घरबसल्या अभ्यास कसा करावा – आजच्या डिजिटल युगात घरबसल्या अभ्यास हा फक्त पर्याय राहिलेला नाही, तर अनेकांसाठी तो एक प्रभावी आणि सोयीस्कर मार्ग बनला आहे. पण घरात बसून अभ्यास करणे जितकं सोपं वाटतं, तितकंच ते आव्हानात्मकही असू शकतं. टीव्ही, मोबाईल, सोशल मीडिया, आणि घरातील गडबड या सगळ्यांमध्ये लक्ष केंद्रित ठेवणं खूप अवघड होतं.
मग प्रश्न असा येतो घरबसल्या अभ्यास नेमका कसा करावा, ज्यामुळे तो परिणामकारक आणि टिकाऊ ठरेल? चला, काही सोप्या पण प्रभावी टिप्स पाहूया.

अभ्यासासाठी निश्चित जागा ठरवा
घरात एक शांत आणि व्यवस्थित जागा निवडा, जिथे तुम्ही रोज अभ्यास करू शकता. ती जागा तुमच्यासाठी अभ्यासाची सवय तयार करते. शक्यतो बेडवर अभ्यास करू नका त्यामुळे झोप येण्याची शक्यता वाढते. काही विद्यार्थी बरोबर संध्याकाळी भरपूर जेवण करून अभ्यासाला बसतात त्यामुळे आळस येतो व झोप लागते.खेडेगावामध्ये बरेच विद्यार्थी रानामध्ये झाडाखाली बसून अभ्यास करतात.
ते खरेच झाडाखाली बसून अभ्यास करणे हे खूप छान वाटते.तर सांगायचे तात्पर्य आहे की ज्या ठिकाणी तुमचे मन अभ्यासांमध्ये लागते अशी जागा निवडावी जेणेकरून आपल्यालाही लक्षात राहते आणि चांगले मार्क्स ही मिळतात परीक्षेमध्ये.
घरात कुठेही बसून अभ्यास केल्यास मन विचलित होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून एक ठरलेली, शांत आणि स्वच्छ जागा निवडा.
- टेबल-खुर्चीचा वापर करा
- पुरेसा प्रकाश आणि हवेशीर वातावरण ठेवा
- त्या जागेला अभ्यासाची जागा म्हणून मेंदूला सवय लावा
वेळेचे योग्य नियोजन करा
घरबसल्या अभ्यास करताना सर्वात मोठी अडचण म्हणजे कधीकधी वेळ वाया जाणे.
रोजचा अभ्यासाचा टाइमटेबल तयार करा – बरेच विद्यार्थी टाईम टेबल तयार करतात पण त्यानुसार अभ्यास करत नाहीत तर आपण टाईम टेबल नुसार आपल्याला पण बदल करायला हवा.जर आपण टाईम टेबल नुसार अभ्यास केला तर आपला अभ्यासही चांगला होतो आणि आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पण मिळतात.
25-30 मिनिटांचे फोकस सत्र”ठेवा (Pomodoro Technique)
मध्ये छोट्या विश्रांती घ्या- मध्ये छोटे छोटे विश्रांती घेणे म्हणजेच थोडासा विश्राम घेणे होय यामध्ये तुम्ही एक छोटसं गीत ऐकू शकतात व लगेच आपण अभ्यासाला लागले पाहिजे.यामुळे थकवा कमी होतो आणि एकाग्रता वाढते.
घरबसल्या अभ्यास कसा करावा
विचलन टाळा
मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया—हे सगळे अभ्यासाचे शत्रू आहेत.बरेच विद्यार्थी अभ्यास करताना मोबाईलवर एखादी रील पाहणे किंवा एखादी व्हिडिओ पाहणे तसेच एखादा कार्यक्रम पाहणे यामुळे बराच वेळ वाया जातो हे कळत नाही यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते आणि याचा परिणाम आपल्या भविष्यावर होऊ शकतो त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे टाईम टेबल बनवणे गरजेचे आहे. किंवा आपण ठरवले पाहिजे की आपल्याला एखादी गोष्टीसाठी किती वेळ दिला पाहिजे.
खाली काही टिप्स दिले आहेत.
- अभ्यास करताना मोबाईल सायलेंटवर ठेवा
- गरज असेल तर “Focus apps” वापरा.
- कुटुंबीयांना अभ्यासाच्या वेळेबद्दल आधी सांगा.
योग्य अभ्यास सामग्री निवडा
घरबसल्या अभ्यासासाठी योग्य resources असणे महत्त्वाचे आहे.
