M R Patil Cocsit Latur Biography |Inspirational Success Story

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now


M R Patil Cocsit Latur Biography
M R Patil Cocsit Latur Biography

 

 

M R Patil Cocsit Latur Biography

 
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यामध्ये असलेल्या घारोळा या ठिकाणी माधवराव पाटील यांचा जन्म झाला. गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे शेजारच्या गावामध्ये दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यानंतरचे शिक्षण लातूरमध्ये पूर्ण केले. आणि त्यानंतर MSC औरंगाबादच्या विद्यापीठामधून पूर्ण केलं.
 
MSC चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1971 साली राजश्री शाहू महाविद्यालय लातूर येथे फिजिक्स चे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तब्बल 34 वर्ष या महाविद्यालयांमध्ये त्यांनी सेवा केली त्यासोबतच पीएचडी सुद्धा केली.
आणि त्यानंतर स्वेच्छा निवृत्ती घेतली.
 
खरंतर निवृत्ती घेण्यामागे एक कारण ही होते , शिक्षण क्षेत्रामध्ये काहीतरी वेगळं करावं अशी त्यांची इच्छा होती. गेली कित्येक वर्ष जे पारंपारिक शिक्षण दिलं जात होतं ज्यामध्ये BA, BCom, BSC याच्यापेक्षा आपल्या भागातील मुलांना व्यावसायिक शिक्षण देऊन नोकरीसाठी कशा पद्धतीने तयार करावे.
 
 
 
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीचे हमी देणारे एखादे महाविद्यालय सुरू करावे अशी संकल्पना त्यांच्या मनामध्ये आली. आणि मग त्याला मूर्त रूप देत COCSIT College  सुरू झाले.
 
महाविद्यालय सुरू होऊन जवळपास 22 वर्षांत पेक्षा जास्त काळ झालेला असून या महाविद्यालयांमधून हजारो विद्यार्थी बाहेर विविध ठिकाणी नोकरी करत आहेत 150 पेक्षा जास्त विद्यार्थी बाहेर देशात नोकरीसाठी गेले आहेत.
 
महाविद्यालयातून बाहेर पडलेले 70 टक्के विद्यार्थी हे भारतातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये सध्या कार्यरत आहेत.
 
फक्त डिग्री दिली म्हणजे पुरेसं झालं एवढ्या वरती न थांबता नोकरीसाठी लागणारे आवश्यक प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना नोकरीसाठी तयार करण्याचं काम डॉ एम आर पाटील सरांनी आजपर्यंत केलेल आहे.
 
 
∆ बालपणीचे शिक्षण : 

 

आज COCSIT मधील विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवणाऱ्या कॉलेजच्या अध्यक्षांचे बालपणीचे शिक्षण हे गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे  बाजूच्या वडवळ गावात पाच ते सहा किलोमीटर चालत जात असायचे.
 
दहावीला 56% मार्क मिळालेल्या पाटील सरांच्या मनामध्ये  शिक्षणाबद्दलच्या असणाऱ्या आवडीमुळे त्यांनी पुढील शिक्षण सुरू ठेवले. त्यांच्या शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे ते घडले असे आवर्जून सांगतात.
 


∆ कॉक्सिट कॉलेज सुरू करण्यामागचा उद्देश : 
 
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना व्यवसायभिमुख शिक्षण प्रदान करण्यासाठी या संस्थेमध्ये प्राधान्य देण्यात येते.
 
एखाद्या छोट्याशा रोपट्याचे रूपांतर एका मोठ्या वटवृक्षांमध्ये ज्याप्रमाणे होते अगदी तसेच आज कॉक्सिट हे नाव लातूरमध्ये आयटी क्षेत्रातील सर्वोत्तम कॉलेज म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी आज या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत.
 

                       ” जे जे नव , ते लातूरला हवं ” 
 

वरील ओळीप्रमाणे एम आर पाटील सरांनी भविष्याचा वेध घेऊन लातूरमध्ये व्यावसायिक शिक्षण देणारे कॉलेज निर्माण केले. मोठ्या मोठ्या नामांकित कंपन्या जसे टीसीएस, विप्रो, इन्फोसिस, असेंचर इत्यादी कंपन्यांचे प्लेसमेंट या महाविद्यालयांमध्ये दरवर्षी होतात. लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रामधील एक नामांकित असं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर एम आर पाटील सर.
 
• M R Patil Sir Car Collection : 
1. Ford Figo 
2.Tata Harrier 
3. Hyundai Creta 
………………………………………………………………………
∆ रॉयल एज्युकेशन सोसायटी 
1 . College of Computer Science and Information Technology , Latur
2. Sharda Junior College, Latur
3. Sharda International School , Latur 
………………………………………………………………………
 
पदवी अभ्यासक्रम : 
• BSC.CS (Computer Science)
• BSC.SE (Software Engineering)
• BSC.Data Science 
• BSC. Software Development
• BSC.IT (Information Technology)
• BSC.CM (Computer Management)
• BSC.NT (Network Technology)
• BSC.BT(Biotechnology)
• B.Voc. Software Development 
• BCA (Bachelor of Computer Application)
• BBA (Bachelor of Business Administration)
 
 
 


∆ COCSIT गर्ल्स हॉस्टेल : 
 
बाहेर जिल्ह्यातून शिक्षणासाठी लातूरमध्ये आलेल्या विद्यार्थिनींसाठी मुलींच्या वसतिगृहाची संस्थेच्या वतीने सोय करण्यात आली आहे. भव्य अशी इमारत त्यामध्ये सुसज्ज अशा रूम्स, डायनिंग एरिया,अभ्यासासाठी रिडिंग रूम उपलब्ध करून देण्यात आली आहे. 
 
 
∆ अनुभवी प्राध्यापक : 
 
COCSIT महाविद्यालयामध्ये आज सर्व तज्ञ शिक्षकांची टीम कार्यरत आहे . 
Principal : N.S.Zuple Sir 
Vice Principal :D.R Somvanshi Sir 
Vice Principal : V.V Bhosale Sir 
BSC CS (HOD) : D.H Mahamuni Mam
BSC SE (HOD) : B.M.Sontakke Sir
BCA (HOD) : V.D Patil Sir
TPO : Kailas Jadhav Sir 
 
Trenning Placement Cell :
 
COCSIT महाविद्यालयामध्ये ट्रेनिंग प्लेसमेंट सेल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये जॉईन होण्यासाठी मदत केली जाते. विविध कोर्स च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर कैलास जाधव सर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.

 

 
एम आर पाटील सर बियोग्राफी | COCSIT College Latur | आयटी क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व | Mahiteesatha.in
 
 

आज COCSIT मधील विदयार्थी देशातच नव्हे तर परदेशामध्ये सुध्दा कार्यरत आहेत. मोठं मोठया MNC कंपन्यामध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत.


अशाच प्रकारच्या प्रेरणादायी पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा 

Leave a Comment