Mahatma Gandhi Mahiti – नमस्कार मित्रांनो आपण पाहणार आहोत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती. चला तर मग आपण विलंब न लावता माहिती पाहुयात.
महात्मा गांधी यांचा जन्म । Birth of Mahatma Gandhi

महात्मा गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ ऑक्टोबर १८६९ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्म झाला. त्यांचे खरे नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.
पुढे ते महात्मा गांधी म्हणून ओळखले जाऊ लागले.लहानपणापासूनच महात्मा गांधीजी स्वाभिमानी, हुशार आणि भाविक मनाचे होते. पण लहानपणी ते लाजाळू स्वभावाचे होते. त्यांचे वडील करमचंद यांना सर्व लोक कबा असे म्हणत. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई असे होते.
लहानपणापासून महात्मा गांधीजींवर घरातले सात्त्विक आणि सोज्वळ संस्कार आपोआप होत होते.गांधीजींचे वडील आपल्या मुलांची फारच काळजी घेत असत. त्यांनी चांगले शिकावे-सावरावे आणि मोठे व्हावे, असे त्यांना फार वाटत असे.
बालपणातले गांधीजी । Gandhiji in his childhood
त्यांच्या कुटुंबामध्ये महात्मा गांधीजी हे सर्वांत लहान होते. हुशार असले तरी महात्मा गांधीजी अभ्यासाकडे लक्ष देत नसत. परंतु वडिलांबरोबर मंदिरात जाण्याची त्यांना खूप आवड होती. तेथे भजन-कीर्तन चाललेले असायचे. तर एका बाजूला एकजण स्वातंत्र्याची गाणी म्हणायचा. ती गाणी मात्र महात्मा गांधीजी mahatma gandhi एकाग्र चित्ताने ऐकायचे.
असे दिवस जात होते. आता महात्मा गांधीजी सात वर्षांचे झाले होते. वडिलांनी त्यांना शाळेत घालायचे ठरविले आणि मग महात्मा गांधीजी वडिलांबरोबर राहून राजकोटच्या शाळेत दाखल झाले. पण लहानपणी महात्मा गांधीजी होते थोडे संकोची. त्यामुळे मुलांच्यात मिसळायला ते घाबरायचे. खूप अभ्यास करून ते प्रत्येक वर्षी पास होत होते.
गांधीजी इंग्लंडला गेले । Gandhiji went to England
Mahatma Gandhi Mahiti महात्मा गांधीजी मॅट्रिकची परीक्षा पास झाले. सर्वांच्या विचाराने त्यांनी वकिलीचे शिक्षण घ्यावे असे ठरवले. वडिलांच्या मित्राच्या मदतीने महात्मा गांधीजी इंग्लंडला गेले.परंतु गांधीजींना इंग्लंडला पाठवायला त्यांची आई आधी तयार नव्हती.पण त्यांनी आईची समजूत काढली.
म्हणाले, मी इंग्लंडला गेलो तरी चांगले वागेन. सर्वांची आठवण ठेवेन. शेवटी आईने परवानगी दिली. मोठ्या भावाने पैशाची मदत करण्याचे ठरविले.इंग्लंडचे वातावरण एकदम वेगळे होते.सुरुवातीला त्यांना जरा कठीण वाटले, पण हळूहळू त्यांनी तिथल्या रीतीरिवाजांशी जुळवून घेतले.
आपल्याला कोणी बुरसटलेल्या विचारसरणीचे म्हणू नये म्हणून ते इंग्रजांसारखा पोशाख करू लागले. मजेत राहू लागले.मोठे भाऊ इकडे बचत करून साठलेले पैसे महात्मा गांधीजींना शिक्षणासाठी पाठवीत होते आणि महात्मा गांधीजी तिकडे पैसे कसेही खर्च करीत होते.
मायदेशी आगमन । Return to the motherland
एके दिवशी महात्मा गांधीजींना आपली चूक कळून आली. ते भानावर आले. खर्च कमी केला. मजेचे जीवन सोडले. हॉटेलमध्ये न जेवता एक लहान खोली घेऊन, हाताने जेवण बनवू लागले. मनापासून अभ्यास करू लागले. उरलेल्या वेळात धर्मग्रंथांचा अभ्यास करू लागले.
त्यामुळे त्यांचे मन शांत झाले. जीवनाचा रस्ता सापडला. शेवटी बॅरिस्टर झाले आणि मायदेशी भारतात परतले. बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी म्हणून ते मुंबई बंदरात बोटीतून उतरले.
पण हे सुख बघायला त्यांची आई जिवंत नव्हती. गांधीजी दुःखी झाले. काही दिवस ते घरी राहिले. भारतीय कायद्याचा अभ्यास करावा असे वाटल्याने ते मुंबईला आले.
गांधीजी आफ्रिकेला गेले । Gandhiji went to Africa
आता त्यांना लोक गांधीजी म्हणू लागले. इंग्रज लोक खूप सभ्य आहेत म्हणून गांधीजी त्यांच्याकडे आदराने पाहत; पण इकडे आफ्रिकेत येताच त्यांचा भ्रमनिरास झाला.
येथपासून गांधीजींची इंग्रज लोकांकडे पाहाण्याची दृष्टी बदलली. गांधीजी ज्यांच्या कामासाठी आले होते, त्यांचे नाव अब्दुल्ला. त्यांच्याकडेच ते राहिले होते.पण तेथे सर्वच हिंदी लोकांचा गोरे इंग्रज अपमान करतात, हे गांधीजींना दिसले आणि मग गांधीजींना गोऱ्यांबद्दल राग वाटू लागला.
गांधीजींनी अब्दुल्लाजवळ चौकशी केली तेव्हा कळले की, हिंदी लोकांना येथे ‘हमाल’ म्हणून वागविण्यात येते. ते ऐकून गांधीजींना खूप वाईट वाटले. आता गप्प बसून चालणार नाही.
प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे, असे गांधीजींना वाटू लागले. भिऊन राहिलो तर आपली प्रगती होणार नाही. म्हणून त्यांनी वृत्तपत्रात तक्रार नोंदविली. त्यामुळे गोरे लोक खूप चिडले पण हिंदी लोकांना मात्र खूप आनंद झाला. कितीतरी हिंदी लोक गांधीजींच्या मदतीला पुढे धावले.
गांधीजी महात्मा झाले । Gandhiji became the Mahatma
माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे या तत्त्वाने गांधीजी वागू लागले. म्हणून लोक त्यांना आता महात्माजी, असे म्हणू लागले.
वैष्णव जन तो तेने कहिए।
जे पीड पराई जाने रे ।।
हे गांधीजींचे आवडते भजन. या वचनाप्रमाणे अनेक हाल-अपेष्टा सोशीत ते आफ्रिकेतच राहिले. गोऱ्यांच्या अनेक तक्रारी हिंदी लोक त्यांच्याकडे आणीत. हिंदूंना मिळणारी अपमानाची वागणूक, त्यांचे होणारे हाल पाहून, गांधीजींना फार यातना व्हायच्या. दुःखाने त्यांना झोप येत नसे.
प्रामाणिकपणा आणि सत्य ही तत्त्वे गांधीजींनी वकिलीतही जपली. अनेक खटल्यांचा अभ्यास करून त्यात तडजोड घडवून आणली.त्यांनी स्वार्थासाठीही कधी अन्याय सहन केला नाही. ते नेहमी न्यायाची बाजू उचलून धरीत. अशा प्रकारे गांधीजी आपल्या कार्यात यशस्वी झाले.
दांडीयात्रा । Dandi March
मागण्या इंग्रजांनी गांधीजींच्या धुडकावल्यानंतर ते विचार करू लागले, तेव्हा त्यांना एक नवाच मार्ग सापडला.मीठ ही तशी लहानशी वस्तू, परंतु त्यावरसुद्धा कर होता. आपण मिठासाठी सत्याग्रह करायचा. कायदा धुडकावून मीठ तयार करायचे.