पुस्तके, नोट्स, आणि ऑनलाइन व्हिडिओज यांचा समतोल वापर करा-घरबसल्या अभ्यासासाठी आपल्याला योग्य ते नोट्स पुस्तके तसेच ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर्स हवे आहेत. म्हणजे आपल्याला जर एखादी गोष्ट पुस्तकातून समजत नसेल तर आपण एखादी व्हिडिओ पाहून किंवा नोट्स पाहून पण आपण आपले विषयातील पॉईंट्स कव्हर करू शकतो.
एकाच विषयासाठी अनेक sources वापरण्याऐवजी, निवडक आणि विश्वासार्ह सामग्री वापरा.
नोट्स बनवण्याची सवय लावा
फक्त वाचणे पुरेसे नाही—लिहिणे आवश्यक आहे.
स्वतःच्या भाषेत छोटे-छोटे नोट्स तयार करा- बऱ्याच जणांना आयते खाण्याची सवय लागलेली असते मला हे म्हणायचे की बऱ्याच विद्यार्थ्यांना सर्व काही रेडिमेड हवे असते.यामध्ये बरेच विद्यार्थी आपल्या फ्रेंड सर्कल मधून नोट्स घेतात आणि तेच वाचतात पण ते त्यांनी काढलेले असते ते त्यांना समजते त्यामुळे आपण आपल्या नोट्स काढणे फायदेशीर ठरते. मग ज्यावेळेस आपण ते वाचायला जातो त्यावेळेस आपल्याला काही समजत नाही तर यासाठी उत्तम पर्याय म्हणजे आपल्याला छोटे छोटे पॉईंट्स चे नोट्स बनवणे गरजेचे असते व आपण काढलेले नोट्स हे आपल्याला समजतात व परीक्षेत चांगले मार्क्स मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे नोट्स काढण्याची सवय लावून घेणे गरजेचे आहे.
diagrams, charts वापरून विषय सोपा करा- काही विद्यार्थ्यांना डायग्राम काढून आणि चार्टचा वापर करून नोट्स काढणे ही पण एक चांगली सवय आहे कारण की डायग्राम आणि चार्ट्सला पण परीक्षेमध्ये मार्क मिळतात आणि डायग्राम काढून आणि चॅट्स काढून त्याची जर आपण विश्लेषण पेपरमध्ये मांडले तर आपल्याला खूप चांगले मार्क्स मिळतात.
revision करताना हे नोट्स खूप उपयोगी पडतात.पेपरच्या वेळेस रिव्हिजन करताना आपल्याला आपण काढलेला नोट्स उपयोगी ठरतात यामुळे आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि आपला पेपर चांगला जातो.
note-नोट्स काढताना आपण चांगले हस्ताक्षर काढणे तसेच पॉईंट्स वाईज काढणे गरजेचे आहे.
नियमित पुनरावृत्ती (Revision) करा
एकदा शिकलेली गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी revision गरजेचे आहे.
अभ्यास करताना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रिविजन आहे आता रिविजन म्हणजे आपल्याला एखाद्या चाप्टर असेल किंवा एखादा विषय असेल तर त्याचा आपल्याला पुनरावृत्ती करणे गरजेचे आहे.
- आठवड्यातून एक दिवस फक्त revision साठी ठेवा. या रिविजन चा उपयोग तुम्हाला पेपर मध्ये होऊ शकतो कारण पेपर मध्ये कसे प्रश्न येतील हे तुम्हाला माहीत नसतं पण रिविजन केल्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये आठवण्यास मदत मिळते की आपण त्यावेळेस काय वाचले होते.
- जुने विषय पुन्हा पाहा- सर्वच विषय सोपे असतात असे नाही आपल्याला सर्व विषय वाटतात पण त्यातील एखादा विषय असतोच की तो तुम्हाला अवघड जातो मग त्या विषयाकडे जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे मग त्याच विषयाची वारंवार रिविजन मारणे गरजेचे आहे.
- mock tests सोडवा- मॉक टेस्ट सोडवल्यामुळे आपल्याला प्रश्नपत्रिका चे स्वरूप समजते व प्रश्न कशा पद्धतीचे असतात हे समजल्यामुळे आपल्याला पेपर चांगल्या पद्धतीने कव्हर करता येतो. यामध्ये mcq सारखे प्रश्न असतात ते देखील तुम्हाला उपयोगी ठरतात.
स्वतःला motivate ठेवा
घरबसल्या अभ्यास करताना motivation कमी होणे स्वाभाविक आहे.विद्यार्थ्यांनी हे स्वतःला मोटिवेट करून घेणे गरजेचे असते आपण त्यावेळेस खचतो ज्यावेळेस आपल्याला एखादा पॉईंट समजले नसतो त्यामुळे आपल्याला तो विषय खूप अवघड वाटतो पण घाबरण्याची कारणे असते जर तुम्ही हार मारली तर तुम्ही कधीच सक्सेस होणार नाही त्यासाठी आपल्याला स्वतःला मोटिवेट करणं गरजेचे आहे मोटिवेशन साठी तुम्ही एखादी व्हिडिओ पाहू शकतात तसेच एखादे मोटिवेशनल सॉंग देखील ऐकू शकतात यामुळे आपल्याला प्रेरणा मिळते व आपण पुन्हा जोमाने अभ्यासाला लागू शकतो.
- छोटे goals ठेवा आणि पूर्ण केल्यावर स्वतःला reward द्या- मुख्यतः गोल चे दोन प्रकार पडतात एक म्हणजे शॉर्ट टर्म गोल आणि लॉंग टर्म गोल.
शॉर्ट टर्म गोल हे आपले लिमिटेड टाईम साठी असते आणि लॉंग टर्म गोल हे आपले भविष्यातील प्लॅनिंग असते. याचे एक उदाहरण म्हणजे मला आताच्या परीक्षेत चांगल्या पद्धतीने पास व्हायचे मग त्यासाठी अभ्यासाचे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. जर तुम्ही व्यवस्थित रित्या प्लानिंग केलं आणि टाईम टेबल बनवले. तर तुम्ही तुमचे शॉर्ट टर्म गोल अचीव केले असे होईल आणि यासाठी तुम्ही स्वतःला रिवॉर्ड पण द्यायला हवेत. - positive mindset ठेवा- पॉझिटिव्ह mindset म्हणजेच आपण सकारात्मक राहणे गरजेचे आहे आता सकारात्मक राहणे म्हणजे काय तर सतत आपण चांगले विचार ठेवणे गरजेचे आहे जर आपण म्हटले की मला हा विषय अवघड जातोय आणि मी पास नाही होणार तर मग माझी विचारसरणी पण तसेच होईल आणि मी नापास होईल याला म्हणतात निगेटिव्ह mindset
तर निगेटिव्ह न राहता आपण सतत पॉझिटिव्ह राहणे गरजेचे आहे. - यशस्वी लोकांच्या कथा वाचा- यासाठी आपल्याला थोर माणसांच्या, संतांच्या प्रेरणादायी गोष्टी तसेच त्यांची पुस्तके वाचणे गरजेचे असते. यामुळे आपल्याला जीवनामध्ये कसे वागायचे तसेच आपल्याला हे चांगली प्रेरणा मिळते.
मोबाईलवर अभ्यास कसा करावा
अनेक विद्यार्थी मोबाईलवर टाईमपास रील्स पाहत असतात. तर असे न करता जर आपण मोबाइल चा चांगला वापर केला तर आपण अभ्यास छान रित्या करू शकतो. मोबाईल वर अभ्यास करण्यासाठी अनेक apps आहेत. त्याचा वापर करून अभ्यास करू शकतात.
शारीरिक आणि मानसिक आरोग्य सांभाळा
अभ्यासाबरोबरच आरोग्यही महत्त्वाचे आहे. जर शरीर साथ देत नसेल तर मग त्या अभ्यासाचे काय उपयोग. बरेच विद्यार्थी फक्त अभ्यासाच्या मागे लागतात आणि आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. अभ्यासाबरोबर शरीराकडे ही लक्ष देणे गरजेचे असते. तर यासाठी नियमित व्यायाम करा. व्यायाम करताना देखील वेडेवाकडे व्यायाम करणे घातक ठरते तर त्यासाठी प्राणायाम करा कपालभाती करा मेडिटेशन करा जेणेकरून यांनी आपली बुद्धी चांगल्या पद्धतीने चालेल व एकाग्रता वाढेल. पुरेशी झोप घ्या झोप देखील खूप महत्त्वाची आहे वेळच्यावेळी जेवण करा आणि लवकर झोपून सकाळी लवकर उठून अभ्यास करणे फायदेशीर ठरते सकाळी केलेला अभ्यास हा आपल्याला दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतो आणि याचा फायदा परीक्षांमध्ये होतो.
संतुलित आहार घ्या- परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थी बरेच खातात त्यामुळे आळस येतो आणि आपल्याला लवकर झोप लागते व आपला अभ्यास देखील होत नाही यासाठी आपल्याला परीक्षेच्या काळामध्ये अल्पहार घेतला पाहिजे जेणेकरून आपल्याला आळस येणार नाही आणि आपला अभ्यास देखील चांगला होईल आहारामध्ये फळे दूध घेणे गरजेचे आहे यामुळे आपल्याला एनर्जी मिळते व आपले शरीर देखील सुदृढ राहते.
यातून एक तात्पर्य आहे.
घरबसल्या अभ्यास करताना सुरुवातीला थोडी अडचण येईल, पण सातत्य ठेवल्यास तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. लक्षात ठेवा शिस्त, नियोजन आणि मेहनत यांची साथ असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा