Chandubhai Virani Networth | Balaji Wafers Success Story |Balaji Wafers Networth

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now


 
 
• चंदूभाई विराणी यांचा जन्म जामनगरच्या कलावाड तालुक्यातल्या धनुधोराजी गावामध्ये झाला. त्यांचे वडील पोपटभाई हे शेतकरी होते पावसाच्या कमतरतेमुळे शेती करण्यासाठी खूप अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी शेती विकली व आलेले पैसे मुलांना वाटून तुम्ही काहीतरी व्यवसाय करा असं सांगितलं.
 
चंदूभाईंचे मोठे बंधू यांनी फर्टीलायझर्स अँड फार्मिंग इक्विपमेंट चा व्यवसाय टाकला. परंतु दुर्दैवाने त्या व्यवसायात त्यांना यश आलं नाही आणि दोन वर्षातच त्यांना तो व्यवसाय बंद करावा लागला. 
 

Balaji Wafers Success Story 

 
 • त्यानंतर विराणी बंधू राजकोटला गेले आणि तिथे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग अँड लोडिंग मेस चा व्यवसाय सुरू केला. 
“गुजराती माणसाची ओळखच त्याचा धंदा असते”
परंतु नियतीच्या मनामध्ये दुसरच काहीतरी होतं दुर्दैवाने या व्यवसायामध्ये सुद्धा त्यांना यश मिळालं नाही. 
 
त्यावेळेस चंदूभाईंचे वय 17 वर्षे होते घरातील आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले. 1974 मध्ये आपल्या भावांना मदत करण्यासाठी म्हणून ते राजकोटला आले. राजकोट मध्ये ASTRON CINEMA नावाचं एक सिनेमा घर होतं. चंदू भाई ने तेथील कॅन्टीन मध्ये काम करण्यास सुरुवात केली.
 
• कॅन्टीन मध्ये काम करत असताना तेथील दुसरे अनेक काम पण करत होते. जसे साफसफाई करणे, तिकीट काउंटर वरती बसणे, वॉचमेन असे बरेच काम ते करत होते. 
 
ASTRON CINEMA चे मालक चंदूभाईंचे काम पाहून त्यांच्यावरती खूप खुश असायचे.
 
1976 मध्ये चंदूभाईंना सिनेमा घरातील कॅन्टीन ठेकेदारी वरती चालवण्याची संधी मिळाली. विराणी बंधूंनी या मिळालेल्या संधीचे रूपांतर सोन्यामध्ये केलं. कॅन्टीन मध्ये ते चिप्स,कोल्ड्रिंक्स,नमकीन, सँडविच अशा खाद्यपदार्थांच्या वस्तू विकू लागले. काम सुरळीत चालू होतं.
 
चंदूभाई आपल्या भावांना व्यवसायात मदत करत असत. कॅन्टीन मध्ये सर्वात जास्त चिप्स विकले जायचे. म्हणून चंदूभाईं आणि त्यांचे बंधू चिप्स च्या माध्यमातून अधिक पैसा कसा कमवायचा याबद्दल विचार करत असायचे. त्यावेळी ते चिप्स खुले विकत असत. मग त्यांनी होलसेल मध्ये चिप्स घेऊन पॅकेटमध्ये पॅक करून विकू लागले. आणि त्यांना यामधून अधिकचे पैसे मिळू लागले. 
 
• परंतु काही काळानंतर त्यांना यामध्ये विविध समस्या येऊ लागल्या. जसे Supply, Breakage, Quality याचा दर्जा खूप ढासळत होता. 
 
– या समस्यांवरती उपाय म्हणून त्यांनी 1981 मध्ये आपल्या भावांसोबत चर्चा करून घरीच चिप्स करण्यास सुरुवात केली. आणि इथून सुरू झाला बालाजी वेफर्स चा प्रवास. 
 


 

∆ बालाजी नाव ठेवण्या मागचं कारण ? 
 
विराणी ज्या कॅन्टीनमध्ये व्यवसाय करत होते त्याच्या समोर एक छोटसं बालाजी मंदिर होतं, त्यामुळे या गोष्टीकडे आकर्षित होऊन त्यांनी बालाजी हे नाव ठेवलं. 
 
• त्यांनी सुरू केलेल्या चिप्सची चव चाखून ग्राहकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. मग चंदूभाईंनी व्यवसायामध्ये वाढ करण्याचे ठरवले. 
 
• 1984 मध्ये चंदूभाईंनी चिप्स विक्री कॅन्टीन मध्येच न करता दुकानांमध्ये सुद्धा विकण्यास सुरुवात केली. दुचाकी वरून ते दुकानात चिप्स सप्लाय करू लागले. 
 
 
– सुरुवातीपासूनच चंदूभाईंनी चिप्सच्या गुणवत्तेमध्ये काटेकोरपणे लक्ष दिलं होतं. 
– प्रत्येक गोष्ट अगदी लहानातल्या लहान बाबींचा विचार केलेला होता. 
– बालाजी वेफर्स हे क्रिस्पी आणि टेस्टी असल्यामुळे सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात ग्राहक याकडे आकर्षित झाले. ग्राहकांच्या पसंतीस येऊ लागल्याने दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात मागणी येऊ लागली. 
– ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळे पदार्थ विकू लागले.
अनेक कॅटेगरी उपलब्ध करून दिल्या.
– प्रत्येक ठिकाणाच्या चवीला प्राधान्य दिले
– बघता बघता 1995 ला बालाजी वेफर्स हे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आणि गुजरात मध्ये भव्य असं कंपनीची उभारणी केली. 
 
“सातत्य आणि मेहनतीच्या जोरावर” बालाजी वेफर्स 2014 पर्यंत गुजरात मधील सर्वात मोठी कंपनी बनली. त्यावेळेस त्यांना अनेक कंपन्यांच्या ऑफर्स येऊ लागले पण त्यांनी नकार दिला. 
 
∆ प्रसिद्ध असलेल्या Lays कंपनीकडून कारवाईची नोटीस : 
 
या क्षेत्रामध्ये नामांकित असणाऱ्या Lays कंपनीने बालाजी वेफर्स वरती कोर्टामध्ये तक्रार दाखल केली की ” Lays कंपनीचे डिझाईन चोरली गेली “
 
• हायकोर्टाकडून Lays च्या बाजूने निकाल लागला चंदूभाई ने 2018 ला बालाजी वेफर्सला नवीन रूप दिले.
– सर्वांना वाटलं आता बालाजी वेफर्स संपुष्टात येईल
 
•परंतू त्यानंतर बालाजी वेफर्स ची यशाकडे खरी वाटचाल सुरू झाली. प्रत्येक वर्षी 20 टक्के ते 25 टक्के ची वाढ व्यवसायामध्ये झाली. 
 

 

∆ Chandubhai Virani Networth : 

• सन 2022 मध्ये कंपनीने 4034 करोड रुपयांचा व्यवसाय केला.
तसेच 
• सन 2023 मध्ये 5000 करोड रुपयांचा व्यवसाय केला. 
 

∆ वेफर्स चे विविध प्रकार : 

 


 

• CRUMCHEM 
1. Simply Salted 
2. Masala Masti 
3. Tomato Twist 
4. Chat Chaska
5. Cream and Onion
6. Peri Peri Wafers 
7. Pizza Masala 
 
• CRUNCHEX
1. Simply Salted 
2. Chilli Tadka
3. Mirch Masala
4. Chilli Lemon 
 
• RUMBLES
1.Pudina Twist 
 
फराळी चिवडा, पापडी गाठीया , कुरकुरे, शेंगा भुजिया, फरसाण, मिक्स चिवडा असे अनेक पदार्थ बालाजी वेफर्स आज मार्केटमध्ये विकतो.
 
 
 
 

अशाच प्रकारच्या आणखी पोस्ट वाचा



1 thought on “Chandubhai Virani Networth | Balaji Wafers Success Story |Balaji Wafers Networth”

Leave a Comment