ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय?| OS in Marathi आजच्या डिजिटल युगामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिव्हायसेस (Devices) वापरत असतो. तर ही उपकरणे RUN करण्यासाठी एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलेले आहे त्यालाच आपण ऑपरेटिंग सिस्टम (OS) असे म्हणतो. Operating System हे एक सिस्टीम सॉफ्टवेअर (System Software) आहे.
ऑपरेटिंग सिस्टमला यंत्रासाठीचे प्लॅटफॉर्म असेही म्हटले जाते. यूजरला तयार ॲप्लिकेशन्स वापरायची असल्यास, किंवा अगदी सिस्टम विकासाची साधने व भाषांचा वापर करायचा असल्यासही, त्या यंत्रावर ऑपरेटिंग सिस्टम असणे आवश्यक असते.
ऑपरेटिंग सिस्टमद्वारे अनेक महत्त्वाची कार्ये पार पाडली जातात, जसे की मेमरी व्यवस्थापन, I/O व्यवस्थापन, CPU जॉब शेड्यूलिंग इत्यादी.

ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय?
ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे संगणकातील असे सॉफ्टवेअर जे युजर आणि हार्डवेअर यांच्यामध्ये मध्यस्थ (Interface) म्हणून काम करते.

सोप्या भाषेत सांगायचे तर:
Operating System शिवाय संगणक किंवा मोबाईल चालूच शकत नाही.
जेव्हा आपण संगणकाला एखादा आज्ञा (Command) देतो, तेव्हा Operating System तो आदेश हार्डवेअरपर्यंत पोहोचवते आणि योग्य आउटपुट देते.
उदाहरणार्थ:
- आपण मोबाईलमध्ये ॲप उघडतो
- संगणकात फाईल सेव्ह करतो
- इंटरनेट वापरतो
हे सर्व काम Operating System मुळे शक्य होते.
Operating System चे प्रकार
1. Batch Operating System | बॅच ऑपरेटिंग सिस्टिम
बॅच म्हणजे वापरकर्त्यांच्या कामांचा क्रम. या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये, जॉबचा क्रम ऑपरेटरद्वारे निश्चित केला जात असे. या प्रणालीमध्ये, कामे (Jobs) बॅच प्रोसेसिंग प्रणालीकडे (BPS) सादर केली जात असत. Batch OS मध्ये सर्व Jobs आधी जमा केल्या जातात. नंतर Operating System त्या Jobs ला क्रमाने Process करते.
उदाहरण:
- 100 विद्यार्थ्यांचे Result तयार करणे
- मोठ्या प्रमाणात Bill Printing
- Payroll System
ही सर्व कामे एकत्र करून Batch मध्ये चालवली जातात.
2. Time Sharing Operating System | टाईम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टिम
Time Sharing Operating System म्हणजे अशी प्रणाली ज्यामध्ये अनेक Users किंवा अनेक Programs एकाच वेळी संगणकाचा वापर करू शकतात. ही Operating System CPU चा वेळ छोट्या भागांमध्ये विभागते आणि प्रत्येक Program ला थोडा-थोडा वेळ देते.म्हणून User ला असे वाटते की सर्व कामे एकाच वेळी चालू आहेत.
3. Real-Time Operating System (RTOS) | रियल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम
Real Time Operating System म्हणजे अशी Operating System जी दिलेल्या वेळेमध्ये अचूक Output देते. यामध्ये वेळेला खूप महत्त्व असते.जर सिस्टमने योग्य वेळेत Response दिला नाही, तर संपूर्ण System Fail होऊ शकते. जिसकी ही सिस्टीम मध्ये error येऊ शकतो.
रियल टाईम ऑपरेटिंग सिस्टिम चे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे हार्ड रियल रियल टाईम सिस्टीम आणि दुसरे म्हणजे सॉफ्ट रियल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम.
ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय?| OS in Marathi
हार्ड रियल रियल टाईम सिस्टीम– यामध्ये प्रत्येकासाठी हा टाईम स्ट्रिक्टली आलो कट केला जातो. जर एखादी काम हे दिलेल्या वेळेत झाली नाही तर सिस्टीम मध्ये एरर येऊ शकतो म्हणजेच सिस्टीम फेल होऊ शकते.
जर आपण याचे उदाहरण पाहिले तर एअर ट्रॅफिक कंट्रोल मेडिकल सिस्टीम मध्ये आणि एअरबॅक सिस्टीम मध्ये याचा वापर केला जातो.
सॉफ्ट रियल टाईम ऑपरेटिंग सिस्टीम– यामध्ये सिस्टम मध्ये थोडासा उशीर म्हणजेच जर एखाद्या काम आपण ओपनिंग स्टीमला दिले व ते काम थोडं होत असेल तर सिस्टीम मध्ये थोडा उशीर झाला तर काही मोठी समस्या होत नाही किंवा एरर येत नाहीत फॉर एक्झाम्पल व्हिडिओ स्ट्रीमिंग जिसके आपण यूट्यूबला एखादी व्हिडिओ पाहतो तर आपली व्हिडिओ स्ट्रीम होते पण पुन्हा लोड होऊन स्ट्रीमिंग व्हिडिओ चालू होते तसेच दुसरे उदाहरण म्हणजे ऑनलाईन गेमिंग असेल.
4. Mobile Operating System | मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम
मोबाईल ऑपरेटिंग चा उपयोग मुख्यतः मोबाईल डिवाइस तयार करण्यासाठी वापरला जातो जसे की आजच्या युगामध्ये अँड्रॉइड फोन्स आयओएस नोट पॅड यामध्ये ही ऑपरेटिंग सिस्टिम केले जाते.
Functions of an Operating System | ऑपरेटिंग सिस्टमची कार्ये
संगणक प्रणालीच्या सुरळीत कामकाजासाठी पार पाडल्या जाणाऱ्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यांची जबाबदारी ऑपरेटिंग सिस्टमवर असते. खालील यादीमध्ये ऑपरेटिंग सिस्टमची कार्ये दर्शविली आहेत.
- इनपुट उपकरणांकडून मेमरीमध्ये इनपुट हस्तांतरित करणे.
- मेमरीमधून CPU कडे इनपुट हस्तांतरित करणे.
- प्रक्रिया केलेला डेटा CPU कडून आउटपुट उपकरणांकडे पाठवणे.
- इनपुट तसेच आउटपुटच्या वेळी स्क्रीनवर संदेश प्रदर्शित करणे.
- इनपुट आणि आउटपुट उपकरणांवर नियंत्रण ठेवणे.
- ॲप्लिकेशन प्रोग्राम्सना साठवणूक उपकरणांतून (Storage Devices) मुख्य मेमरीमध्ये लोड करणे.
- एका साठवणूक उपकरणातून दुसऱ्या उपकरणात डेटाची प्रत करणे (Copy) किंवा तो हलवणे (Move).
- पेरिफेरल्स (Peripherals) आणि प्रक्रियांची सद्यस्थिती दर्शवून, योग्य त्रुटी संदेश (Error Messages) प्रदर्शित करणे.
- प्रोग्राम्स आणि वापरकर्त्याच्या सूचनांची अंमलबजावणी करणे.
- साठवणूक उपकरणांचे ‘ओव्हररायटिंग’पासून (Overwriting) संरक्षण करणे.
Operating Systems Services | ऑपरेटिंग सिस्टम कोण कोणत्या सेवा देते
ऑपरेटिंग सिस्टम हे असे एक वातावरण निर्माण करते, जे प्रोग्राम्सच्या अंमलबजावणीसाठी (execution) योग्य असते. संपूर्ण प्रणालीच्या सुरळीत कामकाजासाठी, ऑपरेटिंग सिस्टम अनेक सेवा पुरवते.
वापरकर्त्यांच्या सोयीसाठी ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे पुरवल्या जाणाऱ्या प्रमुख सेवा खालीलप्रमाणे आहेत:
- User Interface | वापरकर्ता इंटरफेस
- Program Execution | प्रोग्राम अंमलबजावणी
- Input/output Operations | इनपुट/आउटपुट कार्ये
- File System Manipulation | फाइल प्रणाली व्यवस्थापन
- संवाद (Communications)
- Error Detection | त्रुटी शोधन
- Resource Allocation | संसाधनांचे वाटप
- लेखांकन (Accounting)
- Protection and security | संरक्षण आणि सुरक्षा
Operating System ची उदाहरणे
विविध प्रकारच्या उपलब्ध ऑपरेटिंग सिस्टिम्स आहेत त्यापैकी महत्त्वाच्या सिस्टिम्स पुढील प्रमाणे आहेत
संगणकासाठी वापरण्यात येणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम
- Microsoft Windows
- Linux
- MS-DOS
- macOS
- UNIX
मोबाईलसाठी वापरण्यात येणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम
- Android
- Windows Phone
- BlackBerry OS
- Symbian OS
- Tizen OS
- KaiOS
- iOS
ऑपरेटिंग सिस्टमचे फायदे (Advantages)
1. संगणक वापरणे सोपे होत आहे.
सर्वांना संगणक वापरणे सोपे झाले आहे कारण आपण आता पाहत आहोत की लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम मार्केट मध्ये आलेले आहे. त्यामुळे संगणक काला खूपच डिमांड आलेला आहे.
2. मेमरी व्यवस्थापन करते
ऑपरेटिंग सिस्टम जसे की CPU मधील RAM, ROM, HDD आणि इतर स्टोरेज हे योग्य प्रकारे मेमरीच व्यवस्थापन करण्याचे काम ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे करण्यात येते.
3. एकावेळी अनेक कामे करण्यासाठी म्हणजेच (Multitasking)
ऑपरेटिंग सिस्टिम मुळे आपण एका वेळेस अनेक कामे करू शकतो जसे की म्युझिक ऐकणे ब्राउझिंग करणे तसेच डॉक्युमेंट्स तयार करणे गेमिंग खेळणे इत्यादी.
4. Error Handling चे काम देखील उत्तम रित्या हँडल करते
डे टू डे लाइफ मध्ये आपल्या कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात त्यामुळे आपली सिस्टीम हँग होते तर ते योग्यरित्या हाताळण्याचे काम ऑपरेटिंग सिस्टम द्वारे केले जाते.
5. वेळ आणि मेहनत वाचवते
लेटेस्ट जनरेशन ओपनिंग सिस्टीम असल्यामुळे वेळेची बचत होते त्यामुळे युजर चे काम हे जलदरीत्या होते. त्यामुळे आपल्याला कमी वेळेत आणि अधिक मेहनत लागत नाही.
मल्टिप्रोग्रामिंग आणि मल्टिटास्किंग ऑपरेटिंग सिस्टिम्समधील फरक
| मल्टिप्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टीम | मल्टिटास्किंग ऑपरेटिंग सिस्टीम |
| अनेक कार्ये एकत्रित केली जातात आणि कार्यांचा एक संच (Pool) तयार केला जातो. त्यानंतर, प्रत्येक कार्य एकामागून एक execute केले जातात. | एकाच वेळी अनेक प्रोग्राम्स execute केले जातात. |
| प्रोग्राम्स एकामागून एक एक्सेकुट (कार्यान्वित) केले जातात. | एकाच वेळी अनेक प्रोग्राम्स एक्सेकुट (कार्यान्वित) होत असताना टाइम शेअरिंग तत्त्वाचा वापर केला जातो. |
| (मैन मेमोरी) अनेक जॉब्स असतात. | main मेमोरी अनेक प्रोग्राम्स असतात. |
| मेमोरी मॅनेजमेंट करून, त्याच कार्यक्रमाची अंमलबजावणी फोरग्राउंड आणि बॅकग्राउंडमध्ये केली जाते. | एकाधिक ॲप्लिकेशन्सचा वापर फोरग्राउंड आणि बॅकग्राउंडमध्ये केला जाऊ शकतो. |
अशाच प्रकारच्या पोस्ट वाचण्यासाठी क्लिक करा