Priyadarshini Indalkar Biography |Maharashtrachi Hasyajatra Actress

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

Priyadarshini Indalkar Biography

महाराष्ट्राची हास्य जत्रा या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून सुप्रसिद्ध झालेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शनी इंदलकर. प्रियदर्शनी चे संपूर्ण जीवन कथा वाचण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

• अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर चा जन्म 19 जानेवारी 1995 ला झाला. आई वडील दोघेही इंजिनियर असल्यामुळे ते सतत आपल्या कामांमध्ये व्यस्त असायचे. लहान असताना प्रियदर्शनीला नाटकाची आवड असायची.

नाव : प्रियदर्शनी संभाजी इंदलकर
जन्म : 19 जानेवारी 1995
जन्मस्थळ : पुणे
शाळा : रेणुका स्वरूप हायस्कूल पुणे
कॉलेज : कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, पुणे
धर्म : हिंदू
भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी
राष्ट्रीयत्व : भारतीय
कार्यक्षेत्र : अभिनय

वयाच्या दहा ते बाराव्या वर्षीच नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. पहिल्या नाटकांमध्ये तिला फक्त एकच ओळीचा डायलॉग मिळाला, नंतर हळूहळू तिच्या अभिनयामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होत गेली तशा प्रकारे तिला चांगल्या भूमिका मिळू लागल्या.

2010 ला प्रियदर्शनी ई टीव्हीच्या अफलातून या कार्यक्रमात च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली. त्या कार्यक्रमाची ती विजेता ठरली. स्टँड अप कॉमेडीचा तो शो होता.

त्यानंतर प्रियदर्शनीला कलाक्षेत्रामध्येच काम करण्याची आवड निर्माण झाली. परंतु सर्वसामान्य पालकांप्रमाणे आई-वडिलांना वाटत होतं की पुढे चालून काम मिळेल का नाही. याबाबत त्यांच्या मनामध्ये नेहमीच शंका असायची.

• त्यामुळे आई वडिलांच्या इच्छे पोटी प्रियदर्शनी ने पुणे विद्यार्थी गृह संचालित कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी पुणे येथे प्रवेश घेतला. परंतु प्रियदर्शनीच्या मनामध्ये काही दुसरं असतं.

कॉलेजमध्ये असताना तिने तेथील स्नेहसंमेलनात तसेच इतर कार्यक्रमात देखील नाटक, पटनाट्य, एकांकिकेमध्ये सहभाग घेत होती.

• तिच्या मनामध्ये अभिनेत्री होण्याचे स्वप्न त्या काळामध्ये साकारत होतं. त्यानंतर तिने शॉर्ट फिल्म करण्यास सुरुवात केली. आसरा ही तीची पहिली शॉर्ट फिल्म होती.
त्यानंतर अनुरूप, Woong Woong या शॉर्ट फिल्म मध्ये दिसून आली.

कॉलेजमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर कॉलेजच्या कॅम्पस मधून आयटी क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी मिळाली होती. परंतु पंधरा दिवसांमध्येच तिने तो जॉब सोडून दिला.

• मनामध्ये कलाक्षेत्रामध्ये जाण्याचे ठरवलेलं होतं त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही असं प्रियदर्शनीने मनोमन कोरुन ठेवलं होतं.

• मग काय त्यानंतर पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास वारंवार चालू झाला. वेगवेगळ्या ऑडिशनसाठी प्रियदर्शनी मुंबईला जात असे. या काळामध्ये अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी प्रियदर्शनीला मोठ्या प्रमाणात मदत केली या क्षेत्राबद्दल माहिती सांगत गेली त्यामुळे प्रियदर्शनी आजही त्यांना मुंबईची आई असे संबोधते.

काही दिवसानंतर तिला आमच्या ही च प्रकरण या व्यवसायिक नाटकामध्ये काम करण्याची संधी मिळाली.

• महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभराव हिच्या सोबत प्रियदर्शनी काही दिवस राहिली. त्यानंतर अभिनेत्री शिवाली परब तिच्यासोबत ही प्रियदर्शनी राहत असे.

त्यांच्यामध्ये झालेली मैत्री आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून दिसून येते.

Priyadarshini’s First Webseries :

काल सूत्र या वेब सिरीज च्या माध्यमातून प्रियदर्शनी ची वेब सिरीज मध्ये एन्ट्री झाली. सुबोध भावे,सयाजी शिंदे यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली.

Priyadarshini’s Marathi Movie :
भाऊबळी
• सोयरीक

या मराठी चित्रपटांमध्ये हे तिने चांगल्या प्रकारे भूमिका केलेली आहे.

• वेगवेगळ्या इंग्लिश कार्टून्स तसेच दक्षिणात्य चित्रपटांमध्ये हे प्रियदर्शनीने व्हॉइस डबिंग केलेला आहे. तसेच भरत नाट्यम सारख्या कलेमध्येही तिने चांगल्या प्रकारे धडे गिरवलेले आहेत .त्यातही तिचे कौशल्य सतत तिच्या चाहत्यांना ते सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवत असते.

• घरामध्ये तिला लाडाने तिचे आई वडील चिम्या असे म्हणतात. आज त्यांची ही चिम्या संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री झालेली आहे. आपल्या गमतीदार अभिनयाच्या जोरावरती आजवर प्रियदर्शनीने तिची कला जोपासली आहे.

• फुलराणी या मराठी चित्रपटांमध्ये प्रियदर्शनी इंदलकर मुख्य भूमिकेमध्ये दिसून आली. त्यामध्ये केलेल्या कामाबद्दल तिचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं.

तिला आजपर्यंत वेगवेगळे पुरस्कार मिळालेले आहेत.
2024 चा सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्री म्हणून तिला लोकमत फिल्मफेअर अवॉर्ड मिळालेला आहे.
a woman holding a black statue

∆ महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील प्रिया :

महाराष्ट्राची हास्य जत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रियदर्शनी सर्वत्र प्रसिद्ध झाली. प्रियदर्शनीचे कॉमेडीचे टाइमिंग तिचे अभिनय करण्याची कला प्रेक्षकांच्या पसंतीस आलेली आहे.

• वेळोवेळी तिला कार्यक्रमाचे जज सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक यांच्याकडून कौतुकाची थाप मिळत आलेली आहे.


अश्याच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा


Leave a Comment