Flowchart in Marathi: प्रकार, चिन्हे आणि उपयोग

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

फ्लोचार्ट म्हणजे नक्की काय?

फ्लोचार्ट म्हणजे एखाद्या प्रक्रियेचे चित्ररूप सादरीकरण (diagram) होय. यामध्ये वेगवेगळी चिन्हे (symbols) वापरून कामाच्या स्टेप्स दाखवल्या जातात.

Flowchart in Marathi: प्रकार, चिन्हे आणि उपयोग

आजच्या डिजिटल युगात कोणतीही प्रक्रिया समजून घेण्यासाठी सोप्या आणि स्पष्ट पद्धतीची गरज असते. इथेच फ्लोचार्ट तुमच्या मदतीला येतो. जर तुम्ही प्रोग्रामिंग शिकत असाल, बिझनेस प्रोसेस समजून घेत असाल किंवा एखादं काम व्यवस्थित प्लॅन करायचं असेल—फ्लोचार्ट हा एक अत्यंत उपयोगी टूल आहे.

चला तर मग, अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया.

फ्लो चार्ट व त्याचे फायदे

कुठलाही प्रोग्राम करण्याआधी त्याचा फ्लो चार्ट काढणे महत्त्वाचे असते. कारण प्रोग्राम रन कसा होईल याचा अंदाज फ्लो चार्टवरून काढता येतो व त्याप्रमाणे प्रोग्राममध्ये बदल करता येतात.

कॉम्प्युटर प्रोग्राममधील लॉजिकचे वाहन दर्शविणारी आकृती (Diagram indicating flow of logic) अशी फ्लो चार्टची व्याख्या केली जाते.

फ्लो चार्टची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत :

(1) फ्लो चार्ट हा कुठल्याही संगणक भाषेला समान असतो. फ्लो चार्टवरून कुठल्याही भाषेत प्रोग्राम लिहिता येतो.

उदा. बेसिक व सी प्रोग्रामचा फ्लो चार्ट एकच असू शकतो.

(2) फ्लो चार्टवरून खालील बाबी तयार करता येतात :

1. इनपुट व्हेरिएबल्स्

2. आउटपुट व्हेरिएबल्स्

3. फॉर्म्युला

4. लॉजिकचा वापर.

(3) प्रोग्राममधील बदल फ्लो चार्ट वापरून सहजशक्य होतो.

फ्लोचार्ट कुठे वापरला जातो?

फ्लोचार्टचा वापर अनेक ठिकाणी होतो:

  • प्रोग्रामिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट
  • इंजिनिअरिंग आणि टेक्निकल फील्ड
  • शिक्षण आणि प्रोजेक्ट्स
  • बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट

फ्लो चार्ट्सच्या Symbols

फ्लो चार्टमध्ये स्टार्ट व स्टॉपचे चिन्ह एकच, बहुतांशी elliptical वा वर्तुळाकार असते व त्यात स्टार्ट व स्टॉप लिहिलेले असते. इनपुट व आउटपुट स्टेटमेंट्सचे चिन्हसुद्धा सारखे (बहुतांशी लहान रेक्टंगल) असते. मध्ये दाखविल्याप्रमाणे रीड व प्रिंट या अनुक्रमे इन्पुट व आउटपुट सूचना लहान रेक्टंगलमध्ये दाग्नविल्या आहेत.

अञ्जिन्त्रिक एक्स्प्रेशन हे मोठ्या आयतामध्ये लिहिले जाते. त्याचप्रमाणे लॉजिकचे वाहन बाणाने दाखविले जाते. फ्लो चार्ट जर कागदावर मावत नसेल तर क्रमशः चिन्ह (Continuation Symbol) वापरावे लागते.

निर्णय चिन्ह (Decision making symbol) हे फ्लो चार्टचे महत्त्वाचे चिन्ह आहे. प्रश्नाच्या उत्तरांच्या पर्यायांसाठी याचा वापर करतात. कुठल्याही प्रश्नाला होय नाही असे पर्याय असू शकतात.

आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे बाणांच्या सहाय्याने लॉजिक परिस्थितीप्रमाणे वळवता येते. विधान सत्य असल्यास (होय) लॉजिक एका दिशेस जर असत्य असल्यास (नाही) दुसऱ्या दिशेस वळवता येते. परिस्थितीप्रमाणे या लॉजिकचा वापर करता येतो.

फ्लोचार्ट कसा तयार करावा?

फ्लोचार्ट बनवणं खूप अवघड नाही. फक्त या स्टेप्स फॉलो करा:

  1. प्रक्रिया नीट समजून घ्या
  2. सर्व स्टेप्स लिहून काढा
  3. योग्य चिन्हे निवडा
  4. स्टेप्सला arrows ने जोडा
  5. शेवटी फ्लो तपासा

फ्लो चार्टची उदाहरणे

काढण्याची काही उदाहरणे खाली दिली आहेत :

(अ) वर्तुळाचा परीघ व क्षेत्रफळ काढणे (Circumference And Area of Circle): दिलेल्या विज्येवरून व हे एक्स्प्रेशन्स वापरून अनुक्रमे परीघ व क्षेत्रफळ काढता येते. यात त्रिज्या हे इनपुट परीषद क्षेत्रफळ हे आउटपुट व्हेरिएबल्स आहेत. फ्लो चार्टचे प्रयोजन आउटपुट काढणे हे आहे. त्यासाठी इनपुट व्हेरिएबल्सच्या किमती, फॉर्म्युल्यामध्ये भरून आउटपुट प्रिंट करण्याचे विधान द्यावे लागते.

या विधानास आउटपुट स्टेटमेंट असे म्हणतात. त्याचप्रमाणे इनपुट व्हेरिएबल रीड करणाऱ्या विधानास (Input statement) इनपुट स्टेटमेंट म्हणतात. आकृती 2.2 मध्ये हा flow chart दाखवला आहे. हांच फ्लोचार्ट डिसिजन्सचा वापर करून आकृती क्र. 2.3 मध्ये दाखविल्याप्रमाणे काढता येतो.

फ्लो चार्टमध्ये वापरण्यात येणारी चिन्हे


वर्तुळाचा परीघ व क्षेत्रफळ काढणे

उदाहरण: दुसरे दिलेल्या दोन नंबर्सपैकी मोठा नंबर फ्लो चार्टद्वारा काढा.
समजा A व B असे दोन नंबर आहेत व आपणास यापैकी मोठा नंबर काढायचा आहे.

1. A हा B पेक्षा मोठा आहे.

A > B

2. B हा A पेक्षा मोठा आहे.

A < B

3. A व B सारखे आहेत.

A = B

वरील कंडिशन्सचा वापर करून आकृती क्र. 2.4अ मध्ये दाखविल्याप्रमाणे फ्लो चार्ट काढता येतो.

वर्तुळाचा परीघ व क्षेत्रफळ काढणे डिसिजन लॉजिकचा वापर

सदर फ्लो चार्टचा अलगोरिदम खालील प्रमाणे राहील.

  1. Read R
  2. C= 2π R
  3. A= π R ^2
  4. PRINT C,A
  5. EXIT

फ्लो चार्ट्स काढताना घ्यावयाची काळजी :

फ्लो चार्ट्स तयार करताना खालील बाबी लक्षात ठेवाव्यात.

1. START व STOP या सूचना फक्त एकाच वेळी वापरायच्या असतात. एकाच फ्लो चार्टमध्ये एकापेक्षा जास्त स्टार्ट अथवा स्टॉप सूचना वापरता येत नाही.

2. फ्लो चार्ट तयार करताना प्रथम मुख्य मार्ग (Main Path) काढणे आवश्यक आहे. यानंतर Loops व Branches काढाव्यात.

3. फ्लो चार्ट अतिशय सुलभ असावा. त्यामध्ये क्लिष्टता शक्यतो असू नये.

4. फ्लो चार्ट अगदी ‘जनरल’ असावा. जेणेकरून त्यावरून कोणत्याही भाषेत Program करता येईल.

5. प्रोग्रॅमची प्रत्येक स्टेप फ्लो चार्टमध्ये दाखवणे आवश्यक नाही.

Flow Chart मधील संभाव्य चुका :

दिलेल्या program चा flow chart काढताना संभाव्य सामान्य चुका खाली दिल्या आहेत.

1. Arrow line ची चुकीची जोडणी. Arrow line जर अयोग्य ठिकाणी जोडली असेल, तर logic flow चुकीच्या ठिकाणी जाईल व result चुकीचे मिळतील.

2. Less than a greater than च्या conditions बन्याच वेळा चुकतात.

3. Increment किंवा decrement of location देताना काळजी घ्यावी लागते.

समजा 0 ते 10 पर्यंत अंक प्रिंट करायचे आहेत त्याचे लॉजिक खालील प्रमाणे राहील.

हे लॉजिक statements वर अवलंबून असते. समजा हे statement, print N या statement च्या खाली लिहिले तर flow chart च्या condition मध्ये बदल N < 10 ही कंडिशन मध्ये बदल होतो N <= 16 ही कंडिशन टाकावी लागेल.

4. फ्लोचार्ट च्या लूपमध्ये बाहेरून आत प्रवेश करता येत नाही.

फ्लोचार्ट vs अल्गोरिदम

फ्लोचार्टअल्गोरिदम
चित्ररूप (Visual)लिखित स्वरूप (Text)
समजायला सोपाथोडा टेक्निकल
चिन्हांचा वापरस्टेप्स शब्दात

FAQ’s

1. फ्लोचार्ट म्हणजे काय?

फ्लोचार्ट म्हणजे एखादी प्रक्रिया किंवा काम कसं होतं हे चित्राच्या स्वरूपात दाखवण्याची एक सोपी पद्धत आहे.

2. फ्लोचार्टमध्ये कोणकोणती चिन्हे असतात?

फ्लोचार्टमध्ये Start/End, Process, Decision, Input/Output अशी काही बेसिक चिन्हे वापरली जातात.

3. फ्लोचार्ट आणि अल्गोरिदम यात काय फरक आहे?

अल्गोरिदम म्हणजे स्टेप्स लिहून सांगितलेल्या असतात, तर फ्लोचार्टमध्ये त्या स्टेप्स चित्रात दाखवल्या जातात.

4. प्रोग्रामिंगमध्ये फ्लोचार्ट का वापरतात?

फ्लोचार्टमुळे प्रोग्रामचा लॉजिक आधीच स्पष्ट होतो, त्यामुळे कोड लिहिणं सोपं होतं.

5. फ्लोचार्ट बनवण्यासाठी कोणती टूल्स वापरू शकतो?

तुम्ही Visio, Lucidchart, Draw.io किंवा Canva सारखी सोपी टूल्स वापरू शकता.

निष्कर्ष

फ्लोचार्ट हा एक असा टूल आहे जो कठीण गोष्टी सोप्या करून दाखवतो. तुम्ही विद्यार्थी असाल, प्रोग्रामर असाल किंवा बिझनेस प्रोफेशनल—फ्लोचार्ट शिकणं तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.


अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा


Leave a Comment