Dhananjay Powar Biography | Big Boss Marathi | Popular YouTuber

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

Dhananjay Powar Biography

धनंजय पोवार हे नाव सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गाजत आहे,त्याला कारण ही तसंच आहे. Big Boss Marathi मध्ये यावर्षीच्या सीझनमध्ये धनंजय पोवार हे देखील सहभागी झालेले आहेत. त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

  1. कोण आहेत धनंजय पोवार ?
  2. त्यांना एवढी प्रसिद्धी कशामुळे मिळाली ?
  3. धनंजय पोवार किती कमवतो ?
  4. सोसायटी फर्निचर ची सुरुवात कशी झाली ?
  5. Instagram ला एवढा प्रतिसाद कसा मिळाला ?
  6. बिग बॉस मराठीमध्ये ते सगळ्यांपेक्षा वेगळे कसे राहतील ?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आपल्या या ब्लॉगमधून पाहूया .

  • कोण आहेत धनंजय पोवार ?
    धनंजय पोवार हे एक Instagram इन्फ्लुअंसेर तसेच युट्युबर आहेत. त्यासोबतच त्यांचा फर्निचरचा खूप मोठा व्यवसाय देखील आहे. सोसायटी फर्निचर या नावाने कोल्हापूर मध्ये भव्य असं फर्निचर चे शोरूम आहे.
  • Dhananjay Powar Lifestyle

धनंजय यांचा जन्म कोल्हापूरच्या इचलकरंजी येथे झाला. कोल्हापूर म्हटलं की राजश्री शाहू महाराज यांच्या आठवणींना उजाळा मिळतो. आज पर्यंत कोल्हापूर मधून अनेक पैलवान हे महाराष्ट्राने पाहिलेले आहेत त्याच कोल्हापूरच्या मातीतला एक मजेशीर पैलवान म्हणजे धनंजय पोवार.

धनंजय चे शिक्षण व्यंकटेश माध्यमिक विद्यालय येथून झाले. शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी गोविंदराव ज्युनिअर कॉलेज येथून महाविद्यालयीन शिक्षण घेतलं.

धनंजय पोवार यांनी त्यांच्या यूट्यूब चैनल ला 1 मे 2020 ला सुरुवात केली.
नाव : धनंजय अजित पोवार
जन्म :13 जुलै
जन्मस्थळ : इचलकरंजी (कोल्हापूर)
व्यवसाय :The Society Furniture
शाळा : व्यंकटेश माध्यमिक विद्यालय
कॉलेज :गोविंदराव ज्युनिअर कॉलेज
वडिल :अजित पोवार
आई : अश्विनी पोवार
पत्नी :कल्याणी पोवार
बहीण :अंकिता पोवार
धर्म : हिंदू
राष्ट्रीयत्व : भारतीय
छंद : ॲक्टिंग तसेच कन्टेन्ट क्रिएशन
Dhananjay Powar Big Boss Marathi
  1. त्यांना एवढी प्रसिद्धी कशामुळे ?
    धनंजय हे Instagram वरती सतत Active असतात. आपल्या विनोदी शैलीच्या माध्यमातून ते महाराष्ट्रातील त्यांच्या फॉलोवर्स ना वेगवेगळ्या रिल्स च्या माध्यमातून तसेच Youtube चॅनलच्या माध्यमातून मनोरंजन करत असतात.

त्यामुळे त्यांचा एक मोठा चाहता वर्ग तयार झालेला आहे. आणि फक्त साधा नाही तर त्यांच्या भाषेत सांगायला गेलं तर कट्टर फॅन्स आहेत.

युट्युब वरती ते त्यांच्या परिवारासोबत तसेच त्यांच्या सोसायटी फर्निचर या त्यांच्या व्यवसायातील सहकाऱ्यांसोबत व्हिडिओ करतात आणि ते इन्स्टा तसेच युट्युब वरती अपलोड करतात त्यामुळे ते लोकांच्या पसंतीस येतात.

त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला लाखांमध्ये व्ह्यूज येतात.

  • मटण प्रेमी धनंजय पोवार
    धनंजय ला मटण खाण्याची खूप आवड आहे.एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं होतं की आठवड्यातून 5 दिवस मी मटण खातो. मटण प्रेमी धनंजय अशी त्याची ओळख निर्माण झाली आहे.
  1. धनंजय पवार किती कमवतो ?
    Youtube च्या माध्यमातून जवळपास दोन लाखांपर्यंत धनंजय पवार यांची कमाई होते त्यासोबतच त्यांचे इतर देखील उत्पन्नाचे स्त्रोत आहेत जसे की इंस्टाग्राम त्यावरूनही चांगल्या प्रकारे ते कमाई करतात.
    त्यासोबतच त्यांचा व्यवसाय सोसायटी फर्निचर या मार्फत ही त्यांची लाखोंमध्ये कमाई होते.
  2. सोसायटी फर्निचर ची सुरुवात कशी झाली ?
    धनंजय च्या वडिलांनी या व्यवसायाची सुरुवात केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून जात त्यांनी या व्यवसायाला एका लहान रोपट्या पासून ते मोठ्या वटवृक्षात रुपांतर केले.
अजित रामचंद्र पोवार यांनी 1980 ला सोसायटी फर्निचर ची सुरुवात केली. ते त्यांच्या चुलत भावाकडे वायरमन म्हणून काम करत होते. धनंजय हे देखील त्यांच्या YouTube Channel तसेच Instagram वरती The Society Furniture ची मार्केटिंग करतांना दिसतात.
  1. Instagram ला एवढा प्रतिसाद कसा मिळाला ?

धनंजय पोवार यांचे Instagram वरती 1.2 मिलियन Followers आहेत . 3654 येवढ्या पोस्ट देखील आहेत. आपल्या विनोदी शैलीच्या माध्यमातून ते आपल्याला मनोरंजन करत असतात.

  • त्यांच्या व्हिडिओ मध्ये कोण कोण असत.
    1.आई
    2.बायको
    3.बहिण
    4.वडील
    5.सर्जेराव
    6.दुकानातील कर्मचारी
    7.त्यांचे मित्र,दुकानात येणारे ग्राहक
  1. बिग बॉस मराठीमध्ये ते सगळ्यांपेक्षा वेगळे कसे राहतील ?

लहानांनपासून ते मोठ्या माणसांना देखील धनंजय चे व्हिडीओ पहावेसे वाटतात. त्यामूळे धनंजय Big Boss Marathi मध्ये सगळ्यांना आपलेसे करून घेईल यात शंका नाही.

Big Boss Marathi मुळे त्याला एक नवीन ओळख निर्माण होईल.

7 . Youtuber Dhanajay Powar :
धनंजय पोवार यांचे YouTube वरती 979K Subscribers आहेत. तसेच आज पर्यंत त्यांनी 1.7 K व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
Dhanajay Powar DP या नावाने त्यांचे YouTube Channel आहे. यूट्यूब च्या माध्यमातून धनंजय आज महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले आहेत.


अशाच प्रकारच्या प्रेरणादायी पोस्ट पाहण्यासाठी क्लिक करा


Leave a Comment