधित तुजला फिरते वणवण
नाहीं जिवा विश्राम….. एकदां दर्शन दे घनश्याम ॥२ ॥
दासी मीरा ये दाराशी घे गिरीधारी तव हृदयाशी या पायाशीं मथुरा – काशी
तीर्थापरी हे नाम….. एकदां दर्शन दे घनश्याम ॥३॥
गायिका : सौ. सुमन कल्याणपुर
गेला मोहन कुणीकडे
रिमझिम पाऊस पडे सारखा यमुनेलाही पुर चढे पाणीच पाणी चहूंकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे ?
तरूवर भिजले, भिजल्या वेली ओली चिंब राधा झाली नाह चमकून लवता वरती बिजली दबकून माझा ऊर उडे ! गेला मोहन कुणीकडे ?
हांक धांवली कृष्ण म्हणुनी रोखुन धरली दाही दिशानी खुणवितो तुज कर उंचावुनी गुंजत मंजुळ मुग्ध चुडे ! गेला मोहन कुणीकडे ?
जलाशयाच्या लक्ष दर्पणी तुझेंच हंसरे बिंब बघुनी हंसता राधा हिरव्या रानी पावसातही ऊन पडे ! गेला मोहन कुणीकडे ?
कवि : पी. सावळाराम गायिका : आशा भोसले
वाजवी मुरली श्याम सुंदरा
वाजवी मुरली श्याम सुंदरा । तुझ्या मंदिरी नाचे मीरा करि करताळा पायीं घुंघरुं
जन्म तुडविते हा क्षणभंगुर । देह नव्हे हा मोरपिसारा ॥१ ॥
कसले कलियुग । मी द्वापारी गोपवधू मी तूं कंसारी । कालिंदीचा रम्य किनारा ॥२ ॥
गोपीनाथ तूं, मी तर गोपी पुण्यशील तुज, जगास पापी । आलें आलें मी अभिसारा ॥३॥
मिठीत मिटलें, विश्व मुकुंदा मी आणविली ब्रह्मानंदा । तूं मी दोघे अमृतधारा ॥४॥
कवि : ग. दि. माडगूळकर गायिका : आशा भोसले
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा