Rahul Dravid Biography In Marathi| Rahul Dravid Networth

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now
 
• भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने 29 जून 2024 रोजी T-20  वर्ल्डकप जिंकला आहे. त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत तसेच संघामध्ये केलेले विशिष्ट बदल आहेत.
 
प्रत्येक खेळाडूकडे विशिष्ट लक्ष देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम राहुल द्रविड यांच्यामार्फत करण्यात आलं. राहुल द्रविड यांचा आजपर्यंतचा प्रवास आपण थोडक्यात पाहणार आहोत.
 
Rahul Dravid Cricket Team Coach
Rahul Dravid Image
नाव : राहुल शरद द्रविड 
जन्म : 11 जानेवारी 1973 
जन्मस्थळ : इंदोर, मध्य प्रदेश 
वडील : शरद द्रविड 
आई : पुष्पा द्रविड 
पत्नी : विजेता पेंढारकर , अनियमित यष्टीरक्षक 
शाळा : बंगळूर येथील सेंट जोसेफ बॉइज हायस्कूलमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतले, तसेच सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली.
शिक्षण : MBA 
अपत्ये : समित, अन्वय 
विशेषता : फलंदाज , अनियमित यष्टीरक्षक 
पुरस्कार : पद्मश्री – 2004
              पद्मभूषण – 2013
संपत्ती : 1,91,73,80,050 रुपये 
 

Rahul Dravid Biography In Marathi

 
• राहुल द्रविड यांचा जन्म 11 जानेवारी 1973 ला मध्य प्रदेश येथील इंदोर येथे झाला. जन्म झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांचा संपूर्ण परिवार इंदोर वरून बेंगलोर येथे स्थायिक झाले. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील जास्त काळ हा बेंगलोर येथेच व्यतीत केला.
 
• द्रविड हे मराठा ब्राह्मण परिवारातून येत असल्यामुळे त्यांना मराठी चांगल्या प्रकारे येते त्यासोबतच त्यांना कन्नड,हिंदी, इंग्रजी या भाषांवरती सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांची पकड आहे. त्यांना एक लहान भाऊ सुद्धा आहे त्याचे नाव विजय आहे.
 
• राहुल यांचे वडील शरद द्रविड हे एका जॅम बनवणाऱ्या कंपनीमध्ये काम करत होते. त्यावरूनच द्रविड यांचं टोपण नाव जॅमी असं ठेवण्यात आलं. त्यांची आई एका कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या. त्यामुळे घरात एक सुसंस्कृत वातावरण सुरुवातीपासूनच निर्माण झालेलं होतं. द्रविड यांनाही अभ्यासाची चांगली आवड निर्माण झाली होती.
 
• द्रविड यांचं शालेय शिक्षण बंगळूर येथील सेंट जोसेफ बॉइज हायस्कूलमध्ये झालं. तसेच सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली. त्यानंतर पुढील एमबीएचे शिक्षण घेत असताना द्रविड यांचे भारतीय क्रिकेट संघात निवड झाली.
 
∆ लहानपणापासूनच क्रिकेटचे वेड : 
 
• द्रविड यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासूनच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या वडिलांना क्रिकेट पाहण्याची आवड होती. त्यांना सुरुवातीपासूनच बॅटिंग करण्याची आवड असल्यामुळे त्यांनी त्यांचे संपूर्ण लक्ष बॅटिंग कडे दिलं.
 

• द्रविड यांनी तसेच त्यांच्या पालकांनी त्यांच्यातील फलंदाजी करण्याचे कौशल्य याकडे विशेष लक्ष दिलं होतं.संघात आल्यापासूनच चांगल्या प्रकारे संधी मिळत गेल्या आणि त्या संधीच रूपांतर त्यांनी सोन्यात केलं.



 

∆ क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात : 

द्रविड यांनी कर्नाटक टीम कडून अंडर 15 , अंडर 17 , अंडर 19 खेळले. चांगल्या प्रकारे त्यांनी प्रदर्शन केल्यामुळे 1991 च्या रणजी ट्रॉफीसाठी कर्नाटक टीमकडूनच त्यांची निवड करण्यात आली. तेथे त्यांनी चांगल्या प्रकारे कामगिरी केली.
 
∆ इंटरनॅशनल क्रिकेट ची सुरुवात : 
राहुल द्रविड यांचे 1996 ला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. विनोद कांबळी यांच्या ऐवजी राहुल द्रविड यांना सिलेक्ट करण्यात आलं.
 
∆ वन डे करिअर : 
राहुल यांचा वन डे करिअर हे खूप अडथळ्यातून सुरू झाल. त्यांना त्यामध्ये चांगल्या प्रकारे प्रदर्शन करता आलं नाही. त्यांची रन काढण्याची गती खूप कमी झाली होती त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे रोशाला सामोरे जावे लागले.
…………………………………………………………..
“कोणत्याही मोठ्या गोष्टीची सुरुवात ही अपमानातूनच होते”
…………………………………………………………..


 
राहुल यांनी स्वतःवरती विश्वास ठेवत प्रचंड मेहनत घेत सिद्ध करून दाखवलं की ते सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक आहेत.
 
2007 च्या T-20 विश्वचषका नंतर भारताने आज पर्यंत T-20 विश्व चषक जिंकलेलं नव्हतं त्यामुळे सर्व भारतीयांना या वर्ल्ड कप  ची खूप आतुरता होती. पण शेवटी 29 जून 2024 ला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संघाने वर्ल्ड कप जिंकला. आणि जिंकल्यानंतर सर्व टीमने राहुल द्रविड यांना उचलून जल्लोष केला. 


 
• रोहित शर्मा (कर्णधार)
• यशस्वी जयस्वाल
• विराट कोहली
• सूर्या कुमार यादव
• कुलदीप यादव
• युझवेंद्र चहल
• अर्षदीप सिंग
• जसप्रीत बुमराह
• मोहम्मद सिराज
• हार्दिक पांड्या
• शिवम दुबे
• रवींद्र जडेजा
• अक्षर पटेल
• संजू सॅमसन
• ऋषभ पंत
 
T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राहुल द्रविड यांनी प्रशिक्षक पदावरून निवृत्ती घेतली.

CA Rachana Ranade Biography

 
 
 राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शना खाली खेळलेल्या या टीमचे नाव अनेक वर्ष भारतीयांच्या लक्षात राहील. या विजयानंतर मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात झालेली मिरवणूक तसेच वानखेडे स्टेडियम वरचे सेलिब्रेशन संपूर्ण जगाने पाहिलेला आहे
अशाच प्रकारचे आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा 

1 thought on “Rahul Dravid Biography In Marathi| Rahul Dravid Networth”

Leave a Comment