BSNL Case Study | BSNL is Back | New Recharge Plans Effect

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

BSNL Case Study

प्राइवेट कंपन्यांनी वाढवलेल्या दरामुळे BSNL चर्चेत आहे. तर BSNL बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्यासाठी शेवट पर्यंत वाचा.

• BSNL ची सुरुवात कशी झाली :


BSNL म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेड याची सुरुवात ऑक्टोबर 2000 मध्ये झाली. याचा मुख्य उद्देश एवढाच होता भारतातील प्रत्येक सामान्य माणसांमध्ये संवाद घडवण्याचं एक माध्यम. कंपनीने सुरुवातीपासूनच सर्वसामान्य लोकांना परवडेल असे प्लॅन्स केलेले होते.

• BSNL हे सरकारी कंपनी असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारचं नेटवर्क मिळावं यासाठी BSNL नेहमीच प्रयत्न करत असत.

• प्रायव्हेट क्षेत्रात देखील इतर अनेक कंपन्या होत्या परंतु BSNL ने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला होता त्यामुळे 2001 ते 2008 पर्यंत बीएसएनएल चांगला नफा करत होता. एकदाही त्यांना तोटा सहन करावा लागणार नाही.
तब्बल 46,668 रुपयांचा नफा बीएसएनएलने केला .

टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री मधला तब्बल 70% भाग बीएसएनएल सांभाळत होता.

BSNL 5G Planning

BSNL चा डाऊन फॉल कसा सुरु झाला :

हिंदीमध्ये एक म्हण आहे, लालच बुरी बला है. या म्हणीप्रमाणे तेव्हाच्या गटबंधन सरकारमधील टेली कमुनिकेशन मिनिस्टर Dayanidhi Maran यांनी त्यांच्या घरी बीएसएनएलच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत 323 हाय कनेक्शन लाइन्स च्या मार्फत त्यांच्या SUN TV Network या मीडिया चॅनलला इंटरनेट सप्लाय करत होते.

सीबीआयच्या चौकशीनंतर हे सत्य उघडकीस आले. त्यामुळे Dayanidhi Maran यांना राजीनामा द्यावा लागला.

पुढे त्यांच्याच पक्षाचे A.Raja मिनिस्टर झाले. त्यांच्या कार्यकाळात 2G मोठे मोठे प्रकल्प करण्यासाठीं टेंडर दिले होते.
परंतु नंतर त्यामधे 1.76 लाख करोड रूपयांचा घोटाळा प्रकरण चालू झाले.


• एवढ्या मोठ्या घोटाळ्याच्या आरोपामुळे तेव्हापासून बीएसएनएलची उलटी गिनती चालू झाली. आज पर्यंत बीएसएनएल ला तोटा होत गेला.

• त्यानंतर A.Raja यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा देण्यात आला. त्यामुळे हा घोटाळा होता का नाही याची कोणत्याही प्रकारची सत्यता समोर आली नाही.

• परंतु बीएसएनएल वरचा विश्वास ग्राहकांच्या मनामधून उतरून गेला. फक्त सीबीआय च नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष BSNL कडे वळले.

सीबीआय च्या चौकशीमध्ये फक्त मोठ्याच नव्हे तर लहान लहान टेंडर मध्ये सुध्दा घोटाळे उघडकीस आले. त्यामूळे BSNL वरची विश्वासाहर्ता लोकांच्या मनातून निघून गेली.

• या काळामध्ये प्रायव्हेट कंपन्या जसे आयडिया, वोडाफोन, एअरटेल या कंपन्यांनी जोरदार प्रयत्न केले आणि मार्केट वरती ग्राहक संख्या वाढवण्याचे वेगवेगळे प्रयत्न चालू केले. मोठ्या प्रमाणात त्यांचे टॉवर उभारणीचे प्रकल्प हाती घेतले.

• बीएसएनएल वर वाढत्या चौकशा त्यामुळे त्यांना या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळच नव्हता. नवीन प्रकल्प हाती घेण्याचे तर सोडाच परंतु जे आहेत ते सुद्धा सांभाळता आले नाही.

• सरकारी कंपनी असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमध्ये खूप फरक दिसून येत असायचा. ग्राहकांना उद्धट बोलणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण न करणे , कामाची टाळाटाळ करणे यामुळे देखील बीएसएनएलला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला.

• Jio ची भव्य सुरूवात :
2016 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे अध्यक्ष मुकेश भाई अंबानी यांनी जिओ ची घोषणा केली. सुरुवातीला जिओ ने फ्री मध्ये इंटरनेट ही संकल्पना मांडल्यामुळे सर्वच टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री मधील कंपन्यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसला.

• त्यामुळे अनेक कंपन्यांचे ग्राहक Jio कडे वळले.
• जिओ मध्ये डायरेक्ट 4G कनेक्शन आणि तेही अगदी मोफत मिळत असल्यामुळे सर्व ग्राहक संख्या जिओकडे आकर्षित झाली.

Recharge Plans

∆ आता बीएसएनएलची एवढी चर्चा कशामुळे होत आहे ?
तर प्रायव्हेट क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लान चे दर वाढवल्यामुळे सर्वत्र #PortBSNL हे हॅशटॅग चर्चेत आहे.

प्रायव्हेट कंपन्यांची मनमानी चालू नये त्यामुळे लोकांमध्ये खास करून सोशल मीडिया माध्यमांमध्ये या गोष्टीची चर्चा सुरू आहे. कारण बीएसएनएल सारख्या सरकारी कंपन्या टिकल्या तरच प्रायव्हेट कंपन्यांवरती सरकारचा थोडाफार नियंत्रण राहील.

प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त एक दोन कंपन्या असतील तर ते सर्वांसाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे स्पर्धा ही पाहिजेच.

बीएसएनएल चा रिचार्ज चे दर इतर कंपन्यांच्या तुलनेत फार कमी असल्यामुळे ही अनेक जण BSNL कडे जाण्याच्या तयारीत आहेत.

BSNL पुन्हा रिस्टार्ट करेल का ?
केंद्रात असलेल्या मोदी सरकारने बीएसएनएलला चांगल्या प्रकारे मदत करण्याचे ठरवले आहे.89,047 करोड रुपयांचा निधी सरकारद्वारे कॅबिनेट मीटिंगमध्ये मंजूर झाला.

त्यामुळे बीएसएनएल ला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये चांगले दिवस येतील अशी आशा सर्वांनाच आहे.

#BSNL is Back

BSNL मध्ये Tata ची एन्ट्री :
BSNL ने 4G कनेक्शन च्या टॉवर उभारणीचे प्रकल्प रतन टाटा यांची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस 15000 करोड रुपयांचे टेंडर दिलेले आहे. आणि लवकरच 2025 पर्यंत सर्व ठिकाणी 5G सुविधा देण्याचे प्रकल्प यामध्ये समाविष्ट आहेत.

• त्यामुळे सध्या बीएसएनएलची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.
ग्रामीण भागामध्ये बीएसएनएलचे नेटवर्क बऱ्यापैकी चालतं परंतु शहरांमध्ये त्यांनी तेवढ लक्ष दिलं नसल्यामुळे. तेथे नेटवर्क कनेक्शन बरोबर येईल का याकडे पाहण्यासारखा आहे.

बीएसएनएल ने केलेली नवीन सुरुवात ग्राहकांच्या पसंतीस येईल ?  हा मोठा प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे.

यातून एक गोष्ट लक्षात येते की , स्वतःमध्ये बदल करावे लागते. नाहीतर मागून येऊन लोक आपल्या पुढे जातील.आणि आपल्याला कळणार ही नाही .


अशाच प्रकारच्या आणखी पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा

1 thought on “BSNL Case Study | BSNL is Back | New Recharge Plans Effect”

Leave a Comment