Vaishnavi Hagawane Case | वैष्णवीच्या मृत्यूमागचं खरं कारण …. | Rajendra Hagawane NCP Leader

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

Vaishnavi Hagawane Case

Vaishnavi Hagawane Case

मागील काही दिवसांपूर्वी संपुर्ण महाराष्ट्राला शरमेने लाजवेल अशी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या केली. खर पहायला गेलं तर ही आत्महत्या नसून हत्याच आहे असं म्हणता येईल.

  • वैष्णवीने येवढे मोठे पाऊल का उचलले ?
  • राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल ?
  • लव्ह मॅरेज खरंच यशस्वी होतात का ?
  • मयुरी हगवणे यांचे कुटुंबावर गंभीर आरोप
  • हुंड्यासाठी येवढ्या खालच्या पातळीवर माणूस जातो का ?

या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. कश्याप्रकारे तिला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला.

∆ संपूर्ण घटनाक्रम :

16 मे दुपारी जवळपास 4 ते 5 च्या दरम्यान वैष्णवी तिच्या सासरच्या घरी बेड रूम मध्ये होती. खूप वेळ झालं दरवाजा उघडतं नसल्यामुळे तिचा नवरा शशांक याने दरवाजा तोडला.
रूम मध्ये गेल्यावर वैष्णवी ने स्वतःला संपवल्याचे समजल्यावर तत्काळ तिला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. परंतु तो पर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल :


या घटनेनंतर वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी बावधन पोलिस स्टेशन येथे तिच्या सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी वैष्णवीचा बळी घेतला अशी तक्रार दाखल केली.

वैष्णवी आणि शशांक यांचा विवाह :
28 एप्रिल 2023 ला सुजगाव येथे मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला. हगवणे तेथील राजकिय तसेच सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव असल्यामुळे लग्न शाही थाटात पार पडल.

लग्नामध्ये 51 तोळे सोन , 7.5 किलो चांदीची भांडी तसेच महागडी अशी Fortuner गाडी वैष्णाविच्या घरच्यांना मागण्यात आहे. कस्पटे यांनी सगळ्या मागण्या पूर्ण केल्या . तरीही या माणसांची भूक कमी झाली नाही . प्रत्येक वेळी तिला माहेराहून काहीतरी महागड्या वस्तू आणण्यासाठी भाग पाडलं जायचं. एका बापाने फक्त पैसा,गाडी दिली नव्हती तर स्वतःच्या काळजाचा तुकडा देखील दिला होता. कदाचित या गोष्टीचा भान त्यांना नव्हतं.

वैष्णवीच्या मृत्युमागचं खरं कारण….

  • वैष्णवीने येवढे मोठे पाऊल का उचलले ?
    सासरच्या सतत होत असलेल्या जाचामुळे वैष्णवी ने हे पाऊल उचलले असे निदर्शनास येत आहे . तिच्या नवऱ्याला जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोटी रुपये लागणार होते. वैष्णवीला तिच्या माहेर कडून दोन कोटी रुपये घेऊन ये यामुळे तिला सतत त्रास देण्याचा प्रयत्न चालू होता. कदाचित तिची व तिच्या वडिलांची यातून सुटका व्हावी यासाठी तिने हे टोकाचे पाऊल उचलले असेल.
    वैष्णवी गरोदर असताना तिला हे मूल माझं नाही अशा प्रकारे म्हणून तिच्यावरती संशय शशांक कडून घेतला जायचा.
    त्यावेळी तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता परंतु तात्काळ दवाखान्यामध्ये नेल्यामुळे तेव्हा ती सुखरूप आली.
  • राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल ?
    या संपूर्ण घटनेची गांभीर्यता लक्षात घेता राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुंबई पोलीस महासंचालकांना पत्र लिहीत तात्काळ निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत.
    त्यासोबतच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी देखील या घटनेकडे लक्ष देण्याचे आणि तात्काळ संबंधित व्यक्तींवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) राजेंद्र हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे असे जाहीर केले.
वैष्णवी चा नवरा, सासू, ननंद यांना पोलिसांनी अटक केली होती मागच्या पाच-सहा दिवसांपासून सासरा व दिर फरार होते त्यांना पण आता अटक करण्यात आली आहे.
तिचं सहा महिन्याचं बाळ तिच्या आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. आज त्या बाळाच्या डोक्यावरून आईचे छत्र हरवलं.

  • मयुरी हगवणे यांचे कुटुंबावर गंभीर आरोप :
    वैष्णवी ची जाऊ असलेल्या मयुरी हगवणे यांनी प्रसारमाध्यमांसमोर काही व्हिडिओ आणि फोटोज दाखवले त्यामध्ये कुटुंबाकडून मारहाण होतानाचे स्पष्ट दिसले. पैशासाठी सतत अशा गोष्टी होत होत्या याबद्दल त्यांनी आधी ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती.
  • लव्ह मॅरेज खरंच यशस्वी होतात का ?
    वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेम विवाह होता. काय स्वप्न बघितली असतील तिने आणि आणि आज शेवट अश्या प्रकारे होईल याचा विचार देखील केला नसेल.
    खरंतर प्रेम म्हणजे काय ? हे आधी नीट समजून घ्यायला पाहिजे. आपण कोणावरती प्रेम करतो तो माणूस कसा आहे. आधी याची पूर्ण शहानिशा केली पाहिजे. एखाद्या बरोबर संपूर्ण आयुष्य व्यतीत करायचं हे काही साधी गोष्ट नाही. लग्न करणं म्हणजे फक्त हौस किंवा मजा मस्ती नव्हे तर ती एक खूप मोठी जबाबदारी आहे.

आजकाल एक ट्रेंड सुरू झाला आहे रिलेशनशिप . जोपर्यंत मन भरत नाही तोपर्यंत राहायचा आणि पुन्हा सोडून द्यायचं. इंग्लिश मध्ये एक ओळ आहे त्यासाठी Use And Throw .
याला प्रेम म्हणतात का ? तर अजिबात नाही.

खरं पाहायला गेलं तर प्रेम हे खूप सुंदर आणि निखळ अशी भावना आहे पण अशा काही घटनांमुळे त्याला एक प्रकारचा डाग लागतो.

हुंड्यासाठी येवढ्या खालच्या पातळीवर माणूस जातो का ?


आज आपण 21व्या शतकात जरी असलो तरी कायद्याने गुन्हा जरी असला तरी समाजात हुंडा हा सर्वत्र लपून छपून का होईना पण त्याला सामाजिक मान्यता आहे हे सर्वांना माहीतच आहे.
परंतु पैशाच्या लालसेपोटी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत एखाद्याची मजल जाईल ही खरंच माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट आहे
हे काही महाराष्ट्रातील किंवा देशातली पहिली घटना नाही परंतु एखाद्या राजकीय घरंदाज व्यक्तीच्या घरामध्ये अशा गोष्टी होत असतील तर विचार करण्याची गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्रात अशा किती घटना घडत असतील .

आज एक माणूस म्हणून विचार करण्याची गरज आहे …..
माणसातली माणुसकी खरंच जिवंत आहे का ? आज आपण भारत विश्व गुरु होणार , विकसित देश होत आहे, AI ची नवीन क्रांती येत आहे अशा गोष्टी बोलतो. पण आजही वैचारिक दृष्टिकोन हा माणसातला बदललेला नाही. आणि जोपर्यंत हा दृष्टिकोन बदलत नाही तोपर्यंत एक माणूस म्हणून आपण कधीच पुढे जाऊ नाही शकणार.


अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा


Leave a Comment