10 वी नंतर कोणते कोर्स करावे

Instagram Group Join Now
Telegram Group Join Now

10 वी नंतर कोणते कोर्स करावे

10 वी नंतर कोणते कोर्स करावे नमस्कार मित्रांनो माझे नाव राहुल आणि आज आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत की दहावीनंतर कोणते करिअर निवडावे व करिअर ऑप्शन कुठले असावे जेणेकरून आपले भविष्य हे उज्वल बनेल.

जर पाहिला गेले तर प्रत्येकाच्या मनात भीती असते की आपण दहावीनंतर काय करावे. कोणाला वाटते की माझे गणित फारच कच्चे आहे मग मी कॉमर्स साईडला जावे का? कोणाला असे वाटते की मला विज्ञान विषयात फार रुची म्हणजेच आवड आहे. तर मग काही विद्यार्थी असे विचार करतात की आपण बारावीसाठी विज्ञान शाखेत जावे.

हा एक जीवनातला खूप मोठा टप्पा आहे. यामध्ये आपण फक्त एकच विचार करत असतो की मला एक चांगलं करिअर घडवायचा आहे. आणि मग आपण इतरांची सल्ले घेतो तसेच करिअर मार्गदर्शन घेण्यासाठी आपण मोठ्यांकडून सल्ले घेतो.

यामध्ये आपल्याला भीती फार वाटत असते की मला पुढची जमेल की नाही तर माझं वैयक्तिक मत असे आहे की आपण पुढचा विचार न करता आपण सध्या काय करायचे आहे आपल्याला याचा आपण पूर्णपणे रोड मॅप तयार करायला पाहिजे म्हणजेच प्लॅनिंग करायला पाहिजे. दहावी नंतर पाहायला गेले तर अनेक प्रकारचे कोर्सेस पण उपलब्ध आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नसते.

10 वी नंतर लगेच नोकरीसाठी कोणते कोर्स करावे?

तर दहावीनंतर आपण अकरावी बारावी तसेच वाणिज्य शाखा आणि अजून एक शाखा आहे ती म्हणजे आयटीआय आता (ITI) काय हे आपण पाहूयात आयटीआय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) जर आपण पाहायला गेलं तर आयटीआयचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्य शिकवून रोजगार मिळवून देणे हा आहे. याच्यामध्येही अनेक प्रकारचे ट्रेड्स असतात.

जसे की तांत्रिक ट्रेड्स: इलेक्ट्रिशियन फिटर वेल्डर मशीन ईस्ट वायरमन डिझेल मेकॅनिक इत्यादी. आणि अ तांत्रिक ट्रेड्स म्हणजेच स्टेनोग्राफी, कॉम्प्युटर ऑपरेटर (COPA), इत्यादी.

आता आपण जाणून घेऊयात आयटीआयचे फायदे काय आहेत ते.
1) नोकरी लवकर मिळते. आणि आयटीआय कोर्स हा एक किंवा दोन वर्षाचा असतो. तुम्हाला हापू कोर्स पूर्ण केल्यानंतर लगेच जॉब मिळण्याची शक्यता असते.
2) याच्यामध्ये थेरी पेक्षा प्रॅक्टिकल वर फार भर दिला जातो.
आणि हेच आपल्याला भविष्यात उपयोगी पडते.
3) आयटीआय कोर्सची फी पण इंजिनिअरिंग किंवा दुसरी डिग्री करण्यापेक्षा खूप कमी असते.
4) आयटीआय कोर्स हा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये पण संधी मिळते. जसे की रेल्वे, एसटी परिवहन मंडळामध्ये गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये आयटीआय विद्यार्थ्यांसाठी जागा असतात.
5) अप्रेंटिसेशिप ची पण संधी खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये ट्रेनिंग मिळते. तर याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरीयन्स आणि थोडासा पगार दिला जातो.
6) तुम्ही स्वतःचा एक व्यवसाय देखील सुरू करू शकता जसे की इलेक्ट्रिक वर्कशॉप असेल वेल्डिंग शॉप असेल गॅरेज असेल इसी रिपेअर असेल.

10 वी नंतरचे बेस्ट कोर्सेस 2026

उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड

10 वी पास झाल्यानंतर पुढे काय करायचे हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याला पडतो. योग्य कोर्स निवडला तर तुमचे करिअर मजबूत बनू शकते.

  1. सायन्स (Science)
    जर तुम्हाला डॉक्टर, इंजिनिअर किंवा टेक्निकल फील्डमध्ये जायचे असेल, तर सायन्स हा बेस्ट पर्याय आहे. पुढे मोठ्या करिअर संधी मिळतात.
  2. कॉमर्स (Commerce)
    बँकिंग, अकाउंटिंग, CA किंवा बिझनेस क्षेत्रात इंटरेस्ट असेल तर कॉमर्स निवडणे फायदेशीर ठरेल.
  3. आर्ट्स (Arts)
    क्रिएटिव्ह फील्ड, सरकारी नोकरी, पत्रकारिता किंवा टीचिंगमध्ये जायचे असल्यास आर्ट्स चांगला पर्याय आहे.
  4. डिप्लोमा (Polytechnic)
    10 वी नंतर थेट इंजिनिअरिंग डिप्लोमा करून लवकर करिअर सुरू करू शकता. प्रॅक्टिकल स्किल्स मिळतात.
  5. ITI कोर्सेस
    कमी वेळात स्किल शिकून जॉब मिळवायचा असेल तर ITI खूप उपयोगी आहे. इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक सारखे ट्रेड्स लोकप्रिय आहेत.
  6. पॅरामेडिकल कोर्सेस
    हेल्थ सेक्टरमध्ये काम करायचे असल्यास हे कोर्सेस चांगले ऑप्शन आहेत.
  7. कॉम्प्युटर कोर्सेस
    आजच्या डिजिटल युगात Web Design, Coding, Graphic Design यांना खूप मागणी आहे.
  8. स्किल-बेस्ड कोर्सेस
    Digital Marketing, Animation, Video Editing सारखे कोर्सेस करून फ्रीलान्सिंगही करता येते.
  9. हॉटेल मॅनेजमेंट
    हॉटेल आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीत करिअर करायचे असल्यास हा कोर्स चांगला आहे.
  10. योग्य निवड कशी करावी?
    कोर्स निवडताना तुमची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी लक्षात घ्या. घाईत निर्णय घेऊ नका.

10 वी नंतर डिप्लोमा की 11वी? योग्य निर्णय कसा घ्यावा

10 वी नंतर अनेक विद्यार्थ्यांना हा मोठा प्रश्न पडतो — डिप्लोमा करावा की 11वी (Science/Commerce/Arts) मध्ये प्रवेश घ्यावा?

11वी (Junior College) निवडल्यास

जर तुम्हाला पुढे डॉक्टर, इंजिनिअर, CA, UPSC किंवा ग्रॅज्युएशन करायचे असेल, तर 11वी हा योग्य मार्ग आहे.

डिप्लोमा (Polytechnic) निवडल्यास

जर तुम्हाला टेक्निकल फील्डमध्ये लवकर करिअर सुरू करायचे असेल, तर डिप्लोमा उत्तम आहे. 3 वर्षांत इंजिनिअरिंग बेसिक्स शिकता येतात. नंतर तुम्हाला इंजीनियरिंग करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन घेऊन जाते.

कालावधी आणि शिक्षण पद्धत

11वी-12वी नंतर पुढे 3-4 वर्षांचे शिक्षण लागते.

डिप्लोमामध्ये सुरुवातीपासून प्रॅक्टिकल आणि स्किल-बेस्ड शिक्षण मिळते.

करिअर संधी

11वी नंतर अनेक क्षेत्रांमध्ये संधी खुल्या होतात.

डिप्लोमा नंतर थेट जॉब किंवा पुढे इंजिनिअरिंग (Degree) मध्ये प्रवेश घेता येतो.

कोणासाठी काय योग्य?

अभ्यासात रस आणि मोठे करिअर गोल्स असल्यास → 11वी निवडा

प्रॅक्टिकल काम आणि टेक्निकल स्किल्स आवडत असल्यास → डिप्लोमा निवडा, किंवा आयटीआय निवडा

खर्च आणि वेळ

डिप्लोमा/आयटीआय कमी वेळात आणि कमी खर्चात पूर्ण होतो.

11वी-12वी + Degree ला जास्त वेळ आणि खर्च लागतो.


अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा


Leave a Comment