Walmik Karad Biography | Santosh Deshmukh Murder |Beed NCP Leader

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

Walmik Karad Biography

वाल्मीक कराड मागचे काही दिवस झालं महाराष्ट्रामध्ये हे नाव खूप चर्चेत आहे. माजी मंत्री आणि सध्याचे आमदार असलेले धनंजय मुंडे त्यांचा उजवा हात म्हणून वाल्मीक कराड यांची संपूर्ण महाराष्ट्राभर ओळख आहे. त्यांच्यावरती आता पवन चक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडणी प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
• कोण आहेत वाल्मीक कराड ?
• बीडमध्ये त्यांची दहशत कशामुळे ?
• कोणाचा राजकीय वरदहस्त त्यांच्यावरती आहे ?
• बीड जिल्ह्यात जातीय राजकारण कोणत्या टोकाला जाईल ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखामध्ये मिळतील त्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

• कोण आहे वाल्मीक कराड ?
वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे एक पदाधिकारी आहेत ते परळी विधानसभा मतदारसंघातील सध्याचे आमदार धनंजय मुंडे यांचे जवळचे निकटवर्ती देखील आहेत. परळी मध्ये धनंजय मुंडे यांची सर्व कामे तेच पाहतात. धनंजय मुंडेंची सावली म्हणून वाल्मीक कराड यांना ओळखलं जातं.

Walmik Karad Biography

वाल्मीक अण्णा या नावाने बीडमध्ये त्यांना ओळखल जात 

बिडच राजकारण सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी राहील आहे.
तालुक्यातील राजकीय किंवा सामाजिक प्रश्न हे प्रथम वाल्मीक कराड यांच्यामार्फत सोडवले जातात. एकंदरीत पाहता धनुभाऊच अर्ध काम या वाल्मीक कराडच करतात.

धनंजय मुंडेंच्या 2019 तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी ही देखील वाल्मीक कराड यांच्या खांद्यावरती होती. परळीचे सर्व राजकीय समीकरण हे वाल्मीक कराडे यांच्या मार्फतच हलवले जातात.

वाल्मीक कराड यांचा जन्म का गरीब कुटुंबामध्ये झाला. शालेय शिक्षण घेत असताना त्यांना भाजपाचे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे खूप आकर्षण होते. साहेबांचे विचार आणि त्यांचे राजकीय व्यक्तिमत्व वाल्मीक यांना सुरुवातीपासूनच आवडायचे. मुंडे यांच्या घरची सर्व कामे कराड हे करत असायचे.

पंडित अण्णा मुंडे यांनी वाल्मीक कराड यांना पहिल्यांदा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरवलं . त्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून येत वाल्मिक कराड यांनी अण्णांचा विश्वास जिंकला. पुढे जाऊन ते नगर परिषदेमध्ये उपाध्यक्ष देखील झाले.

पुढे मुंडेंच्या घरामध्ये फूट पडल्यानंतर वाल्मीक कराड धनंजय मुंडे सोबत राहिले. तेव्हापासून ते आज पर्यंत धनंजय मुंडेंसोबत अगदी सावली सारखे उभे राहिले. वाल्मिक कराड यांनी मॅनेजमेंट काय असते हे चांगलेच दाखवून दिले. धनंजय मुंडे यांचे सर्व राजकीय कार्यक्रम हे वाल्मिकी कराड यांच्यामार्फतच नियोजित केले जाते.

गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवणं आणि त्यांच्या समस्येचे निराकरण करणे असे भरपूर काम आहे वाल्मिक कराड यांच्यामार्फत केली जातात असे जनतेचे मत आहे.
पण नाण्याला जशा दोन बाजू असतात त्या प्रकारेच भरपूर लोकांकडूनही देखील वाल्मिक कराड हे जिल्ह्यामध्ये दहशत पसरवत आहेत अशा चर्चा चालू आहेत.


बीडचा बिहार होतोय का असा प्रश्न निर्माण झाला आहे मागच्या काही दिवसांमध्ये अपहरण करून मारहाण करून खंडणी मागणे अशा प्रकारच्या तक्रारी समोर येत आहेत.


Beed Political Connections

बीडमध्ये कोणतेही गोष्ट घडली की त्याला वाल्मीक कराडच जबाबदार आहेत अशी चर्चा दबक्या आवाजामध्ये लोकांमध्ये होत आहे. मरळवाडी चे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाल्यानंतर त्या मागचे मास्टर माईंड वाल्मीक कराडच आहेत असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले. त्यासोबतच परळी मधील होत असलेले अवैध धंदे हे वाल्मीक कराड यांच्यामार्फत चालवले जाते अशी देखील त्यांच्यावरती टीका करण्यात आली.

• सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मीक कराडवर संशय ?
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अमानुषपणे मारहाण केल्यानंतर त्यांची निर्घुण हत्या करण्यात आले. त्यामागे देखील वाल्मीक कराड यांचा हात आहे असे बीडचे सध्याचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट भाषेमध्ये वाल्मीक कराड यांच्यावरती निशाणा साधला आहे.

Santosh Deshmukh Murder

• काय आहे मस्साजोग प्रकरण ?
मस्साजोग गावामध्ये पवनचक्की चे प्रकल्प चालू आहेत आणि तेथे त्यांचे ऑफिस देखील आहेत. त्या ऑफिसमध्ये सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि टाकळी गावातील काही नागरिक आले होते.
काही शाब्दिक बाचा बाची नंतर वाद वाढत गेला आणि तेथील वॉचमन असलेल्या सोनवणे याला मारहाण करण्यात आली. सोनवणे हा मस्साजोग गावचा रहिवासी. त्यानंतर त्या प्रकल्पासाठी सरपंच देशमुख यांनी प्रयत्न केले होते त्यामुळे त्यांनी तेथे मध्यस्थी केली.
त्यानंतर दोन्ही गावातील तरुणांमध्ये मारामारी झाली आणि पवनचक्की प्रकल्पाचे मॅनेजर यांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आणि काही दिवसातच आरोपींना जामीन देखील मिळाला त्यामुळे हे प्रकरण इथेच थांबलं असं सर्वांना वाटलं पण खरा खेळ चालू झाला तो इथूनच.

मस्साजोग आणि टाकळी येथील तरुणांचा मारामारीचा व्हिडिओ हा वायरल झाला आणि त्यानंतर टाकळी गावच्या तरुणांमध्ये बदल्याची भावना निर्माण झाली. संतोष देशमुख यांनी केलेल्या मध्यस्थीचा राग संतोष घुले आणि काही जणांच्या मनामध्ये होता त्या रागातूनच का खून झाल्याचे बोलले जाते.
प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरती आणि पोलिसांना मिळालेल्या पुराव्यावरती आतापर्यंत संतोष घुले, प्रतीक घुले, महेश केदार या तीन आरोपींना अटक केली आहे आणि बाकीचे तीन आरोपी हे फरार आहेत पोलिसांचा पाठलाग चालूच आहे.

Dhananjay Munde’s Right Hand

• काय आहे खंडणी प्रकरण ?
फक्त केज तालुक्यात नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये विविध कंपन्यांना खंडणीसाठी धमकावले जात आहे अशा तक्रारी येत आहेत. मस्साजोग येथील अवादा पवनचक्की प्रकल्पाचे अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड, विष्णू चाटे, आणि सुदर्शन घुले यांच्यावरती खंडणीसाठी धमकी दिल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली.

• बीडमध्ये जातीय रंग दाखवला जातोय का ?
मागील एक-दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आंदोलन सुरू होते. तेव्हापासूनच त्यांचा रोख पंकजा मुंडे,धनंजय मुंडे यांच्या वरती सुरुवातीपासूनच राहिला आहे.
बीड मधील काही गावांमध्ये मंदिरांमध्ये शपथ घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता.
हे जातीय राजकारण महाराष्ट्राच्या विकासाला रोखण्याचं काम करत आहे तसेच समाजामध्ये एक वाईट विचार पेरण्याचं मोठं काम राजकीय नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात चालू आहे कुठेतरी हे थांबलं पाहिजे.

Beed Politics

राजकीय स्वार्थासाठी समाजामध्ये भांडण लावण्याचे काम हे राजकारण्यांकडून गेल्या कित्येक वर्षांपासून चालू आहे. स्वतःची वोट बँक सांभाळण्यासाठी हे समीकरण जुळवावी लागतात त्यासाठी कोणतीही गोष्ट पणाला लावली जाते.

संतोष देशमुख हत्या प्रकरण कोणत नवीन वळण घेईल काही दिवसातच कळेल .


अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी क्लिक करा


1 thought on “Walmik Karad Biography | Santosh Deshmukh Murder |Beed NCP Leader”

Leave a Comment