आरती संग्रह मराठीतून | Marathi Aarti Sangrah

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

आरती संग्रह मराठीतून | Marathi Aarti Sangrah याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की विविध प्रकारच्या आरत्यासंग्रह.

Aarti Sangrah

गणेश जी की आरती | aarti ganesh ji ki

जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा॥
एक दंत दयावंत, चार भुजा धारीI
माथे सिंदूर सोहे, मूसे की सवारी॥
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा॥
पान चढ़े फल चढ़े, और चढ़े मेवा।
लड्डुअन का भोग लगे संत करें सेवा॥
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा॥
अंधन को आंख देत, कोढ़िन को काया।
बांझन को पुत्र देत निर्धन को माया॥
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा॥
सूर’ श्याम शरण आए, सफल कीजे सेवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा॥
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा॥
दीनन की लाज रखो, शंभु सुतकारी।
कामना को पूर्ण करो जाऊं बलिहारी॥
जय गणेश जय गणेश, जय गणेश देवा।
माता जाकी पार्वती पिता महादेवा॥

दत्त आरती

त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।।

त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा II

नेति नेति शब्द न ये अनुमाना II

सुरवर मुनिजन योगी समाधि न ये ध्याना IIधृ II

जय देव जय देव जय श्रीगुरुदत्ता II

आरती ओवाळीता हरली भवचिंता II१ II

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त II

अभाग्यासी कैंची कळेल ही मात II

पराही परतली तेथें कैंचा हा हेत II

जन्ममरणाचा पुरलासे अन्त II२ II

दत्त येउनिया उभा ठाकला II

साष्टांगे नमुनी प्रणिपात केला II

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।।

जन्ममरणाचा फेरा चुकविला II जय. II३ II

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।।

हरपले मन झाले उन्मन II

मीतूंपणाची झाली बोळवण II

एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान II४ II


आरती गणपतीची

शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको ।।

दोंदिल लाल बिराजे सुत गौरीहरकों ।॥

हाथ लिये गुडलड्डू सांई सुरवर को ॥

महिमा कहे न जाय लागत हूं पदको ॥धृ॥.

जय जय जी गणराज विद्यासुखदाता ।।

धन्य तुमारा दर्शन मेरा मन रमता ॥

अष्टौ सिद्धी दासी संकटको बैरी ।।

बिघ्नबिनाशन मंगलमूरत अधिकारी ।।

कोटीसूरजप्रकाश ऐसी छबी तेरी।

गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारी ॥२॥

भावभगतसे कोई शरणागत आवे ।।

संपत संपत सबही भरपूर पावे।

ऐसे तुम महाराज मोको अति भावे।

गोसावीनंदन निशिदिन गुण गावे ॥३॥

—————————————————————————————————————————————

आरती ज्ञानदेवाची

आरती ज्ञानराजा॥

महाकैवल्यतेजा ।। सेविती साधुसंत ॥

मनु वेधला माझा ॥ आरती. ॥धृ.॥

लोपलें ज्ञान जगीं ।॥ हित नेणती कोणी ॥

अवतार पांडुरंग ॥ नाम ठेविलें ज्ञानी ॥१॥

कनकाचें ताट करी ॥ उभ्या गोपिका नारी ॥

नारद तुंबर हो । साम गायन करी ॥२॥

छडी प्रकट गुह्य बोले ।। विश्व ब्रह्मचि केलें ।॥

रामा जनार्दनीं ।॥ पायीं मस्तक ठेविले ॥३॥

—————————————————————————————————————————————

आरती विठ्ठलाची

येई हो विठ्ठले माझे माउली ये II

निढळावरी कर ठेवूनि वाट मी पाहें ॥धृ॥

आलिया गेलिया हाती धाडी निरोप।

पंढरपुरी आहे माझा मायबाप ॥१॥

पिवळा पितांबर कैसा गगनीं झळकला ।

गरुडावरी बैसौनि माझा कैवारी आला ॥२॥

विठोबाचे राज्य आम्हां नित्य दिपवाळी ।।

विष्णुदास नामा जीवें भावें ओवाळी ॥३॥

—————————————————————————————————————————————

आरती गणपतीची

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ॥

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ॥

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनःकामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।।

चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।।

हिरेजडित मुकुट शोभतो बरा।।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ २॥

लंबोदर पितांबर फणिवरबंधना ॥

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।

दास रामाचा वाट पाहे सदना ।।

संकष्टी पावावें निर्वाणी रक्षावें सुरवर वंदना ॥३॥


आरती विठ्ठलाची

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ॥

वामांगी रखुमाई दिसे दिव्यशोभा ।।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।।

चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ॥धृ॥

जय देव जय देव जय पांडुरंगा ॥

रखुमाई-वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा । जय देव जय देव ॥१॥

तुळसी-माळा गळा कर ठेवूनी कटी ॥

कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥

देव सुरवर नित्य येती भेटी ।।

गरुड हनुमंत पुढे राहती ॥२॥

धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ॥

सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।।

राही रखुमाबाई राणीया सकळा ॥

ओवाळीती राजा विठोबा सांवळा ॥३॥

ओवाळू आरत्या कुरवंड्या येती ॥

चंद्रभागेमाजी सोडुनिया देती ॥

दिंड्या पताका वैष्णव नाचती ।।

पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥

आषाढी कार्तिकी भक्तजन येती ॥

चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती ।।

दर्शन हेळामात्रे तया होत मुक्ती ॥

केशवासी नामदेव भावे ओवाळिती ॥५॥


श्री हरितालिकेची आरती

जय देवी हरितालिके ॥ सखी पावंती अंबिके ।।

आरती ओवाळीते ॥ ज्ञानदीपकळिके ॥धृ.॥

हर अर्धागी वससी ।। जासी यज्ञा माहरासी ।।

तेथे अपमान पावसी ।। यज्ञकुंडी गुप्त होसी ।॥ जय. ।।१।।

रिघसी हिमाद्रीच्या पोटी ।। कन्या होसी तू गोमटी ।।

उग्र तपश्रर्या मोठी ॥ आचरसी उठाउठी ।। जय. ॥२॥

तपपेचाग्निसाधने ।। धूम्रपाने अधोवदने ॥

केली बहु उपोषणे शंभु भ्रताराकारणें ॥ जय. ॥३॥

लीला दाखविसी दृष्टी ।। व्रत करिसी लोकांसाठी ॥

पुन्हा वरिसी धूर्जटी ॥ मज रक्षावे संकटी॥ जय. ॥४॥

काय वर्ण तव गुण ॥ अल्पमति नारायण ॥

माते दाखवी चरण ।। चुकवावे जन्ममरण ।।

जय देवी हरितालिके ॥ सखी पार्वती अंबिके ।।

आरती ओवाळितें ।॥ ज्ञानदीपकळीके जय. ।।५ ।।

—————————————————————————————————————————————

आरती देवीची

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी ॥

अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥

वारी वारी जन्ममरणाते वारी ॥

हारी पडलो आता संकट नीवारी ॥१॥

जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी ।।

सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥धृ॥

त्रिभुवनभुवनी पहाता तुजऐसी नाही ।।

चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।।

साही विवाद करिता पडले प्रवाही ।।

ते तू भक्तालागी पावसि लवलाही ॥ जय. ॥ २॥

प्रसन्नवदने प्रसन्न होती निजदासा ।।

क्लेशापासुनी सोडी तोडी भवपाशा अंबे तुज-वाचून कोण पुरविल आशा ।।

नरहरी तल्लीन झाला पदपंकज लेशा ॥३॥


आरती शंकराची

लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा।

विषे कंठी काळा त्रिनेत्री ज्वाळा ।।

लावण्यसुंदर मस्तकी बाळा ।।

तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥१॥

जय देव जय देव श्रीशंकरा ।।

आरती ओवाळी तुज कर्पूरगौरा ॥धृ॥

कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।।

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।।

विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ।।

ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥२॥

देवी दैत्यी सागरमंथन पै केले ॥

यामाजी अवचित हलहल उठिले।

तें त्वां असुरपणे प्राशन केले ॥

नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ ३ ॥

व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ॥

पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥

शतकोटींचे बीज वाचे उच्चारी ॥

रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥४॥


॥ श्री गणपतीस्तोत्रम् ।।

॥ श्री गणेशाय नमः ।॥ नारद उवाच ॥

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।।

