CA Rachana Ranade Biography | Rachana Ranade Age, Boyfriend, Husband, Networth

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now
CA Rachana Ranade यांचा आजपर्यंतचा प्रवास कश्या पद्धतीने झाला आहे. याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
 


CA Rachana Ranade Biography

 
CA रचना रानडे यांना आपण विविध भूमिकेत पाहिले असेल. शिक्षिका, सीए, युट्युबर अशा अनेक पद्धतीने त्यांना ओळखले जाते. त्यांचे आजी-आजोबा आणि आई पण शिक्षिका असल्यामुळे रचना यांना लहानपणापासूनच शिक्षण क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण झाली होती. मोठं झाल्यानंतर आपण पण शिक्षिका बनायचं असं त्यांनी मनामध्ये स्वप्न पाहिल होतं. घरातूनच या गोष्टीच बाळकडू त्यांना मिळालं असं म्हणता येईल.
 
लहानपणी चौथीत असल्यापासून रचना यांना पॉकेट मनी मिळायची. पण एक नियम होता. तो म्हणजे दिलेल्या पॉकेट मनी मधून किती पैसे खर्च केले आणि किती जमा केले त्याचा हिशोब महिन्याच्या शेवटी आईला द्यायचा. 
 
• जो जास्त पैसे जमा करेल त्याला दहा रुपये अधिकचे मिळणार होते. त्यामुळे रचना आणि त्यांच्या भावाला लहानपणापासूनच आईच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेचे धडे मिळत असत. 
 
✓ आईच्या मार्गदर्शनाखाली रचना यांना वेगवेगळ्या गुंतवणुकीच्या पर्यायाची माहिती मिळाली. 
1. बँकेतील FD (फिक्स डिपॉझिट) 
2. सोन्यातील गुंतवणूक 
3. आरडी 
अशा विविध पर्यायांची माहिती त्यांना मिळाली. 
 


 
 
नाव : रचना अक्षय रानडे 
जन्म : २६ जून 
जन्मस्थळ : पुणे ,महाराष्ट्र 
शाळा : अभिनव विद्यालय 
कॉलेज :
• Brihman Maharashtra College Of.                Commerce,Pune
• The institute of chartered accountant of India 
• Savitribai Phule Pune University 
राष्ट्रीयत्व : भारतीय 
पती : अक्षय रानडे (CA)
मुलगा: मेघ रानडे
 
 
 
∆ शेअर मार्केटची ओळख : 
 
दहावीचे शिक्षण झाल्यानंतर रचना यांनी पुढील शिक्षण वाणिज्य अभ्यासक्रम मधून घेतल. कॉलेजमध्ये पदवी प्रथम वर्षाच्या वेळेस  त्यांचा प्रियकर आणि सध्या नवरा असणारा अक्षय यांनी रचनाला सांगितले की तो सीए करत आहे. मग काय प्रियकरायला भेटण्यासाठी म्हणून रचना यांनी CA करण्याचं ठरवलं.
 
∆ CA चे internship करत असताना रचना यांना 1 हजार रुपये मिळायचे. मग ते कुठेतरी गुंतवणूक करावे असं त्यांना वाटायचं. त्यांचा भाऊ तेव्हा CA झालेला होता. त्यांनी शेअर मार्केट बद्दल रचना यांना कल्पना दिली. त्यानंतर त्यांनी याबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली.
 
 
∆ टिप्स वरून केली पैशाची माती : 
 
लोकांनी दिलेल्या टिप्सच्या आधारावरती रचना यांनी गुंतवणूक करायला सुरुवात केली. आणि दोन वर्षानंतर 2008 ला मार्केट खूप कोसळले. मार्केटच्या या मोठ्या भूकंपामुळे रचना यांचा पोर्टफोलिओ 80 टक्के पडला. 
 
~ कोणत्याही अभ्यासाविना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे किती धोकादायक असतं हे यावरून समजतं. 
 
~ स्टॉक्स बद्दल फंडामेंटल अनालिसिस करणे खूप गरजेचं असतं. या क्षेत्रामध्ये येणारे नवीन लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. कोणाच्यातरी सांगण्यावरून गुंतवणूक करतात आणि मग मोठा तोटा सहन करावा लागतो. 
 
~ आपल्या झालेल्या चुका शोधून त्यावर ते आपण कोणत्या चुका केल्या आणि भविष्यात काय काळजी घ्यायला पाहिजे याबद्दल त्यांनी विचार करायला सुरुवात केली. 
 
~ ज्या ब्रोकर कडे डिमॅट अकाउंट काढलं होतं त्याच्याकडे जाऊन त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारून रचना माहिती घेत राहिल्या. 
 
∆ सीए चा निकाल : 
 
2009 ला सीए चा निकाल लागला आणि रचना पहिल्या प्रयत्नातच CA झाल्या. लहानपणापासूनच शिक्षिका बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रचनाने शिक्षिकाच बनायचं असं ठरवलं होतं. यामध्ये घरच्यांची ही त्यांना साथ मिळाली.
 
• आजोबांची शिकवण : 
 
” रचना तू चांभार बनण्याचं जरी ठरवलं तरी पुण्यातल्या सर्व लोकांनी म्हणलं पाहिजे की चप्पल शिवायचं असेल तर ते तिच्याकडूनच” असं काहीतरी कर की ज्यामध्ये तू सर्वश्रेष्ठ असलं पाहिजे.
 
• त्यांनी एका महाविद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली. परंतु त्यावेळी त्यांचे मित्र मैत्रिणी त्यांच्यावर हसायचे. एवढ्या कमी पगारांमध्ये हे काम करत आहे म्हणून.
 
कारण रचना या पहिल्या प्रयत्नामध्येच CA झाल्या होत्या त्यांना कोणत्याही मोठ्या नामांकित कंपनीमध्ये चाळीस-पन्नास हजार रुपयांची नोकरी सहज मिळाली असती.


 
∆ कसा सुरू झाला शेअर मार्केट कोर्सचा प्रवास ?
 
2019 ला शेअर मार्केट या क्षेत्राकडे येऊ इच्छिणाऱ्या नवीन लोकांना बेसिक माहिती मिळावी यासाठी त्यांनी कोर्सची सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्याकडे काही विद्यार्थी आले आणि त्यांनी व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करण्याचे सुचवले. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत रचना यांनी 12 पैकी एक व्हिडिओ youtube ला अपलोड केला.
 
ज्या कॉलेजमध्ये त्या शिकवण्यासाठी जात होत्या तेथील सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की तो व्हिडिओ बघा त्यावरतीच आधारित तुम्हाला Viva मध्ये महत्वाचे प्रश्न येणार आहेत.सर्व विद्यार्थ्यांनी बघितला आणि आपल्या मित्रांसोबत शेअर केला
 
. बघता बघता तीन महिन्यात 25 हजारांच्या वरती व्ह्यू झाले. तो व्हिडिओ व्हायरल होत गेला आज त्या व्हिडिओला दोन कोटी पेक्षा जास्त व्ह्यूज आहेत. 
 
∆ शेअर मार्केट मधील महिला आणि पुरुषांचा सहभाग :
 
 जेव्हा रचना यांनी त्यांच्या व्हिडिओचं Statistics बघितलं तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात आली. 
शेअर मार्केटमध्ये पुरुष 80% आणि स्त्रिया 20% असं प्रमाण आहे. महिलांमध्ये शेअर मार्केट विषयी असणारा कमी आत्मविश्वास त्यांना जाणवला.
 
∆ पैशाचे नियोजन : 
 
मित्रांनो पैशाने पैसा वाढत जातो , तो कशा पद्धतीने वाढवला पाहिजे याचे ज्ञान असायला पाहिजे. आपण ज्या ठिकाणी गुंतवणूक करतो ते गुंतवणूक आपल्याला किती फायदेशीर होईल याचा अंदाज घ्यायला पाहिजे.


 
• शेअर मार्केटचे वेगवेगळे ब्रोकर्स : 
 
1.Groww 
2.Zerodha 
3. Angle One
4. Upstox
5. 5 Paisa
6. ICICI Direct 
7. Fyers
8. Kotak Securities 
 
आणखी बरेच ऑनलाईन ब्रोकींग ॲप्स च्या माध्यमातून आपण शेअर खरेदी आणि विक्री करू शकतो. 
 
• रचना यांच्या www.rachanaranade.com या वेबसाईट वरती शेअर मार्केट विषयी विविध कोर्स पाहायला मिळतील. 
 
•युट्युब वरती त्यांचे 4.93 मिलियन सबस्क्राईब आहेत.
तसेच 
• इंस्टाग्राम वरती 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. 
 
 
 

1 thought on “CA Rachana Ranade Biography | Rachana Ranade Age, Boyfriend, Husband, Networth”

Leave a Comment