Hruta Durgule Biography

ऋता दुर्गुळे चा जन्म 12 जानेवारी 1993 ला झाला. तिचं मूळ गाव रत्नागिरी. परंतु अभिनय क्षेत्रात काम करत असल्यामुळे मुंबई येथे सध्या वास्तवास आहे. तिचे प्राथमिक शिक्षण मुंबई मधल्याच V.N Sale Guruji English School येथे झाले. तसेच महाविद्यालयीन शिक्षण Ramnarain Ruia College,Matunga मुंबई येथे झाले.
• ऋता दुर्गुळे ची अभिनय क्षेत्रातली वाटचाल :
ऋताने या क्षेत्रामध्ये पुढचं पाऊल या मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरू केलं. 2011 मध्ये पुढचं पाऊल या मालिकेमध्ये तिने सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलेलं होतं.
• पहिली मालिका :
अभिनय क्षेत्रात पहिल्यांदाच दूर्वा या मालिकेमध्ये तिला महत्त्वाची भूमिका मिळाली. या मिळालेल्या संधीच्या जोरावरती तिनं चांगल्या प्रकारे काम केलं. परंतु परमेश्वराच्या मनामध्ये काही दुसरंच होतं. या मालिकेमुळे तिला जास्त काही प्रसिद्धी मिळाली नाही. पण तिचं या क्षेत्रामध्ये पदार्पण झालेलं होतं.
नाव : | ऋता दिलीप दूर्गुळे |
जन्म : | 12 जानेवारी 1993 |
जन्मस्थळ : | मुंबई |
शाळा : | V.N Sale Guruji English School,Mumbai |
कॉलेज : | Ramnarain Ruia College,Matunga मुंबई |
वडील : | दिलीप दुर्गुळे |
आई : | नीलिमा दुर्गुळे |
पती : | प्रतिक शहा |
भाऊ : | ऋग्वेद दुर्गुळे |
कार्यक्षेत्र : | अभिनय |
राष्ट्रीयत्व : | भारतीय |
प्रमुख भूमिका : | वैदही (फुलपाखरू) |
त्यानंतर 2017 मध्ये झी युवा वाहिनीवरील फुलपाखरू या मालिकेमुळे तिला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. मालिका जरी बंद झाली असली तरी अभिनयाला आजही त्याच प्रमाणात चांगल्या प्रकारे पाहिलं जातं.
• Phulpakharu (फुलपाखरू) ची यशस्वी कारकीर्द :
झी युवा चैनल वरती प्रसारित होणाऱ्या फुलपाखरू या मालिकेच्या माध्यमातून ऋता चांगल्या प्रकारे प्रेक्षकांच्या पसंतीस येऊ लागली.
~ या मालिकेमध्ये एका श्रीमंत उद्योजकाच्या मुलीची भूमिका ऋता ला मिळाली होती.

तसेच 2020 मध्ये अभिनेता सुमित राघवन यांच्यासोबत तिने एक शॉर्ट फिल्म केली. स्ट्रॉबेरी शेक असं त्या शॉर्ट फिल्म च नाव होतं. त्यामध्ये तिला मृण्मयी (चिऊ) चे पात्र मिळाले होते.
~ कॉलेजच्या तरुण-तरुणी वरती आधारित या मालिकेची रचना होती. त्यामुळे युवा वर्गातील लोकांची याकडे जास्त पसंती होती.
• मुख्य संकल्पना कॉलेजमधील मित्र-मैत्रिणींचा समूह कशाप्रकारे वावरतो, कॉलेजचे ते सुवर्ण दिवस जगतो, आयुष्याला आकार देण्याच्या दिवसांमध्ये स्वतःला घडवत असतो याबद्दल खूप चांगल्या प्रकारे या मालिकेच्या माध्यमातून दाखवण्यात आलं.
त्यानंतर 2018 मध्ये ऋताने उमेश कामत, आरती मोरे, ऋषी मनोहर यांच्यासोबत दादा एक गुड न्यूज आहे या नाटकांमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी केली.
त्यातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस आली. अनेक ठिकाणी त्यांचे हे नाटक हाउसफुल होत असे.
त्याच वर्षी सिंगिंग स्टार या गायनाच्या शोमध्ये तिने अँकरिंग करण्याचं काम केलं होतं
• मन उडू उडू झालं :
ऋताने मन उडू उडू झालं या मालिकेमध्ये दीपिका देशपांडे या भूमिकेमध्ये ती दिसून आली. प्रत्येक वेळी प्रमाणे याही वेळेस प्रेक्षकांनी तिला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला.~ या मालिकेमध्ये तिला एका बँकेतील वसोली डिपार्टमेंट मध्ये एक अधिकाऱ्याची भूमिका मिळाली होती.
~ त्याच डिपार्टमेंट मध्ये इंद्रा नावाच्या एका वसुली करणाऱ्या एजंट सोबत तिला प्रेम होते आणि त्यानंतर ते शेवटी लग्न करतात.
रोमांचक अशी या मालिकेची कहाणी आहे.
• त्यानंतर अनन्या, टाइमपास 3, कन्नी या चित्रपटांमध्ये हे ऋताने काम केलेलं आहे.

∆ ऋताला मिळालेले पुरस्कार :
• Maharashtra Times Sanman Puraskar (2015)
• Zee Yuva Sanman Puraskar (2016)
• Sanskriti Kaladarpan Gaurav Rajini Puraskar (2016)
• Times Of India’s Top 15 Most Desirable Women In Marathi Television Industry (2018)
• Second Majja Award (2019)
• Zee Natya Gaurav Puraskar (2019)
• Marathi Television Award (2019)
• Second Top 15 Most Desirable Women In Marathi Television Industry (2020)
असे अनेक अवॉर्ड आजपर्यंत तिला मिळत आलेले आहेत.

• Hruta Durgule Car Collection :
1. Hyundai i20
2. Hyundai Creta
• Disney Hotstar वरती नुकतेच प्रदर्शित झालेल्या Commander Karan Saxena यामध्ये ऋताने एसीपी रचना म्हात्रे ही व्यक्तिरेखा साकारलेली आहे.
• Hruta Durgule Instagarm :
Social Media माध्यमांमध्ये ऋता active असते. तिचे Instagram वरती 2.6 Million Followers आहेत.तिच्या चाहत्यांनी काढलेले अनेक फॅन पेज सुद्धा आहेत.आणि त्यावरती लाखो Followers आहेत.
अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा
7 thoughts on “Hruta Durgule Biography | Phulpakharu Actress | Commander Karan Saxena”