भक्तावासं स्मरेन्नित्यमायुः कामार्थसिद्धये ॥१॥

प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम् ।।

तृतीय कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ॥२॥

लंबोदरम् पंचम् च षष्ठं विकेटमेव च ।। सप्तमं

विघ्नराजेन्दं धूम्रवर्णं तथाष्टमम् ॥३॥

नवमं भालचंद्रं च दशमं तू विनायकम् ॥

एकादशं गणपतीं द्वादशं तु गजाननम् ॥४॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य पढेनरः ।।

न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥५॥

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् ।

पुत्रात्री लभते पुत्रान्मोक्षार्थी लभते गतिम् ॥६॥

जपेत् गणपतिस्तोत्रम् षडभिर्मासैः फलं लभेत् ।।

संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥७ ।।

अष्टम्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत ।।

तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ॥८॥

इति श्री नारद पुराणे संकटनाशननाम

श्री गणपति स्तोत्रं संपूर्णम् ।।


श्री महालक्ष्मीची आरती

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।

वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥

करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।

पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।

कमलाकारें जठरी जन्मविला धाता।

सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥

जय देवी जय देवी…॥

मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।

झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।

माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।

शशिकरवदना राजस मदनाची जननी॥

जय देवी जय देवी…॥

तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।

सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।

गायत्री निजबीजा निगमागम सारी।

प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥

जय देवी जय देवी…॥

अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।

मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।

वारी मायापटल प्रणमत परिवारी।

हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥

जय देवी जय देवी…॥

चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।

लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।

पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।

मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥

जय देवी जय देवी…॥


मंत्रपुष्पांजलि

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्।

ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः संति देवाः।

ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे।

स मे कामान् कामकामाय मह्यं । कामेश्वरो वैश्रवणोददातु ।

कुबेराय वैश्रवणा महाराजाय नमः । ॐ स्वस्ति साम्राज्यं

भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं

राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या ईस्यात् सार्वभौमः

सार्वायुष आंतादापरार्धात् । पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति ।

तदप्येषः श्लोकोऽ भिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्या वसन गृहे ।

अविक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासद इति ।

एकदन्ताय विघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।

तन्नो दंति प्रचोदयात् ।

।। मंत्रपुष्पांजलिम् समर्पयामि ।।


आरती श्री कृष्णाची

ओवाळू आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरा गळा वैजयंतीमाळा ।।ध्रु।।
चरणकमल ज्याचे ति सुकुमार । ध्वजवज्राकुश ब्रीदाचे तोडर ।। ओवाळू।।1।।
नाभिकमल ज्याचे ब्रह्मचर्याचे स्थान । हृदयी पदक शोभे श्रीवत्सल छान ।। ओवाळू।।2।।
मुखकमल पाहता सुखिचिया कोटी । वेधले मानस हारपली दृष्टी ।। ओवाळू।।3।।
जडित मुगट ज्याचा देदीप्यमान । तेणे कोंदले अवघे त्रिभुवन ।। ओवाळू।।4।।
एका जनार्दनी देखियले रूप । पाहता जाहले अवघे तद्रूप ।ओवाळू।।5।।


आरती संग्रह मराठीतून पीडीएफ | Aarti Sangrah Marathitun PDF

अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा

Leave a Comment