आणि मीठ स्वातंत्र्याचे प्रतीक बनले. मिठासाठी ठिकठिकाणी कायदेभंग करण्यात येईल, असे कळविण्यात आले. गांधीजी गुजरातमधील दांडी येथे जाऊन कायदेभंग करणार होते.शंभर सत्याग्रहींना घेऊन १२ मार्च १९३० च्या सकाळी गांधीजींनी साबरमती आश्रमातून पदयात्रेला सुरुवात केली.
गावा-गावातून पदयात्रा जाऊ लागली तसे शेकडो लोक त्यात सामील होऊ लागले. गरिब-श्रीमंत, विद्यार्थी, वकील, मजूर, शेतकरी असे अनेकजण पदयात्रेत चालू लागले.यात्रा दांडीला आली. समुद्रकिनाऱ्यावर उभे राहात गांधीजी कडाडले हे पहा, मी साम्राज्यशाही नष्ट करीत आहे. त्यांनी मिठाचा खडा हातात घेतला, तेव्हा सर्व सत्याग्रहींनी त्यांचे अनुकरण केले.
गांधीजी म्हणाले, कोणी पोलिसांना घाबरू नका. मीठ खाली टाकू नका. मुठीतील मीठ त्यांनाच घ्यायला लावा.शेवटी पोलिसांनी लाठीहल्ला केला. अनेकांच्या मुठी रक्तबंबाळ झाल्या. तरीही कोणी मागे हटले नाही.
गरीब लोकांची मोठी शक्ती गांधीजींनी उभी केली. देशभर सत्याग्रह करण्यात आला. कायदेभंगामुळे सरकार चिडले. अनेक ठिकाणी लाठीमार झाला. सत्याग्रहींनी आनंदाने लाठीमार सहन केला.
गांधीजींबरोबर अनेकांना अटकेत टाकले. गांधीजींना अटक झालेली समजताच जनता खवळून उठली. गांधीजींच्या या नव्या शस्त्राची किमया पाहून जग चकित झाले.
चले जाव चा लढा
वेळ वाया घालवणे गांधीजींना खपत नसे. त्यांची प्रार्थनेची वेळ ठरलेली होती. पाच मिनिटे उशीर झालेला त्यांना आवडत नसे.साधी राहाणी आणि उच्च विचारसरणी या तत्त्वाचे गांधीजी तंतोतंत पालन करीत. स्नानासाठी साबण न वापरता ते दगडाने अंग घासायचे.
सत्य आणि अहिंसा यावर त्यांची असीम श्रद्धा होती. ते म्हणायचे, सत्य हाच धर्म, सत्य हे ईश्वराचे रूप होय. मी ईश्वर पाहिला नाही पण त्याच्या शोधात आहे. जे मला सत्य आहे असे वाटते, त्याचे मी पालन करतो. सत्याचा मार्ग
काट्याकुट्यातून जाणारा कठीण वाटत असला तरी तो सोपाही आहे.अहिंसा म्हणजे सत्यच आहे. सत्त्याला अहिंसेचा आधार नसला तर ते सत्य नव्हे. देवावर विश्वास ठेवा. शेजारधर्माचे पालन करा. जास्त लोभ धरू नका. भीती सोडा आणि शूर बना.
या सर्व गोष्टींचे पालन केल्याने गांधीजी थोरपदी पोहोचले. कितीही प्रयत्न केले तरी इंग्रज लोक स्वातंत्र्याच्या मागण्या मान्य करत नव्हते. खूप विचार केल्यावर त्यांनी स्वातंत्र्यासाठी अखेर मोठे आंदोलन छेडायचे ठरविले.
ते म्हणाले, अहिंसेत जर खरी शक्ती असेल, तर ती आता प्रकट होईल. काँग्रेसच्या बैठकीत गांधींजींनी, इंग्रजांनी भारत सोडून जावे म्हणून ‘चले जाव‘ चा ठराव पास करून घेतला.त्यामुळे इंग्रजांनी पुन्हा सर्व काँग्रेस नेत्यांना अटकेत टाकले. गांधीजींना अटक करून पुण्यातील ‘आगाखान पॅलेस’ येथे स्थानबद्ध करण्यात आले.
इंग्रज सरकार चवताळले होते. जनता दुःखात होती. सर्व उपाय संपल्यावर ‘उपवासाचे’ शस्त्र उपसले. गांधीजींनी उपोषणाला सुरुवात केली त्यामुळे जनता काळजीत पडली. गांधीजींच्या वयाला उपास सोसण्यासारखे नव्हते.
गांधीजींची प्रकृती हळूहळू कमजोर होऊ लागली. गांधीजी एकवीस दिवस उपवास करणार होते. त्यांची प्रकृती इतकी खालावली, की डॉक्टर मंडळी चिंतेत पडली.परंतु गांधीजीच्या मागे सत्याचे पाठबळ होते. ईश्वर त्यांचा पाठीराखा होता. या कठीण प्रसंगातून ते वाचले आणि जनतेने ईश्वराचे आभार मानीत सुस्कारा सोडला.
अखेर भारत स्वतंत्र झाला । At last, India became independent
याच काळात गांधीजींना दुःख देणाऱ्या दोन घटना घडल्या. गेली २५ वर्षे त्यांचे साथीदार असलेले, सावलीसारखे त्यांच्या पाठीशी असलेले महादेवभाई देसाई यांचे निधन झाले.
त्याच सुमारास सावलीसारख्या त्यांच्या पाठीशी असलेल्या त्यांच्या पत्नी कस्तुरबांनी त्यांच्याच मांडीवर देह ठेवला. बासष्ट वर्षे गांधीजींना मोलाची साथ देऊन कस्तुरबा गेल्या.गांधीजींची प्रकृतीही वरच्यावर बिघडू लागली. तुरुंगातून सुटताच ते पुण्यालाच राहू लागले. तिथे त्यांनी सायंकाळची प्रार्थना चालू केली.
अखेर गांधीजींच्या चळवळीला यश येण्याची चिन्हे दिसू लागली. भारताला स्वातंत्र्य देण्याचे ठरले आणि अखेर १५ ऑगस्ट १९४७ ला आपला भारत स्वतंत्र झाला.भारताचा तिरंगा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर डौलाने फडकू लागला.
हरे राम म्हणत देह ठेवला
भारत स्वतंत्र झाला म्हणून आनंद झाला, तरी तितकेच दुःख झाले होते. त्याचे दोन तुकडे पडून पाकिस्तान निर्माण झाले होते, याचे गांधीजींना खूप दुःख झाले. माणसा-माणसातील भेद त्यांना मान्य नव्हता. म्हणून त्यांनी सामाजिक एकी घडवण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे काही भडक माथ्याच्या लोकांचा गैरसमज झाला. गांधीजी ठराविक लोकांची बाजू घेतात, असे त्यांना वाटले.
अशा विचाराच्या कोणीतरी एकदा गांधीजींवर प्रार्थनेच्यावेळी बाँब फेकण्याचा प्रयत्न केला. परंतु नेम चुकल्याने गांधीजी बचावले. तरीही गांधीजींनी त्यांना क्षमा केली.
गांधीजी ३० जानेवारी १९४८ या दिवशी सायंकाळच्या प्रार्थनेला निघाले. इतक्यात एकजण पुढे झाला आणि त्याने गांधीजींना खाली वाकून वंदन केले आणि झटक्यात त्यांच्यावर हातातले पिस्तूल झाडले. आणि हरे राम असे म्हणत गांधीजींनी देह ठेवला. ते अनंतात विलीन झाले.
गांधीजींचे थोर विचार
गांधीजी अनंतात विलीन झाले. मरावे परी कीर्तीरूपे उरावे असे म्हटले जाते. गांधीजी आपल्यातून देहाने गेले, तरी त्यांनी केलेले कार्य जनतेच्या कायमचे स्मरणात राहिले.
गांधीजींची कीर्ती जगभर पसरली. लोक त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणून संबोधू लागले. काही लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणूनही संबोधू लागले.
सत्य आणि अहिंसा हंसा या गांधीजींच्या तत्त्वांनी जग आश्चर्यचकित झाले. सत्याग्रह आणि सविनय कायदेभंग या तत्त्वांचा, त्यांनी शस्त्रासारखा उपयोग केला. जे शस्त्राने साध्य होत नाही ते गांधीजींच्या तत्त्वांनी साध्य झाले.
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा