शार्क टॅंक इंडिया मधील सर्वांचा आवडता शार्क (जज)म्हणजे अमन गुप्ता. अमनचा जन्म 4 मार्च 1982 ला नवी दिल्ली येथे झाला. त्याने बॅचलर ऑफ कॉमर्स चा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वडिलांच्या इच्छेमुळे चार्टर्ड अकाउंटंट चा अभ्यासक्रम सुरू केला आणि तो पूर्ण करून सीए झाला. तसेच एम बी ए चे शिक्षण पूर्ण केले.
सुरुवातीला त्याने विविध ठिकाणी नोकरी केलेली आहे . नोकरी करत असताना त्याला सतत निराशा जाणवायची मनाविरुद्ध नोकरी करावी लागायची. या सर्व गोष्टींचा कंटाळा येऊन तो ती सोडून द्यायचा.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने व त्याच्या वडिलांनी मिळून एक व्यवसाय चालू केला त्या व्यवसायामध्ये त्याला मार्केटिंग क्षेत्राविषयी चांगल्या प्रकारे माहिती मिळाली . वस्तूची विक्री कोठे करावी, ग्राहकांशी कशा प्रमाणे व्यवहार करावा या सर्व गोष्टींचा फायदा नक्कीच त्याला झाला.
काही कारणास्तव तो व्यवसाय पुढे चालून बंद पडला.
आजही तो प्रथम प्राधान्य हे ग्राहकाला देतो . ग्राहक हा देवासमान असतो असे तो म्हणतो.
∆ Boat ची सुरुवात :
कंपनीच्या सुरुवातीचा काळ हा अमन साठी तसेच त्याच्या कंपनीसाठीचा प्रवास अत्यंत खडतर असा होता.Boat कंपनीची सुरुवात करण्यापूर्वी अमनला पाच व्यवसायामध्ये अपयश आलेले होतो.
त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात त्याला तोटा सहन करावा लागला. नोकरी करत असताना त्याने जमवलेले तीस लाख रुपये या व्यवसायामध्ये बुडाले होते. त्यामुळे त्याच्या मनामध्ये निराशा ही होतीच. त्याच्यामते तुम्ही एखाद मोठ यश प्राप्त केलं, तर लोक तुमचे मागचे अपयश विसरून जातात.
पण खरं तर अपयशातूनच माणूस खूप काही शिकून जातो. आणि त्या चुका पुढे न होण्याची काळजी घेतो.
अमनच्या बायकोने त्याला दोन वर्षाचा कालावधी दिला होता त्या दोन वर्षामध्ये तुला जे करायचे आहे ते कर असे ठणकावून सांगितले होते त्यामुळे त्याच्या पुढे करो या मरो अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यातूनच सुरुवात झाली Boat ची. 2016 पासून कंपनीच्या यशाचा वेग वाढत गेला.
∆ पत्नीचे सहकार्य :
तो सतत प्रसारमाध्यमात तसेच इतर ठिकाणी सांगत असतो की त्याच्या यशामागे त्याच्या पत्नीचा खूप मोठ्या प्रमाणात हातभार आहे. कोणताही निर्णय घेण्याआधी तो तिच्यासोबत चर्चा करतो. तीची साथ खूप मोलाची आहे याची जाणीव सतत करून देत असतो.
दोघांच्या प्रेमाची सुरुवात नवी दिल्ली येथे झाली. आणि त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी विवाह केला. त्यांना दोन मुली आहेत.
….……………………………………………..………………….
” CUSTOMER IS THE KING OF MARKET “
….……………………………………………..………………….
∆ Boat च्या यशाचे रहस्य ?
Boat कंपनी मार्केटमध्ये येण्याआधी या क्षेत्रामध्ये भरपूर अशा कंपन्या होत्या आणि आजही आहेत तर मग Boat ने असे काय केले ज्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आज कंपनी मोठी आहे?
• कंपनीने मध्यमवर्गीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रॉडक्टची पॅकेजिंग उत्कृष्ट रित्या केले. Brand Ambassador म्हणून स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या याची निवड केली. कंपनीने मोठ्या प्रमाणात केलेली मार्केटिंग आणि त्यामागील प्लॅनिंग मोठ्या प्रमाणात केले.
• त्यानंतर त्यांनी आयुष्मान खुराणा, कियारा अडवाणी, दिलजीत सिंग, पृथ्वी शॉ यांच्यासारख्या प्रसिद्ध असणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून प्रोडक्टची मार्केटिंग केली.
• मध्यमवर्गीय लोकांना वस्तू घेताना एक चांगल्या प्रकारची अनुभूती मिळावी म्हणून ही योजना वापरण्यात आली. आणि त्याचे प्रतिसाद आपण आज पाहतच आहोत.
हेडफोन्स पासून सुरुवात करून आज मार्केटमध्ये स्मार्ट वॉच, ब्लूटूथ Earphones,Speaker, Power Bank , चार्जर असे विविध प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत.
∆ सुरुवातीच्या काळात लोन घेण्यासाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या होत्या पण प्रत्येक ठिकाणावरून त्याला नकार देण्यात आला. अनेक बँकांनीही त्याला नकार दिल्यामुळे थोड्याशा प्रमाणात तो निराश झाला होता. पण मनामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची धडपड होती त्यामुळे त्याने हार मानली नाही.
∆ Aman Gupta Networth :
रिपोर्टनुसार अमन गुप्ता कडे 720 करोड रुपयांची संपत्ती आहे. अमन हा विविध स्टार्ट अप मध्ये गुंतवणूक करतो. त्याने आज पर्यंत भरपूर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्याने आजपर्यंत 118 विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
∆ शार्क टॅंक इंडिया चा फायदा ?
शार्क टॅंक इंडिया या कार्यक्रमामुळे अमन प्रसिद्ध झाला. त्यामुळे सोशल मीडिया तसेच अन्य ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचे फॉलोवर्स वाढू लागले. युवा वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा चाहता वर्ग आज निर्माण झालेला आहे. त्याचा मनमिळावू स्वभाव सर्वांना आकर्षित करत असतो.
शार्क टॅंक च्या तिन्ही सीजन मध्ये तो शार्क म्हणून होता. याचा फायदा Boat Company ला पण झाला. अमनला बॉलिवूड चे खूप मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे.
आज पर्यंत त्याला विविध पुरस्कार मिळालेले आहेत, काही दिवसापूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते National Creator Award For Celebrity Creator हा पुरस्कार मिळाला
#Boat
#BoatIndia
#MadeInIndia
#PopularHeadphones
#Trending
#mahiteesatha
आणखी पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा