Ajit Doval Biography In Marathi
• 20 जानेवारी 1945 झाली G.N.Doval या कर्तव्यदक्ष आर्मी मेजर च्या घरी अजित यांचा जन्म झाला. पूर्वीच्या संयुक्त प्रांतातील पौढि गढवाल हे त्यांचे गाव जे आता उत्तराखंडमध्ये आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण हे अजमेर येथील मिलिटरी स्कूलमध्ये झालं.
त्यानंतर पुढे 1967 साली त्यांनी आग्रा विद्यापीठातून अर्थशास्त्र पद्युत्तर पदवी प्राप्त केली. त्याच दरम्यान त्यांची भारतीय पोलीस सेवेत आयपीएस म्हणून निवड झाली. डोवाल यांना केरळ कॅड्रेट मध्ये पोलीस अधिकारी म्हणून पाठवण्यात आलं.
त्यावेळेस तेथे दोन समाजामध्ये दंगे उसळून आले होते आणि अश्या ठिकाणी त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती.
नाव : अजित कुमार डोवाल
जन्म : 20 जानेवारी 1945
जन्म ठिकाण : पौढी गढवाल , उत्तराखंड, भारत
राष्ट्रीयत्व : भारतीय
धर्म : हिंदू
शिक्षण : 1. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल अजमेर
2. नॅशनल डिफेन्स कॉलेज
3. डॉ भीमराव आंबेडकर युनि्हर्सिटी
पत्नी : अरूनी डोवाल (1972 )
अपत्ये : शौर्य डोवाल , विवेक डोवाल
पत्ता : नवी दिल्ली, भारत
Ajit Doval Biography In Marathi | James bond of India
• पुढे आठ वर्षानंतर पोलीस दलातील सुखासीन नोकरी सोडून ते इंटेलिजन्स ब्युरो मध्ये गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना एकापेक्षा एक मोठे चॅलेंजस येत होते. इंटेलिजन्स ब्युरो मध्ये गेल्यानंतर त्यांना पहिली कामगिरी मिळाली ती मिझोराम मधल बंड मोडून काढण्याचे. त्या ठिकाणी त्यांनी मिझो बंडखोरांमध्ये काम करण्याची सुरुवात केली.
• मिझो बंडखोरांचे नेते लाल डेंगा यांच्यासोबत त्यांनी अत्यंत जवळचे संबंध निर्माण केले. डोवाल हे मिझो नॅशनल आर्मीचे अत्यंत खतरनाक बंडखोर आहेत असेच त्यांनी सुरुवातीला सगळ्यांना भासवून टाकले ,त्यामुळे अगदी लष्करांनी त्यांना संपवण्याची तयारीही केली होती.
• मात्र एके दिवशी हा आपलाच माणूस आहे अशी माहिती लेफ्टनंट कर्नल J.R.F. जेकम यांना कळाली आणि अजित डोवाल यांच्या कामाची स्टाईल बघून ते आश्चर्यचकित झाले.
• दरम्यान ठरल्याप्रमाणे डोवाल यांनी मिझो येथील बंडखोरांमध्ये फूट पाडली. लाल डेंगा यांच्यासोबतच्या काही नेत्यांना त्यांनी आपल्या सोबत वळवून घेतलं. त्यामुळे लाल डेंगा यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी करार केला आणि मिझोराम येथील वातावरण शांत झालं.
पुढे सिक्कीम हे राज्य भारतात सामील करून घेण्यात अजित डोवाल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. मिझोराम आणि सिक्कीम येथील कामगिरीसाठी अजित डोवाल यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस पदक देऊन सन्मान करण्यात आला.
14 वर्षांची सेवा झाल्यानंतरच तो सन्मान द्यायचा असा नियम आहे. परंतु डोवाल यांच्या शूरपणाला सलाम करण्यासाठी तत्कालीन राजीव गांधी सरकारने नियमात बदल केला केवळ सात वर्षांच्या सेवेतच डोवाल यांना हा सन्मान मिळाला होता.
∆ अजित डोवाल यांचा सर्वात गाजलेला किस्सा :
अजित डोवाल यांनी पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेच्या नाकावर टिचून तब्बल सात वर्ष पाकिस्तान मध्ये हेरगिरी केली. त्यासाठी त्यांनी इतकी खतरनाक तयारी केली होती की त्याबद्दल न बोललेलंच बरं.
