Vicky Kaushal Biography|Chhaava Movie | Vicky Kaushal Networth,Wife Family

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

Vicky Kaushal Biography

बॉलीवुड मधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेला अभिनेता म्हणजे विकी कौशल . त्याचा बहुचर्चित असणारा आगामी चित्रपट छावा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती हा चित्रपट असणार आहे त्यामुळे या ऐतिहासिक भूमिकेमध्ये विकीला पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

विकीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती आपण आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत हा लेख वाचा.

विकी कौशल चा जन्म 16 मे 1988 ला मुंबई,महाराष्ट्र येथे झाला. विकी च लहानपण हे मुंबईमध्येच झालं. येथेच त्याचं बालपणीचे शिक्षण तसेच महाविद्यालयीन शिक्षण देखील पूर्ण झालं.

मुंबईतल्या सेठ Chunnilal Damodardas Barfivala Highschool येथे त्याच शालेय शिक्षण झालं. त्यानंतर त्याने Rajiv Gandhi Institute Of Technology येथून Electronics and Telecommunication मध्ये पदवी प्राप्त केली.

Vicky Kaushal Biography

शाळेत असतानाही विकीला अभिनयाची खूप आवड होती.शाळेमध्ये जेव्हा वार्षिक स्नेहसंमेलन व्हायचे तेव्हा तो सहभाग घेत असायचा. नृत्य असेल किंवा वेगवेगळे स्किटस त्याला ते करायला आवडतं असायचे. आणि मग इथूनच त्याला अभिनेता क्षेत्राकडे जाण्याची आवड निर्माण झाली.

Vicky Kaushal Networth,Wife Family

त्यावेळेस विकीचे वडील मुंबई फिल्म सिटी मध्ये स्टंटमॅन चे काम करत होते. घरची आर्थिक परिस्थिती तेवढी काही बरी नव्हती. त्यामुळे कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विकी जॉब करू लागला. पण त्यामध्ये त्याच काही मन रमेना .

काही काळानंतर त्याने खूप जॉब सोडला आणि पूर्ण वेळ हे अभिनय क्षेत्राकडे देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने नसरुद्दीन शहा यांच्या थेटर मध्ये काम करण्यास सुरुवात केली.

आपल्या अभिनयातून प्रेक्षकावर्ती चांगली छाप पडावी व अभिनयात सुधारणा होण्यासाठी त्यानंतर विकी किशोर नमित कपूर एक्टिंग इन्स्टिट्यूट मध्ये जाऊ लागला.

Vicky Kaushal Family

नाव : विकी शाम कौशल
जन्म:16 मे 1988
जन्मस्थळ :मुंबई, महाराष्ट्र
शाळा :Chunnilal Damodardas Barfivala Highschool, Mumbai
कॉलेज :Rajiv Gandhi Institute Of Technology,Mumbai
शिक्षण :पदवी
राष्ट्रीयत्व :भारतीय
वडील :श्याम कौशल
आई :विना कौशल
भाऊ :सनी कौशल
पत्नी :कतरीना कैफ कौशल
संपत्ती :80 करोड

बॉलीवुड मध्ये झाले पहिले पदार्पण :


2012 : मध्ये Luv Shuv Tye Chicken Khurana या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकले. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस आला आणि त्यानंतर विकीला वेगवेगळ्या चित्रपटांसाठी ऑफर्स येऊ लागल्या.

2015 : मध्ये प्रसिद्ध झालेला Masaan हा चित्रपट विकीच्या बॉलीवूड मधील करिअर साठी सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला.
या चित्रपटांमध्ये विकी प्रमुख भूमिकेत दिसून आला. आणि त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला.
स्वतःची एक वेगळी ओळख विकीने बॉलीवूडमध्ये तयार केली.

2016 : मध्ये विकिने रमण राघव 2.O या चित्रपटामध्ये काम केलं.

2018 : मध्ये अभिनेत्री आलिया भट सोबत विकीने Razi चित्रपट केला आणि तो ब्लॉकबस्टर झाला. त्याच वर्षी Sanju आणि मन मर्झिया या चित्रपटामध्ये तो दिसून आला.

vicky kaushal biography

2019 : मध्ये मोठ्या प्रमाणात ज्या चित्रपटाने कमाई केली तो म्हणजे Uri : The Surgical Strike या चित्रपटामध्ये विकी चा अभिनय हा त्याच्या आजपर्यंतच्या चित्रपटांपैकी सर्वात वेगळा होता. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 360 करोड रुपयांपेक्षा अधिकच आहे.

चित्रपटाच्या माध्यमातून विकीचं एक वेगळं स्वरूप प्रेक्षकांच्या समोर आलं आणि आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा घर करून गेलं.

2020 : मध्ये त्याने Bhoot या चित्रपटांमध्ये काम केलेल आहे.

2023 : मध्ये Zara Hatake Zara Bachake , The Greate Indian Family, Sam Bahadur,Dunki यामध्ये तो दिसून आला.

2024 : मध्ये Bad News मध्ये देखील त्याच्या अभिनयाची चर्चा चांगलीच रंगली होती.

Chhaava Movie

2025 : मध्ये काही दिवसांवरती त्याचा चर्चेत असणारा छावा हा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.ऐतिहासिक घडामोडींवरती छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असल्यामुळे विकीने वैयक्तिकरित्या खूप मोठ्या प्रमाणात या चित्रपटासाठी मेहनत घेतलेली आहे.

Chaavaa Box Office Collection 200+ Crore

छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणं हे काही सोपं काम नाही. त्यासाठी अथक परिश्रम मागच्या काही महिन्यांपासून विकीने घेतले आहेत.

विकी आणि कतरीना ची लव लाइफ :
9 डिसेंबर 2021 मध्ये विकी कौशल आणि कतरीना कैफ यांचा विवाह झाला. त्याआधी काही महिने ते एकमेकांना डेट करत होते. आज दोघेही सुखी वैवाहिक आयुष्य व्यतीत करत आहेत .

Vicky Kaushal Networth :

रिपोर्ट्स नुसार विकीकडे अंजादे 80-90 करोड रुपयांची संपत्ती आहे.

Vicky Kaushal Car Collection :

विकीकडे महागड्या गाड्यांचे देखील चांगले collection आहे.त्याच्याकडे Land Rover Range Rover , Mercedes Benz ,BMW सारख्या महागड्या गाड्या देखील आहेत.


अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी क्लिक करा


5 thoughts on “Vicky Kaushal Biography|Chhaava Movie | Vicky Kaushal Networth,Wife Family”

  1. किशोर नमित कपूर एक्टिंग इन्स्टिट्यू ,या बद्दल काही माहिती मिळेल का?

    Reply
    • हो नक्कीच,
      किशोर नमित कपूर ॲक्टिंग इन्स्टिट्यूट हे अभिनय क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवीन लोकांसाठी मोठी पर्वणीच आहे .
      आज पर्यंत या इन्स्टिट्यूट मधून अनेक कलाकार तयार झाले आहेत.

      इन्स्टिट्यूट बद्दल अधिक माहितीसाठी त्यांच्या ऑफिशियल वेबसाइट वरती विजिट देऊ शकता.
      लिंक : https://knkactinginstitute.com/

      Reply

Leave a Comment