सर्वात पहिल्यांदा तर त्यांनी कुरानचा परफेक्ट अभ्यास केला. पुढे इस्लाम आचार विचार, पेहराव, चालीरीत्या आत्मसात केल्या. हिंदू मानसिकता पूर्ण बदलून पाकिस्तान मध्ये ते एका साध्या रिक्षाचालकाच काम करत होते. एका कनिष्ठ मध्यमवर्गीय वस्तीमध्ये ते राहत होते. एके दिवशी पाकिस्तानातील मशिदीत गेले असताना एक मौलवी म्हणाला की तुम्ही हिंदू आहात.
त्यानंतर डोवाल यांनी आपण मुस्लिम असल्याचे सांगायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्या मौलवीने अजित यांना एका खोलीमध्ये घेऊन गेले आणि सांगितलं की आपण हिंदू आहोत. त्या मौलवीच्या संपूर्ण परिवाराची हत्या करण्यात आली होती त्यामुळे तो जगण्यासाठी मुस्लिम म्हणून वावरत होता. त्यावेळी त्यांनी कपाटातून शंकर आणि दुर्गेची मूर्ती काढली आपण अजूनही हिंदू देवी देवतांची पूजा करतो असेही त्या मौलवींनी सांगितलं.
• त्यानंतर डोवाल यांनी त्याला विचारलं की मी हिंदू असल्याचं त्यांनी कसं ओळखलं ?
त्यावर तो मौलवी म्हणाला की तुमचे कान टोचलेले आहेत. हे कळाल्यानंतर कोणाला कळू नये म्हणून डोवाल यांनी कानाची प्लास्टिक सर्जरी करून घेतली आणि ते सात वर्ष पाकिस्तानात राहिले.
• तिथं त्यांनी खलीस्थानींना मदत पुरवणाऱ्या पाकिस्तानी लोकांची सगळी माहिती गोळा केली. ज्याचा फायदा पुढे ऑपरेशन ब्लॅक थंडर साठी झाला. त्याचं झालं असं, स्वतंत्र खलिस्तान ची मागणी करणाऱ्या अतिरेकींचा विमोड करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार ची मोहीम राबवली होती.
मात्र त्यामुळे परिस्थिती आणखीनच चिघळली राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत सरकारला आणखीन एक कारवाई करावी लागली. त्यावेळेस इंटेलिजन्स ब्युरो मध्ये काम करत असलेले अजित डोवाल खलीस्थानी दहशतवाद्यांमध्ये आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेचा एजंट म्हणून सामील झाले होते. तेव्हा त्यांनी हाताळलेल्या परिस्थितीमुळे रक्ताचे थेंब न सांगता सुरक्षाकारांना कारवाई पूर्ण करता आली आणि ऑपरेशन ब्लॅक थंडर यशस्वी झाल.
• 2015 साली काही नागा बंडखोरांनी भारताच्या लष्करी ताफ्यावर हल्ला केला होता. त्यामध्ये वीस जवान शहीद झाले होते. त्या बंडखोरांचे दहशतवादी तळ हे म्यानमार येथे होते. तोपर्यंत नव्याने पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवाल यांची नियुक्ती केली होती. त्यावेळी अजित डोवाल यांनी बंडखोरांचे तळच उध्वस्त करण्याची भूमिका मांडली त्यासाठी योजना हे तयार करण्यात आली.
लष्कराच्या 21 पॅराकमांडो वरती हल्ल्याची जबाबदारी सोपवली त्यासाठी बंडखोरांच्या प्रशिक्षण तळाची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात आली. तिथं कमांडोनी मॉक ड्रिल केलं पुढे ठरवल्याप्रमाणे तीन टीम मध्ये विभागून कमांडो विमानातून म्यानमारच्या सीमेमध्ये सुमारे आठ किलोमीटर आत घुसले. तळाला चारही बाजूने वेडा घालून त्यांनी अचानक हल्ला चढवला बहुतांश दहशतवाद्यांना ठार करून Rocket Launcher च्या साह्याने त्यांचे तळ उध्वस्त केले.
त्यानंतर अजित डोवाल यांच्या कामाचं खूप कौतुक झालं. 2016 नंतरच्या उरी सर्जिकल स्ट्राइक नंतर डोवाल सगळ्यात जास्त लोकांच्या चर्चेत आले.
Ajit Doval Biography
∆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास :
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये एनडीएचे सरकार स्थापन केल्यानंतर काही दिवसातच Ajit Doval यांना पुन्हा नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर या पदावर ती कार्यरत ठेवले.
अजित डोवाल यांचा असलेला अनुभव व चाणाक्ष बुद्धिमत्ता याची जाणीव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. पंतप्रधानांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश होतो.
Ajit Doval Biography | Indian James Bond | भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची बायोग्राफी | अजित डोवाल
#अजितडोवाल
#Ajitdovalbiography
#googletrending
#mahiteesatha.in
#SEO